चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ 'ती चाल सुधारण्यासाठी डोक्यावर दासबोध घेऊन फिरताना चे स्पष्टिकरण' मिळाल्यावर विचार आठवले.“ - >>>smiley2.gif

हपा Lol

प्लॅनेट मराठी वर २ सिनेमे पाहिले.

सहेला रे - कन्सेप्ट आता घिसिपिटी आहे तशी. मॄणालचा रोलही बहुतेक सगळ्या मराठी पिक्चर मधे असतो तसाच आहे. गृहिणीला किम्मत नसणे वगैरे वगैरे. पण सुमित राघवन ने कमाल केली आहे. काय यंग हँडसम दिसलाय. काय खातो हा माणूस Happy कॅरेक्टरही मस्त घेतलंय. प्रेमातच पडेल कोणी पण याच्या. Happy वागण्याबोलण्यातले खूप लहान सहान बारकावे, हातवारे, एक्स्प्रेशन्स त्याने काय सुंदर दाखवलेत. मस्त अ‍ॅक्टर आहे. साराभाई नंतर फार काही बघितलं नव्हतं याच काम.
सुहिता थत्तेला करवादलेल्या बाईचा रोल का देतात सारखे? कंटाळा आला तिला बघून.
सुबोध भावेला जास्त वाव नाहीये. शेवटच्या १-२ सिन्स मधे थोडी अ‍ॅक्टींग केली आहे.
सुमित - मृणाल ट्रेकिंगला जातात त्या भागाचं चित्रिकरण फार सुंदर आहे.
टाईमलाईन गंडलेली वाटलेली शेवटच्या भागात . घरी पुजा, त्याआधी का नंतर रजिस्ट्रार ऑफिस मधे जाऊन येणं, दुपारी जेवेपर्यंत परत येऊ तेही पुपो चं जेवण हे सगळं कधी काय त्याचा काय ताळमेळ कळला नाही. ती पुण्यापासून दुर राहते असं दाखवलंय. आमच्याकडे पुजा जेवण उरकता ४ वाजतात. असो.

दुसरा पाहिला पाँडिचेरी - प्रचंड आवडला. खराखुरा वाटला.
पाँडिचेरी मधलंच शु टिंग आहे. काय सुंदर देखणं शहर !! पुणे मुंबई सोडून दुसरं वेगळं काहीतरी बघायला मिळालं.
कलरफुल रंगात रंगवलेल्या भिंती, स्लोगन्स, ग्राफिटी, चित्रं खूप आवडलं. एकदम रिफ्रेशिंग.
सईचं घर पण फार सुंदर आहे. वैभव तत्ववादी खरंच असा वाटतो रिअल लाईफमधे पण इतकं त्याने रोहन चं काम भारी केलंय. आधी थोडा बेफिकिर, फक्त कामाशी काम, रिलेशन्स मधे हर्ट झाल्याने तुसडेपणा पण मुळात वाईट स्वभाव नसलेला, ईशानबरोबर मैत्र साधणारा भले पहिल्यांदा स्वार्थासाठी असेल पण नंतर खरंच लळा लागलेला, घराचा बाप होणारा रोहन खूप आवडला.
अमृताला छोटा रोल आहे. त्यापेक्षा निना कुलकर्णींचं काम लक्षात राहण्यासारखं आहे. टीपिकल आई मटेरियल. तोडच नाही कामाला.
फक्त एकच खटकलं मुल होत नसेल तर अमृता चेकप का नाही करत फक्त रोहन वर खोटा ब्लेम करून त्याकडून तिचे आईबाबा पैसे उकळतात. ही काहीच का बोलत नाही जर प्रेम होतं तर ते काही पटलं नाही.
शेवटच्या सिनमधे अम्रुता सईला विचारते तुला रोहन आवडतो ना? ती एकावेळी एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू या म्हणते ते आवडलं. म्हणजे अमान्यही नाही की तो आवडत नाही पण आत्ता त्यावर बोलायची गरज नाही हे स्प्ष्ट केलं. ते आवडलं. सईच्या मुलाचं, इशानचं काम केलेला मुलगा कोण माहित नाही. चुणचुणीत आहे एकदम.

फक्त एकच खटकलं मुल होत नसेल तर अमृता चेकप का नाही करत फक्त रोहन वर खोटा ब्लेम करून त्याकडून तिचे आईबाबा पैसे उकळतात. >>>मला वाटले तिच्या आई-बाबांना माहित असते कि तिला मूल होणार नाही. त्यातून रोहनला तेव्हा मूल नको असते. त्यामुळे त्यालाच दोषी ठरवून तिचे आई-बाबा भरपूर पोटगी मिळवतात.

असेल तिची आई जरा मनी मांईंडेड दाखवली आहे. पण तरी तिला स्वतःची मेडीकल हिस्ट्री माहित नसते हे जरा क्लिशे वाटलं.
तेवढं सोडल्यासा बाकी उत्तमच आहे मुव्ही.

ब्लॅक फोन प्राईम वर निदान सिंगापुरात तरी दिसत नाहिये. Sad
सहेला रे कशा वर आहे? सुमित राघवन फारच आवडतो फास्टर फेणे पासूनच Happy

पॉंडीचेरीबद्दल-
मला असं कळलं- तिला मूल होणार नाही हे वैभवला माहीत असतं. पण तिला दुःख होईल म्हणून तो ती गोष्ट लपवतो आणि मलाच मूल नको आहे असं सांगतो. हे लग्नाआधी न सांगून त्याने फसवणूक केली आहे असं तिला व तिच्या आईला वाटतं. पोटगीचे पैसे तो स्वतःच आणून टाकतो. तसं अमृता नीना कुलकर्णीला सांगते पण.

शेवटी सई अमृताचा एका वेळी एकच प्रॉब्लेम वाला डायलॉग आहे त्यानंतर सई बीचवर चालत असते तेव्हा तिला तो फ्रेंच शेफ भेटतो जो तिचा मित्र असतो. याचा अर्थ मला असा लागला की सई त्याच्याशी रिलेशनशिप सुरू करेल. तिला नवीन पार्टनर मिळाला की तिला वैभव आवडतो हा 'प्रॉब्लेम' आपोआप सॉर्ट होईल.

Primal fear पाहीला. आवडला. क्लायमॅक्स ट्विस्ट मस्त आहे.

व्हाईटहॅट तुम्ही म्हणता ते पण अँगल असू शकतील.
बाकी अम्रुता ते फोटो स्पर्धेसाठी आलेली असते त्याचं काही दाखवलं नाहीये नंतर Happy

इथली परीक्षणे आणि तूलना वाचून फॉरेस्ट गंपचा टॉम जर शाहरुख असेल तर लालसिंह चड्ढातला अमिर म्हणजे ऋन्मेष (चीप करप्टेड व्हर्जन) असावा असे वाटते.

बधाई दो पाहिला.

काही भाग खूप आवडले, इतर भाग ठीक ठाक होते.

एकूण सिनेमा आवडला.

इथली परीक्षणे आणि तूलना वाचून फॉरेस्ट गंपचा टॉम जर शाहरुख असेल तर लालसिंह चड्ढातला अमिर म्हणजे ऋन्मेष (चीप करप्टेड व्हर्जन) असावा असे वाटते.>>>>>>
Happy
फक्त रुनमेश ची जोडी शाहरुख बरोबर लावा !

प्रायमल फियर खरंच खत्रा पिक्चर आहे. एडवर्ड नॉर्टन जबरदस्त अभिनेता आहे खरंच. बिचार्‍याला चांगले रोल्स का मिळत नाहीत कुणास ठाऊक. फाइट क्लब, अमेरिकन हिस्टरी एक्स आणि प्रायमल फियर हे तीन त्याचे सर्वात आवडते चित्रपट माझे.

लालसिंग चढ्ढा पळवत पाहिला. काय ते बोअर बेअरिंग, काय तो घिसापिटा, वेडगळ अभिनय. अमिर खानने अगदी लाज सोडली आहे. म्हातारपणी तरी चांगले रोल्स करावेत, सतत मेन हिरो असण्याची हाव कशाला?

एडवर्ड नॉर्टन चा खरा परफॉर्मन्स बघायचा असेल तर अमेरिकन हिस्टरी एक्स बघा...

एड नॉर्टन साठी kingdom of heaven बघा. बड्या बड्या कलाकारांच्या मांदियाळीत चेहराही न दाखवता अभिनयाची छाप कशी सोडता येते ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नॉर्टनचे किंग बाल्डविनचे पात्र.

पोण्णियीन सेल्वन १ - तमिळमध्ये पाहिला. function at() { [native code] }इप्रचंड आवडला. बाकीच्यांचे अनुभव परीक्षण आधी बघितल्यामुळे जरा सावध झालो होतो. ताकही फुंकून प्यावं म्हणून बघायला जाण्यापूर्वी जरा अभ्यास करून गेलो. त्यातली नावं थोडी तरी ओळखीची व्हायला हवीत तर मग जास्त मजा येते. चोळ साम्राज्याचा नकाशा ठाऊक असेल तर अजूनच भारी.

सध्या थोडक्यात सांगायचं तर मुळातली कथाच इतकी अफलातून आहे, की त्यात आपण हरवून जातो. वंद्यदेवमच्या पात्राला अनेक कंगोरे आहेत आणि त्याचा प्रवास साहसपूर्ण, रोचक आणि रोमांचक आहे. ऐश्वर्या काय दिसली आहे त्यात! डोळ्यांतून बदामवाली इमोजी बहाल करतो. तिच्या दिसण्यावरच सगळ्या कथेचा डोलारा उभा आहे असा भास होतो. ती 'ती' आहे म्हणून बाकीची कथा पटते, खरी वाटू लागते. नंदिनीच्या पात्रासाठी यासम दुसरी निवड अशक्य. एकूण सिनेमा अक्षरशः अवाढव्य आहे - आकार, पात्रे, सेट, कथा - सर्वच अर्थांनी. त्यामुळे मोठ्या पडद्यावरच बघावा. हिंदीत काही पात्रांचं डबिंग नीट झालेलं नाही असा अभिप्राय ऐकायला मिळाला. त्यामुळे शक्यतो तमिळमध्येच बघा - सबटायटल्ससह. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी थोडी कथावस्तू, त्यातली पात्रं वगैरे वाचून/ऐकून जा. ते माहीत नसेल तर मजा येणार नाही, उलट सगळा वेळ कोण कोणाचा कोण हा विचार करण्यात आणि अमुक एक माणूस नक्की कुणाकडून आहे आणि तो असा का वागतोय - हे विचार करण्यात जाईल. ह्या कथेशी अनभिज्ञ असलेल्या लोकांसाठी मणिरत्नमने काही फारसे विशेष प्रयत्न केलेले नाहीत, त्याबद्दल त्याचे २ मार्क कटाप.

यावर एक स्वतंत्र धागा काढणे गरजेचे आहे. वेळ मिळाल्यास काढेन.

च्रप्स +१

अमेरिकन हिस्टरी X जबरदस्त सिनेमा आहे. नॉर्टनने मस्त काम केलंय.

बाकी मला नॉर्टनचा द इनक्रेडिबल हल्क सुद्धा आवडलेला.

Pages