पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाताच्या प्रकाराबाबत लोकांना ठराविक गोष्टी ठराविक पद्धतीनेच खायला मजा येत असावी.. जसे माझ्याबाबत,
फ्राईड राईस, नूडल्स, सलाड वगैरे - फोर्क किंवा चॉपस्टिक्स
पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी वगैरे - चमचा
पुलाव, बिर्याणी, वरणभात किंवा कुठलाही रस्सा आणि भात, फोडणीचा भात - हाताने

मोबाईल कसा म्यूट करायचा, विशेषतः सभागारात असताना..... हे न माहित असणारे सर्वजण माझ्या डोक्यात जातात....

बरेचदा सिनियर सिटीझन्स ना ते ऐन वेळी फोन आल्यावर जमत नाही.पिशवीत कुठेतरी असलेला मोबाईल शोधून ऑफ करेपर्यंत गोंधळ होतो.कार्यक्रम चालू होण्याआधी शांतपणे सांगून त्यांना म्युट/ऑफ करायला वेळ दिल्यास करतात.मुख्य आगाऊ स्वतःला महत्वाचे समजणारे नॉन-सिनियर सिटीझन्स असतात ज्यांना आपण 3 तास प्रत्येक फोनवर भरपूर डिटेल्स मध्ये बोललंच नाही तर जग बुडेल असं वाटतं.

बरेचदा सिनियर सिटीझन्स ना ते ऐन वेळी फोन आल्यावर जमत नाही.पिशवीत कुठेतरी असलेला मोबाईल शोधून ऑफ करेपर्यंत गोंधळ होतो
>>>> अगदी खरे. विशेषतः हातातल्या पिशवीतल्या अगदी आतल्या कप्प्यात मोबाईल सांभाळून ठेवलेला असल्याने काढेपर्यंतच वेळ जातो.

>> तुमच्या रांगेतले ज्यांना घरी जायची घाई लागली असेल ते तुमच्या तंगड्यातून पास होताना काय हे मेले अजून बघत बसलेत म्हणून चरफडत जात असतील

Lol होय असाही रिव्हर्स पीव्ह असू शकतो

>> मोबाईल कसा म्यूट करायचा, विशेषतः सभागारात असताना

शिवाय काहींना स्क्रीनचा ब्राईटनेस कमी करायचा असतो, विशेषतः थिएटरमधल्या अंधारात, अन्यथा आजूबाजूच्या लोकांना डोळ्याला त्रास होतो हेसुद्धा कळत नाही. "मेसेजेस पाहत आहोत, आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायचे काहीच कारण नाही" अशा अविर्भावात असतात हे लोक.

काही जण फ्लॅश ऑन करून व्हिडियो शूटिंग करतात.. फ्लॅश ऑन असल्याचे त्यांच्या खिजगणतीत नसते.... सभागारात प्रखर प्रकाशाचा पात्रांना काय त्रास होत असेल, प्रेक्षकांना काय त्रास असेल याची जाणिव नसणारे डोक्यात जातात

>>>>>>>म्हणजे घरी असताना हाताने भात खाल्ला तर चालते का Lol
घरी तर मनमानीच असते की. घरी कोणाला बोलणार. पण पातळ आमटी, वरण वगैरे + भात चमच्यानेच खाल्लेला प्रेक्ष्णिय दिसतो असे माझे मत आहे.

मला या काही गोष्टी डोक्यात जातात
चप्पल घासत चालणारी माणसे , वॉश बेसिन च्या नॅपकिनला ,अंग पुसायचा टॉवेल आहे हे समजून हे समजून तोंड/पाय पुसणारी माणसे (म्हणजे नाक वगैरे शिकवरून पुसणार ... यक्क... अशी माणसे घरात आहेत माझ्या ), साऊथ इंडियन ज्या प्रकारे मुठीत भात घेऊन खातात तश्या पद्धतीने खाणे , वॉश बेसिन मध्ये साधा गुळाना करताना बदा बदा पाणी इकडे तिकडे उडवणारी माणसे , ताटात अन्न टाकणारी माणसे , रॉंग side ने येऊन वर मिजासखोरीचा लूक देणारी जणू काही wrong side ने चालवणे हा जन्म सिद्ध हक्क आहे असे दाखवणारी माणसे , रांगेमध्ये मधून घुसून पुढचा नंबर पटकवणारी माणसे यात बहुदा ज्येना असतात ( किंवा गुजराथी मारवाडी माणसे . सॉरी टू से हे बघितले आहे ) . दुसरा आपले बोलणे ऐकतो आहे हे पाहून पल्लाहळ लावणारी माणसे (यात नवऱ्यचा नंबर आहे ) चटकन मुद्द्यावर न येणे . खूप दिवसाने भेटल्यावर कितीत बारीक/जाड झालीस असे म्हणणारी लोक .,मोबाइल वर न्युज , youtube किंवा तत्सम विडिओ स्पीकर वर बघणारी माणसे, याना मात्र मी सोडत नाही तोंडावर सांगते आवाज कमी करा किंवा त्रास होतो आहे बंद करा , बहुतेक वेळा लोकांना ( जे असे करतात त्यांना) हे अनपेक्षित असते थांबतात तिथे. ,माझा असा अनुभव आहे कि लोकांना नम्रपणे आणि ठामपणे सांगितले तर ऐकतात फक्त सांगन्याचे धाडस पाहिजे.

अरे मला का देजावू होतंय.. अशा टाईपचा एक धागा होता बहुतेक
पण जाऊदे नवीन टायटल अंतर्गत लोकं पुन्हा नवीन उत्साहाने खटकणार्‍या गोष्टी लिहितात Wink हघ्या.

तुझ्याकडून खुप नवीन शब्द कळतात सामो... हा पण शब्द माहित नव्हता.

माझे काही

१. आपण बोलत असताना समोरच्याने मोबाईलकडे /अ‍ॅपल वॉच कडे बघत बसणे. नंतर काय झालं काय झालं, काय म्हणत होती वगैरे विचारणे.
२. शॉपिंग कार्ट मधेच कुठेतरी सोडून रॅकवरच्या गोष्टी बघत बसणे, दुसर्‍यांच्या वाटेत अडथळा होतोय याचं भान नसणे.
३. स्पीड लिमिट पेक्षा हळू ड्राईव्ह करणारे (स्पेशली सिंगल लेन... मागे भलीमोठी लाईन लागते मग)
४. फोनवर (पलिकडच्या बाजूचे ) बोलता बोलता खाणारे, चहा पाण्याचे जोरात घुटके गिळणारे, ढेकरा देणारे (एक्स्क्युज मी न म्हणता)

बादवे, इथल्या कोट्या आणि काही कमेंट फार जबरदस्त आहेत.... खूप मनापासून हसले.

"बेत काय करावा" या धाग्यावर बेत सोडून संक्रांतीच्या वाणाची चर्चा सुरू करणे - हे पेट पीव्हज मध्ये येतं का? Wink

बेत आणि पोट याचा संबंध असल्याने,
फारेएण्ड यांच्या भाषेत हे चपखल 'पेट' पिव्ह आहे.

मॉल मध्ये पेमेंट करताना बऱ्याच वस्तूंचे बार कोड त्यांच्या त्या स्कॅनर ने स्कॅन होत नाहीत...त्या मुली दोन तीनदा प्रयत्न करून मग हाताने लिहितात...तेव्हा अगदी तिडीक जाते डोक्यात!
आधीच खूप उशीर झालेला असतो, रांगेत थांबावे लागलेले असते, आणि त्यात हे!

हा खूप छान धागा आहे नेहमीप्रमाणे सामो Happy प्रतिक्रिया अजून वाचल्या नाहित. नंतर भर घालेन.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा+१११
बायकांनी स्वयंपाक करायचा, पुरुषांची पंगत आधी बसणार, त्यांना गरम गरम वाढून द्यायचं, वाकावे लागणे, कुणाच्या ताटात किती आहे वगैरे पाहणे, आग्रह करणे, आणि शेवटी थंडगार जेवण कसेतरी पोटात ढकलणे.
>>>>>

अगदीच. हे फार डोक्यात जाते. ह्या धाग्यावर प्रतिक्रियांमधेच लोकांनी माझे ही पेट पिव्ह्ज लिहून टाकले Happy आता मी काय लिहू?

पगार विचारणे...अगदीच मी शॉक्ड झालेले आधी असं विचारलं तेंव्हा. आणि उद्देश म्हणाल तर अमेरिकेतल्या अमुक तमुक च्या पगारा शी तुलना करून आपण अगदी ह्याSS आहोत की किमान आदर देण्या योग्य आहोत ह्याचे मुल्यमापन Sad

वस्तू घेऊन कपाटाचे दार तसेच उघडे टाकणे, पदार्थ घेऊन डबा झाकण तसेच अर्धवट बंद करणे त्याने उरलेला पदार्थ सांदळणे, वापरून झाल्या वर तोंड पुसायचा टॉवेल तसाच गड्डी केल्या सारखा ठेवणे. पुढच्याने वापरायला घेतला तर तो ओलसर असणे(पसरवून न ठेवल्याने) असे अनेक.
वस्तू /पुस्तके घेऊन ती परत न देणं, असे करणार्यांशी तर मी हळू हळू संबंध कमी करत जाते Sad फार वाईट अनुभव आहेत अशांचे आणि त्यांना वस्तू परत मागणे उर्मटपणा वाटतो आपला Sad

सारखे मी मी मी आणि माझे माझे यापलीकडे बोलता न येणारी माणसे प्रचंड संख्येने संपर्कात येतात.>>> होय प्रत्यक्षात ही आहेत . माबो वरही आहेत Sad

पगार विचारणे >> अगदी. दुसऱ्याची कोणतीही नवीन वस्तू बघितली की "कितीला घेतली" असे विचारणारे सुद्धा ह्याच प्रकारात मोडतात. अगदी नवीन फ्लॅट घेतला किंवा घरात इंटिरियर करून घेतल्याचं कळलं तरी " कितीपर्यंत गेलं" विचारणे.

आशु, अगदी

'कितीला घेतली' मध्ये मी आहे, पण शक्यतो अगदी जवळच्या लोकांनाच विचारते Happy
मी माझा ममवभो बराच कमी केलाय गेल्या काही वर्षांत.

मीही हा पेट पीव्ह्ज शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि गूगल केला. हे आहेत माझे पेट पीव्हज -

१. मी ज्यांच्या डोक्यात जातो, ते लोक माझ्या डोक्यात जातात.
२. गोष्टी कॉम्प्लिकेट करणारे डोक्यात जातात.
३. एखाद्या शब्दाचा अर्थ न कळल्यावर ऊठसूट गूगल करणारे डोक्यात जातात.
४. हिप्पोक्रॅटिक लोक डोक्यात जातात.
५. मराठी प्रतीशब्द माहित असुनी इंग्रजी शब्द वापरणारे डोक्यात जातात.
७. निट व्याकर्ण येत असुनी निट न लिहिणारे डोक्यात जातात.
८. त्र च्या जागी ञ वापरणारे मिञ डोक्यात जातात.
९. एन्युमरेटेड लिस्टमध्ये क्रमांक लिहिताना मध्येच एक आकडा गाळून टाकणारे डोक्यात जातात.
१०. अ पुढे त लिहिताना function at() { [native code] }अ होते हे माहीत असूनही function at() { [native code] }उल यांचं नाव function at() { [native code] }उल असं लिहिणारे डोक्यात जातात.

परिशिष्ट
पहिलं वाक्य, ३ आणि ४ मुद्दे यांच्या त्रिवेणी संगमामुळे मी माझ्या डोक्यात जातो.
२-५-४, ५-७-४, ९-६-४ ह्या त्रिवेणी संगमांमुळे आणि ७-४, १०-४ या जोड्यांमुळे मी माझ्या डोक्यात जातो.
परिशिष्ट आणि २ मुळे मी पुन्हा माझ्याच डोक्यात जातो.
वरील वाक्य आणि १ मुळे मी माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात जातो.
वरील वाक्य आणि २ मुळे मी माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात जातो.
वरील वाक्य आणि १ मुळे मी माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्यामाझ्या डोक्यात जातो.
वरील वाक्य आणि २ मुळे मी माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात गेलेल्या माझ्या डोक्यात जातो.

गावी शेजारच्या एक काकू होत्या. आम्हा भावंडांपैकी कोणी मंडईतून भाजी आणली की त्या आम्हाला थांबवून पिशवी उघडून काय काय भाजी आणली पहायच्या. इतरवेळी हे हसण्यावारी नेले जायचे पण चातुर्मासात पंचाईत, कांदे आणलेले सगळ्यांना कळणार. मग चातुर्मासात कांदे आई किंवा बाबा आणायचे, त्यासाठी मंडइत जायची गरजही नसायची.
--
हपा भारीच Lol

Lol हपा.

४. हिप्पोक्रॅटिक लोक डोक्यात जातात. >> हे सगळ्यांच्याच जात असणार. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण नाही हिप्पोक्रॅट पण इतर कोणाच्या मते तो असू शकतो/ती.

हे सगळ्यांच्याच जात असणार. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाला वाटतं की आपण नाही हिप्पोक्रॅट पण इतर कोणाच्या मते तो असू शकतो/ती ते. >>> हो आणि ही पण एक हिपोक्रसीच आहे ना (स्वतः हिपोक्रिट असून इतरांना हिपोक्रिट म्हणून डोक्यात घालवायचं)? म्हणून तर शेवटची मोठी होत जाणारी वाक्यं खरी ठरतात.

फायनली एक पेट पीव्ह सापडलं मला
नाव सांगितले तरी आधी आडनाव विचारणारे डोक्यात जातात.
आणि हे कुणी महाराष्ट्रीयन इकडे भेटले कि हमखास विचारतात.

ह पा Lol

आडनाव विचारणारे कोणत्या तरी हेतूने(जर तरुण असले तर हा/ही पंटर फेसबुक लिंकडीन इंस्टा वर बघून होमवर्क करू/सेलर्स असले तर कस्टमर किती तगडा आहे याचा bgv करून त्याप्रमाणे भारी प्रॉडक्ट आधी दाखवू/60प्लस लोक असतील तर पुढचा प्रश्न 'अमुक अमुक आडनाव म्हणजे तुम्ही कुठले/कोणत्या गावचे' हा येऊ शकतो./70 प्लस असतील तर 'आपल्यातले आहेत का' हे तपासून पुढच्या गप्पा स्ट्रॅटेजी ठरवणे हा उद्देश.काही जण 'फोन मध्ये किंवा ओळखीत या नावाचे खूप जण आहेत त्यामुळे पूर्ण नावानिशी लक्षात ठेवणं बरं' या मेमरी गेम मध्ये अडकलेले असतात.) विचारत असतात.एनी वे आपण सांगितलं नाही तरी त्यांना कळणार असतंच.
'आपल्यातले' वाल्याना 'माझा आडनावावर विश्वास नाही' असं चक्रम उत्तर देण्याची महत्वाकांक्षा आहे.पण ऐन वेळी सणसणीत उत्तरं सुचत नाहीत.

बरेच जण सगळे असे प्रश्न विचारतात, विचारायचे असतात, आपण सुद्धा सगळ्यांसारखेच आहोत हे दाखवायलाही विचारत असतील.

मानव आणि अनु, तुमचे सगळेच पेट पीव्हज भारी आहेत. त्यात छत्री टोचणार्‍या बाईचा किस्सा वाचून हहपुवा झाली.

हपा Lol

हे सगळे समोरासमोर ठेवलेल्या आरशांमधल्या डोक्यांच्या प्रतिबिंबामधे स्टिकने किंवा लेझर पॉइंटरने अचूक डोके दाखवून हपा प्रत्येक वाक्याला नक्की कोणत्या डोक्यात जातो हे सांगत आहे असे डोळ्यासमोर आले Happy

Pages