पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे सुनिधी... मला वाचून पण ई झालं. तुला कसं वाटलं असेल समजू शकते.
अत्यंत सार्वजनिक म्हणजे हाय वे वरचे ढाबे वगैरे मधल्या बाथरूममध्ये वर असलेल्या खिडकीत वगैरे बायका वापरलेले सॅनिटरी नॅपकिन टाकून जातात. सॉरी खूपच खालच्या दर्जाचा पेट पिव्ह आहे पण सत्य परिस्थिती आहे ही. आपल्याला माहित असते आपली परिस्थिती मग लोक सोबत एखादं वर्तमानपत्रं ठेवून त्यात गुंडाळून रस्त्यावरच्या कचरा कुंडीत का नाही टाकत?

DJ च कर्णकर्कश आवाज नको वाटतो .मेंदू चालायचंच बंद होतो त्या आवाज मुळे काहीच लोकांना काय आनंद मिळतो इतक्या मोठ्या आवाजातून हा प्रश्न च आहे.

Cab किंवा रिक्षा शेअर केली असेल तर गाडीत वाजणारे संगीत पण डोकेदुखी ठरते.
अगदी वळणावर गाडी पार्क करणारे महाभाग त्या मुळे पुढचे काही दिसत नाही वळण घेताना .अपघात ची तीव्र शक्यता.

स्पोर्ट्स कार किंवा बाईक चा कर्णकर्कश आवाज.

बुलेट बाईक च आवाज तर नको वाटतो.

>>माझ्या अनेक मित्रांना त्या अथर्व सुदामे चे व्हिडिओ आवडतात पण मला नाही आवडत, ओढून ताणून केलेले वाटतात. जुन्या काळी असतील अशी काही उदाहरणं पण हल्ली कोणी असं खोचून टोचून बोलताना मी तरी ऐकलं नाही.

त्या अथर्व सुदामे चे व्हिडिओ हाच मोठा पेट पीव्ह आहे माझ्यासाठी.

तो कुठल्याश्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचा पेट (चांगल्या अर्थाने) झाल्यामुळे आता त्याच्या व्होडियोंचं फारच पिपेव्ह फुटलंय.

त्या अथर्व सुदामे चे व्हिडिओ हाच मोठा पेट पीव्ह आहे माझ्यासाठी.>> अगदी.

तो कुठल्याश्या कार्यक्रमात राज ठाकरे यांचा पेट (चांगल्या अर्थाने) झाल्यामुळे आता त्याच्या व्होडियोंचं फारच पिपेव्ह फुटलंय.>> Lol

विदुषी की विदेशी यातले नक्की काय याबाबत कोणाला खात्री नव्हती कारण पुरुषांना दोन्हींचे आकर्षण असते Happy

मला बऱ्याच आधी विदुषी म्हणजे फॉरेनारी असे वाटायचे.
आणि कालपर्यन्त फॅशनेबल स्त्री असे वाटत होते, काल अर्थ बघितला शब्दकोशात.

व्हॉट्सअप वर अनोळखी नंबर ने व्हिडिओ कॉल/ कॉल करणे.>>> अगदी अगदी रिया. जाम डोक्यात जातो प्रकार. नेहमी संपर्कात नसलेल्या पण स्कूल किंवा नातेवाईक ग्रुपात असलेलं कुणीतरी उगा कॉल करत असतं.. मग शोधावं लागतं, ही व्यक्ती कोणत्या ग्रुप मधली?
त्यापेक्षा सरळ आधी मेसेज टाकावा, मी अमूक, उद्देश्य तमुक. मग काही वेळाने कॉल..

हा पेट पिव्ह आलाय का कुणाला? एखादी फ्रेंड सर्कल मधली बाई/पुरुष यच्चयावत आपण म्हणू त्या कुणाला ही" हो, मी ओळखतो/ते". असा दावा करतात.. मग ते फेबू वर यु माईट नो धिस पर्सन पण असू शकते. प्रचंड काँफीडन्स ने ओळख दाखवून बाकी काहीही माहित नसले तरी आपल्या ला सर्वच कसं माहित आहे, ह्या दिमाखात काही लोक असतात.. ह्या कमाई साठी ते दिवसभर फेबू ऑनलाईन असतात आणि तुमच्या दुर ओळखी वाल्या ला ही अ‍ॅड करतात. सहसा हे जेश्ठ नागरिक असतात &स्थळ मध्यस्थ चे काम ह्यांना आवडते.

मला पुर्वी विदुषी म्हणजे स्त्री विदूषक असे वाटायचे. लवकरच तो गैरसमज दूर झाला.>>> Lol
कसा दूर झाला हे समजायला आवडेल

मला पुर्वी विदुषी म्हणजे स्त्री विदूषक असे वाटायचे. लवकरच तो गैरसमज दूर झाला.>>> हे मलाही वाटायचे Lol आणि माझा गैरसमज सुद्धा फार उशीरा दूर झाला Happy

विदूषक व विदुषी
+१
लहानपणीच्या समजूती धाग्यावर हे जायला हरकत नाही

विनाकारण स्थळे सुच व णारे लोक. आमच्या ओळखीचे एक होते. वारले बिचारे. इथे मुलांचा कश्यात काही पत्त्त्या नाही. आणी लग्न कसे करवून देणार. ते ही अगदी आपल्यातलाच आहे. ( पण आम्हाला को रीअन मुले आवडतात ना!!) असे सांगून.

परंपरा वैगेरे सारख्या आठवण करून देणे. म्हणजे, खेळकरपणे सांगणे वेगळे. पण उगाच शिक्षकी आविर्भावात शिस्त लावल्याचा सुरात -
"अरे प्रसाद उजव्या हातात घ्यायचा असतो, माहीत नाही का"
"तिन्ही सांजेची नखं कापायची नसतात."
"सोमवारी तूप कढवता?"
"श्रावणात अंडे??"
इत्यादी अगदी annoying असते.

तुझा विश्वास नाही मला माहीत आहे, तरीही हे अमुकतमुक एकदा करून बघ. फायदा नाही झाला तरी नुकसान नाही होणार. एकदा करून बघायला काय हरकत आहे, नुसते एवढेच तर करायचे आहे..... वगैरे बोलत अमुकतमुक बुवाबाजीचे उपाय व्रत वैकल्ये, उपास तापास, टोणगे सुचवणारे सुद्धा जरा त्रासदायक असतात.

आणि मग आपली अडचण दूर नाही झाली तर त्याचा फॉलोअप घेऊन पुन्हा पुन्हा ते उपाय सुचवणे... आणि मग कुठेतरी आपले आईवडील सुद्धा त्याला बळी पडणे.. आणि मग त्यांनी सुद्धा म्हणने की करून बघतो का रे एकदा...

काही लोकं विचारतात तुझा देवावर विश्वास नाही. पण जगात कुठलीतरी शक्ती आहे यावर तरी विश्वास आहे का? आता त्यांना नेमकी कुठली शक्ती अभिप्रेत असते त्यांचे त्यांनाच ठाऊक.. पण उत्तरादाखल हो म्हटले की त्यांचे समाधान होते. आपली श्रद्धा आपला विश्वास जिंकल्याचा आनंद मिळतो. म्हणून उगाच विषय वाढवण्यापेक्षा अश्यांना मी नेहमी तो आनंद देतो. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर असे भाव असतात की या वेड्याला माहीतच नाही, की ज्या शक्तीला हा मानतो तोच तर देव आहे Happy

<<चेहर्‍यावर असे भाव असतात की या वेड्याला माहीतच नाही, की ज्या शक्तीला हा मानतो तोच तर देव आहे >>> अगदीच. Happy

अमुकतमुक बुवाबाजीचे उपाय व्रत वैकल्ये, उपास तापास, टोणगे सुचवणारे सुद्धा जरा त्रासदायक असतात>>>> खरंय पण त्या मागची त्यांची कळकळ आणि काळजी खरी असते, म्हणुन मी पण ते समाधान त्यांना देते. जवळच्यांना.

बघतो का रे एकदा...

काही लोकं विचारतात तुझा देवावर विश्वास नाही. पण जगात कुठलीतरी शक्ती आहे यावर तरी विश्वास आहे का? आता त्यांना नेमकी कुठली शक्ती अभिप्रेत असते त्यांचे त्यांनाच ठाऊक..

जग सोडा माणूस कोणत्या शक्ती च्या जोरावर लिहू,वाचू,विचार करू शकतो.
इथे प्रतेक जीवाला अन्न पानी पुरेल इतके आहे ही अन्न साखळी कोणती शक्ती मुळे अस्तित्वात आहे.
अन्न साखळी आहेच पण विघटन आणि त्या पासून पुनर्निर्मिती करणारी पण शक्ती आहे.

ही शक्ती कोणती हे माणसाच्या बुध्दी च्या बाहेर चे प्रश्न आहेत .
मानवी बुध्दी ची कुवत पण नाही.
हे खरे बुध्दीमान लोक मानतात.
अर्थ्या हळकुंडाने पिवळे झालेले अर्थवट ज्ञान असणारे च त्यांच्या अल्प बुद्धीचे प्रदर्शन करत असतात

हो, पण तुम्हाला खात्री आहे का की ती शक्ती म्हणजेच आपण मंदिरात जाऊन पुजतो आणि माझे या वर्षी लग्न जुळू दे, मी सोळा सोमवार पाळतो म्हणून ज्याच्याकडे नवस करतो तोच देव आहे याची?

ती शक्ती माणसाच्या बुद्धी पलीकडची आहे तर तिला बळेच आकार उकार नाव रंग रूप देऊन सर्वांनी याचीच पूजा करा रे असा हट्ट धरण्यात काय अर्थ आहे?

आक्षेप त्या हट्टाला आहे.
देवाची पूजा करण्याला नाही. तर आपले देवाचे विचार दुसऱ्यावर लादण्याला आहे.
निसर्गाच्या शक्ती समोर माणूस सामान्यच आहे. किबहूना तो त्याच शक्तीची एक निर्मिती आहे. मग कोण अमान्य करेल त्या शक्तीला..
फक्त प्रत्येकाला आपल्या पद्धतीने त्या शक्तीची उपासना करू द्यावे.

असो, हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. माझाच कुठला असेल तर लिंक देतो.. नाहीतर नवा काढतो. इथे थोडक्यात संपणार नाही

कॉमी हा आयडी हिंदू ,आस्तिक लोकांच्या भावनेशी संबंधित पोस्ट जाणून बुजून करतो.
माय बोली वर च अनेक पुरावे मिळतील.

ऋनमेष मनात काही हेतू ठेवून लिहीत नाही हे मला पण माहीत आहे पण कॉमी ह्या id च्य डावपेचात तो अडकला.
म्हणून मला तसा प्रतिसाद द्यावा लागला

व्हॉट्सअप वर अनोळखी नंबर ने व्हिडिओ कॉल/ कॉल करणे.
अगदी अगदी रिया. .. मला तर काही ओळखीचे ही पुर्वकल्पना न देता व्हीडीओ कॉल करतात. फार डोक्यात जातात. बर्‍याच वेळा मी उचलत नाही कॉल. एका नातेवाईकाला फार सवय आहे व्हीडीओ कॉल करायची. चुकून उचलला तर एकदम काहीतरी डोक्यात जाईल असे बोलून सुरवात करतो. त्याला एकदा सॉलिड झाडला. त्याला म्हणालो की अरे बाबा मी ऑफीसमध्ये किंवा पब्लिक प्लेस मध्ये असतो तर तुझा व्हीडीओ कॉल कसा काय उचलू? तसेच तू काहीतरी विचित्र बोलतोस ते सगळ्यांना ऐकू जाते. पण हे सांगून त्याला काहीही फरक पडला नाही. त्याने वर विचारले की लोकांना ऐकू गेले तर काय बिघडले? वर मला म्हणतो की हेड फोन लाव. आता याचा कॉल कधीही येईल म्हणून मी काय सतत हेडफोन लावून हिंडायचे का? तो असे बोलल्यावर मी त्यानंतर त्याचे येणारे सर्व व्हीडीओ कॉल न घेता कट करायला लागलो. असे काही वेळा झाल्यावर तो आता गप गुमान नॉर्मल ऑडीओ कॉल करायला लागलाय.

What's app व्हिडिओ मध्ये असणारे लाफिंग ट्रॅक आणि ते मोठ्याने ऐकणारे लोक. फार डोक्यात जातात

फोन करून आपल्यालाच ' हा कोण बोलतंय ' असं विचारणारे लोक! हे असे फोन हमखास घाईच्या वेळीच येतात.
अजून एक म्हणजे, बारशी, लग्न अशा कार्यक्रमांना लाऊड स्पीकर लावून हळद, घाणे भरणे किंवा पाळणा अशा खास प्रसंगांची खास गाणी अत्यंत भेसूर आवाजात बेसूर गात अख्ख्या दुनियेला ऐकवणारे लोक.

अनघा ही सवय माझ्या बाबांना पण होती/आहे. आपणच फोन करायचा आणि विचारायचं कोण बोलतंय. एकदा मी ओरडले तर म्हटले
आम्हाला हवी ति व्यक्ती पलिकडं आहे का नाही हे कसं कळणार आम्हाला विचारल्याशिवाय? बर्‍याच ज्येष्ठ नागरिकांना असते अशी सवय.

कारण तेव्हा लँडलाईनचा जमाना होता. सर्व घरातल्यांचा एक फोन एक फोन.
आता मोबाईलचा आहे. ज्याचा नंबर तीच व्यक्ती समोर..

Pages