मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या लांबलचक पोस्टी वरून मी आज हे शिकलेय की 'नाविन्यपूर्ण' ह्या शब्दातले 'वि' ऱ्हस्व असले तरी नावीन्य मधले 'वी' दीर्घ लिहितात. Lol

साभार : शुद्धलेखन ठेवा खिशात.

पुणे पोर्शे केसवर आधारीत मुलाखत>> बापरे बघितलं हे.. खरोखर भयंकर आहे.. काय करू शकतो आपण सामान्य माणसे? हा विचार मनात येऊन फार अस्वस्थ आणि हतबल वाटलं.. मुलांना आई बाबांचा ताई दादा काका आजी आजोबा यांच्याशी काही share कराव असा आधार राहिलाच नाहीय .. विशेषतः आई बाबांशी संवादच नाही .. फार वाईट वाटलं.

चिन्मयी सुमितची मुलाखत पाहिली त्यात खरेच तिची उलटी image दिसतेय पदर पण उलट्या बाजूच्या खांद्यावर आहे आणि घडयाळ उजव्या हातात व टॅटू डाव्या .. इतर विडिओ मध्ये हे उलट आहे.. ते पण मुद्दाम बघितलं मी जाऊन.. Proud Proud

अदिती शारंगधरची पण आलीय मुलाखत अजून पहिली नाही..

अदिती शारंगधरची मुलाखत>>>> मुलाखत कॉंट्रोव्हर्शिअल ठरण्याची शक्यता आहे. कारण मला गरोदरपणात बीअरचे डोहाळे लागले होते व मी डॉ.ला विचारून २ सिप बीअर पित होते असं तिने सांगितले. त्यावरून मीम बनले, लोकांनी ट्रोल केलं. आता अख्खी मुलाखत सोडून हीच माहिती बाईट म्हणून प्रसिद्ध केली यातच सगळं आलं.

काही काही मुलाखतकार एकदा प्रश्न विचारल्यावर येणाऱ्या उत्तराशी आपला काहीही संबंध नाही इतक्या कोरडेपणाने समोरच्याचे उत्तर थांबल्यावर लगोलग पुढच्या प्रश्नाकडे वळतात तर काहींना प्रत्येक उत्तरामागे आपले स्वताचे काहीतरी सांगायचे असते,पुढे पुढे तो मी पणा इतका वाढतो की नक्की मुलाखत कुणाची आहे तेच कळत नाही!!

या दोन्हीत सुयोग्य समतोल ठेवायला ज्याला जमतो त्याने घेतलेल्या मुलाखती रंगतात!!

फैयाझ फारच छान बोलल्या आहेत. निखळ आणि आरस्पानी प्रकारे सगळ्याचा आढावा घेत बोलल्या आहेत.
बेगम अख्तरांकडे शिकणं शक्य असून झालं नाही ही फॅक्ट सांगताना त्याच्या कारणांवर जराही फोकस जाऊ दिला नाही. एकदम लेव्हल हेडेड!

बेगम अख्तरांकडे शिकणं शक्य असून झालं नाही ही फॅक्ट सांगताना त्याच्या कारणांवर जराही फोकस जाऊ दिला नाही. एकदम लेव्हल हेडेड! >>>> १००+

धन्यवाद हर्पा. बघेन. Happy
मला फैय्याज नेहमीच निखळ, थेट, आरस्पानी वगैरे वाटतात. त्यांचे टपोरे-बोलके डोळे बघूनही तशाच असाव्यात असं वाटतं.

कारण मला गरोदरपणात बीअरचे डोहाळे लागले होते व मी डॉ.ला विचारून २ सिप बीअर पित होते असं तिने सांगितले. त्यावरून मीम बनले, लोकांनी ट्रोल केलं.
>>> ट्रोलींग चूक आहे. पण गरोदरपणात अल्कोहोल पिणे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी हानिकारक आहे हे वैद्यकीय सत्य आहे म्हणून वाचून अस्वस्थ वाटले. असं काही बोलून 'बेधडक' असणं सिद्ध करण्यात काय हशील आहे कळत नाही. आता उगाळायला बेवड्यांना निमित्त मिळणार, रिकामटेकड्यांना संस्कृती. 'प्रमाणात' वगैरे म्हणून सारवासारव होईल पण ऑनलाईन बघून प्रवृत्त होणाऱ्यांना याचं मार्गदर्शन कोण करणार. धोका अधोरेखित होणारच नाही.

ऑनलाईन बघुन प्रवृत्त होणार्‍यांना स्काय इज द लिमिट आहे. आपण वाचायला, स्वतः विचार करायला शिकलेलो नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट!

गरोदरपणात अल्कोहोल पिणे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी हानिकारक आहे हे वैद्यकीय सत्य आहे
>> तेच. अदितीची प्रकृती, तब्येत, डाएट वगैरे पाहून डॉक्टरांनी जरी दोनच सिप घ्यायला (किती काळ देव जाणे) परमिशन दिली असेल तरीही अंधानुकरण करणारे ती करत असलेल्या इतर हेल्दी गोष्टींचे अनुकरण नाही करणार. शिवाय इतकी पर्सनल गोष्ट जाहीर करण्यामागचा हेतू काय?

हो, ते झालं. पण दुसऱ्यांना गाडीखाली चिरडू शकतात, इतरांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात, त्याचं दुःख आहे. काही जबाबदाऱ्या 'शेअर्डच' असतात. सोशल मीडिया त्यापैकी आहे. जबाबदारीची जाणीव नको का ? भारतातल्या अर्ध्या जनतेकडे संसाधनं नाहीत, माहिती नाही, आरोग्यसेवा नाहीत, शिक्षण नाही. तरीही ज्याला हे सगळं मिळालं आहे, त्यानी किमान वक्तव्याची जबाबदारी घ्यायला हवी. बेजबाबदार विधाने 'कूल' असल्याचा आभास निर्माण करण्यात आला की चिडचिड होते. तुम्ही वेगळ्या प्रकारे 'कूल' असू शकताच की...!
Her ObGyn is also an idiot.

जबाबदारी नक्कीच घ्यायला हवी. पण घेत नाहीत आणि कधी घेतली जाईल असं वाटत ही नाही.
इन्स्टा, टिटटॉक, युट्युब, शॉर्ट्स, फेबु, व्हॉअ‍ॅ सगळीकडे नीरक्षीरविवेक वापरला नाही आणि वाट्टेल त्या गोष्टी फॉरवर्ड करत बसल्या, लाईक्स आणि सबस्क्रायबरच्या मागे लागलं की काय होतं ते दिसतंच आहे. हे फ्रस्ट्रेटिंग आहे. त्या मुलाखतीची लिंक द्या, खाली बेजबाबदार म्हणून आपण सगळे लाखोली वाहू. पण लोक इतके मंद आहेत की तसं केलं तरी हिट्स वाढल्या म्हणून नाचत सुटतील.

तू दोन सिप घ्यायचीस तर बाळ जन्मल्यावर बाळाच्या बाटलीत दोन थेंब टाकतच असशील ना? नसेल तर का नाही?

मला तर वाटते मुद्दामच अशी वादग्रस्त विधानं करतात. 'मला काही डोहाळे वगैरे लागले नव्हते, नेहमीचे मराठी पद्धतीचे जेवण' असे म्हटले तर मग त्या वरुन कोण कशाला चर्चा करणार आहे? बीअरचे डोहाळे म्हटले की कसे देशात लगेच लोकं दोन्ही बाजूनी सरसावतात. आता नेहमी पित असाल तर प्रेग्नंसीत 'प्यायचे नाही' म्हटल्यावर क्रेविंग येवू शकतेच पण तरी कॅफिनचे क्रेविंग म्हणून प्रमाणात कॉफी वेगळी आणि अल्कोहोल वेगळा. दूर रहाणेच उत्तम. दोन सिपची परवानगी देणारा डॉक्टर धन्यच!

तू दोन सिप घ्यायचीस तर बाळ जन्मल्यावर बाळाच्या बाटलीत दोन थेंब टाकतच असशील ना? नसेल तर का नाही? >> 'तू लहान असताना मी तुला तेच देत होते' ही जाहिरात आठवली.

बकुळ पंडीत - फैयाज ची मुलाखत फार आवडली. बकुळ पंडितांना मी पहिल्यांदाच पाहिलं. मुलाखतीच्या लिंक बद्दल धन्यवाद!

आदिती शारंगधर च्या मुलाखती आगोदर तिचं बियर बद्दलचं वक्तव्य बाहेर आलं. ते पाहता मुलाखत ऐकायची इच्छाच झाली नाही.

मित्र म्हणे वर आजकालच्या मुलांच्या नावावर भाग आलाय. माबो वरील नाम नामेति वरून स्फूर्ती घेऊन मुलाखतीचा विषय निवडला की काय, असं वाटलं. मुलाखत मनोरंजक आहे.

पहिल्या भागात बकुळ पंडीत दुसरं नाटक पाणिग्रहण एवढं सांगतात आणि पुढल्या नाटकाकडे चर्चा वळते. मला वाटले उगवला चंद्र पुनवेचा आता येणारच नाही काय. तसेच पावा वनी वाजतो, आणि फैयाज लावणी बद्दल बोलतील की नाही वाटले. पण दुसऱ्या भागात सगळे आले.

'साबण ' ऐकून मला थापा मारताहेत असा संशय आला, पण त्याचे स्पष्टीकरण ऐकल्यावर खरंच असू शकेल असं वाटलं.
नावांइतकीच शिंत्र्यांच्या विक्रमांची यादी रोचक आहे.

बकुळ पंडित, फैयाज यांची मुलाखत फारच आवडली. फैयाज किती मनापासुन बोलल्यात. दोघींचेही आवाज आता वयोमानामुळे कापतात. हे होणारच होतं तरी मनाला लागतं. पण तरीही आवाजातला गोडवा, दमदारपणा गेला नाहीये. बकुळ पंडितांच्या ‘उगवला चंद्र पुनवेचा‘ ची धार ८० टक्के कमी झालीये पण तरीही ऐकायला खूप छान वाटले. “पावा” तर त्यांनी फार म्हणजे फारच सुंदर गायले. फैय्याज यांनी निरागसतेने माईक, कॅमेरामुळे गाताना भिती वाटतीये हे सांगितल्यावर खूप गोड वाटले.
मुलाखत घेणारी पण बर्‍यापैकी चांगली आहे. एकीकडुन दुसर्‍या गायिकेकडे वळताना संभाषण, विषय वाहते ठेवलेत. फैय्याज यांनी वसंतरावांच्या आठवणी सांगताना ‘किती या भाग्यवान‘ असेच वाटत राहिले.

ती झाल्यावर लगेच पुष्पा पागधरे व प्रमिला दातारांची पण ऐकली व तीपण खूप आवडली. पुष्पा पाघधरेंचा आवाज खूप कापत असल्याने त्यांची मुळ गाणी ऐकवली गेली. मला गाणी माहिती होती पण गायिकेचे नाव लक्षात नव्हते. मस्त, अवघड गाणी गायलीत त्यांनी. ‘आला पाऊस‘ तर मला कालपर्यंत उषा मंगेशकरांनी गायले आहे असेच वाटत होते (किती हा बेजबाबदारपणा माझा). प्रमिला दातार यांचा आवाज जराही हललेला नाही. अजुनही आवाजात जोर, ताकद, वजन आहे. वय वर्षे फक्त ८२. मी अवाक झाले. त्या दोघींच्याही आठवणी छान होत्या.

मला यात काय आवडले तर खूप गाणी प्रत्यक्ष ऐकायला मिळतात. कौटुंबिक माहितीची कारण नसताना रेलचेल नाही. गायलेल्या गाण्याशी निकडीत आठवणी ऐकायला मिळतात, ज्यामुळे पुन्हा जेव्हा ते गाणे ऐकु तेव्हा हेही आठवेल.

या मुलाखतीचे सुचवल्याबद्दल आभार.

आता हळुहळु इतर मुलाखती पाहीन.

रंगपंढरी या सदरातील काही चांगल्या आहेत. (यु ट्यूब )
चंद्रकांत कुलकर्णी यांचा एक भाग बघितला. आवडला

सह्याद्रीवरची फैयाझ आणि बकुल पंडित यांची मुलाखत पाहिली. आवडली. फैयाझना शेवटी शेवटी किती बोलू असं झालं. वीज म्हणाली धरतीला मधल्या माझ्या अतिशय आवडत्या गीताबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं हा बोनस. डिट्टो जोगियाबद्दल. ही किंवा कार्यक्रमात गायलेली सगळीच गाणी त्यांनी आपली केली होती. कार्यक्रमाचं शीर्षक सार्थ झालं. त्यांनी विच्छा मध्ये काम केलंय हे आणि पाडाला पिकलाय आंबा या गाण्याबद्दल सांगितलेली माहिती माझ्यासाठी नवीन होती. या गाण्याची रेकॉर्ड सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात आहे. लावणी म्हटल्यावर त्यांनी सुलोचना चव्हाण यांचं नाव घेतलं तेही आवडलं.
बकुल पंंडित रिझर्व्ड वाटल्या. त्यांचं लग्नानंतरचं अलकनंदा वाडेकर हे नाव कधी कुठे पाहिल्याचं आठवतंय; दूरदर्शनवरच असेल.
या कार्यक्रमातलं एक विशेष आवडलं - कोणीही कोणालाही एकदाही इंटरप्ट केलं नाही. एक बोलत असताना, दुसरीने बोलायला सुरुवात केली नाही. आधी तर या दोघींमध्ये कोल्ड वॉर आहे की काय असं वाटलं, पण गीत गोविंद वर बोलताना फैयाझनी बकुल पंडितांचा अगदी आपलेपणाने उल्लेख केला.
सुरुवातीला उत्तरा मोनें हिंदी - इंग्रजी धाटणीचं एक वाक्य बोलल्या - आणि अण्णा साहेब किर्लोस्करांची एक भूमिका चिरस्थायी झाली , जी की संगीत नाटकाचे जनक. पण त्यांनी पुढे असले काही प्रकार केले नाहीत. दूरदर्शनच्या निवेदकांचा आणि सूत्रसंचालकांचा वारसा
अजूनही टिकून आहे, हे पाहून बरं वाटलं. तरीही त्यांच्या तुलनेत फैयाझ यांचं बोलणं , वाक्यरचना अधिक चपखल , दोषहीन होत्या. त्यांनी वाक्य अर्ध्यात सोडलं किंवा बदललं असं लक्षात आलं नाही. उत्तरा मोनेंनी मात्र काही वेळा केलं.

वरची गर्भारपणात मद्यपानाबद्दल चर्चा वाचली. उत्सुकतेने शोधलं तर हा एक लेख मिळाला. अर्थात याच्या नेमके उलट सांगणारे दहा लेखही असतीलच. पण त्यातले काही मुद्दे मला मननीय वाटले. लेखिका सोशोलॉजिस्ट आहे आणि आरोग्य हा त्यांच्या विशेष आवडीचा प्रांत आहे.

हे लिहीत असताना, कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल आपल्याला माहीत असायची गरज आहे का, असा प्रश्नही पडला. मग तो मागच्या चिन्मयीच्या मुलाखतीबद्दलही पडू शकतो. चिन्मयीने समाजात चर्चि ल्या जाणार्‍या मुद्द्यांबाबत भूमिका आणि कृती केली आहे, असं म्हणू.

पण वरचा लेख वाचल्यावर आदितीच्या मुलाखतीबद्दलही ते म्हणता येईल. माझं तूर्तास तरी त्यावर काही मत नाही.

चिरस्थायी झाली , जी की संगीत नाटकाचे जनक >> +१. हे मलाही खटकले होते, पण उर्वरित मुलाखतीचा चांगला दर्जा पाहता हे क्षम्य आहे. जोगिया मला विशेष आवडला. मला मुळातच ती कविता फार भावते, त्यामुळे जास्तच आत्मीयतेने मी ऐकले ते.

Pages