Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरा वाघ. सर्कसमदी राहतो. कवा
खरा वाघ. सर्कसमदी राहतो. कवा कवा जंगलमदी पण असतो. >> चोक्कस
शनी देवाच्या वडिलांचं नाव
शनी देवाच्या वडिलांचं नाव धर्मेंद्र!!! लोल मॅक्स
सनी देओलचा किस्सा प्रत्यक्ष
सनी देओलचा किस्सा प्रत्यक्ष पाहिला आहे.
नाशिक रोड स्टेशनच्या पुढे जिथे लक्झरी बसेस थांबतात तिथे रिक्षातळ आहे. तिथे रात्री साडेनऊ वाजता एक सिंधी बाई रिक्षावाल्याला सांगत होती " सनी देओल चलो"
तो म्हणायचा "मॅडम, मै सनी देओल नही, मै अब्दुल " ती वैतागून म्हणाली " तुम अब्दुल हो कि गब्दुल मुझे लेना देना नही, सनी देओल चलना है तो बोलो " असं दोन तीन रिक्षावाल्यांशी झाल्यावर ती वैतागली.
आम्ही जेवून फिरायला आलो होतो. मामेभावाने तिला विचारलं. मग सगळा उलगडा झाला. सिंधी कॉलनीच्या इथे शनी देऊळ आहे, तो लँडमार्क आहे. सिंधी, पंजाब्यांना ळ म्हणता येत नाही. ती श चा उच्चार पण विचित्र करत होती. त्यामुळे घोळ होत होता. मग मामेभावाने रिक्षावाल्यांना सांगितलं "यांना शनी देऊळ जवळच्या सिंधी कॉलनीत जायचेय" ते ऐकल्याबरोबर सगळे हसत सुटले.
कॉमी, छान लिहिलंय.
कॉमी, छान लिहिलंय.
‘दे केम नॉकिंग‘ चांगला हॉरर आहे. नेटफ्लिक्सवर असावा. खूप काळ झाला पाहुन. असंच कॉमीनी लिहिलेल्या सिनेमाचे नाव वाचून आठवण आली.
मै - हे म्हणजे "वाघ. खरा वाघ.
मै - हे म्हणजे "वाघ. खरा वाघ. सर्कसमदी राहतो. कवा कवा जंगलमदी पण असतो" तसे झाले >>> एक नंबर
थँक्स सुनिधी. दे केम नॉकिंग
थँक्स सुनिधी. दे केम नॉकिंग नाही पहिला, लिस्ट मध्ये टाकलाय.
आज मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस
आज मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस बघणार. सॅम रेमीचा MCU मधला पहिला सिनेमा. (स्पायडरमॅन मोजला नाही तर.)
सध्या थेटरात दोन पंजाबी आणि
सध्या थेटरात दोन पंजाबी आणि गुजराती मुव्हीही दिसत आहेत
सगळ्या भाषेतील सिनेमे असे इकडेतिकडे फिरायला हवेत.
शेर शिवराय मुव्ही गेला वाटतं बहुतेक
काल प्राईम वर बी ए पास बघितला
काल प्राईम वर बी ए पास बघितला. काहीतरी कथानक असेल असे वाटून पूर्ण पाहिला पण alt बालाजी च्या शॉर्टफिल्म्स सारखा निव्वळ उत्तान दृश्य दाखवण्यासाठी बनवला आहे असं वाटतं. सिरियसली लोकं नुसतं इतकंच बघायचं असतील तर सरळ सरळ पॉर्न का बघणार नाहीत? कुछ तो कंटेंट दो भाई :कपाळाला हात:
काल नेटफ्लिक्स वर ‘द इमिटेशन
काल नेटफ्लिक्स वर ‘द इमिटेशन गेम‘ पाहिला. मस्त आहे.
होय, इमिटेशन गेम्स भारी आहे..
होय, इमिटेशन गेम्स भारी आहे...
बीए पास भयानक आहे
बीए पास भयानक आहे
फेरारी की सवारी पाहिला नेफ्ली
फेरारी की सवारी पाहिला नेफ्ली वर. मस्त आहे. दुसरा अर्धा भाग जरा जास्त ताणला आहे. पण ओव्हराल्ल आवडला. बोमन आणि त्याच्या नातवाचं काम करणारा मुलगा - दोघांनी मस्त काम केलं आहे.
फेरारी कि सवारी थेटरात
फेरारी कि सवारी थेटरात पाहिलेला..चांगला आहे.
बीएपास बकवास आहे.
आज प्राईमवर नवीन तमिळ saani kaayidham पाहिला..क्राईम,थ्रीलर रिवेंज सिनेमा.. किलबिल टाईप वाटला.
जिम कॅरेचा "Me, Myself &
जिम कॅरेचा "Me, Myself & Irene" हा पूर्वी पाहिलेला पिक्चर पुन्हा पाहिला (हुलू). जिम कॅरेला त्याचे हावभाव, भन्नाट हालचाली व जनरल अॅण्टिक्स दाखवायला भरपूर स्कोप असलेला रोल त्याने जबरी केला आहे. पण धमाल उडवतात तीन त्याची तीन आफ्रिकन-अमेरिकन मुले. तो स्टीरीओटाइप फार मजेदार पद्धतीने बदलणारी कॅरेक्टर्स आहेत. सुपर लोल आहेत त्यांचे सीन्स आणि संवादही.
त्यातला एक मुलगा म्हणजे फ्रेण्ड्स मधे "उनागी" एपिसोड च्या शेवटी रॉस त्या ट्रेनर ला भेटतो तो.
नेटफलिक्स थर..
नेटफलिक्स थर..
मा#@#@द म्हटल्यावर खाली सबटायटल आलं good lord
प्राईमवाल्यांनी नवीनच सुरू
प्राईमवाल्यांनी नवीनच सुरू केलंय..चांगले सिनेमे 79, 99, 119, 499 रेन्ट देऊन बघायचे आता..
वर कमेंट वाचून us बघायला गेले तर 79 रेन्ट..फक्त ट्रेलर पाहिला मग..चांगलाय ट्रेलर..भयानक.
इमिटेशन गेम खूप दिवसांपासुन
इमिटेशन गेम खूप दिवसांपासुन पहायचा आहे. वेळच होईना. विकेन्डला पहाणार. कम्बरबॅचा थेटरमधे पण लागलाय , तो ट्रेलर तरी मस्त होता. तो पण पहाण्यात येईल.
सुनिधी +१ मी तर आजच चाललेय.
सुनिधी +१
मी तर आजच चाललेय.
डॉक्टर स्ट्रेंज- द
डॉक्टर स्ट्रेंज-इन द मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस बघितला.
मार्व्हल फॅन्स साठी मोठी मेजवानी आहे.
बाकीच्यांना सुद्धा आवडेल, पण मार्व्हल फॅन्सना बऱ्याच जागी "ए तो बघ अमुकतमुक सुप्रसिद्ध पात्र" म्हणत ओरडण्याचा आनंद मिळेल तो नाही मिळणार.
मार्व्हलचा नेहमीचा फॉर्म्युला आणि रेमी (डायरेक्टर)चा पर्सनल टच हा बॅलन्स जुळून आला आहे. पाहण्यासारखा आहे.
सोनी लिव्हवर कारखानीसांची
सोनी लिव्हवर कारखानीसांची वारी पाहिला. अप्रतीम आहे. अग्ली या चित्रपटाची आठवण येत होती पाहताना.
मार्व्हल फॅन्स साठी मोठी
मार्व्हल फॅन्स साठी मोठी मेजवानी आहे.>> मी पण काल रात्री बघितला. मदर्स डे म्हणून एक मार्व्हेल लिहिलेला टीशर्ट, एक आयर्न मॅन वाली कीचेन व एक कसलातरी हिरो असलेली वही गिफ्ट मिळाली. मस्त टाइम पास आहे सिनेमा. अजून चांगला करता आला असता. पण मजा येते बघायला. कंबर बॅच एकदम मस्त दिसतो व काम करतो.
मी पण ह्या आठवड्यात जाणार आहे
मी पण ह्या आठवड्यात जाणार आहे बघायला.. इटर्नल्सच्या आठवणी खोडायच्या आहेत
डॉ स्ट्रेंज बघून आले जबरदस्त
डॉ स्ट्रेंज बघून आले जबरदस्त आहे, कंबरबॅचचा अपटाईट इंग्लिश मॅन लूक, उच्चार व अभिनय आवडतोच पण एलिजाबेथ ओल्सननेही जबरी काम केलेय. काही काही सिन्स क्रीपी आहेत, दचकायला झाले, थ्री डी बघीतला.
कॉमी, तुमचे प्रतिसाद आवडतात,
कॉमी, तुमचे प्रतिसाद आवडतात, आवर्जून वाचते.
थँक्स अस्मिता
थँक्स अस्मिता
आमच्याकडे ऑनलाईन बुकिन्ग
आमच्याकडे ऑनलाईन बुकिन्ग करताना दिसतंय की थेटर पुर्ण भरलंय. त्यामुळे कम्बरबॅचला जायचा बेत रद्द केला व कमी गर्दी असलेला “नॉर्थमॅन” पाहिला. चांगला बनवलाय हा सिनेमा. अवघड आहे असे सिनेमे बनवणं असं मला वाटतं.
नॉर्थमन दिगदर्शक रॉबर्ट एगर्स
नॉर्थमन दिगदर्शक रॉबर्ट एगर्स चे 'द लाईटहाउस' आणि 'द विच' सिनेमे सुद्धा चांगले आहेत. दोन्ही A24 आहेत.
द नॉर्थमन बघायचा आहे...
थर (Thar) - नेटफ्लिक्स
थर (Thar) - नेटफ्लिक्स
तशी नेहमीचीच सूडकथा आहे, पण राजस्थानची वैराण लोकेशन्स, फोटोग्राफी यामुळे बघण्याजोगी आहे. धीम्या गतीचं स्क्रिप्ट असूनही मला कंटाळा आला नाही.
अनिल कपूरसाठी आजही डोळ्यांत बदाम.
हर्षवर्धन कपूर मात्र टोटल माठ चेहर्याने वावरतो. त्याला फारसे डायलॉग्ज नाहीत, त्यामुळे तर आणखी चॅलेंजिंग होतं, आणि त्याला हा चॅलेंज मुळीच झेपलेला नाही.
बापाचे कलागुण पन्नास टक्केही दोन्ही मुलांच्यात येऊ नयेत त्याबद्दलही हरकत नाही, पण मग अॅक्टिंगच्या फंदात कशाला पडावं
सतीश कौशिक आणि अनिल कपूरचे सीन्स बघताना उगीच मि.इंडिया आठवत होता
मलातरी वाटलं कि हर्षवर्धनने
मलातरी वाटलं कि हर्षवर्धनने चांगली acting केली आहे.
(स्पॉइलर अलर्ट)
कथानकाची गरजच होती कि त्याने हृदय नसलेल्या दुःखाचा कडेलोट झालेल्या आणि त्यामुळे जिवंतपणी मेलेल्या माणसाचा रोल करायचा होता.
या आधी त्याला अनुराग कश्यप आणि अनिल कपूरच्या सिरीजमध्ये पाहिलेलं (AK vs AK) त्यात दाखवलेत त्याने एक्सप्रेशन्स!!
Pages