अंदाज किती घ्यावा?

Submitted by आशूडी on 10 February, 2016 - 05:51

बेत काय करावा वर अंदाजाच्या प्रश्नोत्तरांची वाढती संख्या पाहून हा धागा काढण्यात आलेला आहे. उद्देश तोच - पुनर्वापर!
एखाद्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात काही पदार्थ करायचा असल्यास काही अनुभवी लोकांचा सल्ला घेणे योग्य वाटते. तर अशा प्रकारची चर्चा इथे करू. बेत काय करावा वर फक्त बेतच ठरवू. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

175 पराठे लाटणे व भाजणे म्हणजे काय खायचं काम नाहीय Happy (तस खायचंच काम आहे )
१२५ साठी कौतुक व शाबासकी !

पराठापराक्रमाबद्दल शाब्बास आधीच म्हणते.
पण अवांतर लिहिण्याची उबळ आली आहे म्हणून - भूतनाथ सिनेमा मधला माझा सर्वात आवडता प्रसंग - अमिताभ बच्चन ऊर्फ भूतनाथ सोबत असल्याने शाहरूख आणि जूहीचं लेकरू बरेच आलू पराठे (बहुतेक चार असावेत.. नक्की संख्या आठवत नाहीये) गट्टम् करतं. कधीतरीच सॅंडविच/ब्रेडबटर व्यतिरिक्त स्वयंपाक करणारी जूहीआई हैराण होते.. (तिची रेसिपी बघून आपणही हैराण पर्यंत होतोच) Proud
याबद्दल लाडिक तक्रार जूही फोनवरून शाहरूख कडे करत असते. तेव्हा तो जो डायलॉग मारतो तो भारी आवडतो.
"उसने.. पराठे खाएँ तो खाएँ लेकिन तुमने... पराठे बनाएँ? डार्लिंग तुम कितना थक गई होगी!" काय ते उपहासगर्भ कौतुक! Wink

अरे एss !!

इतर पदार्थ असल्याने पुरलेत> म्हणजे १२५ पराठे असून सुद्धा इतर पदार्थ नसते तर अजून पराठे चालले असते ????
OMG!!!
मी आता तुम्ही कानाला एका बटाट्याइतका खडा लावला का ?की next time इतके लोक असतील तर पराठे हा मेनू नको किंवा सर्व पदार्थ करून आता पराठे हा एकच ओप्टिव उरला असेल तर आपण हात नाय वर करायचा वगैरे !! Lol
just kidding .. कधी कधी मजा येते पण असे काही करायला!!

क मा ल आहे. मानलं तुम्हाला.
उसने.. पराठे खाएँ तो खाएँ लेकिन तुमने... पराठे बनाएँ? डार्लिंग तुम कितना थक गई होगी!" काय ते उपहासगर्भ कौतुक :डोमा:. > हा हा हा ... आणि तुला आठवलं ही परफेक्ट प्राचीन.
माझे एक निरीक्षण ... एवढं मोठ्या प्रमाणावर घरी कुकिंग जनरली परदेशातल्या मुलीचं करतात. भारतात आपल्याकडे थोडी जास्त माणसं असली की अन्न बाहेरूनच ऑर्डर केले जाते. अर्थात हौशीने करणाऱ्या असतील ही काही जणी पण ट्रेण्ड सांगते.

१२५ पराठे लाटणे, भाजणे म्हणजे भारीच!

>>माझे एक निरीक्षण ... एवढं मोठ्या प्रमाणावर घरी कुकिंग जनरली परदेशातल्या मुलीचं करतात.>> देशी पदार्थ बाहेरुन ऑर्डर करायचा पर्याय नसल्याने घरीच केले जाते. जे काही थोडेफार पर्याय असतात त्यांचा दर्जा देखील अगदीच बेतासबात असतो. स्थानिक पदार्थ मात्र चांगली सोय असल्याने बाहेरुन मागवले जातात.

ज्यांनी ज्यांनी चुकीचे नंबर लिहिलेत त्याना अजिबात एकसुद्धा पराठा मिळणार नाहीये .. योग्य नंबर लिहिणाऱ्याला म्हणजे फक्त मलाच मिळणार आहेत पराठे ..
Proud

१२५ पराठे केव्हाच संपलेत. म्हणुन सगळ्यांनी दहा दहा पराठे जास्तीचे करायला लावुन नंबर लावला आहे.
तुम्हाला टुकटुक.

१२५ पराठे केव्हाच संपलेत. म्हणुन सगळ्यांनी दहा दहा पराठे जास्तीचे करायला लावुन नंबर लावला आहे.
तुम्हाला टुकटुक.>> हो पण त्यासोबतच सारण व आणलेले १५ पौंड बटाटेही संपलेत!! मी खरे खरे खाल्ले तुम्हाला आता बोलाचे पराठे व बोलाचे सारण ठेवले आहे .. तुम्हालाच टुकटुक !!
हाहा !! पळा... ......... :जोरात पळणारी भावली:

सकाळी घाईत लिहिलं 135
नंतर बघतेय तर द्रौपदी च्या थाळीसारखे पराठे आपले वाढतच चाललेत.

२० लोकांसाठी साधारणतः ४० सामोश्यांचा 'समोसा चाट' बनवायचा आहे? रगडा अंदाजे किती लागेल? बाहेरूनच (गणेश भेळचा) तयार रगडा आणायचा आहे..... तरी किती लागेल?

गणेश भेळ चं 1 रगडा पॅटिस पार्सल असतं त्यातला रगडा अंदाजे 100 ग्राम(विथ आतलं पाणी, लिक्विड वगैरे) असतो.
1 पंजाबी सामोश्याला कुस्करून शेव बिव ऐवज सहीत 100 ग्राम रगडा पुरावा.गणेश मध्ये 500 ग्राम रगडा पाकीट 70 रु ला आहे.
(वाटाणा घरी शिकवून उसळ जास्त स्वस्त पडेल असं वाटतं(आणि मसाले हवे तसे घालता येतील.गणेश चा जरा बेसिक असतो.))

मीअनु शी सहमत आहे
गणेश भेळ चा रगडा 500 ग्रॅम अगदी पाणी वगैरे घालून सरसरीत केला तरी 6-7 सामोशांना पुरेल. 40 सामोसा साठी 500 ग्रॅम ची 7/8 पाकिटे लागतील. 70 रुपये प्रमाणे 500 पेक्षा जास्त रुपये जातील.
पांढरा वाटाणा 50-60 रुपये अर्धा किलो मिळेल. 12 तास भिजवून कुकर मध्ये मस्त शिजवून घ्या. मीठ हळद चाट मसाला आलं हिरवी मिर्ची पेस्ट घालून पाणी घालून पातळ करा. भरपूर होईल रगडा.
1 किलो वाटाणा पुरेल असं वाटतंय.

सोडा नक्की घाला चिमूटभर
वाटाणा मऊ शिजायला जास्त शिट्ट्या लागतात, स्पेशली मोड आलेला नसेल तर

धन्यवाद Happy
व्वा व्वा!! कसले एक्सपर्ट लोक आहात तुम्ही!!
गणेश वाल्याने पण हेच सांगितले की ७० रुपयाचे पाकिट ५ समोसा चाटला पुरेल म्हणून.

तुमचा घरी रगडा बनवण्याचा सल्ला एकदम व्यावहारिक आहे पण पार्टीचा बेत आणि मेन्यू काल रात्री ठरला; सोसायटीच्या कल्चरल कमिटीला सुंदर गणेशोत्सवाच्या श्रमपरिहारानिमित्त आज संध्याकाळी घरी बोलावले आहे Happy आज बायकोचे दिवसभर ऑफिस आहे त्यामुळे ती संध्याकाळीच फ्री होणार त्यातून आमच्या दोघांचाही आज उपवास त्यामुळे चंद्रोदयापर्यंत कशाचीही टेस्ट बघता नाही येणार त्यामुळे बाहेरून रगडा आणणे हा सोयीस्कर पर्याय निवडावा लागला!!

रात्री कळवतो रगडा पुरला की उरला ते Wink

सोडा नक्की घाला चिमूटभर
वाटाणा मऊ शिजायला जास्त शिट्ट्या लागतात >>>>

राजम्याच्या प्रसिद्ध करवंटीचा प्रयोग वाटाण्यासाठी केला तर वाटाणा लवकर शिजेल काय?

करवंटीचा प्रयोग वाटाण्यासाठी केला तर वाटाणा लवकर शिजेल काय >> करवंटी कुकारात पडलेली बघून माबोकरांना आणि बरणीतल्या राजम्याला उकळ्या फुटतात.

रगडा व्यवस्थित उरला Happy

लोकांनी कमी खाल्ले हा माझा युक्तिवाद तर तू नेहमीच जरा जास्तच मागवतोस हा बायकोचा नेहमीचा आरोप (आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर ते खरे आहे..... उरले तरी चालेल पण कमी पडू नये हा आपला बाणा)
पण कालचा स्वानुभव हा की गणेशचे एक पाकिट जरा सरसरीत करुन (आणि थोडे स्पायसी करुन) ६-७ समोसा चाट ला पुरते कारण बाकीचे मटेरिअल भरपूर असते.
अस्मादिकांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे जरा वाढत्या मापाची ऑर्डर रगडा आणि समोसा या दोन्हीची दिल्याने काल ब्रेकफास्ट आणि जेवणात तेच संपवावे लागले हे वेगळे सांगणे न लगे!!

किती किलो मागवला होता?
(लेकीच्या 5 व्या वाढदिवसाला समोसा आणि गुलाबजाम असा बेत होता, सामोसे अर्धे मिनी बनवायला सांगितले ते सवयीने त्या माणसाने मोठे बनवले.पार्टी होऊन, एक खोके सिक्युरिटी ला ताजे देऊन, 1 खोके उरले पुढच्या दिवशी नाश्ता आणि लंच मध्ये सामोसे.मग संपले.नंतर वाढदिवशी घरीच इडली चटणी केली ती नीट पुरली.)

ऐनवेळी ३-४ लोक अजुन येतील अशी पुसटसी चर्चा झाल्याने २५ लोकांसाठी ५० समोसे आणि ७० रुपयवाली १० रगडा पाकिटे आणण्यात आली!!
प्रत्यक्षात १८-१९ लोकच आले आणि त्यातले काही डाएटवाले वगैरे असल्याने वीसेक समोसे आणि त्याला पुरेल इतका रगडा उरला.
अर्थात त्याच्या बरोबरीने वेलकम ड्रिंक/इतर फरसाण आणि आईसक्रीम वगैरे असल्याने माणशी दोन समोसे पकडायला नको होते..... पण चलता है Happy

त्यातल्या त्यात काल स्वयंपाकाच्या मावशींनी सुट्टी मारल्याने वाढत्या मापाची चूक फारशी खळखळ न करता पदरात घेण्यात आली Proud

Pages