बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटेसे काही तरी द्यायचे असेल तर दोन छोटे बटाटे वडे आणि चटणी किंवा पट्टी सामोसे वगैरे देता येईल. त्याच्याबरोबर ड्राय फ्रूट वडी किंवा काजू कतली देता येईल. वर आर्धा कप कॉफी. साधे काही तरी हवे असल्यास चिवडा चांगला पडेल.

Snacks box म्हणजे काय अपेक्षित आहे ते कळले नाही. Box आधीच तयार करून ठेवणार का? आणि मग त्यांनी घरी जाऊन खाणे अपेक्षित आहे का?

भारतात प्रशांत कॉर्नरची अशी बॉक्स परफेक्ट मिळते. आपण सांगील ते भरुन देतात.

उदा: छोटा समोसा, सॉसचे पाकीट, एक अजून तळी व फरसाण्चा प्रकार जसे चीज पटेटो बॉल्स, हे इथे फ्रोझन मिळतात. एक सुके गोड. बर्फी किंवा सोन पापडी साखर वाला लंबा गुलाबजामुन/ सुकी करंजी/ तिळगुळ लाडू. एक टिशू पेपर. बॉक्स बंद.

बरोबर एक छोटी पाणी बाटली व एक ज्युस चा डबा.

२) दोन इडल्या हिरवी चटणी सील्ड प्लास्टिक पाकिटात. एक व्हेज कटलेट. गोड सेम अ‍ॅज अबव्ह.

Snackbox मध्ये सामोसा/वडापाव/कचोरी/बर्गर/कच्छी दाबेली , एक ज्यूस/फ्रुटी/मसालाताकाचा छोटा टेट्रापॅक, गोडात बिनपाकाचे गुलाबजाम, सोबत तिळगूळ व हलव्याचे पॅकेट असे देता येईल.

मला ही सोय प्रचन्ड आवडलेली आहे पण हे सगळे देशातच शक्य आहे...फेसबुकवर कुणीतरी प्रशान्त कॉर्नरच्या टुरचे फोटो टाकले होते..त्यानी त्याच्या फॅक्टरीच्या टुर ठेवल्या होत्या.

भारतात प्रशांत कॉर्नरची अशी बॉक्स परफेक्ट मिळते. आपण सांगील ते भरुन देतात.>>> वॉव काय मस्त आयडीया आहे ही. आणि मेनु काय मस्त लिहिलात अमा. तोंपासू.
हल्लीच १ हळदी कुंकू प्रोग्राम ला गेले होते, तिथे बेन्टो बॉक्स होते. व्हेज पुलाव, रायता, २ मिनी सामोसे चटण्या सिल पॅक मधे, ढोकळा, गाजर हलवा.

अनया, माझ्या आईकडे आम्ही जे बॉक्स आणतो ते कागदी असतात. रिसायकल होतात. भारतात तशी प्लॅस्टिक बंदी आहे त्यामुळे मोस्टली कागदी बॉक्सच असतात.

बरोबर आहे.
शक्य असेल तेव्हा पेट बॉटल्स, सॉस किंवा चटण्यांची पाकीटं टाळता आली तर उत्तम. ते रिसायकल करायला बरीच मोठी प्रोसेस आहे.
असो. तुम्ही सगळे सूज्ञ आहात. असा विचार करत असालच. आता थांबते. फार विषयांतर नको.

She may not invite more than 30 people. it is a gharguti program . Check the menu as per the bb.

You can contact Prashant corner management for correct disposal of their boxes.

(या पोस्ट ला संबंधित नाही पण जनरल:)
ही मिळणारी चिमुकली चटण्या सॉस ची पाकिटे, पार्सल मध्ये येणाऱ्या भरपूर सांबर चटण्या हा माझ्या आयुष्यातला मोठा पेन पॉईंट आहे.ढोकळा समोसा बरोबर मिळणाऱ्या चटण्या 1 कोल्ड्रिंक ची बाटली प्यावी तेव्हा मिळेल तितकी साखर इतक्याच गोड असतात.खात कोणीच नाही.पण आणताना सवयीने हलवाई ती पॅक मध्ये टाकतातच.या बंद पिशव्या थेट कचऱ्यात टाकणे मनाला पटत नाही.मग पिशव्या फोडून, त्यातला मुद्देमाल नळाखाली गाळण्यात धरून,जे उरेल ते वेट डस्टबिन ला टाकून पिशव्या धुवून ड्राय बिन ला टाकते.सांबर चटण्या खूप प्रमाणात दिलेल्या असतात.तितक्या कोणीच खात नाही.मग तेही असंच मोठ्या गाळण्यात गाळून टाकावं लागतं.लोणचे पाकीट हा सर्वात मोठा पेन एरिया.कोणत्यातरी खाकरा पाकिटात असतात.ती चवीने खाण्या इतकी चांगली नसतात.त्याला पण हेच.टाको बेलवाले हौसेनं 10 पाकीट लाल सॉस देतात.तो अतिशय भंपक चवीचा आहे.त्याला पण हेच.त्यातल्या त्यात फक्त निर्भेळ केचप ची पाकिटं मिळाली तर एकत्र फोडून एका सँडविच ला वापरून संपतात.
हे इतकं सॉर्टईंग करण्यात मोठेपणा वगैरे नाही, पण पाकिटं थेट ड्राय कचऱ्यात न उघडता टाकल्यास फुटतात.मग टिपिकल कचरा वास येऊन फक्त स्वच्छ कागद, पिशव्या असलेला ड्राय कचरा एरवी 4 दिवसांनी टाकता येतो तो हे असं केल्यावर रोज बाहेर ठेवावा लागतो.न उघडलेल्या प्लास्टिक पिशव्या सॉस सहित वेट डस्टबिन ला टाकावं तर तत्वात बसत नाही.

माझे पण अवांतर:
मी शक्यतो ज्या चटण्या, सॉस वापरात नाही ती देऊच नका असे सांगते किंवा काउंटरवरच परत देऊन टाकते. 'काय चमत्कारिक बाई आहे' अशा नजरांची सवय करावी लागते, तेवढे चालते मला.
ऑनलाईन ऑर्डरसोबत आलेल्या सॉसचे सॅशे डब्यात द्यायला उपयोगी पडतात म्हणून त्याचा एक वेगळा डबा केला आहे त्यात ठेवते. म्हणजे पटकन डबा भरताना हाताशी येतात, शोधाशोध करावी लागत नाही.
साधारण असली लोणची दह्यात मिक्स करून पोळी/भाकरीशी/दहिभातावर/आमटीभातावर/बोरिंग भाज्यांत घातली कि चव फार वाईट लागत नाहीत. पण माझ्या मदतनीस मुलीला लोणच्याची शाम्पूच्या सॅशेएवढी पाकिटे आवडतात. ती हक्काने सांगते ताई ही माझ्यासाठी ठेवा.
चुकून कधी जास्तीची सलाड ड्रेसिंग आली तर फ्रीजमध्ये ठेवून महिनाभरात वापरते.

अनु, आपण कुंभमेळ्यात हरवलेल्या बहिणी असू शकतो असे वाटले मला.
मी पण हे सगळे सोपस्कार करते. परत सिंक लगेच घासावे लागते हे वेगळेच.

अरे वा,बऱ्याच जणांना हीच समस्या सतावतेय म्हणजे.
(माझेमन, उपाय चांगले आहेत.डब्यात आम्ही पण ठेवतो ओरिगानॉ चिली फ्लेक्स.बऱ्याच ठिकाणी स्वतः ऑर्डर घ्यायला गेलं नसलं तर हे सर्व घरात येतंच कितीही घेऊ नका सांगून पण.)

मला वाटले होते ही समस्या इकडे दक्षिण भारतातच आहे की काय, एवढी मोठी चटणी असते इडली वगैरे सोबत, इडल्या संपवल्या दुपारी रात्री जेवणात खाली तरी निम्मी शिल्लक असते. सॉस पाकिटे, फ्री स्वीटस, कोल्ड्रिंक्स वगैरे मोलकरीण/वॉचमेन यांना देतो (दहा फ्लॅट्सचा ब्लॉक असल्याने वॉचमेनवर यांचा मारा होत नाही.)

त्या मेळ्यात हरवलेल्यांत मलापण घ्या!
मी शक्यतो काहीच आणत नाही, पण सामोसा वगैरे आणला तर जास्तीची चटणी पाकिटं पार्सलात जाण्यापूर्वीच "एकच द्या" - "अहो घ्या"- "नको, वाया जातात, कोणी खात नाही" -अशी एक आवर्तनमात्रा असतेच.
त्यातून उरतेच ती हिरवी चटणी. मग दैवयोगानेच जर दुसर्‍या दिवशी पराठे करणार असेन तर त्यात ढकलून देते. गोड चटणी उरतच नाही.

हे जे प्लास्टिक पिशव्या/ साशे आहेत ते तुमच्याकडे रिसायकल होतात याची खात्री आहे? आणि ते रिसायकल करणे परवडणारे असते याची?

मी मध्यंतरी इथे वाचून/ थोडाफार रिसर्च करून इथे होत नाहीत असा निष्कर्ष काढलेला. आणि ते प्लास्टिक स्वच्छ करण्यात फार पाणी वाया जातं असं वाटू लागल्याने पिशव्या प्लास्टिक प्रकार गारबेज मध्ये टाकायला सुरुवात केलेली.
ते खरंच होत असेल तर उत्तमच आहे.
अनया +१.

पेन एरिया वाचायला सुरुवात केली तेव्हाच वाटलेलं की अनुच असं लिहू शकते.. सही पकडें हैं. याच बोटीत मीही. चिमूटभर सॉस चटण्या यांचं कचऱ्यासाठी वर्गीकरण वैतागकारक असतंय.
माझे मन >> हो. सॉस सॅशे असेल तर आम्हीही असा उपयोग करतो. पण झिपलॉक मध्ये असतात काही वेळा. तेव्हा वैताग येतो.

अनु, मी पण तुमच्या ग्रुप मध्ये !! Lol
त्या चटण्या तशाच पॅक फेकून द्यायचा इतकं जीवावर येतं...आणि मग इतर कुणी जरी फेकल्या..तर समोसे खण्यातला आनंद त्या भांडणाने संपतो!!
लोणची अतिशय बेचव असतात, शेजवान चरणी छान असते..पण ती त्या चविष्ट चायनीज सोबत खाल्ल्यावर..उरलेली आपल्या घरच्या दोडक्याच्या भाजी - पोळी सोबत खवावत नाही !!
छोटी सॉस ची पाकिटे सेम...डब्यात द्यायला होतात.
तसेच मला हेअर डाय च्या साशे मधील प्लास्टिक पिशव्या दिसल्या की होते....
काय करावे?

अय लोकहो... कुठे नेऊन ठेवला हा धागा .. !! Wink
नवीन धागा काढा बघू
पार्सल सोबत आलेल्या केचप, चटण्या यांच्या पाकिटांचे तुम्ही काय करता..
(डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता? या चालीवर .. mi_anu)

मॅगी मधून येणारे मसाला पॅकेट्स पण वैताग असतो. आपण 4 किंवा 8 चा पॅक वापरावं तर आतले पॅकेट्स छोटे छोटे 1- 1 चे असतात. इतके छोटे पॅकेट्स रिसायकल होतात का प्रश्न पडतो. या छोटया पॅकेटची टोके कट न करता त्यातून मसाला बाहेर काढणे कठीण काम आहे. ( इथे मा बो वर वाचूनच टोके कट केली तर रिसायकल होत नाही हे डोक्यात घट्ट बसले आहे) कमीतकमी 4 चा एकत्रितपणे मसाला पॅकेट द्यायला काय हरकत आहे.

कारण आम्ही एकावेळी एकच करतो. चार करत नाही.
मसाला पाकिटं रिसायकल होणं शक्य नाही. शक्य नाही म्हणू नये, पुरेसे पैसे टाकले की काहीही शक्य असतं.. तर महाखर्चिक आहे. त्याची टोके वाचवणे हे स्प्लिटिंग द हेअरच्या वर्ताण आहे.

मसाला पाकिटं रिसायकल होणं शक्य नाही.>> बरोबर. सध्या बहुतेक वेळा असे पाहिले आहे की जर आतमधून / बाहेरून चमकदार असेल तर अशी पाकिटे रिसायकल होत नाहीत. त्यांना काही तरी वेगळे लेयरिंग असते. बाकी साध्या प्लॅस्टिकच्या पिशव्या , दूधाचे कॅन, बॉक्स वगैरे रिसायकल केले जातात.

हेही वाचले आहे की पदार्थ लागून काँटामनेट झालेल्या गोष्टी रिसायकल होत नाहीत. खरे की काय?

मागवायचं कशाला? घरीच करून खावं. >>>> कधीतरी खातात लोक बाहेरचं किंवा एखादा आयटम नाही येत बनवता..उदा.समोसा मला येत नाही.
आणि बाय द वे विषय तो नाही आहे Wink

परवा मैत्रिण व तिची बहीण दुपारी येणार आहे. उन्हाळ्याला योग्य असे टी टाईम स्नॅक्स सुचवा. ती सौदिंडीयन आहे आणि उत्तम स्वैपाक करते. त्यामुळे नेहमीचे सौदिंडीयन पदार्थ नको. कापलेल्या फळांच्या थंड फोडी असतीलच सोबत.

Pages