पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते ‘नो प्रॉब्लेम‘, आभार मानण्यासाठी नसून, ज्याच्यासाठी आभार मानताय ती गोष्ट करण्यात मला काही विशेष कष्ट पडले नाहीत / तुम्हाला मदत झाली ह्यातच आनंद आहे - अश्या अर्थी असावं.

'प्रॉब्लेम' या शब्दातच मूळ प्रॉब्लेम आहे.
'नो प्रॉब्लेम' हे कोणीतरी काहीतरी धांदरटपणा/कल्ला केलाय, आणि आपल्याला निस्तरायला फार काही मोठा प्रकार नाही, होतं कधीकधी या अर्थी वापरला जावा.

फेफ +१
'नो प्रॉब्लेम' म्हणजे हे मी काही आउट ऑफ द वे जाऊन केलेलं नाही. इ. इ.
नो प्रॉब्लेम, नो इश्युज, नो वरीज, शुअर, एनी टाईम... किंवा थँक्यूच परत म्हणायचं हे अगदी कॉमन रिस्पॉन्सेस आहेत.
हल्ली (म्हणजे मी हल्ली पोरांच्या कृपेने जास्त ऐकतो) 'यु बेट' हा एक फेमस रिस्पॉन्स झालाय थँक्यूला. पोरं त्यातला यु म्हणतच नाहीत. काहीही विचारलं की 'बेट' हा एकच रिस्पॉन्स कशाला ही देतात. इथे वाचल्यावर मला पण मार्केटप्लेस मध्ये ते कॉमेंट्रेटर एकदम कनव्हिंसिंगली यु बेट म्हणताना आठवले.

यु बेट - हा मी ऐकलाय.
टोटली हा सध्याचा आवडता रिस्पॉन्स आहे. कोणाशी सहमत होताना - टोटली किंवा अ‍ॅब्सोल्युटली.

नो प्रॉब्लेम हा थँक्यु करता, अगदीच कॉमन आहे.

फेफ, अमितव, सहमत
अनु, Can we do this? असे विचारल्यावरही " (yes) No problem" म्हणता येइल. त्याच धर्तीवर थॅंक्स म्हटल्यावर (उदा. कुणी उठुन आपल्याला बसायला जागा दिली, आपण थँक्स म्हटले तेव्हा) नो प्रॉब्लेम म्हणणे (मला उभे रहाण्यात काही प्रॉब्लेम नाही) खटकु नये.
-----
मार्केटप्लेस मध्ये ते कॉमेंट्रेटर एकदम कनव्हिंसिंगली यु बेट म्हणताना आठवले.>> Lol

पूर्वी मला पहील्यांदा नो प्रॉब्लेम ऐकलेलं तेव्हा वाटलं होतं - हम्म!! याला/ही ला त्रास होतोय यु आर वेलकम म्हणायला. म्हणुन नो प्रॉब्लेम असे म्हणते आहे. परत मदत मागू नका म्हण की मग सरळ सरळ.
पण पुढे सवय झाली.

फेफ व अमित शी सहमत. मी साधारण याच संदर्भाने ऐकला व वापरला आहे.

नो मेन्शन्/मेन्शन नॉट इथे अमेरिकेत फारसे कधी ऐकले नाही. नो प्रॉब्लेम, यू बेट (हे नवीन आहे), वेलकम ची रेंज ( साधा डोसा "वेलकम" ते "यू आर मोस्ट वेलकम डियर/हनी" वगैरे मसाला, घी मसाला, म्हैसूर मसाला वगैरे आवृत्त्या. यात डिअर व हनी हे रोमॅण्टिक अर्थाने नाहीत. फक्त जनरल जवळीक दाखवणारे), ऑफ कोर्स, एनीटाइम - हे सगळेही प्रचलित आहेत.

मीही नो प्रॉब्लेम म्हणते बऱ्याच वेळा थँक्यूला उत्तर म्हणून.

साधा डोसा वेलकम ते मसाला, म्हैसूर मसाला डोसा वेलकम Rofl

“ यात डिअर व हनी हे रोमॅण्टिक अर्थाने नाहीत. फक्त जनरल जवळीक दाखवणारे)” - एकदम सदर्न!! डिअर जास्त भारतात ऐकलंय (सेम जेन्डरमधे ते जरा ऑड वाटतं), पण अटलांटिकच्या पश्चिमेला, मेसन-डिक्सनच्या खाली ‘हनी’ एकदम प्रचलित आहे. Happy

एकदम सदर्न >>> बरोब्बर फेफ! मी "सदर्न" ऑल्मोस्ट लिहीले होते. बाय द वे, जनरल साउथमधे आहे ना? इव्हन कॅरोलीनाज ई मधे?

माझी पण भर :

*माझ्या स्वतः च्याच वैयक्तिक चहा / कॉफी मध्ये साखर न घालू देणारे लोक*.

हे लोक त्यांच्याकडे गेलं की "चहात साखर किती घालू?" असं विचारतात आणि एक मोठा चमचा किंवा दीड छोटा चमचा सांगितलं की "छे छे.. एवढी साखर खाऊ नये.. मी मुळीच एवढी साखर घालणार नाही हा चहात" असे म्हणतात. मग आधी विचारताच कश्याला? बरं लोक हेल्थ कोंशियस आहेत म्हणावे तर हेच लोक आमच्या घरी आल्यावर शेवटच्या मिठाईच्या तुकड्यापर्यंत सगळं गोड यथेच्छ खाऊन जातात. स्वतः ला शुगर असली तरी. मग यांच्या घरी गेल्यावर नॉन शुगर वाल्यांना डोळे का वटारतात?

अजून एक म्हणजे "मी अमुक इतके वाजेपर्यंत खूप कामात आहे. इतके वाजता मी तुला फोन करेन" अशी वेळ देऊनही आधीच फोन करणे आणि मग उचलला नाही म्हणून रुसून बसणारे लोक. अरे मी तुम्हाला इतकी नीट वेळेची कमिटमेंट दिलेली असताना आधीच फोन करून मग मी तो उचलला नाही म्हणून रुसण्याचे काय कारण?

हा पेट पिव्ह्ज नाही पण तरी..
चिकन लॉलीपॉप चे ५ तुकडे मिळत असताना., मैत्रिणी ४ जणी असताना अधाशा सारखा १ ला तुकडा खाऊन एक्स्ट्रा तुकडा कायम .."हा मी घेऊ ना" म्हणुन गट्टंम करणे (कॉलेजच्या मैत्रिणींपैकी १) वैताग व्हायचा.

एखाद्याने थॅंक्यु म्हणण्यात किंवा न म्हणण्यात तुला प्रॉब्लेम का असायला हवा?
>>खूप जणांनी लिहिलंय तस - हा त्याचा अर्थ नाही.

Typical response:
Np, yw, you bet, my pleasure, I am glad I could help - हे काम काय आहे त्यानुसार.

मराठी असेल तर "बास काय/बस क्या - दोस्तीत कुस्ती? (म्हणजे थँक्यू कशाला) Lol

मी हे आधीही लिहिलं होतं कधीतरी बहुतेक, पण परत 'नो प्रॉब्लेम' वरून आठवलं.
कन्नडमधे बोलताना 'पर्वागिल्ला' म्हणतात. थँक्यूला उत्तर म्हणूनच असं नाही, तर हरकत नाही, नो वरीज, काम हो जाएगा अशा अनेक अर्थांनी. ते पर्वा + इल्ला असं आहे. तर सुरुवातीला इथे आल्यावर एखाद्याला काही काम करायला सांगितलं आणि तो पर्वा इल्ला म्हणाला तर मनात यायचं की अरे पर्वा नाही काय, पर्वा कर जरा आमच्या कामाची Happy

काही काम करायला सांगितलं आणि तो पर्वा इल्ला म्हणाला
>>>>
इला म्हणजे आला..
पर्वा इल्ला म्हणजे परवा आलात तर बरे होईल असे वाटण्याची शक्यता.. आधीच उद्या कधी येत नाही त्यात हा परवा या म्हणतोय Happy

त्यांच्याकडे गेलं की "चहात साखर किती घालू?" असं विचारतात>> मी असं विचारते Happy घरात सगळेजण साखर कमी खातात. चहा - कॉफीत तर अर्धा चमचा. त्यामुळे विचारायची सवय लागली. पण समोरच्याने ४ चमचे जरी घालायला सांगितली तरी मी घालते Happy

विचारलं हा प्रोब्लेमच नाहीये. ते विचारुन न देणं हा प्रोब्लेम आहे. आहेत माहितीत अशी लोकं आणि.

दिड छोटा चमचा हे काही भरपुर साखरेचं प्रमाण नाही.

असाच प्रोब्लेम मला अति गोड चहा करणार्यांबद्दल आहे. ते माझं खरं खुरं पेट पिव्ह आहे.
मला आणि सासुला साखर कमी लागते. आईला आणि नवर्याला भरपुर साखर लागते चहात. भरपुर म्हणजे एक घोट प्यायले तरी माझी दाढ ठणकेल. यामुळे आम्ही बिन साखरेचा चहा करा आणि ज्याला जेवढी हवी त्याने तेवढी साखर टाकुन घ्या यावर सेटल झालो आहोत.

आमच्याकडे चहात साखर किती हा प्रश्न कधी ऐकलाच नाही. चहा साखरेचा की बिनसाखरेचा इतकाच प्रश्न. तो देखील पाहुण्यांसाठी. कारण घरात कोणाला साखरेचा काही त्रास नाही. सर्वासाठी एकच टोपभर चहा उकळणार त्यात सर्वाँना एकच प्रमाणात साखर. टिपिकल मिडलक्लास फॅमिली. त्यामुळे चहात साखर किती विचारून नंतर घालणे हे लहानपणापासून केवळ चित्रपटात बघत आलोय Happy

पण हो, आमचा चहा गोड नसतो फार. चहा कडक हवा ज्याने सुस्ती जायला हवी. त्याची जास्त साखर घालून बासुंदी बनवू नये ज्याने सुस्ती यावी ही सर्वाची कॉमन आवड आणि मत.

Pages