पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारणपणे डायरेक्ट कॉल सिनिअर आपल्या ज्युनियरना लावतात. आणि ज्युनियर मात्र तशी गुस्ताखी करत नाहीत.
त्यामुळे बरोबरीच्या कलीगने किंवा दुसऱ्या डिपार्टमेंट मधील कोणी लावला की आपल्याला ते रुचत नाही. आणि ज्युनियरनेच लावला तर अरे हा आपल्याला इज्जत देतो की नाही म्हणत आपला इगो हर्ट होतो.

न विचारता टीम्सवर किंवा फोनवर कॉल करणे यात काय चूक आहे - जर ते कॉमन वर्क अवर्स मधे असेल तर? असा कॉल केल्यावर आधी "तू आत्ता बोलू शकतोस/शकतेस का" विचारणे ही कॉमन कर्टसी आहे. ती दाखवावी, इतकेच. अमेरिकन बॉस हमखास विचारतो. उलट जितका सिनीयर असेल तितका आवर्जून विचारतो. अमेरिकेच्या वाईट सवयी लागलेले देसीही विचारतात Happy

अमित - प्रॉब्लेम सुट्टी घेण्याचा नसावा. ती अचानक घेण्याचा दिसतोय. आता इमर्जन्सी खरीच असेल तर गोष्ट वेगळी. बाय द वे पाश्चात्य देशांत डिसेंबर एण्ड म्हणजे जितके शट डाउन असते तितके भारतात नसते. आजकाल तर १ जानेला अनेकांना सुट्टी नसते.

फा +१

अमित, तू काय म्हणतो आहेस ते कळतंय आणि पटतंय पण साधा नियम हा आहे की तुम्ही सुट्टी घेणार असाल तर दोन आठवडा आधी घ्या. जी घेताना तुमचं त्या वेळेचं काम आणि बॅक अप कोण आहे ते सांगुन जा. पण....! असो!
बाकी २ जानेवारीला येतो सांगुन ४ जानेवारीला येण्ं अजिबातच बरोबर नाही. टिम लिडर किंवा मॅनेजर ने काय करायचं अशा वेळेला? आणि भारतात सगळ्या महिन्यात सगळे रिसोर्स वापरले जातील एवढं काम असतंच नाही तर त्या महिन्यापुर्ता रॅम्प डाऊन करतात.
टिम्स वर फोन करण्याआधी विचारण्याची कर्टसी असण्याचं आणखी एक कारण म्हणजे बरेच लोकं व्हिडिआय वर काम करतात. क्लाईंट सोबत मिटिंग मधे असतील तर ते बाहेर कंपनीच्या टिम्सवर दिसत नाही आणि वाईस वर्सा. शिवाय ऑफिसची वेळ असेल तरी ती एखाद्याच्या लंचची वेळही असु शकते. एखाद्याचा व्हेरी व्हेरी लाँग कॉल जस्ट आत्ताच संपलेला असु शकतो ज्यातुन त्याला काही मिनिटचा मेंटल ब्रेक हवा असतो, एखादा खुप क्लिष्ट कोड लिहित असतो आणि आता तो सोल्व्हच होणार असतो तर त्याला ते १० मिनिटचं डिस्टॅक्षन नको असु शकतं.
माझा मॅनेजर तर टिम्सवर इन मिटिंग स्टेटस बघुन पण कॉल करतो कारण त्याच्यामते काही लोकं खोटं कॅलेंडर ब्लॉक करतात. हे ही खरच आहे. पण मग कधी कधी खरी खरी मिटिंग सुरु असते आणि हा एका मागे एक कॉल करत असतो. मग तिकडे नाही उचलला की फोनवर कॉल येतो. तिकडे नाही उचलला की वॉट्साप वर कॉल येतो आणि हे चुक असो वा बरोबर, हे भारतात सगळीकडे होतं.
या धाग्यावर प्रचंड अवांतर आहे पण इतके किस्से आहेत लिहायला अशा नगांचे माझ्याकडे की काय सांगु.

सांगून जावं, वेळेवर यावं, काय करतोय ते डॉक्युमेंट करावं, confluence अपडेट ठेवावं, हे सगळं बरोबरच आहे. उद्या कस्टमर ने डॉक्युमेंटेशन वाचावे म्हणालात तरी त्यात काही चूक नाहीच. युनिट टेस्ट कराव्या, पुश केलेला कोड किमान कंपाईल व्हावा, ऑटोमेशन केसेस लिहिल्या शिवाय कोड पुश करू नये... कधी न संपणारी हनुमानाची शेपटी आहे. पण .. पण... या जगात यातलं काहीही होत नाही. मला कोणी मी परफेक्शनिस्ट आहे सांगितलं तर त्याला नमस्कार करून आपलं या मर्त्य जगात काय काम? इथे निगरगट्ट प्रोकॅस्टनेटर्स... चालढकल सम्राट रहातात, गळ्यापर्यंत आलं की स्टेरॉईड्सवर काम करतात. त्याच्याशी कसं जुळवाल! असं वाटतं.
थोडेफार इरीटेशन आले तर ठीक आहे. पण हे रोज मरे असतं, याचा पेट पीव्ह झाला तर रोजची झोप जाईल! Happy

अमिताभ बच्चन म्हणे व्हॉटसॲपवर मेसेज केला तर फोन करून सांगतात की मी तुम्हाला मेसेज केला आहे म्हणून. हा प्रकार रिसिव्ह करणाऱ्या लोकांना पेट पिव्हळं झालं असावं.

यातले कित्येक pet peeve वाचुन 'अगदी अगदी ' किंवा ' हो खरं आहे ' अशी भावना झाली आणि कळलं की आपल्याला (म्हणजे मला) केवढे hang ups आहेत. मीच लोकांच्या डोक्यात जात असणार. माझी list endless आहे, त्यातील काही -
1 सकाळी रस्त्यावर पेट्स ना फिरविणारे लोक, जे dog poop साफ न करता तोंड वर करून निघून जातात
2 रस्त्यावर थुंकणारे लोक.... Esp भारतात रिक्षा स्टँडच्या बाजुने तुम्ही चालुच शकत नाही
3 माझा अती सभ्य नवरा माझ्यासाठी दरवाजा धरून उभा राहतो. मॉल्स, थिएटर्स सारख्या सार्वजनिक ठिकाणी मागून येणारे लोक धडाधड आत येत राहतात. साहजिकच तो दरवाजा सोडू शकत नाही. क्वचित अपवादात्मकही कोणी सभ्य व्यक्ती भेटली नाही. आश्चर्य म्हणजे यात टिनएजर्स आणि तरुणांचांही अपवाद नाही. आता मी पेपर नॅपकिन खिशात बाळगते आणि स्वतःसाठी स्वतः दरवाजा उघडते ( मला सार्वजानिक ठिकाणीं दाराला हात लावायला आवडत नाही. )
4. प्रचंड मोठं पेट पिव्ह - माझ्या अन्नाला कोणी हात लावला तर आवडत नाही. पेढा देता तर बॉक्स समोर करा ना, हातात घेऊन का देता? जिथे gloves घालत नाही आणि direct अन्नाला हात लावलेला दिसतो, तिथे मी जेवू/खावू शकत नाही. ( हॉटेल्स मधे जेवते, जिथे डोळ्यासमोर गोष्टी घडत नाहीत)

@मीरा तुमचा १ नंबर व ४ नंबर पेट पीव्हला मम!
माझा टॉवेल, चादर पण इतर कोणीच वापरलेली नाही चालत.
बाकी माझी लिस्ट म्हणजे
* चपला घालून घरात येणारे
* बाहेरून आल्यावर हात पाय न धुता कपडे न बदलता तसेच खाणे / जेवणे.
*किचन बेसीन मध्ये चूळ भरणे, थुंकणे
* वापरलेले कपडे धुतलेले कपड्यांत ठेवणे.
* नळ अर्धवट चालू ठेवून पाणी वाया घालवणारे.

ग्लोव्हज घातले की उत्तम सुरक्षा मिळते.
ग्लोव्हज वापरणे हे स्वच्छतेचे परिमाणं आहे .

हे मला तरी बिलकुल पटत नाही .
किती ही विचार केला तरी पटत नाही.
१) ग्लोव्हज हे रबर पासून बनलेले असतात त्या मध्ये किती तरी क्वालिटी आहेत.
. एकदम चीप तर फालतू प्लास्टिक पासून बनलेले असतात.

त्याची जेव्हा निर्मिती होते तेव्हा किती तरी रासायनिक प्रक्रिया मधून ते गेलेले असतात.
फॅक्टरी पासुन ग्राहक पर्यंत पोचे पर्यंत अनंत हातातून ते गेलेले असतात.

२).ग्लोव्हज घातलेला हात व्यक्ती सर्व ठिकाणी लावतो .ते काही स्वच्छ राहत नाहीत.
एकदाच , एकाच कामासाठी ग्लोव्हज वापरून ते फेकून दिले तर च ग्लोव्हज चा हेतू साध्य होतो अन्यथा बिलकुल नाही.
३) न स्वच्छ केलेली भाजी,फळ ((पाण्याने न धुता वापरलेली )त्या फळ आणि भाज्या न वर अनेक chemical असतात, धूळ असते ..तीच स्थिती ग्लोव्हज ची पण असते.
४) naked हात स्वच्छ साबणाने धुवून घेतले तर ते gloves पेक्षा एक लाख पट .
निर्जंतुक आणि स्वच्छ असतात.
मानवी त्वचा ही जीवंत आहे अँटी bacteria किंवा ह्या पेक्षा खूप जास्त गुण मानवी त्वचेत असतात.
ग्लोव्हज मानवी त्वचे शी कधीच बरोबरी करू शकत नाहीत.

फक्त त्या व्यक्ती ला त्वचा रोग नसावा.

अमेरिकन स्टाईल संडास .
सर्वात जास्त unhealthy .
एकच व्यक्ती वापरत असेल तर ठीक पण कुटुंबात पण एकच संडास वापरत असाल तर खूप धोकादायक.

सार्वजनिक संडास तर अती धोकादायक.

सरळ स्किन to स्किन कॉन्टॅक्ट झालेला असतो.
पाण्याने जंतू मरत नाहीत.
चकाचक दिसते म्हणजे स्वच्छ आहे ही धारणाच साफ चूक आहे.
त्या पेक्षा इंडियन टॉयलेट उत्तम स्किन to skin contacts होत नाही

मला खालील गोष्टी अजिबात आवडत नाहीत.
१. ताटात अन्न टाकणारे लोक.
२ खाताना दात चमचा आणि प्लेट चा आवाज करणारे, माचकमचक खाणारे.
३. माझ्या घरी आल्यावर पाय न धुता फ्रिजात हात घालणारे, किंवा गादीवर पाय वर घेऊन बसणारे.
४. थिएटर मध्ये फोन लाऊड ठेवणारे (खास करून नाटकाच्या वेळेला)
५ आपण जेवत असताना स्वतःचं जेवण आधी झालं तरी बेसिन वर जाऊन खाकरून चुळा भरणारे.
६ स्वतःची बढाई करणारे.
७ ज्यांना दोन दोन वेळेला एकच गोष्ट सांगावी लागते ते पण आवडत नाहीत.
८ रस्त्यात पचापच थुंकणारे
९ वाहतुकीचे नियम मोडणारे/कट मारत गाडी चालवणारे/ कर्णकर्कश्श हॉर्न्स वाजवून घाबरावणारे.

काही लोक आपल्या सोबत मुल असेल तर बघून किती बारीक Sad किंवा किती जाड अशी कॉमेंट करून आपले पालकत्व जज करतात, लक्ष कुठाय तुझं काय हे लेकरू तुझं? तू बरी सुटलीस आणि अशा अर्थाने Angry

* स्वतः दिलेली वेळ आजिबात न पाळणारे लोक. बस, रेल्वे, विमानं कशी पकडत असतील वेळेत? असल्या लोकांमुळे वेळेवर येणारे मुर्ख ठरतात.
* आपण सहज काही शेअर केले तरी धडाधड सल्ले देत सुटणारे डोक्यात जातात.
* ईमेल पाठवल्यावर तो वाचून त्यावर आपण काही अ‍ॅक्शन करू या आधिच तो पाठवल्या पाठवल्या टिम्स वर पिंग आणि थेट मोबाईलवर कॉल
करणारी जमात.
* आपल्या वतीने तिसर्‍याला परस्पर काहितरी कमिट करणारे लोक. उदा. मी कोणाला तरी पिकनिक ला येते का विचारणे आणि तिने परस्पर
अजुन तिसर्‍याला विचारणे येतेस का? मला चालणार आहे/नाही वगैरे असले प्रश्न पडत नसावेत अशा लोकांना.
* बायका बरोबर असल्यावर पुढे पुढे होऊन खर्च करणारे पुरुष आणि हेच जर ग्रुपमध्ये एखादा जरी पुरुष असेल तर खिशात हात घालत नाहीत
हे डोक्यात जाते.

* आपल्याला न आवडलेली गिफ्ट्स घरी ठेवणे आणि दुसर्‍या कोणाला तरी खपवणे. हे तरी ठिक म्हणते मी, पण एका पुरुषाला एका मैत्रिणीने चुकून वुमेन'स पर्फ्युम देऊ करताना तिच्या लक्षात आले, तर ती म्हटली मी हे परत नेते आणि दुसरे पाठवते. तर ह्याने ते आग्रहाने घेतले, जपून ठेवले आणि तिसर्‍याच मैत्रिणीला पास ऑन केले.

* दारू पार्टित जितकी उरली असेल (वेगवेगळ्या बॉटल्स मध्ये अगदी थोडी थोडी उरली असेल तर) त्या सर्व बाटल्या गोळा करून घरी घेऊन जाणारे. चकण्याचे पण सेम. जे उरेल पार्टीत ते घरी ....

छत्री टोचणार्‍या आजी आणि कुलकर्णींचे थोडी तंबाखू किंवा विड्या ओढून जा, सुनेने मोठ्या हौसेने वळले आहेत ...
या कमेंट्स वाचून भयंकर हासले.

>>>>>>आपल्याला न आवडलेली गिफ्ट्स घरी ठेवणे आणि दुसर्‍या कोणाला तरी खपवणे.
किंचित हा प्रकार मी केलेला आहे. जी ए मला झेपत नाहीत. मी जी एंची पुस्तके मैत्रिणींना यु एस ए त दिलेली आहेत. एकाचे विष ते दुसर्‍याचे अन्न या नात्याने, मला ते योग्य वाटलेले होते. मराठी पुस्तके माझ्याकडे फारशी नाहीत कारण आतापर्यंत मी १-२ वेळाच भारतात गेलेले आहे. मला मराठी पुस्तकांचे अप्रुप आहे. पण अर्थात जी ए झेपत नाहीत त्यांचे एक अद्भुत रसाचे एक पुस्तक आहे नाव आठवत नाही - कांचनमॄग, स्वामी कथा आहेत मला वाटतं त्याच्यात. ते पुस्तक आवडते. काजळमायामधली 'सरडा' एक सुंदर कथा आहे. तेव्हा काही कथा आवडतात काही झेपत नाहीत.
अर्थात आवडणारी कवितांची पुस्तकेही भेट दिलेली आहेत. तेव्हा तो कद्रूपणा नसून, सहसा मराठी मंडळात जी ए आवडतात तेव्हा पुस्तके पास ऑन होतील हा विचार होता. पण इतकी विषण्ण करणारी पुस्तके भेट म्हणुन देता कामा नये असे हाईंडसाईट मत आहे. नंतर वाटले होते - खरच नीटपणे एखादा बॉडी स्प्रे, ईयररिंग, सुंदर साबणाचा सेट, द्यायला हवा होता. यापुढे वानवळा म्हणुन तसेच देत जाइन.

आपल्याला न आवडलेली गिफ्ट्स घरी ठेवणे आणि दुसर्‍या कोणाला तरी खपवणे>>>> ह्यात काय वाईट आहे? एखाद्या गोष्टीचा सदुपयोग होत असेल तर.. आय मीन डोक्यात जाण्या सारखे काय आहे?

'थँक्स' लिहिल्यावर कोणी 'NP' (No problem) लिहिलं की जाऊन त्याचे/तिचे दात पाडावेसे वाटतात. नो प्रॉब्लेम काय?एखाद्याने थॅंक्यु म्हणण्यात किंवा न म्हणण्यात तुला प्रॉब्लेम का असायला हवा?तो नाहीये हे आवर्जून सांगावंसं का वाटावं?पुढच्या वेळी थॅंक्यु ऐवजी तुला एखादी शिवी देऊन प्रॉब्लेम आहे का टेस्ट करावी का? असे अनेक प्रश्न डोक्यात येतात.(स्वगत: हिलींग मेडिटेशन...हिलींग मेडिटेशन.)
जनरल पब्लिक ला एखादी गोष्ट समोरच्याने आऊट ऑफ द वे केली तर थॅंक्यु म्हणण्याची, आणि थॅंक्यु रिसिव्ह करण्याची दोन्ही ची अक्कल नसते.

म्हणुन जर्मन बरं.
अ: डांकं
बः बिटं
अ: डांक.
किंवा
अ: डांकं श्योन.
बः बिटं श्योन.
अ: डांकं.

Danke: =Thank you.
Bitte = Please (आणि यू आर वेलकम सारखा प्रतिसाद सुद्धा). तो दिल्या बद्दल परत डांकं. मग बिटं म्हणणारा सोपस्कार थांबवुन साखळी तोडतो.

aashu29 >> आपल्याला न आवडलेली गिफ्ट्स घरी ठेवणे आणि दुसर्‍या कोणाला तरी खपवणे. हे तरी ठिक म्हणते मी, पण एका पुरुषाला एका मैत्रिणीने चुकून वुमेन'स पर्फ्युम देऊ करताना तिच्या लक्षात आले, तर ती म्हटली मी हे परत नेते आणि दुसरे पाठवते. तर ह्याने ते आग्रहाने घेतले, जपून ठेवले आणि तिसर्‍याच मैत्रिणीला पास ऑन केले.

>>'थँक्स' लिहिल्यावर कोणी 'NP' (No problem)

थँक्स ला प्रतिसाद कसा द्यावा हे न कळल्याने NP म्हणतात बरेच लोक. But they don't mean it literally "NP"
पूर्वी:
"तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही"
आजकाल:
"तुमच्या आभाराचे आभार कसे मानावेत हेच कळत नाही"
Lol

नो मेंशन - मेंशन नॉट
हे लहानपणी म्हटले जायचे, तर आता म्हणत नाही का? गेली का ती स्टाईल?

मी बरेचदा थँक्यूला येस थँक्यू असे बोलतो असे आता माझ्या लक्षात आले आहे.
बरेचदा हे तेव्हा घडते जेव्हा डिस्कशन दोघांच्या फायद्याचे असते, आणि दोघांची एकमेकांना थोडीफार मदत झाली असते. निदान मला तरी तसी वाटते.

तसेच मला कोणी शुभेच्छा दिल्या की सेम टू यू म्हणायचे रुचत नाही.
कोणी हॅपी न्यू ईयर केले की आपणही हॅपी न्यू ईयर करावे.. हॅपी दिवाली म्हटले की आपणही दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्यात.. तर ते मनापासून आहे असे वाटते..
हॅव ए नाईस विकेंड किंवा हॅव अ ग्रेट डे म्हटले तर मात्र सेम टू यू ठिक वाटते.. कारण ते गूडबाय सारखे डिस्कशन क्लोज करायला असते.

पण हे काही पेट पीव्हज नाहीयेत... कोणाच्या नसाव्यात..
फार क्षुल्लक आहे हे थँक्यू सॉरी शुभेच्छा रिप्लाय वगैरे... बोलू द्यावे च्यायला ज्याला जे बोलायचे आहे ते.. भावना बघाव्यात.

या सॉरी थँक्यू मॅनर्स एटीकेट्सवरून आठ्वले,
याचा लहान मुलांबाबत अतिरेक करणे मला फार पटत नाही.
त्यावर मायबोलीवर धागा सुद्धा होता..
आजकालच्या मुलांना मॅनर्सचा ओवरडोस पाजला जातोय का? - https://www.maayboli.com/node/64930

Pages