हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
दिल के करीब मध्ये bored झालं
दिल के करीब मध्ये bored झालं तर मी जरा साड्या ज्वेलरी सो्फा, आजूबाजू काही असेल तर तिकडं लक्ष वळवते. पोटे च्या मुलाखतीत आजूबाजूला बघावं तर त्याची इस्पिक च्या राजासारखी हेअर style त्याच्या मुलाखती पेक्षा जास्त डोक्यात जाते.:( केस वाढवण्या बद्दल काही नाही,फॅशन आहे पण त्यांच नीट styling करून यायला काय हरकत आहे मुलाखतीच्या वेळेस
तुमचे गिफ्ट आहे एक आयुष्य
तुमचे गिफ्ट आहे एक आयुष्य अनेक प्रवास पुस्तक >> त्या गिफ्टची तर गंमतच आहे. जीवन गौरव पुरस्कार मिळालेल्या व्यक्तिलाही सुंदर आणि यशस्वी आयुष्य कसे जगावे छाप पुस्तक मिळतं तिथे गिफ्ट म्हणून. आपल्या प्रेक्षकांसाठी खास dkk20 कोड टाकला ना की २० टक्के सवलतीत ते उपलब्ध आहे. शिवाय ते पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून आम्ही हे दगडी पुस्तक खास बनवून घेतो. म्हणजे काय आहे, की त्यांनाही रोजगार मिळतो. किती छान कल्पना आहे ना? अय्या हो ना!
श्रेयस तळपदे व त्याची बायको
श्रेयस तळपदे व त्याची बायको येऊन गेले तर लगेच ते मित्र म्हणे वर पण आले सगळे same>>
अगदी अगदी. अशाच गेले आठे - दहा दिवस श्रीमती माधवी महाजनी सगळी कडे दिसत होत्या. त्यातला एक मुलाखतकार नवीन चेहऱ्याचा दिसला. नाव नीट आठवत नाहिये. पण नुसता प्रीकॅप पाहिला तेव्हा बराच सेंसिबल वाटला.
(No subject)
भारी चर्चा सुरू आहे इथे!
इस्पिक च्या राजासारखी हेअर
इस्पिक च्या राजासारखी हेअर style >> अल्टिमेट
हो ना, का काय माहित पण मला
हो ना, का काय माहित पण मला मित्र म्हणे बघायला लागले कि इस्पिक चा राजा शेविंग करून सिव्हील ड्रेस मध्ये मुलाखत घेतोय असाच भास होतो :p
दिल के करीब मधला तो तिचा
दिल के करीब मधला तो तिचा उत्फुल्ल हसरा चेहरा बघितला की अर्धा उत्साह तिथेच संपतो. वर गोग्गोड भाषा.. मग अजीर्ण होतं.
माधवी रविंद्र महाजनींचं पुस्तक आलंय त्याचा प्रोमो म्हणून त्या जात असतील. त्यांची एक मुलाखत बघितली. प्रेम होतं, पण किती! आणि कुठल्या थराला? त्यांचं होतं मनस्वी ते ही एकवेळ ठीकच. आपण कोण जज करणारे! पण मुलगी एकदा सासरी गेली की सासू हीच आई आणि ती म्हणेल ती पूर्व इ. ऐकल्यावर पोटात ढवळायला लागलं. टॉक्सिक प्रेम आहे पण आहे प्रेम तर आहे, हे एकवेळ मी समजुन घेतलेलं, पण काही काळाने हे असलं ऐकू यायला लागल्यावर मग नाही बघू शकलो.
@अमितव डिट्टो about माधवी
@अमितव डिट्टो about माधवी महाजनी, प्रेम असणं, निभावण etc. पर्यंत मी सगळं बघत होते पण पुढच्या जन्मी पण हाच नवरा मागेन हे ऐकल्यावर अगदीच काहीतरीच वाटलं. आपण जज करू नये त्यांचं त्यांना माहित काय असेल ते पण तरीही परत तोच नवरा पुढचे जन्म हे काही पचलं नाही
शिवाय ते पाथरवट असतात ना,
शिवाय ते पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून आम्ही हे दगडी पुस्तक खास बनवून घेतो. >>
इस्पिक च्या राजासारखी हेअर style >>
इस्पिक च्या राजासारखी हेअर
इस्पिक च्या राजासारखी हेअर style>>>>>> फुटलो मी
शिवाय ते पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून आम्ही हे दगडी पुस्तक खास बनवून घेतो. म्हणजे काय आहे, की त्यांनाही रोजगार मिळतो. किती छान कल्पना आहे ना?>>>>>> भारीच
चला खूप झाली चेष्टा मस्करी
चला खूप झाली चेष्टा मस्करी
ही मुलाखत आवडली. दोघांचाही मनमोकळेपणा आवडला अन रानीकोहिनूरचा स्टँड अगदीच पटला. मला ही व्यक्ती अजिबातच माहिती नव्हती, नाही. या मुलाखतीतूनच कळली अन आवडली.
https://youtu.be/mfSpqddY-l8?si=jEnn9SAg2nAZDrZI
इस्पिक राजा
इस्पिक राजा
ओह हरपा, त्या पाथरवट आणि त्यांच्या दगडी पुस्तकाबद्दल काही बोलू नका हां. मला तो प्रकार आवडला आहे डेकोरेशन म्हणून.
मस्त चर्चा.
मस्त चर्चा.
@अवल,याने /हिने स्वतःच नावं
@अवल,याने /हिने स्वतःच नावं रानी कोहिनुर कधी ठेवलं माहित नाही. पण हा /ही माहित आहे. काही वर्षांपूर्वी हा ड्रेस किंवा हेअर स्टयलिस्ट असं काहीतरी होता बहुतेक, कुठल्या तरी शो मध्ये आला होता. आता तो दोन आवाजात (both मेल and female )गातो पण अस youtube वर पाहिलं कुठं तरी. छान गातो. म्हणजे दोन आवाजात गाणं अवघड आहे ते जमत चांगल.
चांगली वाटते आहे मुलाखत.
चांगली वाटते आहे मुलाखत.
मराठीत दे/ देम इतपत.... त्या/ त्यांनी इ. जेंडर न्यूट्रल सर्वनामं वापरुन लिहिता येईल ना? किंवा सर्वनामं गाळून नाम वापरुन ही लिहिता येईल.
हिंदी इतकं आप/ हम मराठीत सहज होत नसलं तरी रानी कोहिनूर सजग असल्याने तरी हे करावं असं वाटलं.
सॉरी सायो. तो डिस्काउंट कोड
सॉरी सायो. तो डिस्काउंट कोड तेवढा वापरा.
माधवी रविंद्र महाजनींचं
माधवी रविंद्र महाजनींचं पुस्तक आलंय त्याचा प्रोमो म्हणून त्या जात असतील. त्यांची एक मुलाखत बघितली.
>>>>> अरेरे. मी क्लिप बघितली होती. त्यात त्या म्हणाल्या होत्या की त्यांनी मी जुगार खेळतो, मी घरातून पळून गेलो व कशाचे तरी पैसे जुगारात हरलो आहे, हे सांगितले तरीही ह्या प्रेम- प्रेम करत होत्या. ते ऐकून यांना अजूनही 'स्टॉकहोम सिंड्रोम' आहे की काय वाटले. तेवढंच ऐकून बघायचं रद्द केलं. पुढे हे होतं म्हणजे 'धन्य' वाटले.
सुशांत दिवगीकरची/राणी कोहिनूर
सुशांत दिवगीकरची/राणी कोहिनूर रणवीर अलाहबादीयाच्या चॅनलवरची मुलाखत बघितली होती. चांगली होती. नाव कधी बदललं कल्पना नाही.
इस्पिक राजाची हेअर स्टाईल>>
इस्पिक राजाची हेअर स्टाईल>>
पाथरवटांनी केलेले दगडी पुस्तक मी बघितलं नाहीये. कुठल्या भागात बघायला मिळेल?
यांना अजूनही 'स्टॉकहोम
यांना अजूनही 'स्टॉकहोम सिंड्रोम' आहे की काय वाटले. तेवढंच ऐकून बघायचं रद्द केलं>> मी फक्त शॉट्स पाहिले. एकात तर, प्रेम म्हणजे समर्पण वगैरे ऐकलं. त्यामुळे असं नाही, पण एकूणच मुलाखत बघावीशी वाटली नाही.
पुस्तक प्रकाशनाच्या वेळी गश्मिरने जे काही थोडे प्रसंग वाचून दाखवले त्यातून त्या टॉक्सिक नात्याचा अंदाज आला.
सगळं समजून उमजून त्यांनी ते नातं स्वीकारलं होतं, असं दिसतं. मात्र ज्या पोरकटपणे मीडियाने रविंद्र महाजनींच्या मृत्यूचा इश्यू केला, त्यामुळे त्यांना हे पुस्तक लिहून प्रकाशित करणे गरजेचे वाटले असावे.
पुस्तक नाही, पण दर मुलाखतीत
पुस्तक नाही, पण दर मुलाखतीत कुठलं तरी छोटं दगडी जातं, उखळ असे काही गिफ्ट आयटम्स असतात. ते देतानाची सु.त.ची टेम्प्लेट "ते पाथरवट असतात ना << पुढे वस्तूचं नाव आणि तिचं वर्णन >> .... म्हणजे मग त्यांनाही रोजगार मिळतो आणि आपल्याला छान छान वस्तू मिळतात. किती छान कल्पना आहे ना?" अशी ठरलेली असते. इथे माझा विषय पुस्तकाचा चालला होता म्हणून मी वस्तूच्या नावाच्या ठिकाणी "दगडी पुस्तक" टाकलं.
मित्र म्हणे ज्यांनी अजून
मित्र म्हणे ज्यांनी अजून पाहिलं नाहीये, त्यांच्यासाठी एक झलक - >>> ही पोस्ट जबरी आहे
अच्छा! मी एकदोन वेळा बघायचा
इथे माझा विषय पुस्तकाचा चालला होता म्हणून मी वस्तूच्या नावाच्या ठिकाणी "दगडी पुस्तक" टाकलं.>> अच्छा! मी एकदोन वेळा बघायचा प्रयत्न केला होता, त्यात मोठी बॅग आणि साडी असं काहीबाही गिफ्ट होतं. मग मी मुलाखत सोडून त्या वस्तूंची माहिती काढली होती. आता उखळ - जातं किंवा तत्सम शोधते आणि एकदा ते एपिक डायलॉग ऐकतेच.
शेवटी मित्र म्हणे व अमृता
शेवटी मित्र म्हणे व अमृता सुभाषची मुलाखत युट्युबवर आपोआप दिसलीच. म्हणुन जरावेळ पाहिली. त्यात तो इस्पिकचा राजा तिला ‘तु ओटीटीची राणी झालीस‘ असे म्हणाला. कधी झाली ती ?
कितीही ब्लॉक केले तरी दररोज
कितीही ब्लॉक केले तरी दररोज कुठल्या ना कुठल्या चॅनेल्सचे अपडेट फेसबुकवर येत असतात 'रवींद्र महाजनी यांच्या पत्नीचे धक्कादायक वक्तव्य' म्हणून. आताशा इरिटेट व्हायला लागले आहे. रवींद्र महाजनी वैयक्तिक आयुष्यात किती वाईट होते हे जाणून घ्यायची सूतराम इच्छा नसलेल्या सामान्य फेसबुक यूजर्सच्या गळ्यात का मारताहेत हे डीटेल्स?
रवींद्र महाजनी शेवटच्या दिवसांत एकटे राहत होते. यावरून लोकांना अंदाज आलाच होता की कुटुंबात सर्व आलबेल नाही. कदाचित माधवी यांच्यासाठी हे कॅथर्टिक असू शकेल. पण त्यासाठी त्यांचे जवळचे मित्र-मैत्रीण, नातेवाईक नाहीत का? आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी हे डीटेल्स वापरून घेणाऱ्या माध्यमांविषयी काय बोलावे? It is being considered as final chance to get TRPs riding on his popularity or from her pain. Either ways, it is reprehensible.
माझेमन+१.
माझेमन+१.
या सगळ्यात त्याही सामील असाव्यात अशीही शंका येते.
इथे कौतुकाचा इतका भडीमार
इथे कौतुकाचा इतका भडीमार वाचून मी सुलेखाच्या चॅनलवर बैजनाथ मंगेशकरांची मुलाखत पाहिली. म्हणजे सुरवातच पाहिली ज्यात गिफ्ट्स दिल्या. हा गिफ्ट्सचा प्रसंग प्रचंड ऑकवर्ड वाटला. बैजनाथांना (त्यांना गिफ्टस मिळतात हे माहित असूनही) एकामागोमाग एक इतक्या गिफ्ट्स घेत छान छान आणि थँक्यु म्हणत राहणं जरा अवघडच वाटत होतं असं वाटलं. शिवाय सुलेखाताई पाहुण्यांना गिफ्ट देऊन त्यांच्या तोंडाकडे कॉम्प्लिमेंटसकरता बघत बसतात तो मधला पॉजही ऑकवर्ड वाटतो. फारच डिटेलवार होतं. अगदी बोअर प्रकरण आहे. पाथरवट अणि त्यांचा रोजगार यांचा उल्लेख झाल्यावर खूप हसले.
Baiju Mangeshkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !! एक वेगळं वळण !! : https://www.youtube.com/watch?v=2nhSaFa9jVI
सुरवातीलाच १.५० ते ११.०० मिनिटं हा जंगी कार्यक्रम बघायला मिळेल.
इस्पिकचा राजा हे फारच महान
इस्पिकचा राजा हे फारच महान आहे.....
आता पत्ते खेळताना मित्राची आठवण येणार.
सुरवातीलाच १.५० ते ११.००
सुरवातीलाच १.५० ते ११.०० मिनिटं हा जंगी कार्यक्रम बघायला मिळेल. >>>> ऑलमोस्ट ९ मिनिटे? किती बोअर...आणि एवढ्या गिफ्ट द्यायचे काय कारण? टोकन म्हणून एखाद गिफ्ट ठीकेय. स्पॉन्सर्सची जाहिरात म्हणून का? आणि सुटकेस कोण देतं गिफ्ट म्हणून?
रवींद्र महाजनी गेल्यानंतर
रवींद्र महाजनी गेल्यानंतर त्यांच्या मुलाला गश्मीरला मित्र म्हणे वर बोलावले होते मुलाखतीला,
एकंदर मुलाखत ऐकून मला असे वाटले की, रवींद्र महाजनी गेल्यावर, ते वेगळे राहायचे व मुलगा सून बायको यांच्याशी कसे जुळत नव्हते याचा मीडिया ने जास्त बाजार भरवला होता तो पुसण्याचा (उठवण्याचा) प्रयत्न जणू गश्मीरला करावा लागत होता. व पटत नसून ही आपलेच बाबा आहेत(होते ) नि तेही असे व्हिमसिकल मनमानी वागायचे तर आता वाईट कसे बोलू असे त्याला झाले असावे, त्यांच्या बायकोच्या मुलाखतीत सुद्धा हेच जाणवले
त्या असे म्हणाल्या, "तो ना जुगार खेळायचा पण त्याची इच्छा चांगली होती आपल्याला पैसे मिळावेत असे त्याला वाटायचे, ही त्याची इच्छा चांगली होती फक्त त्याचा मार्ग चुकीचा होता " म्हटले नशीब मार्ग चुकीचा होता हे सुद्धा बोलल्या .. !!
असो .. इतक्यात नवी मुलाखत अजून नाहीय कोणाची पाहिली अमृता सुभाष ची आलीये ..पण ती बघवणार नाही असे वाटतेय ट्रेलर बघून ..
Pages