पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजकाल मी नवीन पाहिले ते असे की, मीटिंग चालू असताना टीम मध्ये chat madhye लिहीत राहणे अणि त्या कल्पना, आयडिया कोणीतरी आधीच बोलल्या असतात. जे नंतर chat पाहतील त्यांना वाटेल अरे यानेच सांगितल्या या कल्पना (uhoh)

हो.चॅट मध्ये लिहीत राहिलं की जे उच्च पदीय मिटिंग मध्ये असलेले आणि मिटिंग ला न आलेले मॅनेजर्स असतात त्यांना 'अरे हा एकटाच चांगले इनपुट देतोय वाटतं,माहितगार माणूस आहे असं भासवणं हा मूळ उद्देश असतो.

बापरे भयंकर हसले हा धागा वाचून. मानव , छत्री टोचण्याचा किस्सा वाचून माझा एक किस्सा आठवला. माझ्या पर्स मधल्या विणकामाच्या सुया एकदा ट्रेन मध्ये पुढच्या बाईला टोचल्या होत्या,ट्रेन मधून उतरताना. पण त्या चुकून आणि मी तिला मनापासून सॉरी म्हंटलं आणि नंतर सुया पर्स, बॅग मधून अशा बाहेर येणार नाहीत याची खबरदारी घेतली.
मला पण हा शब्द इथेच अत्ता समजला. थॅन्क्स सामो.
माझे पेट पिव्हज - wa grp वर काही जण टाइप केल्यानंतर / पोस्ट केल्या नंतर वळून बघत नाहीत कि काय टायपलय. ऑटो करेक्शन मुळे भलतंच वाक्य आलेलं असतं. आणि मग आपण विचार करत बसायचा कि केहेना क्या चाहते हो.
माझं म्हणणं आहे की जरा वाचून बघा काय लिहीलंय? माबो वर पण

मस्त धागा, बराच उशीरा बघितला!

"मग तू वेळ कशी घालवते ? " हा प्रश्न डोक्यात जायचा.

manipulative, खोट बोलणारे, hypocrites भयन्कर डोक्यात जातात

स्वतःला शहाण समजणारे आणि दुसर्याला कमी लेखणारे, दुसर्याच़ क्रेडिट ढापणारे अशी मन्डळी डोक्यात जातात.

तसच आवळा देउन कोहळा काढायला बघणारे...

माझ्या लिस्ट मध्ये तर इतके जास्त पेट पीव्हज आहेत.. मला वाटायला लागतं, आपल्यातच काही प्रॉब्लेम आहे...
वर बाकीच्या लोकांनी लिहिलेले तर आहेतच माझेही, पण त्यात आणखी भर म्हणजे..
पाय घासत चालणारी लोकं..
दुसऱ्यांच काहीही नं ऐकत मोठ्या आवाजात आणी रेकून बोलणारी लोक..
सतत हॉर्न वाजवणे..
घरासमोर मांडव घालतांना आपण रस्ता अडवतोय ह्याचं भान नसणारी माणसं..
ऑफिस मध्ये कामाची एखादी डेड लाइन महिनाभर आधी सांगून सुद्धा, डेड लाईनच्या आदल्या दिवशी “काल अमक्या तमक्या नातेवाईकला अॅडमिट केलं.. / परवा पासून बरं नाहीय../ इत्यादि इत्यादि..” करणं देणारी..
घरी एखाद्या समारंभाला बोलावलं की “मला त्या दिवशी जमणार नाही मी दुसऱ्या.. तिसऱ्या दिवशी येईन..” असं म्हणणारी माणसं..
आपल्याला कुणी जेवायला बोलावलं की मेन्यू काय करायचा हे (अर्थातच) बोलवणारे ठरवतात. पण माझ्याकडे ती लोकं जेवायला येणार असतील तर मी काय करायचं हे पण तेच सांगणार. (हे असं नातेवाईकांच्या बाबतीत होतं. माझं वय कितीही वाढलं तरी सासर माहेर दोन्हीकडे मी कायम लहानच असणार आहे.)
आणखीही बरीच आहेत..

माझ्या कॉलेज जीवनात (साधारण पद्मिनी कोल्हापुरे, संजय दत्तच्या काळात) असताना स्टारडस्ट मासिक येत असे, आता येते का माहित नाही, पण मी फार आवडीने ते वाचत असे. त्यावेळी अशी मासिके हाच माहिती स्तोत्र (फिल्मी गॉसिपचा.. हाहाहा) असे. पण त्यात एक माय पेट पीव्हज अँड प्लेझर्स अश्या मथळ्यखाली स्टार्स आपले पीव्हज व प्लेझर्स लिहीत. तेव्हा मला हा शब्द कळला होता.

हे आधी कुणी लिहिलं असेल तर माझ्या नजरेतुन सुटले:
सरिता मासिकात "मुझे शिकायत है" असे सदर होते त्यात वाचक आपले पेट पीव्ह्ज लिहून पाठवत व ते प्रकाशित होत.

शर्मिला , ते डेडलाईनला गायब राहणार्या लोकांबद्दल मम.
आमच्याकडे तर एकाने एकवर्ष 28 December ला संध्याकाळी "going to native place because of family emergency " अशी मेल टाकली आणि परत 2 january ला "did not get return tickets . Will resume from 4th " असं कळवलं.
यांना वाटत manager चे केस hair color लावून salt n paper झालेतं.
Medical emergency च्या नावाखाली गायब असणार्या खोट्या
लोकां बद्दल मला अतिशय चीड आहे.त्यांना खरीखुरी medical emergency असली तरी मग मी विचारपूस करीत नाही.

Aanyway , Office मध्ये दांड्या मारण्याची अविश्वसनिय कारणे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

अरे त्याच्याच सुट्ट्या घेतोय ना? कधीही घेईल!
सुट्टी घेताना कारण विचारायची/ सांगायची काय गरज आहे? मी सुट्टी घेतोय, या दिवशी परत येईन. इतकं पुरेसं आहे की! संपल्या सुट्ट्या की पैसे मिळणं बंद होईल. वेठबिगारी कामगार आहे का तो? की सुट्ट्या घ्यायची परवानगी घ्यायची आहे!
तो काम करत नाही वाटलं, तर ताकीद द्या. सुट्टीत फार तर ऑन कॉल रहा सांगा. नाहीतर फायर करा. सुट्ट्या कधीही घ्यायचा हक्क ही द्यायचा नाही तर मग लोक कारण विचारल्यावर असलेच सांगणार.

सुट्टी वेगळी, दांडी वेगळी. सुट्टीबद्दल नो इश्युज. पण दांडी मारुन ऐन वेळी आपली सिन्सिअ‍ॅरिटी जाहीर करु नये.

कुठे जायचा प्रोग्रॅम वेळेवर ठरला तर शॉर्ट नोटिसवर सुट्टी मंजुर होत नसेल म्हणुन वेळेवर दांडीयात्रा करत असतील.

एंड ऑफ इअरला कोणी येईल आणि काम करेल हे एक्सपेक्टेशनच आधी जरा जास्त आहे.
धुगधुगी टिकवायला दिव्याला तेल-वात करण्यापुरतं पाळ्यालावुन ठेवतात. त्यातल्या कोणी टाळमटाळ करू नये. पण त्याच दिवसांत मशाली पेटवून भांगडा करायची मॅनेजमेंटला काय गरज!
मॅनेजमेंट सुट्टी अप्रुव्ह करणार नाही याची त्याला खात्री आहे! आणि त्याला अजुन कामावर ठेवलंय म्हणजे कंपनीला ही त्याची गरज आहे. टाळी एका हाताने वाजत नाही.

यावर माझे 4 आणे:
एका कठीण कामावर 2 मुलं होती.त्यांना काम करायला भरपूर वेळ होता.पण प्रोजेक्ट 'बाह्य कस्टमर बिलिंग' चा नाही(त्याचा नंतर कस्टमर प्रोजेक्ट बनणार होता त्यामुळे हे काम होणं गरजेचं होतं) म्हणून दोघांना रस नव्हता.त्यातला एक मुलगा एका कस्टमर प्रोजेक्ट वर गेला.तेव्हापासून दुसरा मुलगा असंख्य सुट्ट्या घेतोय
1. माझ्या बहिणीची एंगेजमेंट- 3 दिवस सुट्टी
2. माझ्या बहिणीचं लग्न -1 आठवडा
3. चेन्नई पूर-1 आठवडा
4. पुरामुळे 2 आठवडा इंटरनेट नाही
5. व्हायरल ताप आला-1 आठवडा
6. थकवा आला-3 दिवस
7. माझे 2 शितझु आजारी आहेत. -4 दिवस

सर्व कारणं जेन्यूईन असली तरी याचा आउटपुट 'उरलेला 7% कोड कधीच लिहून पूर्ण न होणे' हा आहे.बरं या सुट्ट्यांच्या मधल्या वेळात
'i am uncomfortable with coding, I will take time'
बरं जो भाग लिहून पूर्ण करायचाय त्याची किमान 25 कोड सॅम्पल स्टॅक ओव्हरफ्लो वर आहेत.

मागे टीम्स वर आधी न कळवता फोन करण्याविषयी उल्लेख आलाय. ऑफिसच्या वेळेत, ऑफिसच्या अकाऊंट वर फोन करण्यासाठी परवानगी घेणं ही कर्टसी आहे हे मान्य. पण ती अपेक्षा अवाजवी आहे. ट्रॅडिशनल ऑफिस सेटिंगमधे एखाद्याच्या डेस्क/ऑफिसमधे वर्किंग अवर्समधे जाऊन बोलण्यासारखंच आहे हे.

फेफ, कारण एकदम साधं आहे.कधीकधी ऑफिस मध्ये जवळपास असलेले लोक तो कॉल ऐकावा असे नसतात.किंवा जवळ पण खूप वेगळे कॉल्स चालू असू शकतात.किंवा हेडसेट जोडलेला नसतो.
मिटिंग रूम जवळ असेल तर 2 मिनिटात कॉल घ्यायला तिकडे जाता येतं.
इतक्या साठी कॉल करताना 'कॉल करतोय/करू का' विचारलेलं बरं पडतं.

ही कर्टसी आहे हे मान्य. पण ती अपेक्षा अवाजवी आहे >> +१
तेच टीम्सवर '?' बद्दलही. टीम्सचं सेटिंग बदलायचं राहिलेली जन्ता अमाप असते. अस्मादिक इनक्लुडेड. ते बदललं तरी आपल्याला जे दिसतंय तेच जगाला दिसत असेल का? मला अजिबात खात्री नाही. बरं ते सेटिंग मोबाईल आणि वर्क कंम्युटर (किंवा मल्टिपल इनपुट मधुन) कसला प्रिसिडंस घेतं/ का घेत नाही. हा आणखी एक मोठा ग्रे एरिया. म्हणजे मी गूगल न केलेला एरिया म्हणू फार तर. टीम्सने अल्गो सेट केला असेल.

लाल/ लाल वजा साईन बघुन फारतर थोडं थांबावं. नाही तर '?' टाकावा. आपला प्रश्नही विचारुन टाकावा हे हल्ली माझं मत आहे. असे सगळ्यांना विचारायचे प्रश्न लाल दिवा बघुन थांबायला लागलो तर वाट लागेल डोक्याची. जीरा, मेल, झूम आणि टीम्स इतक्या ठिकाणातलं कधी काय वापरावं. किंवा वापरू नये. टीम्स वर परत १०० टीम्स करुन ठेवतात. त्यात आपल्याला ज्याला सांगायचं आहे तो नेमका त्या ग्रुप मध्ये नसतो. लोक @ वापरायचं विसरतात. आता मी प्रत्येक टीम्सचे सगळे चॅट लाईन बाय लाईन वाचू. जीरा अपडेट वाचू, पर्सनलाईज्ड मेसेज वाचू... का दिलेलं काम करू? एटिकेट्स गेले खड्ड्यात. काम झाल्याशी मतलब असं घायकुतीला आलेला आमचा प्रकार असतो.

आणि ty इ. शॉर्टकट समजले नाही की गूगल करुन आपणही मारू लागावे. शिंगं मोडून वासरात शिरायला काही हरकत नाही.

'कॉल करतोय/करू का' विचारलेलं बरं पडतं. >> खरं आहे. पण चालू कॉल मध्ये कोणाला अ‍ॅड करायचं तर पटकन अ‍ॅड करणं सोपं पडतं. थ्री -वे हॅंडशेक जमतोच असं नाही.

मामी Wink Proud हापिसच्या वेळात माबोईंग करतो तितकं काय कमी आहे!

न विचारता टिम्स वर थेट कॉल करणे हे पेट पीव्ह आहे की नाही हे त्या त्या प्रोजेक्टवर, परिस्थितीवर, वेळकाळ काय आहे, आणि टीम मेम्बर्स मधील नाते कसे आहे अशा मल्टिपल गोष्टींवर अवलंबून असते.

आग लागली असेल (प्रोजेक्टवर काम करणाऱ्याना याचा अर्थ माहीतच असेलच) तर असे कॉल एकमेकांना केले जातात व ते स्वाभाविक आहे. तिथे "कॉल करू का?" वगैरे लक्झरी नसते. कारण आगच तितकी भयंकर असते Lol

>>>>>.कारण आगच तितकी भयंकर असते
Happy
आई गं आय अ‍ॅम मिसिंग इट. देवा कधी जॉब लागणार? टेस्टिंगला काठीण दिवस आलेत. इतके इतके झूम इन झालेत लोकं की अगदी स्पेसिफिक लागतय, जे की माझ्याकडे नाहीये असं काहीतरी. किंवा मग function at() { [native code] }इ अचाट सगळच लागतय. मिडल ग्राऊंडच नाही. प्रचंड कंटाळा आलाय.
एच टी एम एल, सीएसएस, बुटस्ट्रॅप, रिअ‍ॅक्ट, सेलेनिअम सगळच करत बसलेय. परत डेटाबेस, सीक्वेल ब्रश अप आहेच. एजाईल वगैरे तर function at() { [native code] }इच बेसिक आहे आय मीन ते तर फ्रेमवर्क आहे ऑर रादर मेथडॉलॉजी म्हणा. त्याचं काही नाही.
पण इन्टर्व्ह्युच येत नाहीयेत. ३ आलेले फक्त. २ मध्ये गचकले. एक मलाच नको होता.

लेक लहान असताना एका प्रश्नाचा भयंकर राग यायचा मला. ही एकच मुलगी? दुसर्‍याचा केव्हा प्लॅन? मी नाही म्हटलं की मला समजवायचा प्रयत्न. इतकी चिडचिड व्हायची!
आश्चर्य म्हणजे पहिल्यांदा भेटलेले लोकही असे विचारायचे.

हो प्रोजेक्टची आग फारच भडकली असेल तर ठिके, समजू शकेन पण नॉन अर्जंट कामासाठीही डायरेक्ट कॉल लावणारे लोक असतात.

Pages