पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक म्हणजे : कुठल्याही रांगेत वेळ लागून उभे राहून पाय दुखू लागावेत आणि नेमका आपला नंबर आला की कुठून तरी सुळकन पांढरे केसवाले आजोबा प्रकट होऊन “ज्येष्ठ नागरिकाना प्राधान्य “ या नियमावर बोट ठेवून त्यानी त्यांची कागदपत्रे काउंटरवर घुसडवावीत आणि आपण निमुतपणे मागे सरून बघत राहावे .

शपथ ! असली चरफड होते त्या क्षणी … तो नियम , पांढरे केस .. हे एक पेट पीव्हज आहे माझं

मला पुस्तकाच्या पानांना उलटताना थुंकी लावून उलटणारी माणसं मग तो अमिताभ का असेना डोक्यात जातात..दातात टाचणी ठेवून तीच खोचणारी तर फारच! बिनदिक्कत ओळ तोडून पुढे येऊन दुकानदाराकडे आपली मागणी करणारी माणसं माझा भेजा खल्लास करतात!

अनघा_पुणे तुमचे पेट पिव्ह्स अगदीच माझ्याशी जुळतात Wink

ला हे लोक जुदाईतल्या प्रश्न विचारणाऱ्या परेश रावल सारखे वाटतात, त्याच्या कपाळावर पण केसांचं प्रश्नचिन्ह असतं.>>> होना अगदी Lol
माझे सासरे सिंगापुर ला पहिल्यांदा आले तेंव्हा मी जरा आजारी पडले तेंव्हा मला विचारत होते, इकडचे (म्हणजे चायनिज लोकल) लोक पण पडतात का आजारी ?? Sad

हा धागा फारच आवडेश झालाय Happy

लॉबी मधे किंचाळत खेळणारी लहान मुले डोक्यात जातात. एकूणच किंचाळणारी गोंगाट करणारे लोक डोक्यात जातात.

लाडावलेली मुले: लिफ्ट मध्ये भेटली तरी त्रासदायक. काही मुली अगदी पापा की परी मोड मध्येच असतात. अगदी बारकी आईचा हात न धरता स्वतःच लिफ्ट मध्ये बटणे दाबत फिरतात वन टू थ्री करत. त्यांच्या तितक्याच लाडावलेल्या आया. म्हणजे आईचे अनेक वचन. व उगीच अरेरवी करणारे बाबा. हे मिड्ल मॅनेज मेंट वाले असतात बहुधा. पण बुलीज नंबर वन. बिझनेस वाले असले तर खलासच. घरचे राजे बेटे व त्याम्चे राजेबेटे.
राजकन्या.

उगीच बेल मारून पिडणा रा सर्विस स्टाफ.

सोसायटी अंकल व आंटी.

पुण्या मुंबई सारख्या मोठा शहरात लहान घर असताना कुत्री पाळणारी लोक. ( कुत्रा ह्या प्राण्याला खूप मोकळी जागा गरजेची असते हजार ,पंधराशे वर्ग फूट चा फ्लॅट हा त्यांच्या साठी खूप लहान असतो )

त्यांच्या घरी जाण्याची इच्छा च होत नाही कधी गेले की तो कुत्रा च स्वागत करतो .
आणि त्यांचे अंगाला झोंबण सर्वांना आवडत नाही पण मालकंस मोठे कौतुक वाटत.
सोसायटी आवारात,रस्त्यावर जेव्हा हे श्वान महाशय फिरायला निघतात मालकानं बरोबर तेव्हा कुठे ही संडास करतात ,कुठे सू करतात.
आणि त्याचा मालक ह्या घानी शी आपला काहीच संबंध नाही असे वागतात.
ती शी उचलून योग्य ठिकाणी टाकत नाहीत.

ही लोक सर्वात त्रासदायक लोक असतात असे माझे स्पष्ट मत आहे.
शहरात कुत्री पाळणारी त्या कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी फिरविणारे,त्यांनी केलेली घाण साफ न करणारी लोक ह्यांच्या विषयी राग आणि तिरस्कार दोन्ही आहे.

वेस्ट साइड लाइफ स्टाइल तत्सम दुकानात खरेदी करुन बिलिंग ला गेले की तुमच्या कडे मेंबरशिप आहे का म्हणून पिडणारा सेल्स स्टाफ. नाई व मला नको आहे सांगितले तरी ऐकत नाहीत.

लॉबी लेव्हल ला पटांगणा त सायकल फिरवणारे मध्यम्वयीन अंकल्स. कधी अंगावर येतो मिसाईल. असे साइ डने चालताना वाट त राहते. रोड्पे जा ना भाउ.

अनघा_पुणे तुमचे पेट पिव्ह्स अगदीच माझ्याशी जुळतात>> Happy
कधी अंगावर येतो मिसाईल. असे साइ डने चालताना वाट त राहते.>> Biggrin

कुठेही कधीही भेटल्यावर वरुन खालपर्यंत पाहून जाड झालीस बारिक झालीस अश्या comment करण्याऱ्या बायका माझ्या डोक्यात जातात

• जवळपास सर्वाजण मोबाईलवर बिझी असतात, रस्त्यावरुन चालताना देखील मोबाईल पाहत चालतात.पाठच्याला पुढे जाऊ देत नाही.स्वत: पण जात नाही.
• सुशिक्षीत असून देखील नवरा बायको मोठमोठ्यानी भांडतात, व भांडणाचा मुद्दा सर्व बिल्डिंगला माहित करतात.

बिलिंग स्टाफ कॉस्को चा असा पिडायचा. एकझिक्युटीव्ह मेंबर्शीप घ्या वरून. दरवेळी. मी आधी शांतपणे सांगून बघितलं. मग तिरकस सांगितलं, टोमणे मारले. बरं त्या बिचाऱ्या कॅश रजिस्टर वरच्या माणसावर चिडून काय होणार. सिस्टिम त्याला सांगते विचार! हा/ ही विचारते. त्याला म्हटलं मला ब्लॅक लिस्टित टाकता येईल का? मला परपेच्याल साधा मेंबर रहायचं आहे. असं नाही होत दादा म्हणाला. मग काय झालं माहीत नाही, पण हल्ली पिडणे बंद झाले आहे.
त्या मॉल मधल्या सेल्स पोरांना हाडतुड करावं वाटतं नाही, बिचारी नवा जॉब लागलेली असतात, हसून नको सांगता येईल तितकं सांगतो झालं.

डोक्यात जाणाऱ्या बाबी - आठवेल तसे सांगते
- सिगारेट पिनारे लोकानी जळते थोटूक चालत्या गाडीतून बाहेर फेकणे
- लोकांच्‍या घरी जाऊन न विचारता त्‍यांच्‍या झाडाची फुले/पाने देवाच्या नावा खाली ओरबाडून नेणे, नाहितर काढा करण्‍याला नेणे (कोविड मधे हे खुप झाले)
- नेले लि वस्तु मागितल्या शिवाय परत न आणुन देणे
- अमेरिकेतिल संस्कृती आणि लो़क वाईट कसे हे देशा बाहेर पाऊल न टाकता ऐकवणे
- लोकांचे वय विचारणे, नाही सांगितले तर कुठल्या बॅच ला पास आऊट झाला हे विचारण
- भाजी घेताना भेंडी शेवटाचा भाग तोडून कडक अस्ली तर तशीच परत टाकून देणे.
- भोपल्या मध्ये नखे खुपसून बघणे आणि कडक असला तर नख टोचलेला भोपला खरेदि ना करता तसच ठेवुन देण

दुकानात पाऊल टाकल्या टाकल्या शॉपिंग हेल्पर्स अंगावर चालून येतात. जरा एखाद्या कपड्याला हात लावला की जणू काही आता हा विकत घेणारच अशी अंतःप्रेरणा झाल्यागत त्या कपड्याची माहिती घडाघडा बोलायला सुरूवात करतात. शॉपिंगचा आनंदच घेऊन देत नाहीत. मागे मागे फिरत बसतात. आपण हात लावलेले कपडे आपण एक पाऊल पुढे गेल्याक्षणी 'जाने कहा कहा से आहे है' टाईप चेहरा करत नीट करायला घेतात.

बरं त्यांना सांगितलं की बाबा/बाई मला तुझी मदत नकोय. मला शांतपणे शॉपिंग करू दे तर दोन पावलं मागे जाऊन आपल्यावर करडी नजर ठेवून राहतात. जणू काय आपण चोरी करायलाच दुकानात शिरलोय.

बरं एकाला असं सांगून उपयोग नसतो कारण प्रत्येक विभागात नव्या दमाचा गडी तयार असतो. त्यामुळे साधारण मोठ्या कपड्याच्या दुकानांत शॉपिंग करताना अशा किमान चार-पाच जणांना टॅकल करावं लागतं.

अतिशय डोक्यात जाते ही जमात.

मामी, अगदी.
एकदा एका सुपर मार्केटमधे एक माणूस (म्हणजे दुकानाचा कर्मचारीच) इतका मागे मागे करत होता! मी दोन तीन वेळा सभ्यपणे 'थँक यू' म्हणून बघितलं, पण तरी याचं चालूच. शेवटी वैतागून तिथून निघाले. पुढच्या वेळी गेल्यावरही त्याने हाच प्रकार केला असता तर मी सरळ तक्रार करणार होते.

हे कोणालाच आवडत नाही.एका पंटर ला म्हटलं'नो सुपर्व्हीजन, नो रनिंग कॉमेंटरी प्लिज, तुला जे लक्ष ठेवायचं आहे ते cctv मधून ठेव' मग तो सॉरी म्हणून बाजूला झाला.जरा क्रूड आहे.पण तो वॉटर बॉटल हातात घेतली की रोबो सारखा 'यलो वॉटर बॉटल है, मेटल का है' असं सगळ्या हातात घेतलेल्या वस्तू बद्दल 3 वाक्य बोलत होता.मग थोड्या वेळाने एक मुलगी मागे मागे करायला लागली तिला म्हटलं तुम्ही कस्टमर चा निवांतपणे शॉपिंग करायचा आनंद काढून घेता.मग म्हणाली जर cctv मध्ये कस्टमर ला गायडन्स ला जवळ जवळ नाहीये दिसलं तर आम्हाला ओरडतात कस्टमर्स वर लक्ष नाहीये म्हणून.तितक्यात तिला दुसरा नवा माणूस मिळाला आणि तिथे पळाली.
वेस्टसाईड, झुडिओ मध्ये लोक मागेमागे करत नाहीत.एकदा सांगितलं की सोडून देतात.
(आमच्या इथे एक नट चं खूप चांगलं, किफायतशीर, मराठी माणसाचं दुकान आहे.मला तिथून नट, मखाने, लाह्या घ्यायला आवडतात.पहिल्यांदा मालक बाई प्रचंड कमेंटरी करत होत्या.त्यांना सांगितलं की मला दुकान माहीत आहे, वेबसाईट माहीत आहे, माझ्या घरचे नेहमी येतात, मला शांतपणे शॉपिंग करू द्या.मग त्या अगदी गोड शांत बसल्या.मग पुढच्या वेळी मिस्टर मालकांनी जी अखंड प्रॉडक्ट बडबड चालू केली, हे ट्राय कराच, ते बघाच वगैरे.बरोबर कुटुंब मेंबर्स असल्याने मला त्याला स्पष्ट सांगता आलं नाही.बाईंकडे अगतिक पणे बघत होते.त्या पण 'काय करणार, हा प्राणी मला तसाही ऐकणाऱ्यातला नाही' नजरेने बघत होत्या.

शॉपिंग चा हा अनुभव मॉल च नाही तर रेग्युलर कपड्याच्या दुकानात सुद्धा येतो. मला पुण्यातल्या एका प्रसिद्ध साडी दुकानाचा horrible अनुभव आला होता. मुळात साडी etc घेताना मला स्वतःचा आणि दुकानदाराचा फार वेळ घालवायला आवडत नाही. त्यामुळे मी त्या दुकानात गेल्या गेल्या मला जो स्पेसिफिक रंग हवा होता तो आणि माझं बजेट दोन्ही सांगितलं. तरीही त्या सेल्स वूमन ने बजेट बाहेरच्या साड्या दाखवायला सुरुवात केली आणि जो मला रंग हवा होता तसा काही आवडेना म्हणून मी ५मिनिट. मध्येच नका काढू अजून साड्या नाही पसंद पडतेत अस सांगून निघायला सुरुवात केली तर त्या बाईने चक्क मला ऐकू येईल पण बाकीच्याना नाही इतक्या आवाजात शिव्याच घालायला सुरुवात केली Sad आम्ही shocked. माझ्या नणंद म्हणाली कि आपण काउंटर वर तक्रार करू या या बाईची. पण मीच म्हणल नको उगाच त्याने विषय वाढेल, वेळ जाईल आणि कदाचित त्या बाईची नोकरी ही जाईल. ना जाणो तिला खूप गरज असेल नोकरीची. पण त्यानंतर मी कधीही त्या दुकानातून खरेदी केली नाही

'नो सुपर्व्हीजन, नो रनिंग कॉमेंटरी प्लिज >>>>
आता हे ही ट्राय करून पाहीन. मी आधी नॉर्मल स्वरात आणि नंतर वैतागून सांगते थँक यु बट आय एम नॉट लूकिंग फॉर हेल्प. तरीही नाहीच ऐकले तर किमान त्या आयलमधून किंवा दुकानातून निघून जाते.

जीन्स किंवा कॅज्युअल आऊटफिटमध्ये साडीच्या दुकानात गेलं की बरेचदा हिला काय समजतंय या ऍटिट्यूडमध्ये काहीही गळ्यात मारायला बघतात. हे फार डोक्यात जाते.
एकदा तर मला प्युअर सिल्क साडी हवी आहे सांगून आणि २/३ प्युअर सिल्कचे प्रकार सजेस्ट करून सुद्धा आर्ट सिल्क दाखवायला लागले. मी मावशीबरोबर होते. तिला म्हटले की "चल जाऊया. यांच्याकडे काही प्युअर सिल्क साड्या नाहीयेत बहुतेक". निघाले तशी दुसरा सेल्समन येऊन हव्या तश्या साड्या दाखवू लागला.

वर आणि/किंवा खाली फिदीफिदी हास्याच्या स्माईल्या देऊन विनोद शेअर करणे. अरे तो किती विनोदी आहे, आहे की नाही हे वाचणाऱ्यांना ठरवु द्या की.
मला असा कुणी शेअर केलेला विनोद पुढे शेअर करावासा वाटला तर फॉरवर्ड न करता कॉपी पेस्ट करून त्या स्माईल्या काढुन करून शेअर करतो. कॉपी-पेस्टेड असे नमुद करून.

आणि कुठल्याही व्हिडीओ मध्ये काहीतरी पार्श्वसंगीत. जंगलात कुठला प्राणी/पक्षी दिसलाय त्याचे चित्रीकरण केलेय तर जरा जंगलातील रेकॉर्ड केलेलेच आवाज किंवा शांतता येऊ द्या की.
असे इतरही अनेक व्हिडिओज असतात, त्यात ते पार्श्वसंगीत/गाणे अजिबात योग्य वाटत नाही. ते म्यूट करून बघितल्यास चांगले वाटतात.

यावरून आठवलं. साडी/कपडे वगैरे घ्यायला रेग्युलर दुकानात गेलं की अनेक अनेक साड्या/कपडे बघून झाल्यावरही आपल्याला आवडत नाहीयेत हे बघून अमराठी दुकानदार एक प्रश्न हमखास विचारतो
"आप को कैसा चाहिये?"

तेव्हा इतका वैताग येतो. आता आम्ही काय आम्हाला स्वप्नात दिसलेली साडी विकत घ्यायला आलोय का? काय अपेक्षा आहे? बरं समजा साग्रसंगीत वर्णन केलं तर तशी साडी उत्पन्न करून दाखवणार आहात का?

किती बिनडोक प्रश्न असतो तो.

मराठी दुकानदार असेल तर वीस मिनिटांत त्यांचा पेशन्स संपतो आणि चेहर्‍यावर तुच्छतेचे भाव आणून 'आमच्याकडे एवढ्या आहेत.(तुमच्या तुटपुंज्या बजेटमधल्या. भारीमधे आहेत पण तुम्हाला परवडणार नाहीत.)' असं सांगून विषय संपवतात.

कैसा चाहीये प्रश्न 'आता इतक्या गोष्टी काढायला लावल्या, किमान काहीतरी घ्या, पाहिजे ते दाखवतो, रिकाम्या हाती जाऊ नका' या डेसपरेशन मधून आलेलं असावं.
मराठी दुकानदार 'तुम्हाला पाहिजे ते नाहीये, माल बंद झाला, दुसरीकडे पण मिळणार नाही, कधी येईल ते माहीत नाही' सांगून कस्टमर जायची वाट बघतात.

मानव होय, फॉरवर्ड व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ते हसण्याचे आवाज आजकाल इतके डोक्यात जातात. ते हसणे संपूर्ण इंटरनेटवर बॅन करा रे कुणीतरी, असे वाटते.

सेल्समनची भीती वाटण्याइतके अनुभव येतात हे मात्र खरे. विशेषतः त्याने भरपूर ऑप्शनस (कपडे असो वा काहीही) दाखवायला सुरवात करतानाच त्याचा नूर ओळखायला लागतो. डेस्पो वाटला तर मी त्याला 'नको राहू दे' म्हणून निघून जातो.

बरेच दुकानदार चांगल्या दर्जाचा माल तसाच ठेवून जो गेलेला नाही असा सुमार माल आधी दाखवतात. तेंव्हाच ते डोक्यात जातात. पण सुमार दर्जा असल्याने आपण न घेता दुकानातून निघायला लागतो तेंव्हा ते आपल्यावरच नाराज होतात. म्हणजे "आलाय दुकानात तर काही न काही घ्यायलाच हवे" अशी वृत्ती.

अतुल मी व्हिडीओज बद्दल लिहिले तेव्हा विनोदाचे व्हिडीओ डोक्यात नव्हते. पण हो, त्यातील त्या हसण्याच्या आवाजाच्या ऑडिओ टेम्प्लेट्स फार वैतागदायी असतात. तो प्रकार आधी ९० च्या दशकात रेडिओवर सुरू झाला आणि मग टीव्हीवर. आता टीव्हीवर त्या टेम्प्लेट्सची भूमिका सिद्धू अँड कम्पनी आणि त्यांचे मराठी काउंटर पार्ट्स लाईव्ह वठवतात.

मला लहान मुलांना जबरदस्ती हसायला आणि पोज द्यायला सांगून त्यांचे फोटो काढायची हौस असणारे पालक रुचत नाही..
तसेच पाहुण्यांसमोर त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कला प्रदर्शन करायला लावणारे सुद्धा पटत नाहीत..
म्हणजे अगदी डोक्यात वगैरे जात नाहीत. आपल्या पोरांचे कौतुक व्हावे असे वाटण्यात काही गैर नाही. पण त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांचा मूड नसताना त्यांना इरीटेट करू नये.

get after chicken
i make no bones about it
feed them to the dogs

Soft Spot
वर धागा सुरू करा कुणी तरी.

हे माझे काही -
Disclaimer - प्रतिसादात मराठी पेक्षा इंग्लिशच जास्त आहे , हाही कोणाचा तरी पे पी होऊ शकतो

1) इमेलला उत्तर देतांना लेटेस्ट ई-मेल ला reply न देणे , तरी बरं email draft करतानाच outlook सांगत असतं की हा लेटेस्ट ई-मेल नाहीये.
2) एकच mail chain विविध कारणासाठी continue करणे (जरी मूळ solve problem ) झाला असला तरी. किमान subject बदलण्याचे तरी कष्ट घ्यावेत ना.
त्यामुळे CC जनतेचे पहिले interpretation अजून issue solve झाला नाही ? मग मेल वाचल्यावर कळते काय ते.
3) teams chat मध्ये लगेच उत्तर दिले नाही तर नुसते प्रश्नचिन्ह ?? टाकणे. अगदी Urgency नसली तरी. हे आजकालच्याच जनरेशन कडून जास्त पाहिले आहे . अरे, मिटींगमध्ये आहे, लाल स्टेटस दिसत नाही का? किंवा कामात असू शकतो , वाट बघ थोडी.
४) मीटिंग मध्ये आपण सांगितलेले solution थोडी इकडची तिकडची वाक्ये टाकून परत आपल्यालाच ऐकवणे. सांगतांना आविर्भाव असा की ही स्वतःची idea आहे, अरे मीच तुला सांगितले ना हे. किमान बोलतांना ....like/as you said असे तरी म्हण

चैत्रगंधा अगदी अगदी.
शिवाय ऑफिस मेल्स, चॅट वर थॅंक्यु ला ty सारखे शॉर्ट फॉर्म लिहिणे.
समोरच्याला टिम्स वर 'कॉल करतो आहे' असं न लिहिता थेट कॉल करणे.
हे ऑनलाईन सेलर्स कडून: ते 5 रुपयांची वस्तू विकत घेत असले, आपण लगेच पैसे, शिपिंग, तपशीलात पत्ता सर्व व्यवस्थित लिहून दिलेले असले तरी छोट्या छोट्या अपडेट साठी 2-3 वेळा फोन वरच बोलण्याचा आग्रह धरणे.

>>समोरच्याला टिम्स वर 'कॉल करतो आहे' असं न लिहिता थेट कॉल करणे.
हे अगदीच रिलेट झालं. मुळात कॉल करतो आहे पेक्षाही मी आत्ता कॉल केला तर चालेल का? / आत्त्ता आपण कनेक्ट होऊ शकतो का असे विचारुन समोरच्याचे उत्तर होकारार्थी आल्यास मगच कॉल करणे ही बेसिक गोष्टही कळत नाही काहींना.

>>>मीटिंग मध्ये आपण सांगितलेले solution थोडी इकडची तिकडची वाक्ये टाकून परत आपल्यालाच ऐकवणे. सांगतांना आविर्भाव असा की ही स्वतःची idea आहे, अरे मीच तुला सांगितले ना हे. किमान बोलतांना ....like/as you said असे तरी म्हण+११११११११

Pages