Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऍडम सॅण्डलर बद्दल अगदी
ऍडम सॅण्डलर बद्दल अगदी अस्मिता सारखंच मत आहे.
अमित म्हणजे तू ही किसी डिस्को
अमित म्हणजे तू ही किसी डिस्को मे जाये हे संजीव कुमार च्या परफॉर्मन्स मधे (त्यातल्या त्या "ऊह' की 'पूह' आवाजासकट) इमॅजिन केलेस का? इतके केलेच असशील तर रवीनाच्या जागी शबाना किंवा विद्या सिन्हाही घे.
किसी डिस्को में जाए -
किसी डिस्को में जाए - संजीवकुमार, शबाना/विद्या सिन्हा -
मेरी ख्रिसमस मला आवडला, (शेवटचं एक मिनिट वगळता)
थ्रिलर आहे हे आधी सांगितलेलं असल्यामुळे सुरुवातीच्या भागात अॅलर्ट राहून पाहिला गेला - इथे कुठेतरी नक्की ट्विस्ट असणार, नक्की ट्विस्ट असणार अशा अपेक्षेने - त्यात मजा आली.
दोघांचा उत्स्फूर्त डान्सचा मोठा सलग शॉट मस्त आहे, आणि शेवटी पोलिस स्टेशनमधलाही एकसलग मोठा शॉट आवडला.
कतरिना कैफ आवडत नाही यावर (पुन्हा एकदा) शिक्कामोर्तब झालं.
***** स्पॉयलर *****
खून करून, दुसर्या खोलीचं फर्निचर इ. तोडून-मोडून फरनेसमध्ये जाळणे - हे सगळं एकाच रात्रीत करण्याचा प्लॅन झेपला नाही
आणि शेवटी तो स्वत:वर आळ घेतो ते पण पटलं नाही... त्यापेक्षा तिघंही पोलीस स्टेशनमधून साळसूदपणे बाहेर पडतात तिथेच शेवट करायला हवा होता.
कतरिना कैफ आवडत नाही यावर
कतरिना कैफ आवडत नाही यावर (पुन्हा एकदा) शिक्कामोर्तब झालं.
>>>
इथे कुठेतरी अभिनय शब्द टाका
दोघांचा उत्स्फूर्त डान्सचा मोठा सलग शॉट मस्त आहे, >>> +७८६ मलाही आवडला तो डान्स.. मी मागे नेऊन पुन्हा पाहिला
कतरिनाने अभिनय करूच नये फक्त
कतरिनाने अभिनय करूच नये फक्त सुंदर दिसत रहावं आम्ही चालवून घेऊ, त्या बदल्यात तिने लग्न करून कुणाची होऊ नये ही अपेक्षा चालवून घ्यावी एव्हढं एकच मागणं हाय.
अभिनय न करता येणाऱ्या
अभिनय न करता येणाऱ्या अभिनेत्रीची मुख्य भूमिका असणारा चित्रपट काढा बघु तिला घेऊन.
रवीनाच्या जागी शबाना किंवा
रवीनाच्या जागी शबाना किंवा विद्या सिन्हाही घे. >>> नॉट इन माय वाईल्डएस्ट इमॅजिनेशन
अभिनय न करता येणाऱ्या
अभिनय न करता येणाऱ्या अभिनेत्रीची >> कितीतरी नावं नजरेसमोर तरळून गेली.
हेमामालिनी ची भूमिका करणार असेल तर धर्मेंद्र, जितेंद्र च्या रोलसाठी अर्ज करू शकतो.
संजीव कुमार, गिरीश कर्नाड यांच्या भूमिकांसाठी कुणाला अर्ज करायचा असेल तर हरकत नाही.
Merry Christmas पाहिला नेफिवर
Merry Christmas पाहिला नेफिवर..
मी ही पाहिला. आगळ्या वेगळ्या जोडी ला बघून माझी उत्सूकता चाळवली गेली आणि टायटल साँग ऐकून अजून पाहावासा वाटला.
पण फारसा आवडला नाही. राघवन कडून अजून अपेक्षा होत्या.
स्पोइलर....................................................................................................................................................................
एका रात्रीच्या ओळखीत कोणी अनोळखी उगा आपल्या वर विना कारण आळ घेणार नाही, ते ही नुकतेच शिक्षा भोगून आलेला असताना.. मुलीशी आपुलकी वाटत असते पण त्याखातर हे? नाह..न पटेश!
शेवट त्या जानेजा (करीना वाला) शी मिळता आहे पण त्यात १ हिस्टरी आहे, एक तर्फी प्रेम आहे. १ रात्री पुरती ओळख नाही.
लिफ्ट मधून उतरताना (सेकंड वेळी परतून येताना बॉडी दिसते तेंव्हा) कोणत्या मजल्या वर उतरले हे दोन पैकी कोणत्याच प्रेमी ला कळत नाही?
स्पॉयलर:
स्पॉयलर:
मला नाही आवडला मेख्रि. दर वेळी कुठल्यातरी अनोळखी डॅमसेल इन डिस्ट्रेस साठी एक पुरुष का हुतात्मा करायचा?
Those ladies should learn to clean up their own mess without any knight in shining armour making sacrifice for them.
शिवाय फर्निचर तोडफोड ची कल्पना अतिशय भंपक आहे.
आर्टिकल 370 कसा आहे?
आर्टिकल 370 कसा आहे?
अॅग्री अनू..
अॅग्री अनू..
मान्य आहे की स्त्री-पुरुष रेशो इंबॅलंस आहे पण म्हणून बिचार्या पुरूषांचा असा बळी द्यायचा का?
स्पॉइलर
स्पॉइलर
तिला पुरुषाचा बळी द्यायचा नसतो तर केवळ विटनेस हवा असतो.
तो येडा स्वताहून बळी जातो..
प्यार बडी कुत्ती चीज होती हैं..
'तिला' घ्यायचाय असं नाही
'तिला' घ्यायचाय असं नाही म्हटलं मी
चित्रपट कथा लिहिणारे आणि निर्माते यांच्याबद्दल बोलतेय.किती वर्षं अश्या कथा लिहिणार?
OMG
OMG
आर्टिकल 370 कसा आहे?>> फिक्शन
आर्टिकल 370 कसा आहे?>> फिक्शन म्हणुन चांगला आहे Otherwise propaganda movie. सगळ्यासाठी नेहरुच जबाबदार
मला अजिबात आवडला नाही ॲनिमल.
मला अजिबात आवडला नाही ॲनिमल. हिंसेच्या बाबतीत मी असहिष्णू नाही, मला 'मिर्झापूर' आवडली होती. त्यात हिंसेला त्या पात्राच्या क्रौर्याचा/ विकृतीचा किंवा प्रतिशोधाचा व्यवस्थित आधार होता. ॲनिमलमध्ये मात्र 'इतका रक्तपात दाखवू की तुम्ही भंजाळून आवडला म्हणाल' असा अप्रोच आहे. इथल्या विकृतीला कसलाच आधार नाही किंवा कसली सुसूत्रताही नाही. कसल्याच भावभावनांचे स्पष्टीकरण दिले नाही. रणबीरच्याच नाही तर अनिल कपूरच्याही नाही. काहीही कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही. >>>>>>>>>>पूर्णतः सहमत .
शिवाय फर्निचर तोडफोड ची
शिवाय फर्निचर तोडफोड ची कल्पना अतिशय भंपक आहे.>>> हो काहीच्या काही आहे ते. ते जाळायला मिळावं म्हणून बेकरी सेटप.. काहीही
विजय सेतूपतीचे काही डायलॉग्स भन्नाट आहेत.
जेव्हा ती म्हणते ड्रिंक्स घ्यायला माझ्यासाठी थांबला होतास का? तर म्हणे इतना भी शरीफ नही हूं मै... ये मेरा सेकंड है
मजा येते त्याची डायलॉग डिलिव्हरी बघायला
शिवाय फर्निचर तोडफोड ची
शिवाय फर्निचर तोडफोड ची कल्पना अतिशय भंपक आहे.>>> हो काहीच्या काही आहे ते. ते जाळायला मिळावं म्हणून बेकरी सेटप.. काहीही
+१ एका रात्रीत एवढं शक्यच वाटत नाही.
ही सगळी जाळपोळ सेतुपतीच्या बलिदानापायी शब्दशः 'चुलीत' गेली म्हणता येईल. शक्य असूनही वॅलेट जाळलं नाही त्या क्षणी कुणीतरी अडकणार वाटलं होतं. मला ती फारशी 'डॅमसेल ईन डिस्ट्रेस' वाटली नाही, शेवटच्या ट्विस्टमुळे उगाच सहानुभूती निर्माण केली आहे. अंधाधूनमधे कुणाविषयीही सहानुभूती वाटत नाही, त्यामुळे कॅरेक्टर्स प्रखर वाटत रहातात. वेगवेगळे मजले न लक्षात येणं हे फार सोयीचं झालं. एवढं सगळं करणारी ड्रग्ज देऊन नवऱ्यालाच भट्टीत टाकेल, एवढा 'द्राविडी प्राणायाम' कायकू ?
मेरी ख्रिस्मस - एकदम बखवास.
मेरी ख्रिस्मस - एकदम बखवास. वर कत्रिनाच्या अॅक्टिंगबद्दल लिहिलंय, मला तर सेतुपती पण बखवास वाटतो. एकतर तो सदा अवघडलेला दिसतो, त्यावर त्याची हिंदिची बोंब. डाय्लॉग डिलिवरी अगदिच फ्लॅट. तो थिएटर मधला टेडीला बांधुन ठेवला नाहितर पळुन जात होता हा डाय्लॉग - "तुम्हारा नाम क्या है, बसंती" च्या तोडिचा होता, याने त्याची वाट लावली.. विकि कौशल फिट होता या रोल करता...
थोडक्यात भरपूर वेळ बॅटर फेटून
थोडक्यात भरपूर वेळ बॅटर फेटून, मोठी फरनेस पेटवून शेवटी खमंग केक ची अपेक्षा असलेल्या प्रेक्षकांच्या हातात एक चिमुकलं मारी बिस्कीट ठेवलं(हॅशटॅग क्लिशेउपमा)
मुरमुऱ्याचा लाडू अनु, भट्टी
मुरमुऱ्याचा लाडू अनु, भट्टी दाखवून बिस्किट पण नाही. ही तेवढी प्रतारणा आहे.
किसी डिस्को मे जाये हे संजीव
किसी डिस्को मे जाये हे संजीव कुमार च्या परफॉर्मन्स मधे >>
टु किल ए टाय्गर - नेफिवर
टु किल ए टाय्गर - नेफिवर डॉक्युमेंटरी आहे. सेक्शुअल अब्युज, अजुनहि समाजाची उदासिनता असा साधारण विषय आहे. कनेडियन दिग्दर्शिका काल ऑस्कर समारंभात दिसल्या. डॉक्युमेंटरी ठिकठाक आहे. नांव टु किल ए मॉकिंगबर्ड सदृश दिलेलं आहे. का ते कळलं नाहि. ग्रेगरी पेकच्या सिनेमात मॉकिंगबर्डचा एक विशेष संदर्भ आहे, यात टायगर कुठे बसतो हे जाणकारांनी सांगावे...
तिने सांगितलेले असते ना कि
तिने सांगितलेले असते ना कि सेतूपती आणि कपूर दोघे तिला घरी सोडायला आलेले होते. मग तेव्हाच त्याने ते गिफ्ट पोरीला दिले अशी थाप का नाही मारली. तो नक्की किती वाजता मेला ते माहीत नाही. ती रात्री उशिरा पर्यंत बाहेर होती. त्यामुळे तिने त्याला मारले याचा काही पुरावा नाही. सेतुपती कोणालाच आधीपासून ओळखत नाही त्यामुळे त्यावर संशय नसताच आला.
Damsel : इंग्रजी नेटफ्लीक्स
Damsel : इंग्रजी नेटफ्लीक्स
एका देखण्या राजकुमाराबरोबर एका गरीब मुलीचं,एलोडीचं लग्न होतं, आनंदाच्या डोहात डुंबत असताना काही कळायच्या आतच तीला एका दरीत भयानक ड्रैगनसमोर फेकलं जातं, परतीचे मार्ग बंद आणि समोर महासंकट, असं का केलं तिच्यासोबत यातून ती कशी बाहेर पडणार..परिकथा, फैन्टसी, एडवेन्चर सिनेमा ,चांगला आहे सिनेमा , कुटुंबासोबत बघता येईल, नो बॅड वर्ड्स.
मला फारसा नाही आवडला डॅम्सेल.
मला फारसा नाही आवडला डॅम्सेल. मिली बॉबी ब्राऊन 'एनोला होम्स'मध्ये आवडली होती म्हणून मोठ्या आशेने बघायला घेतला होता. पण चीप स्पेशल इफेक्ट्सपलीकडे काहीच हाती लागलं नाही. 'Strong female lead' या कल्पनेचं हास्यास्पद अतिसुलभीकरण झालं आहे आता असं वाटलं. कुठल्याच कॅरेक्टरला काही डेप्थ, काही शेड्स, काही ग्राफ वगैरे काहीच नाही. त्यात रिपिटेटिव्ह आणि प्रेडिक्टेबल घटनाक्रम!
Netflix वर तारा vs बिलाल
Netflix वर तारा vs बिलाल बघितला.
अतीशय बंडल बोर बकवास.
शेवटी शेवटी मला स्वतः ची दया येऊ लागली होती. पण थोडाच राहिला होता म्हणून कसातरी संपवला.
'Strong female lead' या
'Strong female lead' या कल्पनेचं हास्यास्पद अतिसुलभीकरण झालं आहे आता असं वाटलं. कुठल्याच कॅरेक्टरला काही डेप्थ, काही शेड्स, काही ग्राफ वगैरे काहीच नाही. > पूअर थिंग्ज् बघा. एमा स्टोन नि मार्क रफेलो दोघेही धमाल करतात. त्यातला डान्स चा सीन हायलाईट आहे. आर रेटेड असूनही कुठेही खटकत नाही.
पुअर थिंग्ज का? हो, तो बघायचा
पुअर थिंग्ज का? हो, तो बघायचा आहे. काल चार अवॉर्ड्स घेतली ना?!
Pages