लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
१. एटीएम मधून पैसे काढून आतच
१. एटीएम मधून पैसे काढून आतच मोजत उभे राहणे. बाहेर लोक तिष्ठत उभे असतात, याला फिकीर नसते. जसे काय पैसे कमीजास्त असले तर एटीएम सोबत वादच घालणार आहे हा. <<< अतुल, पैसे आत मोजून घेतलेले चांगले नाही का? एटीएमात म्हणे कॅमेरा असतो. कमी-जास्त पैसे आले आणि तिथे मोजले तर कॅमेर्यातला पुरावा बँका बघतात, असे एक ज्ञान व्हॉट्सॅप किंवा त्याआधीच्या सोशलमिडिया-पिढीकडून वाचलेले आहे. खरे आहे का माहीत नाही.
--------
१) लिफ्टमध्ये (बहुतेकदा ऑफिसच्या लिफ्टमध्ये) शिरल्यावरही आपली बॅग पाठीवरच ठेवून दुसर्याच्या पुढ्यात उभे राहणारे लोक. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी लिफ्ट खच्चून भरते आणि असे लोक पुढ्यात उभे असले की त्यांची बॅग मागच्याच्या छातीवर दाबली जातेय हे त्यांच्या गावी नसते. लिफ्टमध्ये आपली बॅग हातात घ्यावी किंवा पाठीऐवजी पोटावर घ्यावी.
२) लिफ्टमधल्या बटणांच्या बोर्डाला खेटून उभे राहणारे लोक.
३) लिफ्ट बोलावताना भले जायचे वर असो वा खाली, लिफ्टबाहेरच्या बोर्डावरचे 'वरच्या दिशेचा बाण' आणि 'खालच्या दिशेचा बाण' दोन्ही दाबून बसणारे लोक. यामुळे यांना खाली जायचे असले तरी वर जाणारी लिफ्ट तिथे थांबते. (मग लिफ्ट उघडल्यावर 'वर जाते की खाली' असे विचारून 'नाही, मला खाली जायचे आहे.' असे म्हणतात.)
४) आधी अजिबात कल्पना न देता डायरेक्ट दरवाज्यावर आदळणारे पाहुणे! (त्यातही सुट्टीच्या दिवसाच्या भल्या पहाटे यांनी यावे. किंवा ऑफिसातली न टाळता येणारी मिटींग वेळेत गाठता यावी यासाठी आपण घरातून निघायच्या बेतात असावे आणि ती वेळ गाठून त्यांनी यावे.)
५) (हायब्रीड मोड असल्यावर) ऑफिसमध्ये असताना हेडफोन न लावता लॅपटॉपच्या स्पीकर्सवरून मिटींगा घेणारे लोक.
ऑफिसमध्ये असताना हेडफोन न
ऑफिसमध्ये असताना हेडफोन न लावता लॅपटॉपच्या स्पीकर्सवरून मिटींगा घेणारे लोक. >>> गजानन, आणि त्यावर "this is strictly confidential" असे मीटिंगमधल्या लोकांना सांगणारे का?
त्यांची बॅग मागच्याच्या छातीवर दाबली जातेय हे त्यांच्या गावी नसते >>> अशांकरता भरपूर ढेरी असलेले लोक मागे यावेत एकमेकांत चपखल बसणार्या जिगसॉ पझल सारखे होईल
लिफ्टबाहेरच्या बोर्डावरचे
लिफ्टबाहेरच्या बोर्डावरचे 'वरच्या दिशेचा बाण' आणि 'खालच्या दिशेचा बाण' दोन्ही दाबून बसणारे लोक.
>>>>>>
बरेच लोकांना हे माहीत नसते की वर जायला वरचा बाण आणि खाली जायला खालचा बाण वापरायचा असतो.
काहींना वाटते की आपल्याला खाली जायचे असले तरी त्यासाठी ग्राउंड फ्लोअरला असलेली लिफ्ट वर बोलवायची असल्यास वरचा बाण दाबा.
आणि हे गैरसमज कित्येक काळापर्यंत तसेच राहतात. आणि त्यानंतर समजूनही सवयीने उमजत नाही.
हो हे खरे आहे. पण लोकांची
हो हे खरे आहे. पण लोकांची टीका ही हे वापरायचे कसे हे माहीत नसणार्यांबद्दल्/नीट न समजणार्यांबद्दल नसून पब्लिक फॅसिलिटीज आपल्या बापाचा माल असल्यासारख्या वापरणार्यांबद्दल आहे दोनच मजले उतरायचे असले तरी लिफ्टमधला पंखा सुरू करून मग तो तसाच सुरू ठेवून बाहेर पडणारे वगैरे.
पण लोकांची टीका ही हे
पण लोकांची टीका ही हे वापरायचे कसे हे माहीत नसल्यांबद्दल नसून पब्लिक फॅसिलिटीज आपल्या बापाचा माल असल्यासारख्या वापरणार्यांबद्दल आहे
>>>>>>>>
फा, वरची मी कोट केलेली पोस्ट दोन्ही बाणाची बटणे दाबणे यांच्याबद्दल होती.
पण मुळात इथे आलेले सगळे पेट पीव्हज टीका म्हणून बघायला नको. काही प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत. त्यात समोरचा चूक असेलच असे नाही.
जसे मूळ लेखातच सामो यांनी म्हटले की त्यांना हॉटेल मध्ये हाताने भात खाणारी लोकं रुचत नाहीत. पण मुळात यात गैर काहीच नाही. ती त्यांची वैयक्तिक नावड आहे. आपल्याकडे बहुतांश लोकांना डाळभात हाताने खाण्यातच जास्त मजा येते. अश्यानी न लाजता हॉटेलात हाताने भात खाणे हे कौतुकास्पद सुद्धा म्हणू शकतो. ज्याचा त्याचा दृष्टीकोन..
पेट पीव्ह हे त्या व्यक्तीची
पेट पीव्ह हे त्या व्यक्तीची मतं आहेत. ती व्यक्ती कोण आली दुसऱ्याला चूक का बरोबर ठरवणारी!
मजा घ्या आणि सोडून द्या. आता वर कोणाला मीटिंग मध्ये कंप्युटरवर काम करणारी लोक आवडत नाहीत. मी इतका वेळ मायबोलीवर घालवू शकतो कारण हापिसात मीटिंग असतात.
फोर वे स्टॉप ला दोघे एकदम आले, तर पहिले आप / पहले आप जगाच्या अंतापर्यंत करणे आणि मग दोघांनी एकदम चालू करणे हे आमच्या देशाचं व्यवच्छेदक लक्षण आहे... आता अस्मिता हौडी पंथाला लागली म्हणून आम्ही पण सोडू काय! शक्यच नाही!
लिफ्ट चे वर खालेचे बटण दाबणे, चढल्यावर ख्रिसमस लाईट समजून सगळ्या मजल्यांची बटणे दाबणे... हे प्रकार कालच आमच्या पोरांनी हॉटेल मध्ये हॉकी टीम बरोबर रहाताना शिकून केले... मी आपला आयरोल दिला.
पीव्हज द पोल्ट्रेजिस्ट आपला आवडता आहे.
आम्ही जंगली, तुम्ही रोमॅन्टिक
आम्ही जंगली, तुम्ही अदबशीर, बस् !
इथल्या ड्राईव्हिंगचे फक्त 'वाईल्ड पीव्हज्' होऊ शकतात, कसेतरी दोन' पेट पीव्हज्' शोधले होते. आओ कभी टेक्ससमें.
. आओ कभी टेक्ससमें. >>>
. आओ कभी टेक्ससमें. >>>
भारतीय: म्हणजे आम्ही येडे?
आजच सकाळी मुलांना स्कूलबसमधे
आजच सकाळी मुलांना स्कूलबसमधे बसवण्यासाठी रस्ता क्रॉस करत होते. वेगळ्या शाळेची एक बस उजवीकडून येऊन आमच्या गेटसमोर येऊन थांबली होती. आमची बस डावीकडून येऊन विरुद्ध बाजूला थांबली होती. मी आणि मुलं या अलीकडच्या बसच्या मागून रस्ता ओलांडत होतो. अर्धा रस्ता ओलांडला. उजवीकडून एक ब्लिंकिटचा डिलिव्हरी करणारा वायुवेगाने आला, आमच्या पुढून निघूनही गेला. त्याला थांबवून, आधी हेल्मेट काढायला लावून आणि एक थोबाडीत लगावून 'तू एक मिनिट उशिरा पोचलास तर
कुणाचा जीव जाणार नाही, पण अशी गाडी चालवलीस तर एक दिवस अपघात नक्की होईल' असं सांगता यायला हवं होतं!
माझ्या आईचा अपघात सेम असाच
माझ्या आईचा अपघात सेम असाच झाला होता. त्यामुळे आता ती कधी खाली बसू शकत नाही.
पण आपली काळजी आपणच घ्यावी. काही लोकं ट्राफिकचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणाने वागणारच हे लक्षात घेऊनच आपण रस्त्यावर उतरावे. इथे फूटपाथवर सुद्धा बाईक घुसवतात लोकं. त्यामुळे गृहीत काहीच धरू नये. आपला जीव आपली जबाबदारी.
सर्वच डिलिव्हरी वाले अतिशय
सर्वच डिलिव्हरी वाले अतिशय घाण गाड्या चालवतात.सुरुवातीला त्यांना लवकर पोहचल्यावर इंसेंटिव्ह होते.किंवा स्वीगी झोमॅटो चे मॅप बहुतेक परदेशी गाड्या आणि परदेशी रस्त्यांच्या हिशोबाने वेळ मोजत असावे.1 यु टर्न, 2 मोठे गर्दीचे सिग्नल आणि 2.5 किलोमीटर अंतराला 'अरायव्हिंग इन 2 मिनिट' दाखवत असतं.आता स्वीगी वाले कुठेतरी बारीक अक्षरात 'आम्ही उशिरा पोहचलेल्या डिलिव्हरी बॉय ला फाईन लावत नाही' असं लिहितात.सिग्नल कटिंग, फुटपाथवर दुचाकी चालवणे हे तर सगळे करतात.
कधीकधी लोकांना नियम मोडायचा मोह पाडला जातो.पाव किलोमीटर अंतरासाठी 3 किलोमीटर जाऊन यु टर्न वगैरे.
रहदारीचे नियम असतात.
रहदारीचे नियम असतात.
बुद्धीबळ खेळताना कसे घोडा अडीच घरच चालतो, उंट तिरकाच चालतो वगैरे. समोरच तर आहे प्यादे विरुद्ध पक्षाचे, घोडा कशाला अडीच घर चालवु, किंवा उंट कशाला तिरका चालवु असे म्हणुन चालत नाही.
हो अगदी खरं. पण पब्लिक ला कोण
हो अगदी खरं. पण पब्लिक ला कोण समजावणार?पनिशमेण्ट(थेट एम परिवहन वर चलन) किंवा रिवार्ड यापैकी एक ठेवावं लागेल.
ऋन्मेष, काळजी तर घेतोच आपण
ऋन्मेष, काळजी तर घेतोच आपण रस्त्यावर उतरताना. तरीही अपघात होतात.
अनु, डिलिव्हरीवाले आणि जनरलच, गूगल मॅप्स सतत समोर चालू ठेवून गाडी चालवणारे आक्रमक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवतात असं मला वाटतं. ते virtual जगात असतात असं वाटतं.
बऱ्याच गोष्टी लोकांना आवडत
बऱ्याच गोष्टी लोकांना आवडत नाहीत म्हणून मी समारंभात शक्य तो जात नाही आणि गेलोच तर आत यजमानाने पाहिलं की आलाय मग मागे फिरतो. बाहेर वडापाव खाऊन घरी जातो.
>> अतुल, पैसे आत मोजून
>> अतुल, पैसे आत मोजून घेतलेले चांगले नाही का? एटीएमात म्हणे कॅमेरा असतो. कमी-जास्त पैसे आले आणि तिथे मोजले तर कॅमेर्यातला पुरावा बँका बघतात, असे एक ज्ञान व्हॉट्सॅप किंवा त्याआधीच्या सोशलमिडिया-पिढीकडून वाचलेले आहे. खरे आहे का माहीत नाही.
नाही, हा गैरसमज पसरवला असेल कुणीतरी. नोटा कमीजास्त असतील तर पाच दिवसांच्या आत एटीएमच्या आणि नोटांच्या तपशीलासहित बँकेला कळवायचे. अशी काहीशी ती प्रोसेस आहे. पण त्यात कुठेही "कॅमेऱ्यासमोर नोटा मोजून घ्याव्यात" अशी सूचना नसते. अन्यथा एटीएम मध्येच ही सूचना त्यांनी लिहिली असती.
ओके, अतुल. फारेंड,
ओके, अतुल.
फारेंड,
आत मोजलेले चांगले यासाठी की
आत मोजलेले चांगले यासाठी की बाहेर चोर भुरटे लक्ष ठेवून असतात.
पण आपण एका बाजूला जाऊन पाठ करून पैसे मोजले, आणि दुसऱ्या पुढच्यानं atm ला रस्ता मोकळा करून देणे इतकं करता येईल.
विमान जमिनीवर उतरल्यावर
विमान जमिनीवर उतरल्यावर थांबले की लगेच लोकं उभे राहून आपापल्या बॅगा घेऊन उभे रहातात हे पाहून डोक्यात तिडीक जाते. त्यांना सांगावेसे वाटते की अजून १०-१२ मि. तरी लागतील शिडी लावायला, त्यानंतरच तुम्हाला उतरायला मिळेल. विमानातून उतरताना पुढे मागे झाले तरी विमानतळाबाहेर पडायच्या वेळेत काही फरक नाही. पण लोकांना याचे काही नसते. चुकून तिसरी सिट असली तर बाजूला उभे रहाणार्या लोकांचा त्रास होतो. एकदा आत बसलेले दोघे मला उठ म्हणत होते. मी म्हणालो की लाईन पुढे सरकायला लागली की उठेन.त्यावर ते जरा नाराज दिसले.
मी तर आजवर एटीएमचे पैसे कधीच
मी तर आजवर एटीएमचे पैसे कधीच मोजले नाहीत. ना आत ना बाहेर.... जे चुकीचे आहे.
पण गेले तीन चार वर्षे एटीएम मध्ये जायची वेळ सुद्धा आली नाही म्हणा. पासवर्ड सुद्धा विसरलो आहे. कारण सगळे छोटे मोठे पेमेंट ऑनलाईन होते.
सिनेमा पूर्ण संपायच्या आधीच
सिनेमा पूर्ण संपायच्या आधीच काही जण उठून आपल्या समोरून आडवे आडवे चालत जातात
मला शेवटपर्यंतची नामावली आणि त्यानंतर शेवटी सुद्धा कधी कधी इंटरेस्टिंग असते ते बघायचे असते. पण हे लोक बघू देतील तर!
अतुल
अतुल
याचे व्हायसे व्हर्सा सुद्धा होत असेलच
तुम्ही शेवटपर्यंत बघत बसून राहात असाल आणि तुमच्या रांगेतले ज्यांना घरी जायची घाई लागली असेल ते तुमच्या तंगड्यातून पास होताना काय हे मेले अजून बघत बसलेत म्हणून चरफडत जात असतील
ज्यांच्याकडे रजिस्टर्ड बॅगेज
ज्यांच्याकडे रजिस्टर्ड बॅगेज नाही त्यांना फायदा होतो असे आधी विमानातून उतरल्यास.
पूर्वी असे विमान थांबले की इकॉनॉमी क्लास मधून लोक पुढे बिझिनेस क्लास मध्ये जाऊन उभे राहायचे विमान पूर्ण थांबले की.
त्यावर मग अनेकांनी तक्रारी केल्या. इमेल्स मधुन सगळ्या बिझिनेस क्लास लोकांनी तक्रार करा असे कॅम्पेनही झाले. मग विमान उतरून केबिन क्रू ला उठन्याचा सिग्नल मिळाला की एक उठून लगेच पुढे येऊन बिझिनेस आणि इकॉनॉमी क्लास मधील पडदा बंद करून तिथेच उभा/भी राही. हे इसवीसन २००० आसपास झाले.
--
अजून एक गोंधळ म्हणजे एरोब्रिजला विमान लागलेय म्हणुन सगळे पुढे तोंड करून पॅसेजमध्ये उभे, पण काही कारणामुळे बराच वेळ लागतोय आणि मग मागे शिडी लागून तिकडून सुद्धा उतरणे सुरू केले. त्यात मग मागे वळून उतरण्यास कधी धक्का बुक्की सारखी परिस्थिती होतसे.
रेल्वे क्रॉसींगला सिग्नल लगला
रेल्वे क्रॉसींगला सिग्नल लगला असता, दोन्ही बाजुला दोन्ही लेन व्यापून ठेवणारे डोक्यात जातात. ह्यामुळे अधीकच ट्राफीक जाम होतो.
>>>>>>>>बऱ्याच गोष्टी लोकांना
>>>>>>>>बऱ्याच गोष्टी लोकांना आवडत नाहीत म्हणून मी समारंभात शक्य तो जात नाही
कोणत्या गोष्टी शरदजी?
आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात
आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
>>>
म्हणजे घरी असताना हाताने भात खाल्ला तर चालते का
Btw.. तुमच्या या लिस्ट वर मी असेन मग आणि I am sorry for that for causing uncomfortable situation. पुढील वेळी असे बाहेर गेलो आणि कोणी uncomfortable होतंय असे लक्षात आले तर किमान त्यांना सॉरी बोलेन.
बाकी मी घरात असो की बाहेर, पंगतीत असो की हॉटेल मध्ये हातानेच भात खातो, त्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही. आणि कुठे तरी वाचले होते/ ऐकले होते की भात हातानेच खायचा असतो. बोट, दात आणि ओठ यांचा स्पर्श झाला की शरीरात कुठले तरी विशिष्ट द्रव निर्माण होते आणि जेवण पचायला सोपे होते.
बाकी काट्या/चमच्याने पिझ्झा, मसाला डोसा किंवा उत्तपा खाणारे लोक आवडत नाहीत. पानात हात धूनारे, चुळ भरणारे लोक आवडत नाहीत. प्रोफेशनल लाईफ मध्ये टीम्स मीटिंग मध्ये न विचारता रेकॉर्डिंगचे बटन दाबनारे आवडत नाहीत. ऑफिसमध्ये फोनवर मोठ्याने बोलणारे आवडत नाहीत. ते असे का वागतात त्याची त्यांची काही कारणे असतील, त्यामुळे मी बरोबर ते चूक असे काहीच नाही, फक्त मला थोडे uncomfortable होते.
शिवाय भारतीय लोकांची अ ति श य
शिवाय भारतीय लोकांची अ ति श य वाईट सवय म्हणजे रांगेत चिकटून उभे राहणे. जसं काय दोन-पाच इंचाची गॅप दिसली तर दुसरं कोणी येऊन मधेच घुसेल. पर्सनल स्पेस कशाशी खातात याची कल्पनाच नसते.>>>>>>>>>>>>
सोशल डिस्टंन्सिंग
टिळक स्मारकला वसंत व्याखानमालेला गेलो होतो. व्याखान आमच्या मित्राचच. सुरवातीला मी, व्याखाते व आमची एक मैत्रिण असे अनौपचारिक गप्पा संयोजकांशी झाल्या. ऑडिटोरियम मधे गर्दी भरपूर झाली होती. सुरवातीच्या रांगा राखीव होत्या. मैत्रिण तिथे पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवून बसली मी तिथे शेजारी बसावे अशा सहजप्रवृत्तीने गेलो. तिने नाईलाजाने पर्स मांडीवर घेतली असावी.( हा आपला अंदाज) काही काळा नंतर तिचे बहुतेक लक्ष लागेना. मग तिने माझ्या उजव्या बाजूला पर्स ठेवून पर्सच्या शेजारी बसली. मगच तिचे लक्ष व्याखानात लागले. मी मनातल्या मनात हसलो. कारण मला एक किस्सा आठवला होता. मराठी विज्ञान परिषदेत एक व्याखान होते. त्याचा विषय होता शरीरातील जीवजंतू व आपण- डॊ. अपुर्वा बर्वे यांचे व्याखान होते. त्यांनी तो किस्सा सांगितला होता. त्या परदेशात गेल्या होत्या.एका एअर पोर्टवर त्या लाईनीत एका माणसाच्या मागे उभ्या होत्या. समोरचा मनुष्य फार अवस्थ वाटत होता. म्याडमला काही कारण कळेना. शेवटी त्या माणसाने नम्रपणे सांगितले madam you are consuming my space.मग त्यांच्या लक्षात आले कि त्या भारतीय सवयीनुसार कमीत कमी अंतर ठेवुन त्या माणसाच्या मागे उभ्या होत्या.सुरक्षित अंतर हे केवळ सुरक्षिततेसाठी नसत तर ते मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील असत. करोना निमित्त असलेल्या सोशल डिस्टन्सिंग निमित्त आठवल एवढच. त्याला लगेच मी सामाजिक दुरावा असे म्हणणार नाही.
सभागृहात कार्यक्रम चालू
सभागृहात कार्यक्रम चालू असताना ज्यांचा मोबाईल वाजतो याबद्दल अपराधगंड न बाळगता मोठ्याने मोबाईलवर बोलणारी माणसे डोक्यात जातात. मी अनुभवलेले काही नमुना प्रसंग-
प्रसंग १- सामाजिक विषयावर चाललेल्या सभागृहात एका ज्येष्ठ बाईंचा मोबाईल बोंबलु लागला.वक्त्यासकट सगळ्यांचे चेहरे त्रासिक झाले. ती बाई जणु काही आपला वाजतच नाही असे भाव. सगळ्याचे लक्ष आवाजाच्या दिशेने गेल्यावर पर्स मधे हात घातला व बंद करण्या साठी कुठली तरी बटने दाबली. आवाज बंद झाला. थोड्या वेळाने परत तेच. नंतर लोकांच्या कपाळाच्या आठया पाहुन ती गोंधळून गेली तिला काय करावे समजेना. मी तिचा मोबाईल घेउन बंद केला. तिला बंद कसा करायचा हे माहित नव्हते. तिच्या वेषभुषा व केशभुषा यावरुन मला तसे वाटले नव्हते.
प्रसंग २- स्थळ तसेच. परंतु एक ज्येष्ठ नागरिक
प्रसंग 3 टिळक स्मारक वसंत व्याखान माला. एक मध्यमवयीन बाई असेच भान हरपून बोलत होती.
प्रसंग 4 मराठा चेंबर्स चे सभागृह ब्याख्यात्या बेळगावच्या मानसतज्ञ होत्या. विषय रंगात आला. मोबाईल बोंबलला. बाईंनी थांबून मोबाईल बंद करण्याविषयी सूचना दिल्या. प्रेक्षकांना अवधी दिला व परत चालू केले. थोड्या वेळाने परत बोंबलला. बाई हताश झाल्या. मी पुण्याविषयी हेच इंप्रेशन घेउन बेळगावला जाउ का? असा प्रश्न विचारला. प्रेक्षकातल्या एकाने तो श्रोता नंतर आला. त्याला माहित नव्हते असे सांगून वेळ मारुन नेली.
हाताने कोणीही भात/भुरकून आमटी
हाताने कोणीही भात/भुरकून आमटी/भाजी खाल्ली तर मला चालते, दे आर एन्जॉयईंग. पण स्वतःला काहीही वास येणारा द्रव(आमट्या/भाजी/पंजाबी ग्रेव्ही/लसूण वाले दाल तडका) चा स्पर्श थेट बोटांना आवडत नाही.नंतर बोटांचा वास पटकन जात नाही बराच वेळ हात धुवून.चमच्याने खाते वरण भात.भाजी पोळी खाल्ली तर बोटं आणि पातळ भाजी यांच्या मध्ये भरपूर पोळी येईल किंवा थेट बाउल मध्ये पोळीचे तुकडे आणि भाजी मिक्स करून चमच्याने खाते.हे फार विअर्ड आहे याची कल्पना आहे.
बहुतेक वेळा चमचा दिलेला असतोच.पण अगदी गावाकडे पंगती असल्या तरी पंचाईत होते.चमचा द्या म्हटल्यावर लोक 'हे कोण स्नॉब आलंय' म्हणून नाकं मुरडतात.
अर्थात वेळ प्रसंगी हाताने वरण भात खाऊ शकते.पण इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो.
जास्त भाजी/आमटी/मिसळ कट खाल्ला जातो आपोआप, म्हणून माझ्या बरोबरचे काही लोक मिसळ कट मध्ये पाव तुकडे घालून चमच्याने खायला शिकले आहेत
चेन्नैला दोश्यावर साम्बार
चेन्नैला दोश्यावर साम्बार ओतुन भातासारखा कालवून भुरकून खाताना पाहुन नजर मेली आहे अशा प्रकारा बाबतीत.
मी चीन मध्ये भाताचे प्रकार, भात-भाजी चॉप स्टिकने खातो आणि इकडे दक्षिणेत खास दक्षिणी जेवण करताना हाताने भुरकूनही.
Pages