पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक म्हणजे स्टीलच्या भांड्यांचे न निघणारे स्टिकर्स - विशेषकरून ताटांचे आणि त्याहून विशेषकरून अश्या स्टिकर्स न निघालेल्या ताटांत पाहुण्यांना जेवायला घालणारे.

होय, ते स्टिकर्स भयंकर असतात. अजिबात निघत नाहीत. बहुदा देवाब्राह्मणांच्या साक्षीने चिकटवत असावेत. लग्नात आग्रह करून वाढणे पूर्वी क्यूट असायचे कारण मुळात लाडू जिलेबी वगैरे कधीतरीच खायला मिळायचे. आजकाल 'इतक्या लांब आमच्या घरी आला आहात तर थोडीशी तंबाखू घ्या, निदान गुटक्याची एक पुडी तरी खा. अगदीच काही नाही तर या विड्या ओढा, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' असा भास होतो.

होय, ते स्टिकर्स भयंकर असतात. अजिबात निघत नाहीत. बहुदा देवाब्राह्मणांच्या साक्षीने चिकटवत असावेत. >>>>

कुठलाही स्टिकर काढण्यासाठी ते भांडं धुण्यापूर्वी गरम करा. गरम असतानाच सुरीने अलगद एक कड सोडवून घ्या. अक्खा स्टिकर बर्याचश्या गोंदासहित निघतो. उरलेला गोंद घासून निघतोच. काचेची भांडी असतील तर मावेमध्ये १५ सेकंद गरम करा.

मात्र एकदा भांडं धुतले गेले कि तो गोंद जन्म-जन्मांतरीच्या गाठीसारखा घट्ट बसतो.

>>>बहुदा देवाब्राह्मणांच्या साक्षीने चिकटवत असावेत.
हे भारी आहे.
बाकी ते स्टिकर्स कसे काढायचे हे मला अद्याप माहीत नव्हते खरे.

भारतात: दुकानात भांडी निवडायची. भाव करायचा. आणि दुकानदाराला सांगायचे सगळ्यांचे स्टिकर्स डिंक न उरता काढून दया तरच घेऊ. वाटल्यास भांड्याला पाच रुपये जास्तीचे घ्या.

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटला भेटायला जाऊन अमका ह्या आजाराने गेला, तमका कसा सिरीयस झाला, त्याला कसा व्हेंटिलेटर वर ठेवला, असे किस्से ऐकवणारी मंडळी डोक्यात जातात. तसेच डॉक्टर कोण आहेत असे विचारणे. नाव सांगितल्यावर, कधी नाव ऐकले नाही बुवा असे हावभाव करणे. जणू काही यच्च्ययावत डॉक्टर ह्यांच्या ओळखीचे आहेत.

चल मेल्या पुढे नाहीतर अजुन टोचेन ))) मानवदादा Proud Proud

((विड्या ओढा, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' )))
विकु हसून हसून मरायला झालं ! Proud Proud

नाव सांगितल्यावर, कधी नाव ऐकले नाही बुवा असे हावभाव करणे. >> Proud

या सारखेच म्हणजे "कुठल्या कंपनीत काम करता?" हे संबंध नसलेल्यांनी विचारणे.
हा प्रकार कधी कधी फारच विनोदी होतो. त्यातला एक:
गावात त्यांच्या सर्कलमध्ये त्यांना फार ज्ञानी समजणाऱ्या काकांनी मला एकदा हा प्रश्न विचारला होता. माझ्या त्यावेळच्या कंपनीचे नाव फायझरशी मिळते जुळते होते, फक्त एक अक्षर उच्चारात वेगळे. ते सांगितल्यावर त्यांनी "फायझर ना?" असे विचारले. मी नाही म्हणुन परत कंपनीचे नाव सांगितले. आता मी नाही म्हटल्यावर त्यांच्या चेले मंडळीत त्यांची नाचक्की झाली असती. म्हणून त्यांनी घोडे दामटत विचारले "जर्मन कंपनी ना?"
"हो".
"मग फायझर असाच तर उच्चार आहे."
त्यांनी मला स्वतःच्या कंपनीचे धड नाव माहीत नसलेला मुर्ख सिद्ध करण्याचे ठरवले होते.
मी नाही हो, फायझर मला माहित आहे ती नाही असे सांगुन जाऊ लागलो. मागे त्यांनी "त्यांचीच कुठली ब्रँच असेल" असे म्हणुन आपल्या चेल्यांपुढे आपली प्रतिमा ढळु दिली नाही.

(ते फायझरचा उच्चार पफायझर करत नव्हते याबद्दल आदरही वाटला होता मला.)
-----

अगदीच काही नाही तर या विड्या ओढा, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत' असा भास होतो.>> हे मिसले होते मी.
विकु Biggrin

>>>>>>>"त्यांचीच कुठली ब्रँच असेल" असे म्हणुन आपल्या चेल्यांपुढे आपली प्रतिमा ढळु दिली नाही.
मानव Lol

बाई गाडी विकत घेणार आहे, चालवणार आहे, ती काही प्रश्न विचारतेय हे स्पष्ट दिसून तिला पुर्ण इग्नोर मारून तिच्या बरोबर आलेल्या पुरुषाला फक्त त्याच्याकडे बघून सर्व माहिती आणि पूर्ण महत्व देणे. एका मी घेणार असलेल्या छोट्या कार च्या टेस्ट ड्राईव्ह ला आलेला सेल्समन कारमध्ये मागे सतरंज्या ठेवल्यात म्हणून मला रस्त्यावर सोडून फक्त नवऱ्याला बाजूला बसवून टेस्ट ड्राईव्ह ला घेऊन गेला Happy मग मी त्याला रिव्ह्यू पण त्या मागे ठेवलेल्या सतरंज्यांच्या लायकीचाच दिला.
>> एका मोठ्या कंपनीच्या सीईओ कडून एका मोठ्या deal च्या वेळी समोरचा माणूस तिच्याशी न बोलता तिच्या subordinate शी बोलत राहिलेला - त्याचा किस्सा सांगितलेला.

ती म्हणाली मी शांत बसून राहिले. सगळं झाल्यावर तो म्हणाला की decision काय आहे तेव्हा तो रिपोर्ट करणारा माणूस म्हणाला - मला नको तिला विचारा तेव्हा समोरचा माणूस दचकला.

नानबा विपू बघ प्लीज. तू काय फक्त एका मिनीटाकरता येतेस का गं? डोन्ट यु सी युअर विपू??? कमाल आहे. असो.

भारी आहेत किस्से !
स्टिलिन्ग द थण्डर वाले तर डोक्यात जातात...काहीही सान्गा लगेच माझ काय भारी
भारतात ट्रॅफिक लाइटला सगळे युद्धाला निघाल्यासारखे त्या रिव्ह्र्स काउन्टीन्गची वाट पाहताना इम्पेशटली गाडी भुरभुरवत थोडे थोडे लाइन सोडून पुढे पुढे येतात ते भयकर चिड आणणारे आहे...इथेही ट्रेफिक लाइट ग्रिन झाल्या झाल्या पुढच्या मिलिसेकदात गाडी पुढे गेली नाही तर लोक लगेच हॉन्क करतात..
लेन चेन्ज करताना सिग्नल न देणारे डोक्यात जातात..सकाळी शाळा-ऑफिसच्या वेळात निवान्त २०-२५ने पॅरेलली गाडी चालवुन लेन अडवणारे...

नानबा यांनी वेगळ्या दृष्टिकोनाच्या पीव्हज शेअर केल्यात.
असे होताना पाहिले आहे, आणि अनुभवले आहे.

त्याच्या उलट हॉस्पिटलमध्ये आमच्या रुग्णाचे पथ्य पाणी सांगायचे असेल तर वहिनींना बोलवा. कारण हे स्त्रियांचं काम. बायकोने नाही यांनाच सांगा म्हटले तर आश्चर्य डोळ्यात, काय ही बाई ! लूक.

मला नको तिला विचारा तेव्हा समोरचा माणूस दचकला. >>> असा एक किस्सा ऐकला आहे - एक गोरा माणूस व त्याचा देशी बॉस भारतात कोठेतरी गेले होते तेव्हा तेथे तो गोराच बॉस आहे असे समजून सगळे याला तु.क. देत होते Happy

लेन चेंज करणार्‍यांत एक वैताग ब्रीड आहे. लेन बदलताना गाडीचा एक दशांश भाग आपल्या लेन मधे तसाच ठेवत चालवणे. किंवा कमालीची हळू लेन बदलणे. म्हणजे आपल्याला वेग कमी करावाच लागतो.

चॅटवर नुसतेच बनियन घालून बसणारे वा घरात नुसतीच बनियन घालून वावरणारे, मठात नुसत्या तोकड्या पंच्यात वावरत वाढणारे .....

वरचे बरेचसे अगदी अगदी. Happy

माझे ट्रॅफिकचे पेट पीव्ह-
स्वतःचाच 'राईट ऑफ वे' माहिती नसलेले लोक. आपण त्यांचा हक्क आहे म्हणून थांबून रहातो, ते आपल्याकडे बघतात आपण त्यांच्याकडे बघतो, तरी ते निघत नाहीत.
उगाच 'निगाहें मिलाने को जी चाहता है' सिच्युएशन तयार होते. Proud मग आपण निघायला गेलो की तेही ताबडतोब निघतात. हे ट्रॅफिक सर्कलला/ राऊंड अबाऊटला होते.

आपल्याला राईटला वळायचे असते तेव्हा सरळ जाणाऱ्यांना रेड लाईट असतो व शेवटचा माणूस इतका गॅप ठेवून मागे कार थांबवतो की आपला उजवीकडे जाणारा रस्ता ब्लॉक होतो व आपल्याला त्यांना ग्रीन सिग्नल मिळेपर्यंत थांबून रहावं लागतं. हे रोज होतं.

-----
बाकी घरातले 'पेट पीव्ह' काय सांगू, मी आदिमानवांसोबत रहाणारी एकटीच सेपियन आहे. शिवाय घरात एक कुत्रा आहे.

न्यु यॉर्कमध्ये नो राईट ऑन रेड आहे. त्यामुळे ही सिच्युएशन येत नाही पण तू म्हणतेयस ते अगदी नीट कळतय.
>>>>उगाच 'निगाहें मिलाने को जी चाहता है' सिच्युएशन तयार होते.
खी: खी: 'अस्मिता टच'

इतक्या लांब आमच्या घरी आला आहात तर थोडीशी तंबाखू घ्या, निदान गुटक्याची एक पुडी तरी खा. अगदीच काही नाही तर या विड्या ओढा, नव्या सुनेने हौसेने वळल्या आहेत>>
epic Biggrin

Pages