लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
माझे बरेच पेट पीव्हज कव्हर
माझे बरेच पेट पीव्हज कव्हर झाले आहेत.
हे आडिशनल :
-माझ्याच घरी येउन माझ्या मुलाशी बत्तमिजी करणारे लोकं डोक्यात जातात माझ्या.
-वळण नसणार्या मुलांचे पालक जेंव्हा वो तो ऐसी ही है म्हणतात
-आमचं कुत्र काही करत नाही म्हणत त्यांना आपल्या घरी आणणारे किंवा त्यांच्या घरी आपल्याला बोलवुन त्या कुत्र्याला बांधुन न ठेवणारे पालक
-आपण फारच फनी किंवा सार्कॅस्टिक विनोद करतोय असं समजुन दुसर्यांना अपमानित करणारे
-पार्टी मधे येउन सतत एका नन्तर एक आपण हे रील बनवुया ना, थांब खाऊ नको मला फोटो हवाय इन्स्टा साठी वगैरे म्हणणारे. मला बसुन गप्पा मारायला , गेम खेळायला आवडतात. आहे मी बोरिंग.
-दुसर्यांच्या वजनावर कमेंट करणारे. किती वाळलीस, किती सुटली आहेस, मी ओळखलंच नाही तुला वगैरे वगैरे.
- आजारपणात लोकांना भेटायला जाऊन अमका याच आजाराने गेला, तमक्याने हे औषध घेतलं लगेच बरा झाला असले कमेंट्स करणारे. अशांना नरकात स्पेशल स्थान हवंय
-पगार किती विचारणार्यांसारखाच आणखी एक कसं भागतं तुमचं एवढ्या पगारात विचारणारा ग्रूपही आहे
- आमच्याकडे नवरे काही झालं तरी किचनमधे जात नाहीत. पाणी सुद्ध्हा हातात आणुन द्यावं लागतं वगैरे फार अभिमानाने सांगणारे. उम्म्म ॲक्क्क्युअली ते नाही डोक्यात जात , पुढे तुझा नवरा कसा सगळी कामं करतो म्हणत मला जज करणारे डोक्यात जातात
माजी लिस्ट खूप मोठी आहे.
माजी लिस्ट खूप मोठी आहे.
1) सार्वजनिक वाहनात हेडफोन न वापरता मोबाईल वर गाणी ,कार्यक्रम ऐकणारी लोक डोक्यात जातात.
२) प्रवासात शेजारी बसणारा प्रवासी वेडा वाकडा बसतो खांद्यावर डोकं टेकवत असतो,सीट वर पाय ठेवतो किंवा पुढच्या सीट ला पाय लावून बसतो ही लोक डोक्यात जातात.
३) बस ची सीट जास्त प्रमाणात मागे घेणारे मूर्ख.
ही जमात तर जास्त डोक्यात जाते.
४) लोकल ट्रेन मध्ये शूज,चप्पल सहित पाय पुढच्या सीट बर ठेवणारे तर डोक्याची दही करतात.
माझी ह्या कारणावरून खूप वेळा भांडण पण झाली आहेत.
५) गुटखा, पान खाताखता बोलणारे ह्यांचे थोपाड रंगविण्याची तीव्र इच्छा होते.
अजून खूप आहेत सध्या इतकेच
मानव आणि अनु, तुमचे सगळेच पेट
मानव आणि अनु, तुमचे सगळेच पेट पीव्हज भारी आहेत. त्यात छत्री टोचणार्या बाईचा किस्सा वाचून हहपुवा झाली.>>>>> +१००
<<३) बस ची सीट जास्त प्रमाणात
<<३) बस ची सीट जास्त प्रमाणात मागे घेणारे मूर्ख.
ही जमात तर जास्त डोक्यात जाते>> अशी व्यक्ती आपल्यापुढे असली की त्रास होतो पण शेजारी असली की फायदा. तिने सीट पूर्ण मागे घेतलेली असते आपण कमी, मग झोपेत तिचे डोके आपल्या खांद्यावर येत नाही, आपल्या सिटला बाजूने अडकते. त्यात खड्डा आला की व्यक्ती उठून डोके चोळते, त्यात असुरी आनंद घेण्याचा स्कोप असतो.
"बस खड्यातून गेली आणि आपल्या डोक्याला लागले की आनंद दाखवणारी दुष्ट व्यक्ती" म्हणुन त्यांच्या पेट पिव्हज यादीत आपल्याला मानाचे स्थान मिळते.
अजून एक:
अजून एक:
त्यांना फक्त 'आमच्याकडे डेसपरेशन नाही, हवीच असं नाही, नसली तरी चालते' इतकंच व्यक्त करायचं असतं.
'आम्ही बै अजिबात चहा कॉफीतले नाही' हे वाक्य 'आमच्याकडे दारू/गुटखा/तंबाखू' व्यसन नाही' या सुरात अभिमानाने सांगणारे सर्व जण.बरं यांनी आयुष्यात चहा कॉफी प्यायलीच नाही असं पण नसतं.अनेक सामान्य जनांप्रमाणे दुधाचा रतीब, चहा कॉफी साखरेचे डबे, सिंक मध्ये धुवायला असलेले चहा कॉफीचे ताजे कप पण असतात
शक्यतो अश्या लोकांपुढे चहा/कॉफी/कोणतंही पेय पिणं टाळते.सर्व मजा जिंक्स होते हे वाक्य आलं की.
स्वतः खा, प्या,नका पिऊ, आयुष्यभर हवेवर राहा, नका राहू,पण दुसऱ्याला आनंदात जगू द्या.'आमच्याकडे चहा कॉफीचं प्रस्थ नाही/आम्ही बाई चहा कॉफीतले नाहीच' हे वाक्य अस्थायी आहे, बोलल्याने व्हॅल्यू ऍड होत नाही.
हपा तुमची पोस्ट माझ्या
हपा
तुमची पोस्ट माझ्या डोक्यात बिलकुल नाही गेली.. डोक्याच्या वरुन गेली 
अरुंद रस्त्यावर गाडी उभी करुन
अरुंद रस्त्यावर गाडी उभी करुन वाहतुकीला अडथळा आणणारे लोक माझे पेट पीव्हज. आणी स्वतः मात्र मख्खपणे बघत असतात तुंबलेल्या वाहतुकीकडे. दररोज माझ्या कंपनीकडे जाणार्या रस्त्यावर एक चौक आहे तेथे रोज असे लोक दिसतात.
या एकदा, मजा दाखवतो.
हपा परिशिष्ट मांडलेल्या
हपा
परिशिष्ट मांडलेल्या मुद्यांवर पीएचडी होऊ शकेल एखाद्याची 
मी आता माझे नाव function-at()-{[native-code]}-उल असेच करून घ्यावे म्हणतो. डोक्याला अरेबियन स्कार्फ बांधला कि ते शोभूनही दिसेल
काही खास मित्रमंडळी सुद्धा
काही खास मित्रमंडळी सुद्धा डोक्यात जातात. "बोल रे बोल. मनातली व्यथा सांगून टाक. बोलल्याशिवाय मन मोकळे होणार नाही" असे म्हणून आपल्याला बोलायचे आमिष दाखवतात. आणि आपण आपली व्यथा सांगितली रे सांगितली कि हे मात्र "त्याला तूच कसा जबाबदार" यावर लेक्चर झोडायला सुरु करतात
आपली अवस्था मात्र "अरे, ह्यासाठी मन मोकळे करायला लावले होते?" अशी होते 
चमचे आणि काटे ह्यांनी खाणे
चमचे आणि काटे ह्यांनी खाणे आपल्याला आवडत नाही.
हाताने खाल्ले तर च खाण्याचा आनंद मिळतो.
त्या मुळे सार्वजनिक ठिकाणी असे पदार्थ टाळतो.
आपल्या मुळे बाकी लोक अस्वस्थ नको व्हायला..
पण हट्ट करून तसे पदार्थ मागवत च नाही..
मसाला डोसा हातानेच खाण्यात मजा आहे.
भाकरी घेवड्याच्या ,चवळी च्या,मुगाच्या, वाटण्याच्या, पावट्या, etc.
आमटीत कुस्कुरून खाल्या शिवाय त्या अन्न च आनंद मिळत नाही.
सातारी लोकांचा हाच स्वभाव असतो.
उगाचच आपल्या आवडीवर नियंत्रण ठेवून दाखवण्यासाठी सातारी पुरुष तरी नक्की तयार नसतात.
मग ते अमेरिकेत असू किंवा दुबई मध्ये
हपा
हपा
एखादी खाण्याची गोष्ट कशी खावी
एखादी खाण्याची गोष्ट कशी खावी हे माहित असताना देखील ती आमच्या पद्धतीने खाल्ली तर त्याची चव खूप छान लागते असे ताटावर जेवायला बसलेले असताना सांगणारे खूप म्हणजे खूपच डोक्यात जातात.
पाहुणे जेव्हा जेवायला येतात
पाहुणे जेव्हा जेवायला येतात.आपण प्रेमाने जेवण बनवलेले असते.
आणि पाहुणे जेव्हा तोंडावर नाव ठेवतात.
मीठ कमी आहे, हे ठीक नाही ह्या मध्ये कमी आहे तेव्हा त्रासदायक वाटतात पाहुणे.
जवळचे मित्र बोलले तर चालतं त्यांना बोलता येत जास्त नखरा दाखवू नको हाताने घे मीठ .
पण पाहुण्यांना बोलता येत नाही.
आपण कोणत्या पाहुण्या कडे गेलो की यजमान लोकांची कमी त्यांना तोंडावर सांगणे टाळावे.
काही ही योग्य कारण नसताना
काही ही योग्य कारण नसताना,कोणतीच गरज नसताना गाडी ची अप्पर headlight चालू करून गाडी चालवणारे डोक्यात जातात.
त्यांच्या मुळे खूप लोकांना त्रास होतो
काही कारण नसताना,काही गरज नसताना गाडी ची अप्पर head चालू करून गाडी चालवणारे ..एक तर अडाणी असतात,मूर्ख असतात किंवा गाडी चालवण्याच्या लायकीचे नसतात.
आणि हा प्रकार ग्रामीण भागात जास्त दिसतो.
Two wheeler चालकात जास्त दिसतो.
लायकी नसतो डाऊन payment वर बाईक घेतलेली असते.
Four wheeler गाडीचे चालक ह्या बाबतीत चांगले वर्तन ठेवतात
याचं पुढचं वर्जन म्हणजे फोडणी
याचं पुढचं वर्जन म्हणजे फोडणी करपवलेली आमटी वाढुन मी की नाही जगात भारी आमटी बनवते सांगणारे.
मीठ मागितलं की बरोबर आहे की मीठ. एवढं जास्त मीठ खाऊ नये म्हणत ते न देणारे
तिखट लागलं म्हणून पाणी घेतलं की किती तू पुलचट म्हणत अपमान करणारे.
मुलगा तिखट नसेल खात म्हणून बिन तिखटाची भाजी केलीये. तीच दे त्याला अशी बळजबरी करणारे.
आजकाल मी कोणाकडेही गेले की लोणचं मागून घेते. मला फारच आवडतं लोणचं. घरी खोकल्यामुळे खायला मिळत नाही सांगत. मग काहीही कमी जास्त असलं तरी चालून जातं.
तुमचे पण बरोबर आहे अशी पण लोक
तुमचे पण बरोबर आहे अशी पण लोक असतात
गरज नसताना धाग्यावर
गरज नसताना धाग्यावर
शाखा घेऊन येणारे सुध्दा
डोक्यात जातात .
याचं पुढचं वर्जन म्हणजे
याचं पुढचं वर्जन म्हणजे
ह्याच्या पुढचे वर्जन.
हे गुप्त व्हर्जन आहे.
कशाला म्हणजे कशालाच तिने हात लावला नाही.
बघत बसली पण ताट नाही उचललं.
हे असले संभाषण पण फक्त पाहुणे नातेवाईक असतील तर, .
कामाशी संबंधित लोक असतील तर नाही.
अशी गॉसिप सुरू झाली की
अशी गॉसिप सुरू झाली की हातातले काम टाकुन, झोपायला आडवे झालेले उठून सरसावतात भाग घ्यायला.
>>>>>>> आपली अवस्था मात्र
>>>>>>> आपली अवस्था मात्र "अरे, ह्यासाठी मन मोकळे करायला लावले होते?" अशी होते Proud
अ तुल
>>आम्ही बै अजिबात चहा कॉफीतले
>>आम्ही बै अजिबात चहा कॉफीतले नाही' >> यावर, माझे नाही चालत बॉ चहा शिवाय. आणि बरं परफेक्ट चहा लागतो ब्ला ब्ला... दुपारी जेवण झालं की काम सोडून आधी स्टारबक्स. तिथली डार्क रोस्ट अमेरिकानो पोटात जात नाही तोवर कामाला हातच लावू शकत नाही. इंडियात/ त्या पावण्याच्या गावाला, त्याच्या/ तिच्या आवडत्या खेड्यात... आलं की पहिले स्टारबक्स शोधतो. ... अशी निरर्थक बडबड. आणि मग तुम्ही लोक चहा कॉफी शिवाय कसे राहता. कमालच आहात हा तुम्ही.
ती फारच डोक्यात जाणारी आणि बेअक्कल व्यक्ती असेल तर .. अशी साधी व्यसनं असली की बरं असतं म्हणतात. नसली की लोक दारू ते मेथ काय मनात येईल त्याच्या मागे लागतात असा रिसर्च वाचला हल्लीच. असं बोलून त्यांचा जीव मेटाकुटीला आणायचा.
जास्त खातोस, कमी खातोस, जाडा आहेस, बारीक झालायस.. काय वाट्टेल ते म्हण. चहा कॉफी वर घसरायचं नाय! नाय म्हणजे नायच!
माझे पण पेट पीव्ह बऱ्याच
माझे पण पेट पीव्ह बऱ्याच जणांनी लिहिलेत, त्यात अजून २ पॆसे टाकते
भारताबाहेर राहणाऱ्यांना हा पेट पीव्ह नक्की येत असेल की ,
कुठेतरी भटकत असताना दुसरी इंडियन फॅमिली रस्त्यात भेटते भेटल्यावर अरे इंडियन ? असे झाले की पुढचा प्रश्न किती वर्षे झाली ?-अमुक , म पासपोर्ट झाला ? / PR झाले? त्यापुढे जाऊन तुमचे इथे घर असेल ना स्वतःचे ?-- अरे? अजून आपण भेटून ५ min ही झालेले नाहीत तुम्ही भारतातून कुठून आलात इथे उठे राहता काय करता तुमचे नाव ही विचारले नाहीय आणि लगेच हे प्रश्न ?
आणि
घरात कुठलीही वस्तू चिरायला घेतलेली सुरी न धुता तशीच ठेवणे भले ते फळ , लिंबू , कांदा बदाम काहीही असो
आणि
अनेक फाटे फोडून, अनेक नाकं मुरडून,सर्व ऑपशन्स बाद करून शेवटी एकमत होऊन आता सग्ग्गळं ठरलंय की , कुठल्या गल्लीत /गावात / कुठल्या हॉटेलमध्ये काय जेवायला जायचंय , आणि सर्व सदस्य पायात चप्पल बूट घालून आता निघणार तेवढ्यात , कोणीतरी एक मेम्बर , आणखी घोळ कसा वाढेल याची जास्तीत जास्त खबरदारी घेत १०० वा option सुचवतो जो अतिशय पांचटच असतो पण तरी तेवढ्यात सुचवायचे उगाचच..
माझे पेट पीव्ह - सतत आपले
माझे पेट पीव्ह - सतत आपले पेट पीव्हज सान्गणारे लोक.
ह. पा. न्ची पोस्ट आवडली.
सतत आपले पेट पीव्हज सान्गणारे
सतत आपले पेट पीव्हज सान्गणारे लोक >>
खरंय! स्नो फ्लेक लोक डोक्यात जातात. हे लिहिलं म्हणजे 'मीच माझ्या डोक्यात' इटरेशनच येणार.
हपांचा उपरोध ही पोचला.
'स्नो फ्लेक' हा शब्द आवडलेला
'स्नो फ्लेक' हा शब्द आवडलेला आहे. आधी मी 'फ्रॅजाईल' हा शब्द वापरायचे त्याऐवजी हा छान आहे.
> कुठेतरी भटकत असताना दुसरी
> कुठेतरी भटकत असताना दुसरी इंडियन फॅमिली रस्त्यात भेटते भेटल्यावर अरे इंडियन ? असे झाले की पुढचा प्रश्न किती वर्षे झाली ?-अमुक , म पासपोर्ट झाला ? / PR झाले? त्यापुढे जाऊन तुमचे इथे घर असेल ना स्वतःचे ?-
हे तर काहीच नाही. एका पठ्ठ्याने वरील सर्व प्रश्न विचारून माझा मुलगा एक वर्षाचा आहे या वरून मनातल्या मनात स्कॉलरशिप च्या गणितासारखे क्ष ची किंमत काढून बर्याच उशीरा मुलगा झाला तुम्हाला, हा शेरा मारला होता. beat that !
भारतीय जेवण चमच्याने खाणारे
भारतीय जेवण चमच्याने खाणारे माझ्या डोक्यात जातात.
फ़क्त स्टेटस सिम्बॉल म्हणून प्रवास करणारे..
सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वाजवणारे
हर्पा उपरोधात का होईना
हर्पा
उपरोधात का होईना तुमच्या शुले चुका बघून आसुरी आनंद झाला. 
विकु आणि Anjali cool पोचलं.
ते सगळे एकमेकांना हेच बोलत- विचारत होते. हे पेट पीव्ह नाही. आधी एकदम खरी उत्तरे द्यायचो, आता हसून सोडून देतो नाही तर ट्विस्टेड बोलतो.
मला हे लोक जुदाईतल्या प्रश्न विचारणाऱ्या परेश रावल सारखे वाटतात, त्याच्या कपाळावर पण केसांचं प्रश्नचिन्ह असतं. नवीन आलेले भारतीय व जुने मुरलेले भारतीय अशा कॅटेगरी करता येतील. आम्ही तर ओळखबिळख करूनही घेत नाही, एका वाढदिवसाच्या पार्टीत गेलो तर एकाच ऑफिस मधल्या सगळ्यांनीच फुकटचे जांभळे शर्ट घातले होते, एकदम वांग्याच्या शेतात गेल्यासारखं वाटलं.
पूर्वी भारतात गेलो की
पूर्वी भारतात गेलो की अमेरिकेत पगार किती ? हा हमखास प्रश्न यायचा. उत्तर तयार होते, सर्व कट होउन हातात महिन्याला तीस डोलर्स येतात. ( बायको एक तारखेला पगार काढून घेते व रोज चहाला एक डोलर देते)
तसे खूप सारे पेट पीव्हज आहेत
तसे खूप सारे पेट पीव्हज आहेत . पण लेटेस्ट आठवलेले : मायबोलीचा कोणताही थ्रेड उघडला की जाहिराती पॉप अप करतात. ते इरिटेट होते .
Pages