लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
"मुलींऐवजी व्हिडीओत मुलगे
"मुलींऐवजी व्हिडीओत मुलगे असते तर त्यांच्या भविष्याबाबत इथे कुणी इतके हळवे झाले असते का" - मिडिया ट्रायल आणि प्रायव्हसी ब्रीच ही कुणाच्याही बाबतीत चुकीचीच आहे हे सजग मत आहे, हळवेपणा नाही आणि हे जेंडर स्पेसिफिक नाही.
हे जेंडर स्पेसिफिक नाही >>
हे जेंडर स्पेसिफिक नाही >> हळवेपणा दोन्ही बाबतीत सारखाच असेल, तरच तो योग्य आहे.
मुलगे दारू पिऊन पडलेले असते
मुलगे दारू पिऊन पडलेले असते तर संस्कृती रक्षकांना काही पडलेली नसती. संस्कृती रक्षणाचं काम__फक्त_ स्त्रीयांचे आहे ना?
माझी इन्स्टिन्क्टिव्ह - विचार
माझी इन्स्टिन्क्टिव्ह - विचार करायच्या आधी येणारी स्वाभाविक- प्रतिक्रिया मुली व मुले यांच्याबाबतीत सारखीच असेल हे मी अजिबात क्लेम करत नाही
पण याबाबतीत थोडा विचार करून जे माझ्या आधीच्या पोस्ट मधे लिहीले आहे ते तेथे कोणीही असले तरी तेच आहे.
"हळवेपणा दोन्ही बाबतीत सारखाच
"हळवेपणा दोन्ही बाबतीत सारखाच असेल, तरच तो योग्य आहे." - माझा मुळात 'हळवेपणा' ह्या शब्दाशीच सहमती नाहीये. माझं हे सजग मत आहे आणि ते मुलगा-मुलगी - कुणाच्याही बाबतीत तेच आहे (म्हणजेच जेंडर स्पेसिफक नाही). मागे एकदा मी एका हॉस्पिटलमधे एका पुरूष पेशंटच्या प्रायव्हसी बाबतीतही ही भुमिका घेतली होती आणि व्यवस्थापनाकडे निषेध नोंदवला होता.
मी आधी मांडलेले मत - असे
मी आधी मांडलेले मत - असे कोणीही कुणाचेही व्हिडीओ, फोटो पब्लिकली व्हायरल करणे योग्य नाही, त्या विरोधात कायदा असावा (असा कायदा सरसकट असु शकत नाही हे मान्य)- हे कुठल्या एका जेंडर संदर्भात नव्हते.
गडावर दारू पिणाऱ्याना पकडून (त्यांना नाव, प्रोफेशन विचारत मारहाण पण केली होती) त्यांचे व्हिडीओ व्हायरल केले तेव्हाही हेच मत होते.
पण मुलींच्या बाबतीत अमितव म्हणाले ते बरोबर आहे.
आपल्याकडची संस्कृती आम्ही स्त्रियांना आमच्यापेक्षा श्रेष्ठ मानतो प्रोव्हायडेड : त्यांनी असे असे वागले पाहिजे अशी मोठी यादी. त्यात चूक झाली की मग ती संस्कृतीला काळिमा फासणारी होते लगेच. असे जेंडर डिस्क्रीमिनेशन असलेल्या पार्श्वभूमीवर मुलींच्या बाबतीत अधिक काळजी वाटणे, अधिक हळवे होणे हे सुद्धा ओघाने येणारच असे माझे मत.
असं मुलांसोबत घडलं तर काहीही हरकत नाही, चांगलंच झालं अद्दल घडेल आणि मुलींसोबत घडले तर मात्र आक्षेप अशी भूमिका असेल तर ती डिस्क्रीमिनेटरी आहे.
दोन्ही बाबतीत भूमिका सारखी पण तुलनेत मुलीं बाबतीत अधिक काळजी, हळहळ यात मला गैर वाटत नाही वरील कारणामुळे आणि मला स्वतःलाही मुलींबाबत तुलनेत अधिक हळहळ वाटेल हे कबूल करतो.
छान झाला होता मागच्या वर्षीचा
चुकून इथे केलेली पोस्ट संपादित.
मानवदादा, पर्फेक्ट पोस्ट.
मानवदादा, पर्फेक्ट पोस्ट.
https://marathi.abplive.com
https://marathi.abplive.com/entertainment/pune-viral-video-complaint-fil...
मानव, संपूर्ण पोस्टला अनुमोदन
मानव, संपूर्ण पोस्टला अनुमोदन.
तो व्हिडिओ मी पाहिला, तेव्हा चेहरे पूर्ण दाखवले होते, ब्लर केलेले नव्हते. तेव्हाच ते खटकलं होतं. त्यानंतर ते गृहस्थ, त्या मुली नशेत तर्र आहेत आणि अलिकडेच पुण्यात इतक्या कोटींचे ड्रग पकडले गेले, हे परत परत सांगत होते. मला वाटते, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा हेतू चांगलाच होता, पण पद्धत थोडी खटकली.
इथे एवढी चर्चा झाल्यामुळे मी
इथे एवढी चर्चा झाल्यामुळे मी नविन धाग्याची भर घातली नाही, पण छान चर्चा चालु आहे.
त्या व्हिडियो मधे मुलींच्या जागी मुलगे असते तर? ह मुद्दा माझ्या डोक्यातच आला नव्हता. पण आता विचार केला की जर टिनएजर मुलगे असते तर, हो मला तरी देखील तेवढेच वाईट वाटले असते. त्यांच्या भविष्यावर भयानक परिणाम होणार आहे, हे त्यांना जागच्या जागी आरोपी ठरवताना विचारात घ्यायला हवं. व्हिडियो live करणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावर दारू पिऊन पडलेले पुरुष पाहिले नाहीत का? तेव्हां का नाही FB वर live गेले? आणि मुली अस्ताव्यस्त पडल्या म्हणजे over drunk असु शकतील असं का नाही वाटलं ? लगेच drugs घेतले आहेत हे सांगुन ठरवून मोकळे. किती बेजबाबदार आणि किती ते उथळ समाजकार्य ,,( हो, मी वाचलेल्या forward पोस्ट्स मधे त्यांना अनेक गुणांची विशेषण चिकटलेली पाहिली. समाजभान असलेला कलाकार, तळमळीचा सुजाण नागरिक आणि बरंच काही. एका ठिकाणी वाचलं की एका सुसंस्कृत माणसामुळे या मुली वाचल्या. Really ? )
मी आधी मांडलेले मत - असे
मी आधी मांडलेले मत - असे कोणीही कुणाचेही व्हिडीओ, फोटो पब्लिकली व्हायरल करणे योग्य नाही, त्या विरोधात कायदा असावा >>>>>>
काही लिहायच्या आधी हे स्पष्ट करतो कि सदर व्हायरल केलेला व्हिडियो हा चुकीचाच आहे. पण....
मागे असाच एक ट्रेन मधील विडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक मुलगी ट्रेन मध्ये समोरच्या सीट वर पाय ठेवून बसलेली. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या माणसाने आधी त्यांना परोपरीने समजावले होते, पण पूर्ण शुद्धीत असताना देखील त्यांनी त्याच्या सोबत हुज्जत घातली होती . आता या गुन्ह्या साठी दंडाची तरतूद आहे, तेंव्हा नव्हती , आणि जरी असती तरी रेल्वे पोलीस या क्षुल्लक कारणासाठी तिथे आले असते की नाही यावर शंका घ्यायल वाव आहे... आता सदर घटनेला तुमच्या मागणीत कसे बसवावे? माझ्या मते सार्वजनिक ठिकाणी आपण चांगले (कायदेशीररित्या वैध असलेले) सांगितलेलले कुणी ऐकत नसेल आणि कायदेशीर तरतुदीनी शिक्षा करण्यास असमर्थ असू तर आपणच आपले डोळे मिटून घ्यावेत आणि ज्याला त्याला स्वतःच्या धुंदीत जगू द्यावे आणि त्याहूनही वैताग आला तर या धाग्यावर येऊन पेट पीव्हज च्या यादीत टाकुन द्यावे हाच एक पर्याय दिसतो आहे.
माझ्या मते सार्वजनिक ठिकाणी
माझ्या मते सार्वजनिक ठिकाणी आपण चांगले (कायदेशीररित्या वैध असलेले) सांगितलेलले कुणी ऐकत नसेल आणि कायदेशीर तरतुदीनी शिक्षा करण्यास असमर्थ असू तर आपणच आपले डोळे मिटून घ्यावेत आणि ज्याला त्याला स्वतःच्या धुंदीत जगू द्यावे आणि त्याहूनही वैताग आला तर या धाग्यावर येऊन पेट पीव्हज च्या यादीत टाकुन द्यावे हाच एक पर्याय दिसतो आहे.>>> भरपूर बडबडून घ्यावे, आपला उद्वेग निघतो & जरी समोरचा व्यक्ती डोंट केयर अॅटीट्युडात असला तरी तिरक्या नजरेने बोललेले टीपून घेत असतो.. चांगले झापते मी तर. ऐको वा न ऐको.
https://youtu.be/U5FkV8Y9Hfo
लहान चूक नाहीये, पण तरीही लिहितो या धाग्यावर.
Mumbai's Gokhale Bridge Misaligned with the Barfiwala Flyover | BMC Blames Railways
मला सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त
मला सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वागणाऱ्या मुलांचे पालक डोक्यात जातात. बेशिस्तीचा threshold एकेकाचा वेगळा असू शकतो, पण विमानाच्या सीटवर उभं राहून सीटच्या पाठीवर आपल्या पाठीने परत परत दणके देणे, aisle मधे वारंवार धावणे, मध्येच किंचाळणे/ मोठ्या आवाजात ओरडणे, हे चारपाच वर्षांच्या मुलाने करणे हे पालक कसं काय चालू देतात?
हो, असे विमानात आणि इतर
हो, असे विमानात आणि इतर ठिकाणीही अनुभवले आहे.
सिव्हिक सेन्सेसची बोंब हा एक वाईल्ड कार्ड पेट पीव्ह म्हणता येइल.
उबो, नेव्हीच्या भाषेत स्नाफु म्हणतात तो प्रकार वाटला व्हिडिओ बघुन.
स्नाफु न्हवे, सामान्य
स्नाफु न्हवे, सामान्य नागरिकांच्या पैशाचा चुराडा आहे हा चक्क आणि गंमत म्हणजे असल्या अकार्यक्षम कारभारासाठी कुणीही जबाबदार ठरणार नाही. नेहमीप्रमाणे "चलता है", "जुगाड" आणि मग मागील पानावरून पुढील पानाकडे.
मी प्रत्यक्ष नाही पाहिले अजून
मी प्रत्यक्ष नाही पाहिले अजून कुणाच्या लग्नात पण social मीडिया वर कुठं कुठं लग्नातलि एक फॅशन पाहिली आहे ती सध्या माझं पेट पिव्ह आहे. ती फॅशन म्हणजे ब्लॉउज च्या पाठीवर किंवा चुनरी वर अमक्या तमक्या ची सून, अमक्या तमक्या ची लेक, याची राणी, त्याची ही आणि ह्याची ती असे लिखाण आणि ते ही मोठया अक्षरांत जरी आरी वर्क करून लिहिलेलं असत
ती एवढी मोठी बाई /मुलगी आपल्याच कार्यात हरवणार आहे का, तिच्या पाठी असा नावाचा बोर्ड लिहायला.
खरंतर मी अमक्याची हि किंवा
खरंतर मी अमक्याची हि किंवा तमक्याची ती लिहिण्यापेक्षा "मी - माझी मी" असे लिहायला हवे.
मी, हा, ही कुणाचचं काही कशाला
मी, हा, ही कुणाचचं काही कशाला काय लिहायचं पाठीवर, अर्थात हे माझं वैयक्तिक मत. त्यांची पाठ त्यांचा पैसा काही पण निबंध लिहिनात बापडे. पण माझं आपलं पेट (पाठ ) पिव्ह म्हणून इथं लिहिलं.

ते माझं फार फार मोठं पेट
ते माझं फार फार मोठं पेट पीव्ह आहे.इतकं लिहायचंच आहे तर अमक्याची एक्स गर्लफ्रेंड तमक्याची कुड हॅव बीन पण लिहा.
अर्थात ब्लाऊजं त्यांची, पाठी त्यांच्या, नवरे त्यांचे.आपल्याला काय
असं लिहितात हे आत्ताच कळलं.
असं लिहितात हे आत्ताच कळलं.
ऑफिसातले वॉशरूम वापरताना
.
आपल्या वेळी मेंदीवर इनिशियल
आपल्या वेळी मेंदीवर इनिशियल पुरतं होतं, आता ब्लाऊजवर..... प्रेम वाढतच चालले आहे.
असं लिहितात हे आत्ताच कळलं. >
असं लिहितात हे आत्ताच कळलं. >>> मला ती मीम वाटायची फक्त. प्रत्यक्षात असे लिहीतात हे माहीत नव्हते.
माझ्या मावस बहिणीने हळदीसाठी
माझ्या मावस बहिणीने हळदीसाठी तसे कानातले,नेकलेस, बांगड्या आणि नावाची नथ वगैरे पण बनवून घेतले होते
तुम्ही नाही पाहिलंत हे प्रेमळ
तुम्ही पाहिल्या नाहीत हया प्रेमळ पाठी
हाय कंबक्त्त तुने देखा ही नही इष्क
बर ते प्रेम फक्त नवऱ्या बद्दल चं असेल अस नाही. माहेर सासर च्या खानदाना च नावं लिहून त्यांच्या बद्दल च प्रेम पण पाठीवर उतू जात असत
@रिया :O इतक्या छोट्या साईझ
@रिया :O इतक्या छोट्या साईझ ज्वेलरी वर हे अस लिहायचं म्हणजे एका तिळाचे सात भाग करण्याईतकंच अवघड आहे. आर्टिस्ट ची कमाल च म्हणायची
मक्या तमक्या ची सून, अमक्या
मक्या तमक्या ची सून, अमक्या तमक्या ची लेक,>>>> अर्रे देवा सीरियसली? पाहिले नाहिये अजून तरी..
पूर्ण श्लोक लिहिलेली साडी/पदर असे पाहिले आहे.
अमक्या तमक्या ची सून, अमक्या
अमक्या तमक्या ची सून, अमक्या तमक्या ची लेक, याची राणी, त्याची ही आणि ह्याची ती असे लिखाण आणि ते ही मोठया अक्षरांत जरी आरी वर्क करून लिहिलेलं असत >>>>
हे असं लिहितात? कमाल आहे.
आत्तापर्यंत फक्त फोटोत तिरुपती बालाजी पाहिला होता ब्लाउजच्या पाठीवर व त्यावर ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, ‘ ‘मागे उभा मंगेश’ वगैरे असंख्य मीम्स पाहिले होते.
त्या पत्रलेखाने (ऍक्ट्रेस) स्वतःच्या चुनरीवर ‘सौभाग्यवती भव’ असं लिहून घेतलं होतं, त्याचीही मला कमाल वाटली होती. हा आशीर्वाद आहे नं? मग स्वतःच स्वतःला द्यायचा का?
Pages