पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोंबिवली सिंड्रोम Lol अगदी अगदी.

डोंबिवलीकर पाण्याची नासाडी बघू शकत नाहीत, अगदी खरोखर अमितव.

डोंबिवली बरी म्हणायला हवं अशी पाणीटंचाई नालासोपारा इथे बघितल्याने जास्तच त्रास होतो अशा गोष्टींचा.

असा आवाज शतकानुशतकांत एकदाच निर्माण होतो. टाचेपर्यंत लांब शेपटा होता तिचा. >>> Lol आठवले.

वरती मेरियटचा उल्लेख आहे त्यावर - फार वैयक्तिक माहिती शेअर करावी लागणार नसेल किंवा ती करायला तुमची काही हरकत नसेल तर मोठे हॉटेल ब्रॅण्ड्स, एअरलाइन्स ई. ची मेम्बरशिप घ्यावीच आणि रिझर्वेशन करताना तो नंबर वापरावा. बहुतांश फ्री असते आणि कधी ना कधीतरी अनपेक्षित फायदा मिळतो. मला अनेकदा मिळालेला आहे. बर्‍याच अमेरिकन चेन्स मधे निव्वळ मेम्बर असल्याने सुद्धा रूम रेट कमी पडलेला पाहिला आहे. कधी वायफाय फुकट मिळते.

मात्र कंपनी रिलायेबल आहे ना ते बघूनच हे करा.

इथे बरेच दिवसांपासून लिहायचं म्हणतेय.

मला अगदीच त्रासदायक असं काहीच नाहीय. मी समोरच्या माणसाच्या त्रासदायक सवयी, डोक्यात जाऊ ना देता मनशांती अबाधित ठेवू शकते असा वाटायचं. किंवा आपल्या हातात नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं इतका तर आपल्याला जमत याचा आनंद वाटे.
पण मला तरीही काही गोष्टी खटकतात , त्यातली पहिली मला गेल्या काही वर्षात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे , काही माणसं काहीही निर्जीव वस्तू 'भेटली ' असा म्हणतात. मुंबईत असेपर्यंत कदाचित माझ्या परिचयातील असं बोलणारी माणसंची टक्केवारी कमी असल्यामुळे असेल पण आत्ता मला इथे एकतर मराठी बोलणारी माणसं कमीच भेटतात त्यातही त्यांना अशा वस्तू 'भेटतात' की मला कसातरी होत. इथे जवळ एक जोडपं राहतं, सुरुवातीला मी खूप आनंदी झाले की आसपास कोणी मराठी आहे, पण त्यांना कधी कोथिंबीर स्वस्त भेटली किंवा बस भेटली किंवा ट्रेन भेटली नाही की मला काय बोलावं हेच सुचेनासे होत.
बरं असं ( आणि बरंचस वेगळं मराठी उदाहरणार्थ मी करेल, मी खाईल असं) तेच नाहीत तर बरेच जण बोलतात. नवऱ्याला सांगितलं तर तो म्हणतो तू कशाला लक्ष देतेस. तू सर्वांनी प्रमाण भाषा बोलावी असा आग्रह नाही करू शकत. हे मला पटत पण हे भेटल असा कोणी बोलल की मला पुढे बोलायलाच जमत नाही, राग वगैरे नाही येत आणि नंतर मी विसरूनही जाते पण त्या क्षणी मला असा वाटत की माझा संवाद पुढे जाऊ शकत नाहीय.

त्या क्षणी मला असा वाटत की माझा संवाद पुढे जाऊ शकत नाहीय...... समजू शकते.बरेचदा हताश व्हायला होते.

तसेच टी.व्हीवर किंवा इतर मुलाखतीत किंवा इतरत्र लोकं म्हणाली,बोलली असं ऐकले तरी हा त्रास होतो.

अगं देवकी यु करेक्टेड मी वन्स पण लोक हा २ अर्थी शब्द आहे - लोक = भु:, भुवः. स्वः वगैरे तिथे अनेक लोक आहेत खरे आहे.
पण जिथे जन समुदाय येतो तिथे लोकं हे मला तरी बरोबर वाटतं.
सभेला खूप लोकं आली होती.
कोणीतरी प्लीज कन्फर्म करा.

सभेला खूप लोकं आली होती. >>>>>> नाही सामो, आपण पुण्याचे आहोत की नाही, मग आपल्याला हे allowed च नाही. Lol

सभेला खुप लोक आले होते.

मला तर लोकांचे "व्यस्त असणे" वगैरेही खटकते. ते माझ्या"सोबत" असे वागतात, त्याने "माझी" मदत केली. "सर्वांचे धन्यवाद" - ई. सर्व Happy

हे बोलणारा ज्या भागातून आला आहे तेथील भाषेत साधारण असेच बोलतात का? तसे असेल तर फक्त बोलीभाषेतील फरक म्हणून आपण समजून घ्यायचे. पण आळशीपणाने आजूबाजूला ऐकलेले, वाचलेले शब्द जर लोक उचलत असतील किंवा कूल आहे असे वाटून वापरत असतील तर लक्ष्यासारखे "अज्ञान, घोर अज्ञान!" म्हणून तु.क. टाकायचा Happy

आणखीन एक पेट पीव्ह आहे. लोकांना इतर भाषेतले शब्द, त्यातही विशेषनामे, आपल्या परिचित ध्वनींमध्येच उच्चारायची खोड असते. माझ्या ओळखीतला एकजण (कन्नडभाषक) बंगळूरहून पुण्याला नॅशनल लेव्हलच्या तरणस्पर्धेसाठी गेला होता. बालेवाडीला स्पर्धा होत्या. हा बाणेरला कुठेतरी राहिला असावा. नंतर मला त्या जागेचं नाव 'बन्नेरु' म्हणून सांगत होता. कारण बंगळूरुत बन्नेरघट्टा जैविक उद्यान आहे. त्याउलट बंगळूरुत रहायला आलेले कित्येक मराठी लोक त्या उद्यानाला बाणेरघट्टा म्हणतात. मारतहळ्ळी नावाच्या जागेला मराठाहळ्ळी म्हणतात! सध्या राहतो तिथे एक 'होजे' (ज जहाजातला, जवानातला नाही) नावाचा स्पॅनिश इसम कुणी त्याला जोस म्हटलं तर चिडत असे (कारण त्याचं स्पेलिंग जे ओ एस ई होतं, लोक न विचारता जोस म्हणत), पण तोच माणूस आमच्या भारतीय नावांची वाट लावत असे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसाठी एक पुस्तक होतं - बॉब्रोव्ह नावाच्या लेखकाचं. अप्पा बळवंत चौकात कुठेही ते पुस्तक मागितलं की काउंटरवरचा माणूस माडीवर बसलेल्या पोराला 'एक बाबुराव टाक रे खाली' अशी हाक देत असे. शंतनु नाव असताना अनेक उत्तर भारतीय लोक सरळ शांत्-नू (त अर्धा उच्चार) अशी हाक मारतात. सायलीची सयाली होते (आणि मग तीही स्वतःला सयालीच म्हणते). तसंच रावलपिंडीला अनेक मराठी लोक रावळपिंडी म्हणतात. सगळ्यात जास्त डोक्यात जातो तो 'ट्राईड अँड रिफ्युज्ड प्रॉडक्शन्स' चॅनलवाला यूट्यूबर. तो सिनेमा परीक्षण करताना एकंदरित सगळ्याच नावांची वाट लावतो. कुणालाही सोडत नाही.

मेरठचे मीरत मराठीत, तसेच हांबुर्ग, फ्रांकफुर्ट, बेर्लिन या जर्मन उच्चारांचे अनुक्रमे हॅंबर्ग, फ्रँकफर्ट आणि बर्लिन इंग्रजीत आणि म्हणुन मराठीत.
म्युन्शेनचे म्युनिक हे खडकीच्या किर्की सारख्या प्रकारात मोडावे.

जर्मन लोकही इतर देशांची आपल्या सोईनुसार नावे ठेवतात. इंडिएन (Indien) म्हणजे इंडिया आणि इंडिएनेर (Indiener) म्हणजे Indian. डच सुद्धा हेच म्हणतात बहुतेक.

आपल्याकडे विमानतळावर इतर देशातील (किंवा आपल्याच देशातीलही) शहरांची नावे हिंदीत मजेशीर लिहिली असतात बरेचदा.
झुरीकचे (याचा जर्मन उच्चार झ्युरिश्ss) "ज्योरिच" वगैरे

रावलपिंडीला अनेक मराठी लोक रावळपिंडी म्हणतात.
>>> रावळपिंडी हा उच्चार टेक्निकली बरोबर आहे कारण ते शहर पराक्रमी राजपूत बाप्पा रावळने वसवले होते. हिंदीमध्ये 'ळ' अक्षर नाही म्हणून ते रावलपिंडी म्हणतात. पण राजस्थानात/पंजाबात रावळ हाच उल्लेख करतात.
तसेच कुणाचे नाव 'शंतनु' असेल तर उच्चार तसाच व्हायला पाहिजे. पण संस्कृत व्याकरणदृष्ट्या बरोबर शब्द व उच्चार 'शांतनु' आहे. 'शांत तनु ज्याची' असा काहीतरी विग्रह शाळेत शिकला होता.

अच्छा. बाप्पा रावळ - राजस्थानी भाषेत ळ उच्चार आहे हे लक्षात नव्हतं आलं. धन्यवाद.

"शांत तनु ज्याची" हा विग्रह नाही. शंतनु = शम् + तनु (शमयति/ते तनुम् इति - कर्मधारय तत्पुरुष समास आहे).
माझंच नाव शंतनु आहे. Lol

"शांत तनु ज्याची" हा विग्रह नाही. शंतनु = शम् + तनु (शमयति/ते तनुम् इति - कर्मधारय तत्पुरुष समास आहे).
माझंच नाव शंतनु आहे.
>>>> पुन्हा संस्कृत नवनीत आणून वाचायची किंवा बदाम खायची वेळ आली म्हणायची माझ्यावर Sad Sad बाकी कर्मधारय हे नाव पण विसरले होते.

शम् + तनु!!
अच्छा म्हणजे धनंजय माने आणि मंडळी ज्यांना दार उघडण्यासाठी आवाज देत होते ते, ते हेच नाव.
उखाणा सुद्धा आहे सुधा ने घेतलेला Proud

निर्जीव वस्तू भेटण्याचा पिव्ह वाचून अगदी अगदी झालं.
पण लोकं हा शब्द आता इतका प्रचलित झाला आहे बोलीभाषेतला म्हणून accept झाला आहे.
तसाच पेन वही भेटणे हे हि लवकरच मर्ज होईल बोलीभाषेत. तो दिवस दूर नाही.

माझा नेहमीचा पेट पिव्ह...

मला असा सुट्टी दिवशी फोन येतो भर दुपारी किंवा निवांत बसलेलं असताना....
"काय नाही असच फोन .. केला.अमुक अमुक ठिकाणी चाललो होतो, २.३० ची मिटिंग आहे. आत्ता कुठं सव्वादोन झालेत, म्हट्लं तुला फोन लावूया.. तु पण निवांत असशिल... मी (मनात) माणूस निवांत असेल तर शांत बसेल ना? तुला वेळ आहे म्हणून आणि मी निवांत असले तरि कुठे असं कमप्ल्शन आहे? की मी तुझ्याशी फोन वर बोलत बसावं?

दुसरी एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे लोक फोनवर उगिच नको ते पाल्हाळीक डिटेल्स सांगत बसतात. उदा. कालची कणिक उरली होती, एक छो टा बटाटा होता... मग तो परतला, दोन पोळ्या लाट्ल्या, जरा सॅलड चिरलं.... टॅ टॅ टॅ
किंवा विकेन्ड ला फार्म हाऊस ला गेलेलो... मग बाळ्या, होता, पक्या होता... बोंब्ल्या होता, भिक्या होत्या... अशि सगळी २० च्या २० नावं..टॅ टॅ टॅ मस्त चिकन आणलेलं, मॅरिनेट केलेलं चुल पेटवलेलि.. टॅ टॅ टॅ...

काही माणसं काहीही निर्जीव वस्तू 'भेटली ' असा म्हणतात. >>
विद्यार्थ्यांशी रोजच संबंध येत असल्यामुळे ‘भेटली’.. ‘’भेटली नाही’.. (वही.., worksheet) हे मला दिवसातून पन्नास वेळा तरी ऐकायला लागतं. मी आणी माझ्यासारख्या इतर बायका पण रोज तेच तेच करेक्शन करून वैतागल्यात, पण मुलांमध्ये बदल नाही.

"भेटली" बाबत सहमत. काही नव्याने मुंबईला आलेले शुद्ध मराठी लोक सुद्धा मुद्दामहून मुंबईकर आहोत हे दाखवायला मला ट्रेन भेटली, बस भेटली वगैरे बोलतात. ते जास्त डोक्यात जाते.

गाडी चालवताना बर्‍याच वेळा एक गोष्ट कायम डोक्यात जाते ती म्हणजे कॉर्नरला उभ्या राहीलेल्या रिक्षा. या रिक्षावाल्यांना चौक असेल तर कॉर्नरला रिक्षा पार्क करायची सवय असते जेणे करून चारही रस्त्यावरून कोणाला रिक्षा हवी असेल तर यांना ते दिसेल. पण यामुळे त्या कॉर्नरला गाडी घेऊन वळणार्‍या लोकांना त्रास होतो त्याचे यांना काहीच पडलेले नसते. बर्‍याच वेळा यांना बोलून झालेय पण हे रिक्षावाले मात्र कधीच सुधारणार नाहीत.

निर्गुणाचे भेटी | आलो सगुणासंगे |
तंव झालो प्रसंगे | गुणातीत ||

या संत गोरा कुंभार यांच्या ओवीत बदल करून निर्जिवाचे भेटी आलो सजिवासंगे असं लिहायला लागेल.

असो, हे भाषिक पेट पिव्ह करणं मी सोडून द्यावं म्हणतो आहे. मीही बऱ्याचदा चुकीचं मराठी वापरतो.

निर्जीवच्या जागी अमानव, आणि सजीवच्या जागी मानव करावे लागेल. वनस्पती, प्राणी, पक्षी सुद्धा भेटत नाहीत.

तुमचं नाव आहे म्हणून मान्य करतो आहे, नाहीतर 'जंगमार की कुसुकूशी गप्पा मारून आल्यावर तो मिळाला म्हणायचं का भेटला म्हणायचं' असं विचारलं असतं. Wink

हपा Rofl

Pages