चित्रपट कसा वाटला - ६

Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05

आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"महागुरू बाल कलाकार म्हणून नशीबवान आहेत" - ह्याच भांडवलावर 'अमिताभ आणि धर्मेन्द्र मला ज्युनियर आहेत' असं सांगत फिरतात. मराठी चॅनेल्स आणि विशी-तीशीतले अँकर्स आहेतच मग भारावून जायला (भारावून जायचं नाटक करायला).

अणकुचीदार टोक इमॅजिन करते आहे >>> Lol हो. तत्कालीन मराठी चित्रपटात अणकुचीदार टोक हे फार फार तर पदराचेच Happy

मुलांबाबतची अगम्यता मनमोहन देसाईने फार पुढे नेली. ते हरवणे-सापडणे तर सोडाच, त्यांच्या पिक्चर्स मधे चरित्र अभिनेते व्हिलन्सची मुले पळवायचे. अमर अकबर अँथनी मधे प्राण जीवनची मुलगी परवीन बाबीला किडनॅप करतो, तर परवरिश मधे इन्स्पेक्टर शम्मी कपूर डाकू अमजद खानच्या मुलाला. अर्थात ते सद्हेतूने वगैरे केलेले असते. अमजद खान नंतर समजतो की जो काड्या करणारा मुलगा आहे तो आपला आहे पण प्रत्यक्षात उलटे निघते.

मला हे फार आश्चर्य वाटते.. असा एकाच फटक्यात प्रेग्नेंट होणाऱ्यांचे... आम्ही तीन महिने ट्राय केला तेंव्हा कन्सिव्ह झालो होतो...
आमच्या टीम मध्ये एक होता जो एक आठवडा सुट्टी काढून लग्नासाठी गेला होता आणि बायकोबरोबर फक्त एकच रात्र स्पेंड करू शकला होता.. नंतर काही महिन्यांनी कळले कि प्रेग्नन्ट झाली.. आम्ही त्याला शार्प शूटर म्हणायचो हाफिसात...

आम्ही तीन महिने ट्राय केला तेंव्हा कन्सिव्ह झालो होतो...
>>>>
दुसऱ्यावेळी लवकर होते. चित्रपटात दुसरे दाखवलेय ना.

आम्ही तीन महिने ट्राय केला तेंव्हा कन्सिव्ह झालो होतो..
>>>>

अरे कंट्रोल करा जरा

कुठं गेली ती गळेकाढु गँग??
सरांचे आणि दुसऱ्या सरांचे हे प्रतिसाद खटकत नाहीत का? आणि अवांतर पण वाटत नसतील ना?

भारतात मेडिकल सायन्सची प्रगती झाली नव्हती तेव्हा फळ खाऊन, सावली दिसल्याने मूल व्हायचं. सावली पडणे असे म्हणतात ते उगाच नाही.

हे प्रतिसाद खटकत नाहीत का? आणि अवांतर पण वाटत नसतील ना?
>>> अवांतर मान्य आहे.. पण खटकण्यासारखे काय आहे मूळ प्रतिसादात?

ज्यांना सर म्हणलेलं खटकतं त्यांना हे चालत असावं बहुदा

चालायचंच पहिल्या धारेच्या आपलं श्रेणीच्या आयडीबाबत वेगळे धोरण असणे अगदी स्वाभाविक आहे

त्रास फक्त आमच्या पोस्टमूळे होतो Happy

सरांचे आणि दुसऱ्या सरांचे हे प्रतिसाद खटकत नाहीत का? आणि अवांतर पण वाटत नसतील ना?>> काहुन चिखलामंदी दगडं फेकुन रायले बाप्पा. पाहुन घ्याच आणि उगीमुगी बसाचं. नैतर वाताला गॅंग यीलच तुम्ची हजेरी घ्याला.

व्हिलन तिच्यावर अटॅक करतो , ती बेशुद्ध पडते, व्हिलन गैरकृत्य करणार असतो, तेवढ्यात तिचे पहिले मूल पाळण्यात असते ते रडू लागते, त्याने व्हिलनचे हृदयपरिवर्तन होते व तो निघून जातो
ती बेशुद्ध पडलेली असते , तोवर नवरा येऊन जे करायचे ते करून जातो.
मग ती दुसर्यादा प्रेग्नन्ट होते , तिला नवरा येऊन गेल्याचे माहीत नसते , तिला वाटत रहाते हे दुसरे मूल व्हिलनचे आहे.
शेवटी व्हिलन नवऱ्याला खरे ते सांगतो , की मी काही नाही केलेले.>>>>> अरे कायच्या काय कथानक आहे हे. बेकार. खुप हसले Rofl

पूर्वी प्रेग्नंट बाईला दिवस गेले की तिला दिसेल असा कृष्णाचा फोटो भिंतीला लावायचे. म्हणजे मूल त्याच्यासारखे होईल असे म्हणायचे. मला प्रश्न पडायचा की जर लग्नाआधी फोटो लावला तर ? मग मोठी माणसं धपाटा देऊन सांगायची की लग्न झाल्याशिवाय मूल होत नाही. तेव्हांपासून डोक्यात किडा होता हा.

पूर्वी प्रेग्नंट बाईला दिवस गेले
>>> प्रेग्नन्ट बाईला दिवस जाणे... गल्तीसे मिस्टेक टाईप झाला हा..

ती बेशुद्ध पडलेली असते , तोवर नवरा येऊन जे करायचे ते करून जातो.>> पटकथा लेखकाला ऑस्कर मिळायला पाहिजे होता.

मला फक्त कणेकरांचा डायलॉग आठवतो. ती बाई मरताना म्हणते की एक मूल तुझं नाही... पण तो दिवा लपलपायच्या आत असं सांग की बबड्या तुझा नाही, किंवा बबडी त्या शेजार्‍याची आहे. कन्फ्युजन कशाला टाईप.

Proud कणेकरांमुळेच हा चित्रपट ऐकून माहीत होता.
"बबडी शेजाऱ्याची आहे" म्हणताना कणेकर शेजाऱ्याच्या ऐवजी त्या काळात जो कोणी माणूस अशा पराक्रमांसाठी ट्रेंडिंग असायचा त्याचं नाव टाकायचे- व्हिव रिचर्डस, बिल क्लिंटन असं काहीही.

बाकी वरचं सर्व डिस्कशन हहपुवा आहे.

कणेकर जे पिक्चर सांगतात त्यातले काही बघायचे ठरवले आहेत. एकदा ' कुदरत का कानुन ' ' कानून क्या करेगा ' ' करेगा वो मरेगा ' ही सिरीज बघायचं ठरवलं होतं. त्यातला कुदरत का कानून पाहिला. डोक्याला शॉट आहे

दुसरा तो 'माला सिन्हा दुडूदुडू धावत येते आणि रेल्वे इंजिनातलं गरम पाणी भरून घेते' वाला पण पाहिला होता (बहुतेक जब याद किसी की आती है) त्यात खरंच ती इतक्या वेळा पाणी भरायला येते, की वैताग येतो. अतिशय रटाळ पिक्चर.

स्वाती आंबोळे, हा तर पूर्णच रहस्यभेद झाला, असं म्हणालो असतो. पण पुढे जी चर्चा आणि काथ्याकूट झाला आहे, त्यात बायको बेशुद्ध असताना नवरा (विदौट कन्सेंत) करतो की आधीच करतो, ती मेल्यानंतर नवऱ्याची जी अगतिकता आहे, ती नक्की त्याचं मुल कोण याबद्दल आहे की व्हीलन एवढा शार्प शूटर कसा निघाला याबद्दल आहे, शेवटी रहस्यभेद होतो तेव्हा बायकोला व्हीलनबद्दल एवढा कॉन्फिडन्स कसा काय होता या विचाराने त्याचं काय होईल - अशी अनेक नवीन रहस्य उभी राहिली आहेत. त्यासाठी तरी काही लोक बघतील.

बाकी काही नाही, तरी सीमा देव यात छान दिसली आहे. ह्या सीमासाठी तरी हा नक्की पहावा.

सीमा देव व काशीनाथ घाणेकर मुले आणि रमेश देव त्यान्चा बाप..

याने मुले इतकी मोठी होईपर्यन्त स्वतःचीच म्हणुन प्रेमाने मिरवलेली असतात. त्यानन्तर बायको म्हणाली की यातले एक तुमचे नाही तर इतका शॉट लावुन का घ्यावा? तोवर मुलान्प्रती चांगला लळा, जिव्हाळा असतो तो एका क्षणात गडप? कसली ही तकलादु नाती….

यापेक्षा तो जयश्री गडकरचा अरुण सरनाईक नवरा असलेला चित्रपट बरा… बायको बाळन्त झाल्या झाल्या मेली समजुन मुलाला साम्भाळत असलेला नवरा, बायको अजुन एका मुलासकट उगवलेली पाहुन उगीच आनन्द करण्यात वेळ न घालवता या मुलाचा बाप कोण ह्या रहस्यभेदाच्या मागे लागतो.

ह्या असल्या चित्रपटांनी स्त्रीची योनीशुचिताच सर्वश्रेष्ठ हा फालतु विचार जनमानसात बिम्बवण्यात हातभार लावला हे मत नोन्दवुन आजच्या दिवसाचा प्रतिसाद कोटा संपवते.

अरे कंट्रोल करा जरा >> कंट्रोलचा संबंधच नाही. कंट्रोल नाही केला तरी पहिल्या फटक्यात कन्व्हिन्स होत नाही हा राष्ट्रीय प्रश्न आहे. काही काहींना डॉक्टरकडे जाऊन लाखो रूपये खर्च करावे लागतात. व्हिलन लोक त्यामानाने लगेच कन्व्हिन्स करतात.

आजच्या दिवसाचा प्रतिसाद कोटा संपवते. >>> वाढवून पाहीजे का कोटा ? माझे काही काही ड्युआयडीज रोज प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा कोटा तुम्हाला देतो.

मला हाच प्रश्न पडला होता. कुठलं मूल आपलं नाही हे कळून पुढे काय करणार? ओएलेक्स वर विकून टाकणार का?

अवांतर - आम्ही तीन महिने ट्राय केला तेंव्हा कन्सिव्ह झालो होतो >>> 'करू शकलो होतो' पाहिजे ना??

It follows बघितला. चांगल्या प्लॉटची माती केली झालं!
नाही आवडला. हॉरर सुरुवातीला काही ठीक वाटलं, मग कायच्या काय प्रकार चालू झाल्यावर क्लायमॅक्सला काहीच वाटेनासं झालं. शेवट हाच करतील आधीच वाटेललं तो ठीकच होता पण मग ... जाऊ द्या!

मला वाटते तो व्हिलन तिचा पूर्वीचा मित्र , प्रेमी तत्सम काहीतरी असतो का ?

म्हणजे संपूर्ण सिनेमा हा खरे तर शहारुख , सनी देवल , जुही चावला यांच्यासारखाच आहे.

फक्त हिरोईन मध्ये मरते आणि व्हिलन सत्य सांगण्यासाठी पुन्हा पुन्हा घरी येऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो , असे काहीतरी आहे

चारीत्र्यसंपन्न व्हिलन. नायक व्हिलनवर विश्वास ठेवतो हे पण सुंदर आहे. त्याचीही चूक नाही. बायकोचाच तसा विश्वास असतो. तिनेच सांगितल्यावर तो तरी काय करणार ?
अशाच कल्पनेवर महेश मांजरेकरचा पण एक चित्रपट होता. तब्बू आणि सचिन खेडेकरचा. अस्तित्व ? पण तो चांगला होता.

Pages