Submitted by गारंबीचा शारूक on 15 April, 2022 - 12:05
आधीच्या धाग्याने अठराशे प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर.
आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/80722
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कंतारा , ट्रेलर पाहून बघावासा
कंतारा , ट्रेलर पाहून बघावासा वाटलं नाही. पण नसता पहिला तर खूप मोठ्या अनुभवाला मुकलॊ असतो. अस्सल मातीतला, मातीची कहाणी सांगणारा चित्रपट आहे. कथा, पटकथा, अभिनय, छायाचित्रण सर्वांग सुंदर आहे, कन्नड मधून बघितला असता तर संवादातलं सौन्दर्य अजून भावलं असतं , हिंदी मध्ये संवाद थोडे विचित्र 'ऐकू' येतात. हा एक मोठ्या पडद्यासाठीच बनलेला चित्रपट आहे. शेवटाकडे जातांना त्या पूर्ण प्रसंगात तुम्ही समरसून जाता , एक प्रेक्षक म्हणून केवळ बघे उरत नाही. जातीव्यवस्था, न्यायव्यवस्था, समाज, संसाधन आणि निसर्ग ह्या सर्वांच्या वर कंतारा!
कंतारा पाहिला. शेवट काही खास
कंतारा पाहिला. शेवट काही खास नाही. अपेक्षितच आहे.
कर्नाटकातले ग्रामिण लोकजीवन छान दाखवले आहे आणि अॅक्टिंगही उत्तम.
पण साउथ इण्डियन सिनेमा ची जाहिरातबाजी खुप केली जाते.
माझ्या मते एकदा पाहिला हरकत नाही पण चित्रपट्गृहातच पाहिला पाहिजे असे नाही.
कांतारा सिनेमागृहात पहावाच.
कांतारा सिनेमागृहात पहावाच. अप्रतिम आहे.
लाल सिंग चड्ढा
@लाल सिंग चड्ढा >>> वरातीमागून घोडे आहे माझे. पण परवा पी एस मधले गाणे ऐकले. त्यातले शिल्पा राव आणि रुआ हे २ दुवे उचलून यूट्यूबने मला लालसिंग चड्ढामधले 'तेरे हवाले' गाणे सजेस्ट केले. कधी नाही ते यूट्यूबची सजेशन चांगली निघाली. अरिजित सिंग पंजाबी गाण्यात जास्त खुलतो. पण शिल्पा राव जास्त आवडली. अमिताभ भट्टाचार्यची लिरिक्स आणि गुरुबाणी म्हणताना असते तसे फक्त तबला आणि पेटीचे संगीत छान फील देते. आमिर दाढीत हरवून गेलाय. पण करीना कपूर जेव्हा 'पू' होण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा उत्तम अभिनय करते हे जाणवून देणारे गाणे.
करीना कपूर जेव्हा 'पू'
करीना कपूर जेव्हा 'पू' होण्याचा प्रयत्न करत नाही तेव्हा उत्तम अभिनय करते हे जाणवून देणारे गाणे.>>>+१११
केसरी मधे अक्की पण दाढीत हरवून गेलाय.. भावना दिसत नाहीत..
तीन रंगः निळा (Three Colours:
तीन रंगः निळा (Three Colours: Blue) (१९९३)
दिग्दर्शकः ख्रिस्तॉफ कीस्लोव्स्की प्रमुख भूमिकाः ज्युलिएट बिनोश, बेन्वा रेजाँ, शाहर्लत वेरी, फ्लोऑन्स पेरनेल
ज्युली, तिचा पती पॅत्हीस आणी मुलगी ॲना हसत खेळत कारने प्रवास करत आहेत. तिचा नवरा एक मोठा नामांकित संगीतकार आहे. एकत्रित युरोपच्या निर्मितीवर संगीतरचना निर्माण करण्याचे काम त्याने हाती घेतले आहे. अचानक कार एका झाडावर आदळते आणि पॅत्हीस आणि ॲना जागच्या जागी दगावतात. मागे राहिलेली शोकाकुल ज्युली हावालदिल होते. ती एकदा जीव द्यायचाही प्रयत्न करते पण ऐन वेळी तिचा धीर खचतो. आता ती सारे बंध, सारी नाती तोडून, अनोळखी जागी जाऊन राहायचे ठरवते. परंतु जीवन तिला सतत आपल्यात ओढू पाहते. नवी नाती समोर आणते. जुन्या नात्यांबद्दल प्रश्न उभे करते. घरात व्यालेल्या उंदरीपासून ते तिला नव्याने कळलेल्या नवऱ्याच्या प्रेमसंबंधांपर्यंत सर्व लहान-मोठ्या गोष्टी तिला खेचत राहतात.
सगळे पाश तोडून स्वतंत्र व्हायला निघालेल्या ज्युलीला तसं करणं जमतं का? मुळात सर्व पाश, नाती तोडणं म्हणजे स्वातंत्र्य का? स्वातंत्र्य अखेर काय आहे? प्रेमाशी त्याचा काय संबंध आहे? नवे नाते जुन्या गमावलेल्या नात्याची भरपाई करू शकते का? अँटी-ट्रॅजेडी म्हणून ओळखला गेलेला हा नितांतसुंदर चित्रपट आपल्यासमोर हे सर्व प्रश्न उभे करतो. ज्युलिएट बिनोशने साकारलेली ज्युली ही तिची आजवरची सर्वोत्तम भूमिका. ब्ल्यू हा दुःखाचा, आठवणींचा रंग, तसाच तो फ्रेंचांसाठी स्वातंत्र्याचा रंग. कीस्लोव्हस्कीच्या तीन रंग या चित्रत्रयीतील हा सर्वांत भावोत्कट चित्रपट. संगीताने भारलेला आणि स्वातंत्र्य, दुःख, प्रेम आणि मानवी नात्यांचा शोध घेणारा हा चित्रपट पाहण्याचा अनुभव चुकवू नका.
लिंक शोधा यूट्यूब वर.
इथे वाचून इंस्पेक्टर ऋषी
इथे वाचून इंस्पेक्टर ऋषी बघितला, निराशा झाली नाही. आवडला! व्यक्ति रेखा, सिनिक चित्रण, गोष्ट सांगण्याची तर्हा ह्या टिपिकल साऊथ मुव्हित असतात तशा म्हणजे चांगल्या रहस्य पटात असतात तशा.
मेन लीड चा अभिनय मख्खं वाटला. फॉरेस्ट ऑफिसर च जास्त भावला
सुझल मधे नराधम झालेला ह्यात गुणाचा ऑफिसर झालेला
भाग २ येणार अशी सोय करून ठेवली आहे.
आज फायनली लापता लेडीज बघितला.
आज फायनली लापता लेडीज बघितला. एकदम मस्त! सगळ्यांनी कामं काय छान आणि सहज केली आहेत!
क्र्यू पाहिला नेट फ्लिक्स वर
क्र्यू पाहिला नेट फ्लिक्स वर आलाय. तीन बायका म्हणून उत्सुकता होती. ट्रेलर सुद्धा मजेशीर होता. पण सुरुवातीचा अर्धा तास इतकी मजा आली नाही. जे चटपटीत संवाद ट्रेलर मध्ये होते तेवढेच पिक्चर मध्ये होते. अपेक्षाभंग होण्याची तयारी करून नेटाने पूर्ण पाहूया म्हटले. पण नंतर त्यामानाने चांगला वाटला. एकदा बघायला नक्कीच हरकत नाही.
लापता लेडीज एव्हाना अडीच वेळा बघून झाला आहे. घरातल्या इतर माणसांना दाखवताना. अडीच मधील अर्धे सेकंड हाफ आहे.
लापता लेडीजसाठी एक महिन्याचं
लापता लेडीजसाठी एक महिन्याचं नेफ्ली घ्यावं लागणार बहुतेक. सावकाश घेईन. तोपर्यंत महीनाभरात काय काय बघायचं लिस्ट करायला हवी.
मी पण झी ५ संपल्यावर
मी पण झी ५ संपल्यावर नेटफ्लिक्स घेणार आहे.
लापता लेडीजसाठी एक महिन्याचं
लापता लेडीजसाठी एक महिन्याचं ....... मी you tube var पाहिला.
पण नंतर त्यामानाने चांगला
पण नंतर त्यामानाने चांगला वाटला. एकदा बघायला नक्कीच हरकत नाही. >>> धन्यवाद! मीही पहिला सुमारे अर्धा तास पाहिला आणि अगदी एंगेजिग वाटला नाही. पुढे चांगला असेल तर बघेन.
मी वेबसिरीज तसेच हिंदी सोडून
मी वेबसिरीज तसेच हिंदी सोडून इतर भाषेतले काही बघत नसल्याने माझ्याकडे पर्याय कमी असतात आणि माझ्या अपेक्षा मुळातच कमी असतात. त्यामुळे अजून दोन चार जणांचे रिव्ह्यू येऊ दे
देवकी youtube वर थोडा वेळ
देवकी youtube वर थोडा वेळ बघितला, तेव्हा वेळ नव्हता आणि नंतर गायब झाला.
अमेरिकन हार्टलॅण्ड मधल्या कथा
अमेरिकन हार्टलॅण्ड मधल्या कथा असलेले दोन पिक्चर्स - दोन्ही नेफिवर
द हिलबिली एलिजी - हा आधीही बघितला होता पण सहज लावला आणि इंटरेस्ट राहिला पूर्ण बघायला. सध्या युएस सिनेटर असलेल्या जे डी व्हान्सच्या याच नावाच्या पुस्तकावर बेतलेला आहे. नक्कीच बघण्यासारखा आहे. यावर मी पूर्वी जास्त डिटेल लिहीले आहे.
द जज - रॉबर्ट डाउनी ज्यु, रॉबर्ट डुवाल आणि बिली बॉब थॉर्न्टन व इतर २-३ चांगले कलाकार. हा ही जबरदस्त ग्रिपिंग आहे. नायक हा निष्णात वकील आहे - बहुधा शिकागो मधे दाखवला आहे. इण्डियाना मधल्या एका कोर्टात जज असलेल्या त्याच्या (संबंध दुरावलेल्या) वडिलांवर खुनाचा आरोप होतो व आधी आईच्या मृत्यूनंतर तेथे गेलेला तो त्यात त्यांची केस घेतो. हा ही पिक्चर बघण्यासारखा आहे.
गॉलायाथ सारख्या सिरीज मधे बेवडा वकील म्हणून सहज खपून जाणारा बिली बॉब थॉर्न्टन इथे अपटाइट सरकारी वकील्/प्रॉसीक्यूटर आहे आणि वाटतोही. दोन्ही रॉबर्ट मधली सततची जुगलबंदी भारी आहे. त्याचे दोन भाऊ, आधीची गर्लफ्रेण्ड व्हेरा फार्मिगा - सर्वांचीच कामे मस्त आहेत.
क्रु ट्रेलरच्या मानाने अगदी
क्रु ट्रेलरच्या मानाने अगदी बन्डल वाटला, नेटाने बघत राहिले तरी बोअरच झाला.. पहिला हाफ चोलिके पिछेच म्युझिक सारख बॅकग्राउन्डला होत नतरच्या भागात स्पेशल २६च म्युझिक तसच उचलुन आणलेल...प्लॉट तोच तोच घिसापिटा होता...नथिन्ग न्यु!
अंजू, अग मलाही बरेच दिवस हा
अंजू, अग मलाही बरेच दिवस हा मूव्ही मिळता नव्हता.एका माबोकराने यू ट्यूब वर आहे म्हटल्यावर 3-४ दिवस ट्राय केला.पण नाही मिळाला.एकेदिवशी reloading Ashi pati झळकवत आपोआप स्क्रीनवर आला.
Ok टाईप.पण सर्वांनी एकदम सहज कामं केली आहेत.
Crew
Crew
अ आणि अ सिनेमा आहे. केवळ त्या तिघीही आवडतात म्हणून शेवटपर्यंत पाहिला.
त्या तिघींचं राहणीमान कुठेही पैशाची चणचण असणारं वाटत नाही. तेच डेस्परेशन पोचत नसेल तर पुढचा डोलारा काय कामाचा. फक्त नानू की अंगूठी, पीएफ, लोनचा हप्ता हे शब्द वारंवार संवादांत टाकून काय होणारे!
बाकी मूव्ही-मेकिंग क्राफ्ट सगळं चकाचक आहे, बॉलिवूडमध्ये ते आजकाल असतंच.
मोनिका, ओ माय डार्लिंग
मोनिका, ओ माय डार्लिंग (नेटफ्लिक्स)
पहिला अर्धा भाग चांगला आहे, डोकेबाजपणे लिहिलेला थ्रिलर वाटतो. अपेक्षा वाढतात.
पुढच्या अर्ध्या भागात अपेक्षाभंग !
चित्रपट कसा वाटला भाग 9 सुरू
चित्रपट कसा वाटला भाग 9 सुरू आहे, कृपया त्यावर प्रतिसाद दया, हा जुना धागा आहे.
क्रू बद्दल एकदम सहमत ललिता
क्रू बद्दल एकदम सहमत ललिता-प्रीती.
क्रू लावलेला. थोडा बघितला पण
क्रू लावलेला. थोडा बघितला पण अगदीच बकवास वाटला. बंद केला.
लापता लेडीज पाहिला. थँक्स
लापता लेडीज पाहिला. थँक्स देवकी. खूप सुंदर
आवडलातच. पुनः बघायला आवडेल.
आहे अजून यु ट्युबवर
मायबोली काही आठवडे भूतकाळात
मायबोली काही आठवडे भूतकाळात गेलीय. मज्जानु लाईफ.
देवकी काल मिळाला ला ले.
देवकी काल मिळाला ला ले. एकंदरीत तासभर बघून झाला. जया जाम चंट आहे, अक्कलहुशारीने काय काय करते. अर्थात बरं करते, तिचा खरा नवरा अगदीच फालतू असतो.
मला फुल इम्प्रेसिव्ह वाटली, जाम निरागस आणि गोड, मी अमुक नाहीये (कुठला तो शब्द) असं ठामपणे सांगते, बावळट नाही वाटली. तो जया नवरा तिला खो गयी क्या विचारतो, तेव्हा नाही म्हणते हे आवडलं (गाडीत त्याच्या शेजारी बसते तेव्हा मात्र मूर्ख वाटलेली, नवरा आल्याशिवाय कशाला जागा बदलायची असं वाटलं पण पूर्ण पिक्चर त्यावरच आहे) . फक्त ती रात्री तो दुल्हन पेहराव धुऊन वाळवू शकली असती, जेव्हा ती छाया कदमच्या घरी जाते. सैराट आणि यात छायाचा रोल सेम खाण्याची टपरी आणि नायक किंवा नायिकेला त्यावर रोजगार देणं. छान करते अभिनय, कांस गाजवलं तिने दुसऱ्या पिक्चरच्या रोल साठी.
क्रू अचाट आणि अतर्क्य कडे
क्रू अचाट आणि अतर्क्य कडे वेगाने वाटचाल करतो
फार काही चांगला नाही. काही डबल मिनींग ( की थेट मिनींग संवाद ) लेडीज तोंडी दिले की बोल्ड असे काहीतरी समजूत होती वाटते चित्रपट बनवणाऱ्याची.
क्रिती समोर करीना आणि तब्बू वजनदार वाटल्यात.
झाला बघून लापता लेडीज.
झाला बघून लापता लेडीज.
शेवट कसला positive इमोशनल आहे. रवी किशनने डोळ्यात पाणी आणलं.
एखाद्या छोटू आणि मंजूमुळे फुल सुरक्षित रहाते. एखाद्या दीपक सारख्या फॅमिलीमुळे जया सुरक्षित रहाते, स्वप्नांची भरारी घेते, रवी किशनचा आणि त्या मित्राचाही मोठा वाटा आहे त्यात.
अभिनय दीपक फॅमिलीतल्या सर्वांचा छान होता, खेळीमेळीने रहाणारे कुटुंब अगदी. ती फुलची जाऊ किती मस्त, कुठेतरी बघितलं आहे तिला. फुलची सासू, आजे सासूही सहज अभिनय करतात.
दोघींना शेवटी आपापल्या मनासारखं करता येतं हे मस्त.
देवकी? हा कोणता सिनेमा? कुठे
देवकी? हा कोणता सिनेमा? कुठे आहे? कोण आहे यात?
लापता लेडीज नेफ्लिवर आहे.
लापता लेडीज नेफ्लिवर आहे. सुंदर पिक्चर. फारसे ओळखीचे चेहरे नाहीत रवी किशन सोडल्यास. उलट बरंच आहे. आमिर खान प्रॉडक्शन व किरण राव दिग्दर्शक आहे.
Pages