लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
हे अख्खे मायक्रोसॉफ्ट पिव्ह
हे अख्खे मायक्रोसॉफ्ट पिव्ह झाले आहे आजकाल. यांचे सगळेच प्रोडक्टस डोक्यात जाताहेत
राग आलाय काय करू तेच कळत नव्हते तेवढ्यात हा धागा आठवला.
मस्त धागा आहे! आज वाचला. माझा
मस्त धागा आहे! आज वाचला. माझा पेट पीव्ह अजून तरी दिसला नाही. मायक्रोवेव्हचे हिटींग मध्यात थांबवून पदार्थ बाहेर काढून टायमर शून्यावर रिसेट न करणे मला आजिबातच आवडत नाही! त्यावर 41, 16 सेकंद असे रँडम आकडे ठेवून लोक कसे निघून जातात हे मला कळत नाही!
एअरपोर्टवर तर हमखास नाईट
एअरपोर्टवर तर हमखास नाईट ड्रेस आणि थ्रो (शालीसारखं फ्लीसचे पांघरुण) घेउन लोक असतात. हमखास!! कमीत कमी २.
कोणत्या ठिकाणी कोणता पोशाख
कोणत्या ठिकाणी कोणता पोशाख केला पाहिजे.
कोणत्या हवामानात कोणता पोशाख केला पाहिजे .
ह्याची माहिती नसणे ,आणि कोणत्या तरी विचित्र विश्वात रममाण होणारी लोक च असे विचित्र वागतात
आताच होवून गेलेल्या राम मंदिर
आताच होवून गेलेल्या राम मंदिर सोहळ्यात सर्व अती श्रीमंत स्त्री पुरुषांनी कार्यक्रमास सुसंगत पोशाख केला होता.
बघून खरेच अभिमान वाटत होता.
तो निर्णय त्या अती श्रीमंत लोकांनी स्वतः घेतला होता की दबावात घेतला होता .
हा फक्त प्रश्न मनात आला
>>बायकांचा ग्रुप वेगळा व
>>बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा>>
असं करण्याला कारणं आहेत.
एक तर बायकांचे जोक्स वेगळे असतात.
दुसरे म्हणजे त्यांचे नवरे विदुशी बायांशी गप्पा मारत वाहवत जातात आणि आपल्या बायकोला विसरतात. संरक्षणात्मक संरचना आहे ती.
शनिवारी, अमावास्येला
शनिवारी, अमावास्येला चौकाचौकांत किंवा वाहनाने दूरच्या प्रवासाला निघताना नारळ फोडून टाकतात. ते खोबरं कुणी खात नाहीत. उंदिरही खात नाहीत. तरी रस्त्यावर पडून राहतात वाट्या. मिरच्या लिंबूचा हारही टाकतात रस्त्यावर. म्हणजे त्यास तुडवल्यावर यांचे भाग्य फळफळते म्हणे.
>>>>विदुशी बायांशी गप्पा मारत
>>>>विदुशी बायांशी गप्पा मारत वाहवत जातात
सुंदर बायकांची अज्जिबात भिती वाटत नाही पण विदुषी स्त्रिया फार आकर्षक असतात. आत्मविश्वास, सेन्स ऑफ ह्युमर, चालू घडामोडी, व्यासंग - त्यांची भिती वाटते 
अंधविश्वासच म्हणा.
हाहाहा शक्य आहे
म्हणजे नवरा वहावत जाइल याची नव्हे तर इन जनरलच. न्यूनगंड!
-----------
>>>>तुडवल्यावर यांचे भाग्य फळफळते म्हणे.
मी तर वाचलेले की ते ओलांडले की आपल्याकडे ती समस्या येते
ते खोबरं कुणी खात नाहीत >>>
ते खोबरं कुणी खात नाहीत >>> मुंबईत असे नारळ, अंगावर उतरून टाकलेले नारळ वगैरे खाद्यपदार्थांचे फिरते विक्रेते (स्वस्तात इडली डोसा वगैरे विकणारे) गोळा करून चटणीसाठी वापरतात. एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलचे चालक डॉक्टर यांनी लिहिलेला हा किस्सा कुठेतरी वाचला होता.
पुण्यात पाहिले आहे
पुण्यात पाहिले आहे
नदीत टाकलेले नारळ काढणारी team आहे ते पुन्हा विक्रीसाठी येतात.
फुलं सुद्धा.. same
कुठे विचारू नका नाही सांगणार इथे.
अंगावर उतरून टाकलेले नारळ >>
अंगावर उतरून टाकलेले नारळ >> हा काय प्रकार असतो?
अंगावर उतरून टाकलेले नारळ >>
अंगावर उतरून टाकलेले नारळ >> हा काय प्रकार असतो? >>>>
दृष्ट काढण्यासाठी वापरलेले नारळ. यासाठी मीठ-मोहऱ्या, लिंबं, नारळ, दही-भात (व गावाकडे कोंबडं) वगैरे पदार्थ वापरतात असे ऐकले आहे.
बाप रे एकदा एका कॅसेट्मध्ये
बाप रे एकदा एका कॅसेट्मध्ये लिंबू मारला गाणे ऐकलेले होते. कै च्या कै अघोरी मानसिकता.
अच्छा, धन्यवाद.
अच्छा, धन्यवाद.
तर ती मंडळी अन्न वाया नाही
तर ती मंडळी अन्न वाया नाही जाऊ देत असे दिसते.
असे उतरवले अन्न खाणारी
असे उतरवले अन्न खाणारी पचवणारी काही लोकं असतात हे माहीत आहे. तरीही असे नारळ बाद करण्यापेक्षा इतर उपाय काढावेत. बसमधल्या सर्वांना एकेक शहाळं पाजून गार करता येईल.
________________
काहींचे शर्ट मानेच्या बाजूला कॉलरखाली उंचावलेले दिसतात. कुठल्या खिळ्याला किंवा खुंटीला टांगतात दुसरे दिवशी पुन्हा घालण्यासाठी त्याप्रमाणे उंचवटा दिसतो. ते विचित्र वाटते. काही जण कॉलरला आतून रुमाल लावतात. मळू नये म्हणून. बुजगावणे दिसतं.
कृपया मला आग्रह करु नका असे
कृपया मला आग्रह करु नका असे सांगून ही जेवताना मला आग्रह करणारे लोक डोक्यात जातात
असे उतरवले अन्न खाणारी
असे उतरवले अन्न खाणारी पचवणारी काही लोकं असतात>>> म्हणजे त्यात अजून काही मिसळलं असतं, अथवा नासलेलाच नारळ असतो वगैरे म्हणुन खाऊ शकत नाही की तसं काही नाही पण अशा साठी वापरलेले अन्न खाल्ले की काही वंगाळ होते अशी वदन्ता आहे म्हणुन म्हणताय?
नारळ फोडल्यावर त्याचं
नारळ फोडल्यावर त्याचं शहाळ्यात रुपांतर होताना बघत असतानाच एकीकडे बस शोधत फिरणे हा बायकी जोक आहे का पुर्षी?
चोकात नारळ फोडणे ,लिंबू टाकने
चोकात नारळ फोडणे ,लिंबू टाकने,देवाच्या नावखाली कोंबडे, बकरे कापणे,गाडी किंवा घराला लिंबू मिरची बांधणे, दसरा दिवाळी ला फुलांचे हार लावणे .
ही सर्व अंध श्रद्धा असली तरी विरोध करण्याची काही गरज नाही.
ह्या निमित्ताने ह्या वस्तू न चा खप वाढतो.
लोकांना रोजगार मिळतो.
काही जण कॉलरला आतून रुमाल
काही जण कॉलरला आतून रुमाल लावतात. मळू नये म्हणून. बुजगावणे दिसतं.
>>> ही एक परिस्थितीवश केलेली ऍडजस्टमेन्ट असते. अजूनही शारीरिक कष्ट करावे लागणाऱ्या क्षेत्रांत, जास्त प्रवास करावे लागणारे लोक, ड्रायव्हर वगैरेची नोकरी करणारे लोक (प्रदुषणामुळे) हे करतात. सुस्थित वर्गात फारच कमी आढळते आता.
सुंदर बायकांची अज्जिबात भिती
सुंदर बायकांची अज्जिबात भिती वाटत नाही पण विदुषी स्त्रिया फार आकर्षक असतात >>> हे दोन्ही mutually exclusive सेट्स नाहीत
दुसरे म्हणजे त्यांनी "विदुशी" लिहीले आहे. त्यात नक्की टायपो कोणता आहे माहीत नाही. त्यांना "विदुषी" म्हणायचे आहे की "विदेशी" यावरून पुढच्या फाको ठरवता येतील
धिस हियर इज सन अँड धिस हियर इज किंग जयद्रथा >>>
गाऊन बघून खरोखरच ऐतेन. >>> वावे, गाउन वरच्या विनोदाला इथे खूप वाव आहे
गाणे, बघणे आणि ऐकणे अशा तीन क्रिया आहेत यात 
>>>>>> हे दोन्ही mutually
>>>>>> हे दोन्ही mutually exclusive सेट्स नाहीत Wink
हाहाहा करेक्ट!!!
>>>>त्यांना "विदुषी" म्हणायचे आहे की "विदेशी" यावरून पुढच्या फाको ठरवता येतील Happy
अर्र!! खरच.
हा धागा आता विविध धारांनी
हा धागा आता विविध धारांनी जोरात वाहू लागला आहे

नारळ फोडल्यावर त्याचं शहाळ्यात रुपांतर होताना बघत असतानाच एकीकडे बस शोधत फिरणे
सुंदर, विदुषी, विदुशी, विदेशी हे सगळंच
ह्या निमित्ताने ह्या वस्तू न चा खप वाढतो.
लोकांना रोजगार मिळतो.
(पुणेकर व्हायचं असल्यास) रस्त्याच्या मधोमध सायकली उभ्या करून गप्पा मारत उभं राहता आलं पाहिजे. यातूनच पोलिसांना वाहतूक नियंत्रणाचं शिक्षण मिळतं असं पुलं म्हणून गेले आहेत, हे इथे आठवलं.
धाग्याची वाट लावू नका लोकहो!
धाग्याची वाट लावू नका लोकहो!
आत्ताच एका नवीन पेटीक पिव्ह अनलॉक झालंय.
व्हॉट्सअप वर अनोळखी नंबर ने व्हिडिओ कॉल/ कॉल करणे. कोणी तरी महाभाग आपल्याला न विचारता आपला नंबर कोणाला तरी देतो आणि तो मनुष्य मेसेज वगैरे न टाकता डायरेक्ट फोन काय करतो. बरं आपण कट केला तरी हे करत राहतात फोन. मग आपण मेसेज टाकतो कोण म्हणून तरी उत्तर न देता फोन करत राहतात.
काय इरीटेटिंग आहे.
नारळ फोडल्यावर त्याचं
नारळ फोडल्यावर त्याचं शहाळ्यात रुपांतर होताना बघत असतानाच एकीकडे बस शोधत फिरणे >>>
दक्षिणा - चपलांबद्दल १००% सहमत. देशातील आणि परदेशातील भारतीयांना कोठेही चपला नीट कशा काढून ठेवायच्या याचे ज्ञान नागरिकशात्रात दरवर्षी देणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणी लोकांना आत यायला डिस्करेज करायचे असेल तर बाहेर काही भारतीयांना तेथे चपला काढून ठेवायला सांगितले तरी काम होईल
इथेही देशी गेट टुगेदर्स मधला एक मोठा "eyesore" असतो तो. भारतात देवळांबाहेर, दवाखान्यांबाहेरही खूप कॉमन आहे.
व्यवस्थित कप्पे असतात
व्यवस्थित कप्पे असतात चपलांकरता पण लोकं त्या कप्प्यांमध्ये ठेवतच नाहीत चपला. कश्याही बाहेर टाकलेल्या असतात - हे खरे आहे.
विंटरमध्ये इथे स्विमिंग
विंटरमध्ये इथे स्विमिंग पूलच्या चेंगिंग रुमच्या बाहेर फार बुट्स होतात. विंटरमध्येच. कारण बुट्सना चेंजिंगरुम/ पूल फ्लोरवर बंदी असते. शूज इ. चालतात. (म्हणजे शेवटी तुम्हालाच चालायचं असतं ..
चालायचंच... सॉरी
) ... तर पादत्राणे ठेवायला भला मोठा रॅक आहे. त्यातल्या खणांची उंची ही विंटर बुट्स मावतील अशी आहे. लोक ठेवतात ही. पण तरीही इतस्ततः बरेच विखुरलेले असतात. पुढच्या वेळी डेमोग्राफिकली मार्क करत बसलं पाहिजे. देसी लो़क असं करतात का इतर ही करतात.. पोरं तर करतातच. .. कुठलीही असो. त्यांना सांगून फायदा नाही. उगा डेटा गढुळायचा. पण त्यांच्या पालकांपैकी किती वर ठेवायला जागा शोधायचा प्रयत्न करतात आणि किती नाही यांचा वय, जेंडर, डेमॉग्राफिक स्टडी. एखादा पेपर लिहुन टाकू मग.
बळंच नाकातून बोलून आपण
बळंच नाकातून बोलून आपण पुण्यावर फार मोठा विनोद केला असे समजणारे लोक, उगाच संबंध नसताना चितळ्यांवर काहीतरी टीका करणारे (आणि नंतर त्यांच्याच दुकानात जाऊन मिठाई घेऊन येणारे) लोक.
माझ्या अनेक मित्रांना त्या अथर्व सुदामे चे व्हिडिओ आवडतात पण मला नाही आवडत, ओढून ताणून केलेले वाटतात. जुन्या काळी असतील अशी काही उदाहरणं पण हल्ली कोणी असं खोचून टोचून बोलताना मी तरी ऐकलं नाही.
मज्जा मज्जा आहे इथे.
मज्जा मज्जा आहे इथे.
माझ्या डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे चावुन झालेले चुईन्गम कुठे न दिसेल अशा ठिकाणी लावणे व आपला हात तिथे लागणे. आत्ताच एक प्रवास केला तर विमानाच्या सीटबेल्टच्या बक्कलला व बेल्टला पण लावलेले होते. क्रु नी पण स्वच्छ करायचा त्रास घेतला नव्हता. विमानात बिघाड झाल्याने आम्हाला उतरावे लागले पण उतरताना हवाई सुंदरीला सांगितले. तिने तत्परतेने क्लीनरला बोलावते असे सांगितले. पण कितीवेळ ई असं वाटत राहिलं.
Pages