Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच चर्चा अमिताभ बच्चन घ्या
मस्तच चर्चा अमिताभ बच्चन घ्या गाण्यांची .
सी आता मला परदेसिया ऐकलं तरी तुझी पोस्ट आठवेल गाणं बघताना हसायलाच येत होतं.
बच्चन प्राण डेंजर कॉम्बो आहे.
बच्चन प्राण डेंजर कॉम्बो आहे.. हे कॉम्बिनेशन असले म्हणजे फुल पैसा वसूल असतो...
शराबी फारसा आवडता नाही पण
शराबी फारसा आवडता नाही पण मन्जिले अपनी जगा है एकताना अक्षरश: काटा येतो अन्गावर.
सी भारीच, हाहाहा.
सी भारीच, हाहाहा.
फिरभी अमिताभ ही अमिताभ. रेखाकडे लक्षही जात नाही माझं.
त्याच पोजला स्मरून बहुतेक अमिताभच्या पेजवर विठोबा रखुमाई फोटो खूप असतात (मुंबईतल्या एका देवळातले). एनिवे मस्करीत लिहिलं पण असतात फोटो हे खरं तसं बाकी देवांचे फोटो पण त्या त्या सणासुदीच्या दिवशी असतात.
सिलसिला चा शेवट वगळून बघता
सिलसिला चा शेवट वगळून बघता आला तर बघावा आणि शेवटी काय होतं ते कुणाकडून तरी ऐकावं असा सिनेमा वाटतो मला. यश चोप्रा ला रोमान्स जितका कौशल्यानं हाताळता आला तितकंच त्याबाहेरचे सीन्स - विशेषतः अॅक्शन सीन्स- अगदीच कम्फर्ट झोनच्या बाहेरचे वाटतात. तो विमानाच्या क्रॅशचा सीन अगदीच विजोड वाटतो इतरत्र सुंदर जमलेल्या सिनेमांत. बाकी सिनेमा अगदी प्रेक्षणीय!
भारी चर्चा. लिन्क्स बघते.
भारी चर्चा. लिंक्स बघते.
मी सिलसिला पाहिला आहे, पण त्यातलं फारसं काही आठवत नाही. मला खास आवडला नव्हता हे वगळता.
एकूण चोप्रा ब्रॅन्डचा रोमान्स मला पचत नाही.
यश चोप्रा बहुधा रोमान्स मोड
यश चोप्रा बहुधा रोमान्स मोड किंवा अॅक्शन मोड सेट करून दिग्दर्शन करत असावा. जेव्हा रोमान्स मोड असतो तेव्हा अॅक्शन मधे मजा नसते (कभी कभी चा क्लायमॅक्स आठवा ) . पण अॅक्शन मोड सेट केला की मग दीवार, त्रिशूल, काला पत्थर.
अगदी अगदी!
अगदी अगदी!
"पण अॅक्शन मोड सेट केला की
"पण अॅक्शन मोड सेट केला की मग दीवार, त्रिशूल, काला पत्थर." -अरे, हो रे.. खरंय तुझं म्हणणं.
मला नाही फार अमिताभ रेखा जोडी
मला नाही फार अमिताभ रेखा जोडी आवडत, (बरेच जण वेड्यात काढतील मला पण मला अमिताभ जया च जोडी आवडते जास्त, अगदी सिलसिलातही) .
त्यापेक्षा रेखा मला खुबसुरत, खून भरी मांग, इजाजत मध्ये खूप आवडली.
तसं अमिताभ असताना तोच व्यापून टाकतो बरेचदा (पुर्वीचा तरी), मग दुसरे दुय्यमच वाटायचे मला तरी.
मला वाटते बॉलिवूडला
मला वाटते बॉलिवूडला क्लायमॅक्स न जमण्याचा रोग / शाप आहे. बरेच सिरीयसली केलेले क्लायमॅक्स तर अचानक डार्क ह्युमर सुरू केलाय असे वाटतात.
थोडेच क्लायमॅक्स जमून आले आहेत.
सिलसिलासाठी फेफ+१
सिलसिलासाठी फेफ+१
अ आणि अ आहे ते सगळंच!
पण बाकी मात्र मला आवडतो.
मला नाही फार अमिताभ रेखा जोडी
मला नाही फार अमिताभ रेखा जोडी आवडत, (बरेच जण वेड्यात काढतील मला पण मला अमिताभ जया च जोडी आवडते जास्त, अगदी सिलसिलातही) .>>> मला जया भादुरी/बच्चन फक्त अभिमान आणी गुड्डी मधे आवडली होती बाकी कशातही आवडली नाही कधिच.
तिची आणी अमिताभची जोडी कधिच आवडली नाही अगदी विजोड वाटते.
मला अमिताभ आणि परवीन बाबी
मला अमिताभ आणि परवीन बाबी जोडी खूप आवडते. परवीन आणि शशी कपूर सुद्धा आवडते जोडी.
“तिची आणी अमिताभची जोडी कधिच
“तिची आणी अमिताभची जोडी कधिच आवडली नाही” - खुद्द अमिताभला सुद्धा तसंच वाटायचं (विचारा रेखाला )
अमिताभची जोडी कोणासोबतच आवडली
अमिताभची जोडी कोणासोबतच आवडली नाही. मुळात तो कोणत्या हिरोईनसोबत जोडी बनवावा असा नव्हताच. तो यायचा आणि स्क्रीन खाऊन जायचा. रेखाही खरे तर तशीच होती. अमिताभच्या प्रेमापोटी त्यासोबत काम करताना बॅकफूटला जात असेल. पण मग अशी जोडी का आवडावी?
उलट मग अमिताभ जयाच्या जोडीतले विजोडपण आवडले. शोलेमध्ये हा तोंडाने बाजा वाजवणार, ती एकेक दिवा मालवणार, त्यातच प्रेम उमलणार.. जंजीरमध्ये तो अँग्री यंग मॅन बनणार, आणि ती साधीशी गरीब मुलगी.. मिली मध्ये तो शांत, ही बडबडी.. चुपके चुपके मध्ये तो कॉमेडी आणि ही सिरीअस टोन.. अभिमानमध्ये तो अहंकारी, आणि ही डाऊन टू अर्थ, अश्यात शेवटच्या गाण्यात जेव्हा स्टेजवर एकत्र आले तेव्हा बघायला आवडले.... मला तर अगदी कभी खुशी कभी गम मध्येही ते शाहरूखचे दत्तक आईबाप म्हणून बघायला आवडले
अरे वा ऋ, अमिताभ जया बद्दलची
अरे वा ऋ, अमिताभ जया बद्दलची पोस्ट आवडली.
लहानपणीच मनात रुजलेली जोडी आहे ती. बन्सी बिरजू, एक नजर पासून.
अमिताभचे गुण हेरण्यात आणि त्याला नाकारल्यावर, तोच हिरो म्हणून हवा म्हणणारी जयाच पहिली. हे अनेकदा वाचनात आलं आहे, कितीतरी ठिकाणी.
तेव्हा जया खरंच खुप आवडायची, राजकीय जया नाही आवडत फारशी.
हा धागा अमिताभ-जया-रेखा मय
हा धागा अमिताभ-जया-रेखा मय झालाय
मला अमिताभ- परविन जोडी आवडायची. जया सोबत नाहिच आवडली कधी..अभिमान, गुड्डी वगळता. एक ऑक्वर्ड्नेस असायचा अशी भावना वाटत असायची.
रेखा ची जोडी विनोद मेहरा सोबत खास च वाटायची.
लोकहो हा नाच कसा काय विसरलात
लोकहो हा नाच कसा काय विसरलात ? लहानपणी खूप आवडायचा हा lighting चा dress
https://youtu.be/0AwkZihdw6E?t=142
पण मन्जिले अपनी जगा है एकताना
पण मन्जिले अपनी जगा है एकताना अक्षरश: काटा येतो अन्गावर. >>> अगदी अगदी
शिवप्रताप गरुडझेप फक्त
शिवप्रताप गरुडझेप फक्त महाराजांसाठी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीला हातभार लागावा म्हणून पाहिला !
पण अमोल कोल्हे असू दे नाहीतर दीगपाल लांजेकर दोघेही शिवाजीराजांच्या पराक्रमाला पडद्यावर परिणामकारक उतरवू शकत नाही हे सिद्ध झाले .
महाराजांचा सर्वांना माहीत असलेला इतिहास पडद्यावर दाखवायचा असेल तर व्ही एफ एक्स बरोबर कसदार अभिनेत्यांची गरज आहे .
कोल्हे आणि ऑरंग्या च्या भूमिकेतील यतीन कार्येकर वगळता इतर कलाकारांची ( कमीत कमी असलेले ) अभिनयाच्या बाबतीत बोंबाबोबच आहे .
आग्ऱ्या ला शिवाजींना कैदेत ठेवल्याचा समाचार मिळताच राज्य सांभाळण्यासाठी पुढे सरसावलेल्या जिजावू आदेश देतात राज्याची तटबंदी अधिक सुरक्षित करा !
त्यावेळी दहा ते बारा जण हातात भाले घेवून पळताना दाखवले आहेत , आणि चार पाच घोडेस्वार !
असे यांचे v f x .
या पेक्षा जास्त खर्च सिरीयल वाले करत असतील......
ऑरंग्या च्या भूमिकेतील >
ऑरंग्या च्या भूमिकेतील > हल्ली सगळ्या सिरीयल आणि पिक्चर मध्ये औरंगजेबचा उल्लेख औरंग्या असा का करतात? शिवाजी महाराजांनी पण असा उल्लेख केला नसेल असे उगीच दरवेळी माझ्या मनात येतं . औरंगजेबा बद्दल प्रेम नाही पण खूप बालिश वाटते असे बोलणे.
PREY आला आहे HOTSTAR वर.
प्रे बघायला हॉट स्टार लावले तर लक्षात आले सबस्क्रिप्शन संपलेय. लगेच रिन्यू केले. मग लक्षात आले की Hotstar वर फक्त ट्रेलर आहे.>>>PREY आला आहे HOTSTAR वर.
मुल्लामौलवीपालक मुघलकुलावतंस
मुल्लामौलवीपालक मुघलकुलावतंस दिल्लीपती औरंगजेब महाराज
माझा एक तेलगू मित्र मराठी
माझा एक तेलगू मित्र मराठी चित्रपट कोणते पाहू असे विचारत आहे , सैराट खूप आवडला त्याला , भाषा थोडी थोडी कळते
कोणते ३-४ चित्रपट सांगता येतील (शक्यतो अलीकडचे) ?
देऊळ, वळू,घो मला असला हवा
देऊळ, वळू,घो मला असला हवा
पिक्चर मध्ये औरंगजेबचा उल्लेख
पिक्चर मध्ये औरंगजेबचा उल्लेख औरंग्या असा का करतात?>>>
बुडाला औरंग्या पापी असं समर्थांनी च म्हणलं आहे म्हणे
हरिश्चंद्राची फॅक्टरी सुचवेन
हरिश्चंद्राची फॅक्टरी सुचवेन मी.
शोधक,
शोधक,
मृने दिलेले आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी, सायकल , मुक्ता, मसाला , एक डाव धोबीपछाड, वास्तुपुरूष, स्माईल प्लीज हे सुचवेन.
पिक्चर मध्ये औरंगजेबचा उल्लेख
पिक्चर मध्ये औरंगजेबचा उल्लेख औरंग्या असा का करतात?>>>
बुडाला औरंग्या पापी असं समर्थांनी च म्हणलं आहे म्हणे
>>>
चुकीचे आहे हे. समर्थांनी असा उल्लेख केला असेल तर ते ही चुकलेच.
पाकिस्तानींना सर्रास पाकडे म्हटले जाते. मी कधी म्हटले नाही. जे म्हणतात त्यांना कधी समजवायच्या फंदात पडलो नाही. उगाच माझ्या देशभक्तीवर शंका घेतली जायची. पण हल्ली काही बातम्यांमध्येही पाकडे वगैरे उल्लेख वाचण्यात आले. हसावे की रडावे असे झाले. खरेच बालिश प्रकार. असो. ईथे या विषयावर तुर्तास ईतकेच.
Pages