चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो लापता लेडीजची मेन कन्सेप्ट अनंत महादेवनच्या १९९०मधल्या ‘घुंघट के पट खोल’ पिक्चरवर आधारित आहे आणि याबद्दल त्याला क्रेडीट दिले नाही म्हणून खवळलाय तो.

करु बूम चा रिमेक आहे हे माहीत नव्हते
बूम कधी पाहिला नव्हता.
तेव्हा कतरीना नवीन होती आणि अमिताभ काहीही करायचा.
ट्रेलर बघूनच नकोसा वाटलेला.

लोकहो लापता लेडीजची मेन कन्सेप्ट अनंत महादेवनच्या १९९०मधल्या ‘घुंघट के पट खोल’ पिक्चरवर आधारित आहे आणि याबद्दल त्याला क्रेडीट दिले नाही म्हणून खवळलाय तो. >>> तसं असेल तर क्रेडिट द्यायला हवं.

हाहाहा.

असा काही चित्रपट आलेला हे आठवत नाहीये, आता जाऊन बघायला हवं.

बायको म्हणालेली की एका बन्गाली चित्रपटावरुन घेतला आहे. टागोरान्ची कथा आहे वगैरे.

दोन्ही चित्रपटात काही साम्ये आहेत असे तो म्हणतो. . गाडीतुन उतरताानाा घुंघट मुळे अदलाबदल होते हे एक व शोधण्यासाठी फोटो देताना नवरी घुंघटात हे दुसरे असे तो म्हणतो. हा फोटोवाला जोक आधीही पाहिलाय, त्यात खुप नवे असे काही नाही. तिकडच्या लोकांना तर सवय असणार असे फोटो काढायची. आपल्यासाठी जोक ..

त्याच्या चित्रपटात शेवटी दोन्हीही जोडपी पार्टनर बदलतात कारण इतके दिवस एकत्र राहुन प्रेम जडते. लाले चा फोकस वेगळा आहे.

महादेवनचा चित्रपट त्याने सोडुन इतर कोणी बघितला नसावा पण पोस्टर डिझाईन करणार्‍यांनी कदाचित त्याचेही पोस्टर केले असावे तेव्हा…

अरे अदलाबदल ही एक कल्पना आहे. ती काही फार आउटऑफ द वर्ल्ड ग्रेट वगैरे नाही. सूटकेस अदलाबदल, बंदुकांची अदलाबदल, जुळ्यांची अदलाबदल, पासवर्डची अदलाबदल, कारची अदलाबदल, पेनांची अदलाबदल, विष घातलेल्या गोष्टींची अदलाबदल, माणसांची अदलाबदल... या आणि अशा अनेक अदलाबदलींचे प्रत्येकी खोर्‍याने सिनेमे, कथा, शोज पाहिलेत.
आता अदलाबदल झाल्यावर पुढे काय करायचं यातच तर कसब आहे ना! म्हणजे त्याचा सस्पेन्स, थ्रिलर, विनोद, सिटकॉंम, ट्रॅजेडी, सद्यपरिस्थितीवर भाष्य हे किंवा हे सगळं तर आहेच. पण ते कसं करताय आणि कसं तडीस नेताय हे खरं स्किल.

बाकी जगातली कुठलीही आयडिया जितकी ग्रेट असते तितकीच ही पण आहे म्हणजे नाही. आपण चार लोक एकत्र बसून अशा हजार कल्पना सहज काढू शकू. पण पुढे जे काही होतं, फुलतं त्यात सगळा ग्रेटनेस आहे. डिटेलिंग, बारीक बारीक प्रसंग, त्यातील भाष्य इ. इ. इ. बाकी लाले चा लेखक संपूर्णपणे खंडन करतोय. की प्रेरणासुद्धा घेतलेली नाही म्हणून. असो.

त्याकाळी ट्विटर युट्युब ओटीटी असते तर महादेवन चा चित्रपट पण गाजला असता.अर्थात कधीकधी कॉपी करणाऱ्या लोकांना जो बिझनेस सेन्स,बजेट चे स्वातंत्र्य आणि पॉलिश करायचे स्किल असते त्यामुळे कॉपी मूळ आवृत्ती पेक्षा जास्त हिट होते(वश आणि शैतान चे ताजे उदाहरण)
कदाचित पूर्ण स्वतंत्र कल्पना असेलही.ही कल्पना खूप जागी वापरली गेली आहे.

Pages