चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेंट मॉड (२०१९)

एका देवभक्त ख्रिश्चन परीचारिकेचा एका मरणासन्न बाईशी संबंध येतो. हि बाई देवावर विश्वास ठेवत नसते, नर्सच्या दृष्टीत काही "पापकर्म" करत असते. नर्स स्वतःला देवाने बाईंचा स्पिरिच्युअल उद्धार करायला पाठवले आहे असे समजत असते. मग तिच्या व्यक्तिगत आयुष्यात वैगेरे ढवळाढवळ करायला सुरु करते.

शेवट एकदम झकास जमलाय-अपेक्षित तोच असला तरी सुरेख घेतलाय. सिनेमा म्हणावा तर धार्मिक विचारांचा पगडा या विषयावर आहे किंवा म्हणलं तर मानसिकरित्या अस्थिर व्यक्तीवर आहे.

नेटफ्लिक्स वर पाहू शकता.
https://www.netflix.com/in/title/81180826?source=35&preventIntent=true

Batman आणि The Lost City मुलांना घेऊन जाण्यासारखा आहे का? Easter weekend ला थिएटर मधे जाऊन काहीतरी बघायचे आहे.

अस्मिता, बॅट्मॅन गंभीर आहे. आणि आधीचे पाहिले नसल्याने नीट मनापासुन पहायला जमले नाहीत. पण कॉमीने लिहिले होते की त्या सिनेमांची ती स्टाईलच आहे.
लॉस्ट सिटी टाईमपास आहे. मुलांना न पाहण्यासारखे काही वाटले नाही.

कॉमी, कुठे पहाता ते पण लिहीत जा.

बच्चन पांडे प्राईम वर आला आहे. काल अर्धा पाहिला, आज अर्धा. इतकाही वाईट नव्हता.
न चालल्यामुळे अपेक्षाच नव्हत्या. अक्षयकुमार चे याआधीही डेंजरस क्रिमिनल च्या भूमिकेत असलेले विनोदी सिनेमे आले होते. ते मुळातच रद्दड होते. हा तितका नाही. पण टाईमपास बरा आहे. पंकज त्रिवेदीने छोट्याशा रोल मधे जी धमाल केली आहे तशीच अजून अर्धा तास जरी जमली असती तरी चांगला विनोदी सिनेमा बनला असता.

अस्मिता, बॅट्मॅन गंभीर आहे. आणि आधीचे पाहिले नसल्याने नीट मनापासुन पहायला जमले नाहीत. पण कॉमीने लिहिले होते की त्या सिनेमांची ती स्टाईलच आहे.
>>≥>>>>>>>>>>>
खरं आहे ! अक्खी बॅटमॅन सिरीज गंभीर अभिनयावर अवलंबून आहे , लांबलचक मोठ्ठे संवाद !
गेल्या वेळचा जोकर ने तर लै त्रास दिला होता !

बाय द वे !
Kgf 2 बद्दल अभिप्राय इथे लिहून येथील लोकांना मानसिक छळापासून वाचवा ना !

जोकर अप्रतिम सिनेमा आहे
आणि तो असा येता जाता सहज बघितल्यासारखा नई बघू
जोकर चे दुःख, वेदना आणि त्याच यावेळी येणारे न आवरणारे हसू तर फारच भयाण

आशुचॅम्प +१

घालवण्यासारखं काही नसलेला माणूस स्नॅप झाला तर काय होईल हे खूप प्रभावीपणे दाखवलंय.

केजीएफ-२ बद्दल बरेच वाचल्याने केजीएफ-१ बघायचा थोडा प्रयत्न केला.

सुरूवातीचा अनंत नाग वाला भाग कुतूहल वाढवणारा आहे.
नंतर हीरो आल्यावर असंख्य वेळा तेलुगु चित्रपटात बघितलेली फायटिंग दिसत आहे. नावीन्य काही नाही. संवाद अगदीच सामान्य आहेत - मूळ कन्नड कसे आहेत माहीत नाही.
१९७८ साली स्मगलर लोकांना आपल्या दुश्मनाला लांबून खतम करण्याची कोणतीही पद्धत माहीत नसल्याचे समोर येत आहे. १०० लोक असतील तरी प्रत्येकाने एकेक करून समोरून जाउन जाउन मार खायचा. मग तो पडला की पुढचा - अशा क्रमाने फायटिंग झाली आहे.
हीरो अजून पटकन ओळखू येत नाही. चेहर्‍यावरचे केस बाजूला सारले व दमदार टाइप डॉयलॉग मारला की मग कळते.

बाकी एका फाइटीत सर्वसामान्य हिंदी हीरोपेक्षा चौपट ताकद साउथच्या हीरोंमधे असते. ते लोण तेलुगूमधून कन्नड मधेही आले आहे.

ओह ! कमेण्ट्स वाचायला पाहिजे होत्या आधी Lol
उगीच जागरण केले Lol

पण जो काही मूव्ही आहे तो अ आणि अ आहे. एका गरीब वस्तीत आश्रम बनणार असतो. त्यांचे गुंड घरं खाली करायला येतात. एक पंडीत त्यांच्या विरोधात उभा राहतो. पण त्याच्या मुलीला आणि बायकोला मारून टाकतात. आधी वाटले हाच यश असेल. पण तो हिंसा करायला तयार नव्हता. मग हिरो म्हणून यश येईल असे वाटले. पण नंतर जादूटोणा, मंत्र तंत्र, साधू, गूढ विद्या सुरू झालं.

Lol

पण इतक्या लगेच तूनळी वर इतका नवीन आणि तोही सुपरहिट सिनेमा येत नस्तो गो !

जाऊ दे , सामान्य ज्ञानात भर तरी पडली Wink

केजी एफ १ पुष्पासारखा आहे असे कानावर आलेले.
पुष्पा आवडलेला. घरीच पाहिलेला. पण तरी केजी एफ १ बघायची ईच्छा झाली नाही.
पुष्पासारखाच आहे तर कश्याला उगाच पुन्हा ते बघा असे झाले.
पण आता केजीफ २ च्या हवेने पहिला भाग बघावासा वाटतोय. कुतूहलाने की नेमके आहे तरी काय.. झेपला तर २ सुद्धा बघता येईल.
अर्थात थिएटरला नक्कीच जाणार नाही. ओट्टीटी वर येईलच

उगीच जागरण केले Lol

असे बरेच जणांचे होते.. कधी कधी या नादात एखादा चांगला पण माहीत नसलेला सिनेमाही बघितला जातो Happy
यूट्यूबर कॉमेंट मात्र आधी वाचायच्याच... पब्लिक सब जानती है, और झूठ कभी नही बोलती है..

केजीफ १ बघायला थेटरात जायचा आग्रह मित्रांनी केलेला तेव्हा ठामपणे व्हेटो दिलेला.

नंतर घरी बघितला, आणि योग्य निर्णय घेतल्याचे समाधान मिळाले. २ बघायचा प्रश्नच नाही, ना थेटरात ना OTT वर.

बाहुबली मात्र जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव होता, सुखद धक्का होता तो.

शर्माजी नमकीन पाहिला. छान, साधीसुधी स्टोरी आहे. शेवटी तो हॉटेल टाकतो वगैरे दाखवलं नाही ते आवडलं.

सोशल मिडियावर रिव्ह्यूजमध्ये वाचलं होतं की ऋषी कपूर आणि परेश रावलचे सीन्स आळीपाळीने येतात. त्यामुळे त्या तयारीनेच पाहिला. त्यामुळे फार विरस झाला नाही.
तरी ऋषी कपूर मस्त, हॅपी गो लकी पंजाबी अंकल वाटतो, तितका परेश रावल वाटत नाही. परेश रावल कर्तव्यदक्ष, जरासा खडूस अंकल अधिक वाटतो. अर्थात हा फरक त्यांच्या व्यक्तिमत्वांमुळे आहे. कामं दोघांनी छान केली आहेत.

जूहीचा मेक-अप जरा गंडलेला वाटला. तिला आहे त्यापेक्षा वयाने लहान दाखवण्यचा प्लॅन असावा आणि तो फसला असावा असं वाटलं.

सलीम-जावेद दोघेही कायमचे हिमालयात निघून जातील असे संवाद आहेत केजीएफमधे. विशेषतः इंग्रजीत पाजळू लागले की. हे विशेष कारण हे बहुधा डबिंगमधून वाचलेले आहेत त्यामुळे ओरिजिनल फॉर्म मधेच इतके जागतिक दर्जाचे आहेत.

हीरॉइनः How dare you!
हीरो: How fair (are) you!

आणि हा जगात भारी
"if you are bad, I am your dad"

एखाद्या व्यक्तीत एखादा गुण असेल तर त्याच्या वडिलांमध्ये तो गुण जास्त प्रमाणात आढळतो हा चुकीचा समज आहे, पण ट्रॅश टॉक मध्ये खपून जातो.

"if you are bad, I am your dad"

या नावाने एक गाणे ही आहे
बस मध्ये हिरो हिरोईन प्रणय करताना
मला तरी फार उन्मादक वाटलं ते गाणं
इंस्टावर कोणीतरी टाकलं होतं
सिनेमा कुठला ते माहिती नाही

"if you are bad, I am your dad"
>>>>
मी केजीफ पाहिला नाही. पण हा डायलॉग ऐकलाय कुठल्यातरी चित्रपटात.

if you are bad, I am your dad

अरे दिवानो च्या चालीवर म्हणता येतंय.

अरे बॅडांनो, मुझे पहचानो, कहासे आया मै हूं डॅड
इफ यू आर बॅड, आय अ‍ॅम डॅड
आय अ‍ॅम , आय अ‍ॅम , आय अ‍ॅम डॅड
डॅड डॅड डॅड डॅड डॅड

Lol

Pages