चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल नेटफ्लिक्सवर लाल चढ्ढा पाहिला. सकाळी लक्षात रहावा इतका चांगला नव्हता, बघताना बंद करून दुसरा लावावा इतका वाईट नव्हता. बघताना प्रत्येक सीनला फॉरेस्ट गंपची आठवण/तुलना (हा सीन फॉरेस्ट गंप मधे असा घेतलाय, इथे असा बदललाय/तसाच ठेवलाय) होत होती. करिना छान दिसलीय.

चाळीशीच्या पुढच्या, लग्न आणि दोन मुलांची आई असलेल्या अ‍ॅक्टरला मेनस्ट्रीम हिरॉइनचं काम मिळणं ही बॉलीवूडची प्रगती आहे. (ह्यात करीना कपूरवर टीका नसून, बॉलीवूडवर टिप्पणी आहे. करीना कपूर चांगलीच अ‍ॅक्टर आहे).

‘पोन्नियिन सेल्वन’चा हा इंग्रजी अनुवाद ऑडिबलवर ऐकायला सुरुवात केली आहे, आणि आवडतो आहे.

फेफ, लालसिंगबद्दल अनुमोदन.
या चित्रपटावरून कॉन्ट्रोवर्सी कशी होऊ शकते हे खरोखरीच माझ्या समजुतीच्या बाहेर आहे!

मजामा काल तासभर पाहिला आज उरलेला पाहीन. अगदीच वाईट वाटला नाही आतापर्यंततरी. बाकी मेकअप, साड्या, दागदागिने आणि ठरलेला डान्स यामुळे माधुरी नेहमीप्रमाणे स्टार माधुरीच वाटते. बाकीचे लोक ठिकेत. सर्वात तारा मस्त आहे. तिच्यात आणि सई परांजपे/विनी परांजपे यांच्यात काहीतरी साम्य जाणवत होते दिसण्यात.

“ या चित्रपटावरून कॉन्ट्रोवर्सी कशी होऊ शकते हे खरोखरीच माझ्या समजुतीच्या बाहेर आहे!” - खरंय! कॉन्ट्रव्हर्शियल नक्कीच काही नाहीये.

फेफच्या मागच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत. कालच लालसिंग पाहिला. माझ्या डोक्यात फॉरेस्ट गंपशी तुलना होत असल्यामुळे आवडला नाही. मुख्यतः आमीरचे हावभाव आणि ते सारखं सारखं नाटकी 'अं...' म्हणणं फारच कृत्रिम वाटले. त्याची डोळे वटारून मान पुढे काढायची पद्धतही आता function at() { [native code] }इपरिचयात अवज्ञेला पोहोचली आहे. पण पटकथेचं भारतीयीकरण चांगलं जमलं आहे. काहीवेळा चित्रपट उगाचच जास्त भावनिक होतो - ते आवडलं नाही. फॉरेस्ट गंप जेव्हा युद्धात त्या माणसाला इच्छा नसतानाही पळवून आणतो - तिथे ह ह पु वा झाली होती. लालसिंग सिनेमामध्ये जरा अनपेक्षित आणि चांगला बदल घेतला असला तरी त्या सीनमधली जी गंमत आहे ती तेवढी टिकवून ठेवता आली नाहीये. तो पुढे नंतर जेव्हा लालला थँक्यू म्हणतो, त्याचं गहिरेपण मनाला भिडण्यासाठी त्याला आधी जगायची इच्छा नव्हती आणि तो जीव वाचवल्याबद्दल जिवाच्या आकांतापासून त्याला शिव्या घालत होता - हा विरोधाभास ठळकपणे दिसणं गरजेचं होतं, जे फॉरेस्ट गंपवाल्यांना उत्तम जमलं, पण इथे नाही.

त्यात लालच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापकांना घरकामात मदत करण्याचे आश्वासन देणे वगैरे प्रकार दाखवून मुळातल्या ष्टोरीतले भारतीयांना सांस्कृतिक धक्के बसतील असे प्रकार वगळले आहेत, हे जरा मजेशीर वाटलं. पण ते तसं दाखवलं असतं तर नक्कीच (आणखीन?) कॉन्ट्रोवर्सी झाली असती.

फेफ व हर्पा ,प्रतिसाद आवडले.
मला संथ पंजाबी सिनेमा बघितल्यासारखा वाटला. टेबल टेनिसची सगळी दृश्यं कापली आहेत, दंगलींची लांबवली आहेत. सगळ्याच बाबतीत ज्या हाय वर फॉरेस्ट गंप जातो तिथे लाल सिंग गेला नाही , एक मधली सुरक्षित रेंज धरून कडेकडेने गेला आहे. आमिर खानचे तसे वटारलेले डोळे (चिकटवलेला स्टार्टल्ड लूक) , आता निरागस न वाटता अनैसर्गिक वाटत आहेत. आता हाच लूक ठेवायचा असेल तर सरळ डॉ सूसचे 'कॅट ईन द हॅट' करावे. करीना छान दिसलीये पण सतत काहीतरी हुकलंय वाटत होतं. बाला आवडलाच. अतिरेक्याबाबत तेवढी मजा आली नाही. त्यानी परिस्थितिचा स्वीकार लगेचच केल्यासारखा वाटला. आडमुठेपणाची गंमत सुरू झाल्याझाल्या संपली. भारतीय नायकाच्या 'अहं परंपरेनुसार' ट्रेन मधली सगळी लोक पूर्णवेळ ऐकत होती. नावाला एक जण उतरला. तरीही सपशेल आपटावा इतका वाईट नव्हता.

छान आहे लालसिंग चड्डा.

मी फॉरेस्ट गंप पाहिला नसल्याने वा मुळातच ईंग्लिश पिक्चर बघत नसल्याने माझी हा चित्रपट बघायची नजर वेगळी होती. मनाची पाटी कोरी होती. मला आवडला पिक्चर. लहान मुलांनाही आवडण्यासारखा आहे..

बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला यात नवल नाही. असे चित्रपट थिएटरात चालतच नाहीत. पण त्याचा चित्रपटाच्या दर्ज्याशी काही संबंध नसतो..

आता ऑफिस सुरू होईल. नंतर वेळ मिळाल्यास लिहेन सविस्तर..

शाहरूखसाठी मात्र हजार बदाम बदाम बदाम.. कसला चिकणा दिसलाय Happy

द ब्लॅक फोन पाहिला.
मनोरंजक आणि उत्कंठावर्धक आहे. आवडला !

द ब्लॅक फोन पाहिला.>>>>> कुठे???

मी युटुबवर पेयींग घोस्ट बघत होते.कायच्या काय सिनेमा.. उमेश कामतच्या चेहऱ्यावर तर माशी हलत नाही.. त्याची घाबरायची ऐक्टिंग बघून रडावं का हसावं कळेना..अर्ध्यात सोडला.
प्राईमवर 'सर्व लाईन व्यस्त आहेत' सुरू केला म्हटलं, विनोदी असेल, अतिशय टुsssकार सिनेमा...पांचट जोक्स... दहा पंधरा मिनटात बंद केला..

दगडी चाळ 2 कसा आहे.. कुणी बघितला का??

दगडी चाळ 2 पाहिला
1 आवडला असेल तर तरच हा आवडेल.
Nothing great.
एका रेषेच्या बाहेर मराठी चित्रपट जातच नाहीयेत.
Climax ला काय होणार हे मी आधीच बायकोला बोललो आणि तसेच झाले.

सहेला रे पाहिला.
परत तेच. ड्रामा उत्तम होउ शकला असता पण एका रेषेच्या पलीकडे सिनेमा जातच नाही.
मृणाल कुलकर्णी आताशा वय दिसत आहे.
सुमित राघवन काय खातो काय माहित, जबरी तरुणच दिसतो. सुबोधचा रोल तसा कमीच आहे.
सिनेमातले निसर्ग दृश्य सुंदर आहेत काही.
बहुतेक ताम्हिणी घाट असावा. Dron shots मस्त

दगडी चाळ २ अर्धा पाहिला. मग ब्रेक घेतला. पुन्हा आवर्जून पुर्ण करावा असे अजून वाटले नाही. कदाचित उत्तरार्धात नाट्यमय घडामोडी असू शकतील. त्यामुळे पुर्ण करायचा आहे.
तसेच दगडी चाळ आणि डॅडींशी जुने नाते आहे, नॉस्टेल्जिक व्हायला होईल म्हणूनही बघायचा आहे.
पहिला भागही याच कारणास्तव थिएटरात बघितलेला.
त्या चित्रपटाची ओळख / परीक्षण ईथे लिहिलेले. ते आणि त्यावरचे प्रतिसाद वाचू शकता.

चुकीला माफी नाही ..... दगडी चाळ !
https://www.maayboli.com/node/56069

त्यात लालच्या आईने शाळेच्या मुख्याध्यापकांना घरकामात मदत करण्याचे आश्वासन देणे वगैरे प्रकार दाखवून मुळातल्या ष्टोरीतले भारतीयांना सांस्कृतिक धक्के बसतील असे प्रकार वगळले आहेत, हे जरा मजेशीर वाटलं. पण ते तसं दाखवलं असतं तर नक्कीच (आणखीन?) कॉन्ट्रोवर्सी झाली असती>>>>

मूळ सिनेमा आहे तसा घेतला नाहीच होय
म्हणजे कॉपी पण धड नाही, ना ओरिजनल
फ्लॉप गेला यात नवल नाही Happy

सहेला रे - अजिबात आवडला नाही.
क्लिशे प्रसंग, क्लिशे डायलॉग, क्लिशे कॅमेरा फ्रेम्स, मृणाल कुलकर्णीचा नाटकी आणि तोच तोच प्रकारचा अभिनय!!
सगळंच वरवरचं आणि प्रेडिक्टेबल Uhoh
एडिटिंगमध्येही गंडलेला आहे. सुमित राघवनची घरात दोनदा एन्ट्री तर टोटल गंडलेली आहे.

मी लालसिन्ग बघायला सुरवात केली खरी पण आमिरचा पाणीपुरीचा पहिलाच सिन इतका ओव्हर वाटला त्यातही त्याची सिन्गेचर स्टाइल इतकी नको झालिये की नेटाने पुढे बघितलाच नाही मला ट्रेलरच नव्हता आवडला त्यामुळे बघायची अजिबात उत्सुकता नव्हती.
बन्द करुन परत कितव्यादा तरी ओशन ११ बघितला.
(आमिरचा दन्गल खुप आवडला होता, त्याने आता वयाप्रमाणे भुमिका कराव्या या वयातही तरूण दिसायला तो टॉम क्रुझ नाही तितका फिटही नाही.)

आमिरचा पाणीपुरीचा पहिलाच सिन इतका ओव्हर वाटला >> हो. एकतर त्याने बाटलीच्या झाकणाला भोक पाडलं आहे आणि ती तशी गळकी बाटली तो आख्ख्या प्रवासात घेऊन आला असला तरी पाणी अजिबात कुठे गळालेलं/सांडलेलं नाही. नंतर तो रूपाला तीच बाटली देतो ती बॅगेत ठेवलेली असते. असली गळकी बाटली लहानपणी बॅगेत/प्रवासात नेली असती तर आईने चार रट्टे हाणून (मुलांना मारावं का ही चर्चा इथे नको प्लीझ) सांगितलं असतं, 'जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता. .. अं....' .

जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता. .. अं....' .
Biggrin

हपा Proud

पण अ‍ॅक्चुअली छान होता तो सीन. याचे वेडपट चाळे बघून त्या समोरच्या बाईचे एक्सप्रेशन्स आणि आवघडलेली स्थिती भारी दाखवली आहे.

मला तो सीन बघून माय नेम ईज खान आठवला. त्यातही शाहरूख थोडा असाच ढिला पण अल्लाह का नेक बंदा दाखवला आहे. प्रवासात त्याच्या समोरचे प्रवासी काहीतरी चपाती रोल वगैरे खात असतात. याला फॉर्मेलिटी म्हणून डब्बा पुढे करून विचारतात. हा अगदी भाबडेपणाने कसलीही भीड न बाळगता एक खायला उचलतो आणि एक नंतर खाण्यासाठी म्हणून खिश्यात टाकतो Proud

जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता. .. अं....>>>

हाहाहा खतरनाक Happy

तो जेव्हा पुरीत पाणी ओततो आणि डायलॅाग बोलायला लागतो तेव्हा पुरीतले पाणी खालून गळून हातावरून हातातील कड्यापर्यंत येते आणि खाली पडताना दिसते. ते बघून मला ‘अरे खा लवकर’ असे झाले.

मृणाल कुलकर्णी , माधुरी दीक्षित असली नावे वाचूनसुद्धा कसे काय बघयला जाता चित्रपट... ऍक्टिंग च्या नावाने बोंब असते...

'जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता >>> Rofl

ब्लॅक फोन खरोखरच उत्कंठावर्धक आणि चाकोरीबद्ध भयपटापेक्षा वेगळा सिनेमा आहे. सुरूवातीला थोडासा संथ वाटला तरीही नंतर पकड घेतो. खूपच आवडला.

काल नेटफ्लिक्स वर Mr. Harrigan's Phone नावाचा चित्रपट पाहिला. लौकीकार्थाने हॉरर असला तरी हॉरर पेक्षा ड्रामा / गूढकथा जास्त आहे. कुठेही भुतं, रक्तपात वगैरे दाखवलेलं नाही. चित्रपट चांगला आहे पण संथ आहे. थोडा कमी लांबीचा चालला असता की काय असं वाटलं.

समर्थांनी असा उल्लेख केला असेल तर ते ही चुकलेच>>> असामी असा मी मधले धोंडोपंतांचे त्यांच्या बायकोकडून 'ती चाल सुधारण्यासाठी डोक्यावर दासबोध घेऊन फिरताना चे स्पष्टिकरण' मिळाल्यावर विचार आठवले. Lol

ब्लॅक फोन खरोखरच उत्कंठावर्धक आणि चाकोरीबद्ध भयपटापेक्षा वेगळा सिनेमा आहे. सुरूवातीला थोडासा संथ वाटला तरीही नंतर पकड घेतो. खूपच आवडला. >> +१

'जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता. .. अं....' Rofl

हपा ते ‘अं’ विषयी टोटल सहमत! ते निरागस वाटण्यासाठी आहे हेच मला तुझ्या प्रतिसादातून कळलं. ते कबुतरासारखं (गट्ळगटर्र!) आवाज काढणं अ‍ॅनोयिंग वाटत रहातं. मुळात फॉरेस्ट कधीच वेडसर वाटत नाही जे लालविषयी खात्रीपूर्वक नाही सांगता येत.

“ 'ती चाल सुधारण्यासाठी डोक्यावर दासबोध घेऊन फिरताना चे स्पष्टिकरण' मिळाल्यावर विचार आठवले.“ - Lol

Have you opened a can of worms? Wink

. मुळात फॉरेस्ट कधीच वेडसर वाटत नाही जे लालविषयी खात्रीपूर्वक नाही सांगता येत. >> हो ते भयंकर इरिटेटिंग होत राहते. निव्वळ त्यासाठी सिनेमा फ्लॉप झाला नि कॉन्ट्रोवर्सी झाली हे बरेच झाले वाटत राहिले Wink

Have you opened a can of worms? >> आपण निमित्तमात्रच असतो रे ! कर्ता करविता शेवटी !! नेकी कर और दर्या मे डाल Wink

जिंदगी गोलगप्पे के पानी के बाटली के भोक पाडे हुवे झाकण के जैसी होंदी है .. अं ..... पानी भले ही गळ जावे, शरीर नही मरगळता >>> Lol हा जोक तो चित्रपट पाहिल्यावर आणखी चांगला कळेल असे दिसते Happy

Pages