हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
मुग्धा डिफेन्सिव्ह झाली, कारण
मुग्धा डिफेन्सिव्ह झाली, कारण ती पण लेखिका आहे आणि तिला शुद्ध काय ते माहित असावं. आय गिव्ह हर बेऑडा.
दिल के करीब इतकं मधाळ ऐकवत नाही. साधारण मराठी मुलाखतकार तयारी करुन न आलेले आणि मग लाळघोटेपणा करत तयारी लपवायला गोल गोल बोलून स्तुती करणारे, पाठीचा कणा नसलेले असतात. त्यांना मुद्दा काय आहे ते समजलेलं नसतं... न्हवे, नक्की काय विचारायचं आहे हेच ज्ञात नसतं. चेहर्यावर हास्य ठेवून मुलाखत घेणं म्हणजे संपूर्ण शरणागतीची गरज नसते. तर रे असो.
हो. मुग्धाची मिरर इमेज आहे हे मी पण नोटिस केलेलं. दोन कॅमेरे लावलेले आहेत आणि एकाचं सेटिंग वेगळं आहे. ती इमेज बदलणे करायचं असेल तर अजुनही पोस्ट प्रोसेसिंग मध्ये सहज शक्य व्हावे.
सुधीर फडक्यांची अशोक
सुधीर फडक्यांची अशोक रानड्यांनी घेतलेली मुलाखत आवडलेली. अशोक रानडेही तयारी करुन सुस्पष्ट (फर्म) प्रश्न / प्रतिप्रश्न विचारत होते. उगा लाळघोटेपणा न्हवता. व्यक्तीचा मान ठेवून, उत्सुक्ता दाखवून ती शमेपर्यंत विचारत राहुन समोरच्याला बोलतं करणे हे दुर्मिळ कौशल्य असावं.
सर्व वेलांट्या र्हस्व काढणारे एक आयडी आठवले.
भाग्येश कुलकर्णींच्या
भाग्येश कुलकर्णींच्या मुलाखतीचा अंश फेसबुकने दाखवला. दोघे अँकर यावेळी घाबरून बसल्यासारखे वाटले.
त्या अंशात दिसलेला भाग -> रक्तातली साखर = कचरा. यात तथ्य आहे का अशी शंका आली.
आता इंट्रो पाहिला. त्यांनी डायबेटिस हा किचनशी रिलेटेड आजार आहे , जेनेटिक नाही. टाइप टु डायबिटीस हा लाइफस्टाइल डिसीज आहे / मधुमेहींनी जीवनशैली बदलणं गरजेचं आहे. असं बहुतेक ठिकाणी म्हटलेलं दिसतं. अर्थात सगळ्यांनाच हे माहीत असेल आणि माहीत असलं तरी वळत असेल असं नाही , त्यामुळे त्यांनी हे सांगून चांगलंच केलं.
'सरफरोश'ला पंचवीस वर्षे पूर्ण
'सरफरोश'ला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमिर खान, नासिरुद्दिन शाह, सोनाली बेंद्रे, दिग्दर्शक जॉन mathew Matthan आणि मुकेश ऋषी यांची छोटेखानी मुलाखत आली होती ती पाहिली. ठीक आहे. मुलाखतकार काही आवडला नाही. काहीही बोलतोय, असं काही वेळा वाटलं. आमिर खान चांगलं बोलला आहे.
जो जीता वही सिकंदरला पंचवीस वर्षे झाल्यानिमित्त झालेला कार्यक्रम खूप छान झाला होता.
सरफरोश पिरिएड फिल्म वगैरे
सरफरोश पिरिएड फिल्म वगैरे काही होता का? का आपलं व्लोग वाल्यांना दुकान चालू ठेवायला कंटेट पायजेले तर २०२४ - २५. २०२४ - ५० इ. करुन जे उत्तर येईल त्यांच्या मुलाखती घ्यायच्या!
अमित, काय तुझं मराठी
अमित, काय तुझं मराठी
झालं काय आहे की युट्युबवर मुलाखतकार पैशापासरी झाले आहेत आणि आता चॅनल उघडून बसले आहेत तर कंटेंट हवा की नको? मग असं काहीतरी शोधून घेऊन येतात. आता ती छाया कदम कान्सहून परत आल्यावर प्रत्येक युट्युब चॅनलवर मुलाखत दिसतेय. तेच तेच प्रश्न आणि उत्तरं किती ऐकायची?
पायजेले का. हा अस्सल मराठी
पायजेले का. हा अस्सल मराठी शब्द आहे. त्याच्या साठी हसत असलीस तर टोटल णिशेध!
हो त्यालाच हसतेय. बोलताना
हो त्यालाच हसतेय. बोलताना पायजेले म्हणताना ऐकलंय पण लिहित नाहीत तसं.
आणि उत्सुक्ता नव्हे,
आणि उत्सुक्ता नव्हे, उत्सुकता!
न्हवता पण नाही. नव्हता
न्हवता पण नाही. नव्हता
त्याला मुक्ता (बर्वे)शी
त्याला मुक्ता (बर्वे)शी काहीतरी जुळवावं असं वाटलं असेल. काहीतरी म्हणजे यमक.
आणि र्हस्व नव्हे, ऱ्हस्व!
आणि र्हस्व नव्हे, ऱ्हस्व!
(
अमितने इतक्या सहज आणि लगेच बेऑडा का देऊन टाकला असेल ते माझ्या लक्षात यायला लागलंय.)कीबोर्ड असाच आहे माझा पण!
कीबोर्ड असाच आहे माझा पण!
आणि (चुकीचं) बोलतो तसं लिहिता आला पायजेले स्कूल ऑफ थॉटचा पुरस्कर्ता ए मी!
सेम गोज विथ उत्सुक्ता. उत्सुकता लिहून खोडलं मी.
हृस्व र्हस्व .. आता मी तो रफार कसा दिला तेच लिहिता येत नाहीये. जे काही पहिलं उमटेल ते बरोबर. गूगलचा इंग्रजी एआय बरोबर करतो. मराठीत ही करेल. त्यासाठी लेखनाचा वेग कॉप्रोमाईज करायची गरज नाही.
(No subject)
>>> त्यासाठी लेखनाचा वेग
>>> त्यासाठी लेखनाचा वेग कॉप्रोमाईज करायची गरज नाही.
अं... का म्हणे? नेमकं कोण खोळंबलंय वाचायला?! इतरांच्या 'र्हस्व' वेलांट्या बर्या नोटिस होतात!
खोळंबायला कशाला हवंय!
आणि खोळंबायला कशाला हवंय! मरणाची घाई लागलेली असताना कुणी खोळंबलेलं नसतं. पण शास्त्र असतं ते!
आणि दुसर्याच्या चुका काढायचं मक्ता अजुन शाबुते! काय!
आता बाई सांगायच्या 'आणि' ने वाक्याची सुरुवात नाही करायची. पण बोलताना उभयान्वयी अव्यय रानोमाळ हरवतं तर लिहिताना का नको?
वरचे प्रतिसाद
वरचे प्रतिसाद
मराठी मुलाखतकार तयारी करुन न आलेले >> फक्त मराठी? पूर्वी मुलाखतकार या व्यक्तीला अभ्यासाची गरज असायची. ठराविकच लोक मुलाखत घ्यायचे. आता कोण उठतो तो मुलाखत घेतो आणि तेही काहीही तयारी न करता. मग कुणीही कुठल्याही विषयातल्या माणसाची मुलाखत घेतो, कारण तयारीच करायची नसल्याने काय फरक पडणार! अशोक रानडे हे संगीत क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेत. त्यांनी जयंत नारळीकरांची मुलाखत घेतली नसती... नसावी. एखादेच सुधीर गाडगीळ सर्वक्षेत्रीय मुलाखती घेत, पण त्याची त्यांना विशेष तयारी करावी लागे. सध्या होस्ट लोक पॉडकास्ट म्हणून तज्ज्ञ लोकांना बोलावतात आणि कायतरी बावळटासारखे प्रश्न विचारतात.
<<#आमच्यावेळीहेनव्हतं मोड ऑफ >>
नक्की कुणाची मुलाखत चालली आहे
नक्की कुणाची मुलाखत चालली आहे...
सध्या सगळेच अती व्यक्त होतात कारण तेवढी माध्यमं उपलब्ध असतात. बरेचदा त्यांना स्वतःची मतं किंवा दृष्टीकोनही नसतो. अजिबात व्यक्त न होणं किंवा अती व्यक्त होणं सारखंच घातक आहे. ज्या हौदाचा नळ सतत गळतो त्यात काही साठत नाही. साठलेलं नसताना व्यक्त होणं म्हणजे इतरांचा व स्वतःचा दृष्टिकोन पसरट करणं. हे (माबोसहीत) सगळ्याच माध्यमांना लागू आहे. मग अशा लोकांना बोलताना- ऐकताना-वाचताना काहीच सुसंगत किंवा स्पष्ट ऐकल्याचं/वाचल्याचं समाधान मिळत नाही. कोणतीच गोष्ट नाविन्यपूर्ण किंवा ओरिजनल वाटत नाही. आजकाल तेवढं 'बॉडी ऑफ वर्क' नसताना सुद्धा लोक मुलाखती देत सुटतात. निदान वेगवेगळ्या विषयांवर बोलावं म्हणजे बोलणाऱ्या/ विचारणाऱ्याची कल्पकता आणि ताजेपणा टिकवून ठेवता येतो तर तेही नसतं. त्यात टिआरपी/ व्यूजसाठी 'ज्यूसी' करण्याकडे कल असतो. त्यातल्या एखाद्या वाक्याचं दळण दळणाऱ्या क्लिप्सचा नंतर बाजार मांडता येतो किंवा बाजार मांडायला वाव मिळावा असे प्रश्न विचारले जातात. हळुहळू सगळंच चर्चितचर्वण होवून *'म्हशीचं वाढण' होत जातं.
------
*म्हशीला एकाच टोपल्यात काला-लगदा करून वाढतात, त्याही तासभर खात बसतात.
रवंथ करतात ग अस्मिता
रवंथ करतात ग अस्मिता
मी मुलाखत पाच दहा मिनिटांची बघू शकते. पेशन्स नाहीत माझ्याकडे अजिबात पण डॉक्टर भाग्येश कुलकर्णी यांची बघेन.
हळुहळू सगळंच चर्चितचर्वण
हळुहळू सगळंच चर्चितचर्वण होवून *'म्हशीचं वाढण' होत जातं. >>>
अशोक रानडे हे संगीत
अशोक रानडे हे संगीत क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेत. त्यांनी जयंत नारळीकरांची मुलाखत घेतली नसती... नसावी>> ह्या उदाहरणाबद्दल माहित नाही, पण मुद्दा तितकासा पटला नाही. अशोक रानडे संगितज्ज्ञ होते, आणि साक्षेपी विचारवंत होते. पण म्हणून त्यांची मुलाखत आवडली असं वाटत नाही. तर ते ज्या प्रकारे प्रश्न विचारत होते, ज्या प्रकारे समोरच्याला बोलतं करत होते, त्या मागे एक निखळ आनंद घेणे आणि तो वाटणे, त्या व्यक्तीविषयी आणि तिच्या कार्याविषयी आदर आणि आणखी जाणून घेण्याची उत्सुकता, त्या व्यक्तीचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि विचार करण्याची पद्धत समजावुन घेणे आणि त्याबद्दल साधक बाधक चर्चा करणे, तर्कसुसंगत प्रश्न विचारणे इ. साठी सखोल ज्ञान हे तितकंस गरजेचं नाही, पुरेसं तर नक्की नसावं.
ह्यात मला वाटतं अंगी बाणलेल्या वृत्तीचा (अॅटिट्युड) हात सर्वात जास्त असावा. मग नारळीकर असोत का बिल गेट्स त्या क्षेत्राचा थोडाफार अभ्यास आणि जेन्युईन क्युरिऑसिटी पुरे झाली.
कदाचित मुलाखत प्रेक्षकांसाठी असते आणि प्रेक्षकांना तसंच हवं असेल असं एक आपलं नेहेमीचं यशस्वी कारण देतील हे मुलाखतकार.
मुग्धा गोडबोलेने घेतलेली
मुग्धा गोडबोलेने घेतलेली चिन्मयी सुमितची मुलाखत बघितली. आवडली. एकदम मोकळेपणाने बोलली आहे चिन्मयी. तिची पार्श्वभूमी औरंगाबाद - मराठवाड्यातील असल्याने मला बऱ्याच गोष्टी रिलेट झाल्या. तिचे मुंजीवरचे मत पटले. तिच्या आईचा BAMU- औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरातला सहभाग, बाबांचं कलेक्टर असणं वगैरे ऐकायला छान वाटले. तिचे संगोपन छान घरात झाले आहे. सुमित आणि मुलं, मराठी भाषेतील शिक्षण, स्वतःची वाचनाची आवड आणि संसाराची हौस वगैरे मस्त सांगितले आहे. डिप्रेशन आणि PMS(Pre menstrual syndrome) बद्दल कुणीतरी पहिल्यांदा बोलताना ऐकलं. मुग्धाचे प्रश्न आणि उत्तरे देताना स्पेस देणं आवडलं.
रेकोसाठी धन्यवाद भरत आणि अमित.
मला काही डिफेन्सिव्ह वाटली नाही, क्लॅरिटीसाठी बोलल्यासारखी वाटली. दीर्घ आणि ऱ्हस्वच लिहिणाऱ्या दोन आणि एक माबोकरात मी तर येत नाही ना हा विचार येऊन गेला.
अंजूताई, नाही ते नंतर आधी
अंजूताई, नाही ते नंतर. आधी वाढणच
अस्मिता, एकदमच पटला प्रतिसाद.
अस्मिता, एकदमच पटला प्रतिसाद.
म्हशीचं वाढण म्हणजे तिला आंबोण म्हणायचंय बहुतेक अन्जूताई. पण तासभर करतात ते रवंथच.
अमित, पीरियड फिल्म म्हणून नाही, पण महत्त्वाचा सिनेमा होता सरफरोश. नव्वदच्या दशकातले जे काही सिनेमे अजूनही बघायला मला खरोखरच आवडतात त्यातला हा एक आहे. आता पंचवीस वर्षांनी त्यातल्या कलाकारांना त्याबद्दल काय वाटतं हे इंटरेस्टिंग असू शकतं. मला खरं तर नासिरुद्दिन शाहचं म्हणणं ऐकायला आवडलं असतं. पण तो कंटाळलेला वाटला बोलताना. शिवाय मुलाखतकाराने आमिर खानला विचारलेला 'रिस्क' वाला प्रश्नच त्याला विचारला. त्यावर आमिर खानच म्हणाला 'नासिरसाब रिस्क से डरते नहीं. किससे सवाल पूछ रहे हो भाई?'
पंचवीस वर्षांपूर्वी एकत्र काम केलेल्या (आणि तेव्हा थोड्याफार फरकाने कदाचित एकाच प्रमाणात लोकप्रिय असलेल्या) कलाकारांना नंतर वेगवेगळ्या दिशेने गेल्यानंतर परत एकत्र बघणं हेही छान वाटतं.
अमित, तुझं बरोबर आहे. सखोल
अमित, तुझं बरोबर आहे. सखोल ज्ञान नाही, पण निदान आपण कुणाची मुलाखत घेत आहोत, त्यातलं काहीतरी माहीत असावं. ती फैयाज आणि बकुल पंडितांची मुलाखत मीपण पाहिली. त्यात त्या जोगिया म्हणताना मुलाखतकारिणी(?)ला ती पूर्ण कविता पाठ आहे हे बघून मला आनंद झाला. त्याबद्दल त्या आणखी बोलू शकल्या आणि प्रेक्षकांना माहिती देऊ शकल्या. ज्यांची मुलाखत आहे, ते सगळेच फैयाज यांच्यासारखे उत्तम व्यक्त होऊ शकणारे नसतीलही. तिथे त्यांना काय म्हणायचं आहे हे लोकांपर्यंत नीट पोहोचवणं आणि पाहुण्यांच्या बोलण्यात आलेले संदर्भ - त्यांचा धागा पकडून मुलाखत एका समृद्ध वाटेवर घेऊन जाणं - ह्यासाठी थोडीफार तरी माहिती हवी. म्हणूनच मी सुधीर गाडगीळांचं उदाहरण दिलं होतं. त्यांना इतक्या विषयात सखोल माहिती असणं अशक्यच आहे. पण ते निदान त्या त्या मुलाखतीपूर्वी थोडीफार माहिती काढत आणि इतर मुलाखतीत न येणार्या गोष्टी ते काढून घेऊ शकत. मुलाखत देणार्याला ती घेणारा काहीही समजूनच घेत नाहीये असं वाटायला नको. काही (राजश्री मराठी किंवा तत्सम) पत्रकार कागदावर वाचून प्रश्न विचारतात आणि त्यावर कितीही छान उत्तर आलं तरी 'बरं, आता पुढचा प्रश्न आहे, ...' असं म्हणून पुन्हा कागदात डोकं घालतात. विशेषत: चित्रपट प्रमोशनच्या वेळी हे फार घडतं.
हो, खरं आहे.
हो, खरं आहे.
ज्याची मुलाखत घ्यायची
ज्याची मुलाखत घ्यायची त्याच्याशीच बोलून सुधीर गाडगीळ माहिती काढत असावेत. मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात हे वाक्य त्यांच्या कार्यक्रमात - मुलाखत किंवा सूत्रसंचालन - हमखास असे
अस्मिता, चिन्मयीच्या
अस्मिता, चिन्मयीच्या मुलाखतीबद्दल तुम्ही नोंदवलेले इतर मुद्देही पटले आणि आवडले. त्याबद्दल आधी थोडंफार ऐकलं वाचलं होतं , म्हणून मला लिहावंसं वाटलं नाही.
मुग्धा डिफेन्सिव्ह झाली यावर मात्र मी ठाम आहे. ती आई कुठे काय करते लिहायची आणि त्या मालिकेच्या संवादांतल्याही चुका - व्याकरण + लॉजिकच्या काढल्या आहेत. पण तिच्यानंतर आलेल्या लेखकाने तर पारच वाट लावली.
आता मुग्धा चिन्मयी मुलाखत परत
आता मुग्धा चिन्मयी मुलाखत परत बघणं आलं. भरत म्हणतायत ते मिस केलं बहुतेक.
चॅनल कोणतं माहित नाही पण असंच कोणतं तरी युट्युअबवर. आरती वडगबळकर मुलाखत घेते लोकांची. शुभांगी गोखलेची घेतलेली पाहिली. आरतीचा आवाज कर्कश्य वाटतो बोलता/हसताना. ऐकवत नाही. एकदा तर चक्क ‘हां आता हे विचारुन झालं‘ असंही म्हणाली
छान लिहिले आहे हर्पा.
छान लिहिले आहे हर्पा.
फैय्याज आणि बकुळ पंडित यांच्या मुलाखतीची लिंक दिली आहे/ देता का ?
धन्यवाद वावे.
----------
मुग्धा डिफेन्सिव्ह झाली यावर मात्र मी ठाम आहे. >>>> बरं.
मी मराठी मालिका बघत नाही. तुमच्या 'आई कुठे काय करते' यावरच्या पोस्ट मात्र वाचत असायचे. त्यावरून लॉजिकचं हाकानाका वाटलं होतं.
त्याबद्दल आधी थोडंफार ऐकलं वाचलं होतं , म्हणून मला लिहावंसं वाटलं नाही.>>>
सहज सांगतेय. मीही आधी अनेक वेळा असं केलं आहे पण लिहिताना ती एक स्वतंत्र मुलाखत समजून आपल्याला आवडलेल्या/ खटकलेल्या सगळ्या गोष्टी आवर्जून लिहायला हव्यात. त्यात आपल्यासाठी नावीन्य नसेल पण इथे वाचणाऱ्यांसाठी असू शकेल आणि (रुचेल तसं) हायलाईट्सप्रमाणे ते पोचवायला हवं.
जसं, मुलांना मराठी माध्यमातून दिलेलं शिक्षण हे मलाही माहीत होते पण मुलाखतीत तो हायलाईट आहे. तिचं परिसराविषयी भान आणि भाषेबद्दल कळकळ
त्यातून व्यक्त होते म्हणून ते महत्त्वाचे झाले.
Pages