चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"खरेच बालिश प्रकार." - सहमत आहे. अति झालं आणि हसू आलं ही गत आहे. हाच धागा पुढे नेऊन तुला एक सजेशन देऊ का? ते ऋषभ पंत ला सतत 'चुम्मा' म्हणणं सुद्धा असंच उबग आणतं. कधीतरी ठीक आहे.

चुम्मा कौतुकाने म्हणतो हिणवायला नाही. कश्याची तुलना कुठे फेरफटका. असो Happy

अरे हो, क्रिकेटचा विषय काढलात म्हणून. आमच्याकडे बरेच जण सचिनला प्रेमाने तेंडल्या म्हणतात. सचिन कधी बोलतच नाही. ते मला बिलकुल आक्षेपार्ह बालिश वा उबग येणारे वाटत नाही. कारण तेंडल्यात प्रेम आहे पाकड्यात द्वेष आहे हे कळते मला Happy

चला चहा पिऊन येतो Happy

समर्थांनी असा उल्लेख केला असेल तर ते ही चुकलेच>>>

सर तुम्ही हवे होतात तेव्हा, तुमचं ऐकून समर्थानी बदलल्या असत्या ओळी

समाजाचं दुर्दैव की तुम्ही होमो इरक्ट्स च्या काळापासून नाहीत
नैतर काय चूक काय बरोबर हे सगळं नीट समजावून सांगितलं असतात तुम्ही

मानव आज आहे तसा राहिलाच नसता

"चुम्मा कौतुकाने म्हणतो हिणवायला नाही." - मुद्दा तो नाहीये रे. "अति झालं आणि हसू आलं ही गत आहे" हा आहे. जाऊदे.. एन्जॉय युअर 'कप ऑफ टी'. Happy

विक्रम वेधा बघायला गेलेलो, अमच्या मागच्या row मध्ये एक फॅमिली with किरकिर कार्टे.. चित्रपट संपायला आलेला... टोटल सायलेन्स आणि अचानक त्या faमिलितली गृहस्वामिनी बोलली, "कसला हँडसम आहे ना हा" आणि सगळ्या थिएटर मध्ये हास्याची लाट.. एक एक रो हळू हळू पसरत पसरत हसायला लागलेली!

मुद्दा तो नाहीये रे. "अति झालं आणि हसू आलं ही
>>>

अति झाले आणि हसू आले हा माझा मुद्दा नव्हताच. असे हिणवणारे उल्लेख एकदा केले तरी ते चूकच हा मुद्दा होता. तुम्ही माझे पंतला चुम्मा म्हणने एकाच मुद्द्याखाली घ्यायला मुद्दाच बदललात Happy

झाली चहा पिऊन आणि हे मा शे पो Happy

कसला हँडसम आहे ना हा" आणि सगळ्या थिएटर मध्ये हास्याची लाट.
>>>
Lol
याचा एक वेगळा धागा काढायला हवा. असे किस्से कैक घडतात थिएटरात. कोणी अनवधानाने बोलते तर कोणी उत्स्फुर्तपणे एखादी कॉमेंट पास करते की पब्लिक हसायला लागते.

कॉमीनी उल्लेख केलेला prey चित्रपट बघितला. थरारक आहे. बऱ्याच दिवसांनी काहीतरी वेगळे पाहायला मिळाले. चित्रपटात असलेले effects पण खरे वाटले. नाहीतर अश्या चित्रपटात एकदम अविश्वसनीय दृश्ये असतात.
कलाकारांचा अभिनय देखील उत्तम.

मराठीत आणि हिंदीत खूप काही चांगले सिनेमे येऊन गेले. पण प्रतिसाद नाही मिळाला प्रेक्षकांचा.
आता युट्यूबवर आणि ओटीटीवर पाहिल्यावर कळतेय ते. हिंदीतला चटकन आठवणारा म्हणजे " एस्केप फ्रॉम तालिबान".

मराठीत तर खूपच आले होते वेगळ्या वाटेवरचे सिनेमे. (वेगळ्या धाग्याचा विषय आहे हा).

भाषा थोडी थोडी कळते
कोणते ३-४ चित्रपट सांगता येतील (शक्यतो अलीकडचे) ? >> एखाद्या नोळखीच्याला सुचवणे खूप अवघड आहे हे सांगणे. हरीश्चंद्राची फॅक्टरी सुचवावा आणि पडछाया आवडावा असं होतं. याच धाग्यावर पहा ना.

2022

सीता रामम पाहीला‌. आवडला. हीरवीन आवडते मला ती आपली मराठी मुलगी. लव स्टोरीच असली तरी छान आहे एकदा बघायला.

Netflix वर primal fear बघितला.
रिचर्ड गेर आरोपीचा वकील आणि एडमंड नॉर्टन आरोपीच्या भूमिकेत.
आर्च बिशप च्या मर्डर मध्ये नॉर्टन अडकतो , नॉर्टन ला दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा पेशंट दाखवलंय .
नॉर्टन ला देहदंडापासुन वाचविण्यासाठी गेर आणि सरकारी वकिलिन बाईंची कोर्टातील जुगल बंदी , फॉरेन्सिक रिपोर्ट चे सगळे पुरावे नॉर्टन च्या विरोधात !!!!!
तरीही गेर आरोपी नॉर्टन ला वाचवू शकतो की नाही हे सिनेमा बघण्यातच खरी मजा आहे .
क्लाय मॅक्स तर उत्तम केला आहे .
एकदा अवश्य बघाच .....

primal fear >> याची हिंदी आव्रुत्ती अदेवगण, उर्मिला, अक्षय खन्नाचा चित्रपट होता . नाव विसरले.
पण primal fear अर्थात उजवा आहे.

primal fear>>>
नेलपॉलिश नावाची एक वेबसिरीज होती मानव कौल आणि अर्जुन रामपालची. त्याचेपण कथानक असेच होते.

ब्लॅक फोन (2022)

हॉरर / थ्रिलर सिनेमाचे फॅन असाल तर नक्की पहा.

एका सिरीयल किलर / किडनॅपर ने पळवून नेलेला लहान मुलगा, त्याला बंदिस्त करून ठेवलेल्या तळघरात असलेला काम न करणारा (???) फोन आणि पूर्व सूचक स्वप्न येणारी मुलाची मोठी बहीण असा प्लॉट आहे.

एकूणच सिनेमा फार आवडला.

ब्लॅक फोन ?
कोठे पाहायला मिळेल ते ही सांगत जा हो महाराजा !

primal fear स्टार प्लस बेस्टसेल्रर्समधली मासूम.
दर रविवारी एका भागात एक कथा

PS1 थिएटरमध्ये पाहिला, आणि खूप एन्जॉय केला!
हा सिनेमा बनवणं हे बराच काळ मणिरत्नमचं स्वप्न होतं असं वाचलं - खरंच ‘दिल से’ बनवला आहे.
मुलाने आग्रह केला म्हणून काहीशी अनिच्छेने गेले होते मी, पण गेल्याचं सार्थक झालं. मोठ्या पडद्यावरच पाहायला हवा हा!
दुसऱ्या भागाची वाट बघणं आलं आता!

अवांतर : तमिळ लिटररी जीनिअस कल्की कृष्णमूर्ती यांची पाच खंडांत लिहिलेली याच नावाची प्रदीर्घ ऐतिहासिक कादंबरी ही त्या भाषेतील अभिजात साहित्यातलं एक मानाचं पान समजतात. त्यापैकी पहिल्या खंडाची कथा चित्रपटाच्या दोन भागांत मिळून येणार आहे.

Z library मधून पोन्नियीन सेल्वन चे पाचपैकी चार इंग्रजीत अनुवाद केलेले खंड मिळाले.

PS1 थिएटरमध्ये पाहिला, आणि खूप एन्जॉय केला >> हमने तो पिछले हफ्ते ही बोला था! पण पोस्ट वाहून गेल्यासारखी झाली त्या अमिताभच्या पुरात Lol

मजा मा- अमेझॉन प्राईम
माधुरीसाठी बघितला. तिच्या चाहत्यांनी चुकवू नये कारण खूप दिवसांनी तिची मध्यवर्ती भूमिका असलेला मुव्ही आलाय.
बाकी स्टोरी काही खास नाही. क्रांतिकारी काहीतरी दाखवायचं की कौटूंबिक स्टोरी या गोंधळात काहीच धड जमलेलं नाहीये.
माधुरी किंवा तिच्या नवऱ्याच्या भूमिकेतील गजराज राव पडद्यावर नसेल तर फारच बोअर प्रकार आहेत बाकीचे सीन्स.
But MD lights up the screen. तिच्यासाठी बघावा इतकंच.

Pages