लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
आपण नम्रपणे सांगतो की
आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात >>>> मग कशाला सांगायचं असं ? सरळ सांगा की काढा चप्पल म्हणून ! मी सांगतो.
माझा सगळ्यात मोठा पेट पीव्ह म्हणजे मुंबईला बॉम्बे म्हणणं.. विशेषतः "मद्रासी" लोकांनी ह्या बद्दल मी ओळखीच्या लोकांबरोबरच आमच्या ऑफिसमधला व्ही.पी., फ्लाईटचा कॅप्टन, चेकईन काऊंटर वरची लोकं वगैरे बर्याच जणांना फंडे दिले आहेत.
उलट चप्पल (तळ वर अशी पडलेली) सरळ न करणे. >>> अगदी
>>>>सरळ सांगा की काढा चप्पल
>>>>सरळ सांगा की काढा चप्पल म्हणून !
खरे आहे.
अन्न टाकणाऱ्या लोकांचा मला
अन्न टाकणाऱ्या लोकांचा मला प्रचंड राग येतो. आपल्या पोटाचा अंदाज आपल्याला असलाच पाहिजे. विशेष करून get togethers, partya etc ना असलं भसा भस घेऊन, नंतर खूप झालं म्हणून त्याला कचऱ्या ची टोपली दाखवणारी जनता तर अगदी डोक्यात जाते. अरे तुमच्या घरी असाल तर तुम्ही असं सगळं पानात घेऊन टाकून देता का. मग दुसरीकडे फुकट मिळतंय म्हणून हा माज का?
वस्तू घेऊन झाली कि कपाट, ड्रॉवर etc उघडे टाकून जाणे फार डोक्यात जाते. आमच्या घरात नवरा आणि मुलगा दोघांनाही ही सवय आहे त्यामुळे ते आळीपाळीने डोक्यात जातात. आणि बाकी वेळ ओट्या च्या वरचे कपाट, भिंतीनंतर ब्लाइंड कॉर्नर ला असलेले कपाट अशी त्यांनी ओपन ठेवलेली दार डोक्यात जातात i mean डोक्याला आपटतात.
पेट पीव्हज हा शब्द आधी माहीत
पेट पीव्हज हा शब्द आधी माहीत नव्हता. शब्दकोशात नवीन भर
पण छान धागा आहे. एकेकाची लिस्ट वाचताना यातले आपण काही करतो का हे नकळत पडताळले जात आहे
मला तरी आता चटकन काही आठवत नाहीये, किंवा सध्या अशी काही लिस्ट नसावीच. एका अर्थी हे चांगलेच वाटत आहे की आपण आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या अश्या छोट्या छोट्या गोष्टीचा त्रास करून घेणे सोडले आहे.. आणि हे जाणीव पूर्वक सोडले आहे.. तर जुने आठवावे लागेल.. उद्या आठवून लिहितो. तूर्तास शुभरात्री
वर उल्लेख आलेल्या अनेक गोष्टी
वर उल्लेख आलेल्या अनेक गोष्टी खटकतात, पण अगदी डोक्यात जाव्यात अशा दोनतीनच गोष्टी असतील.
एक नक्की. मोबाईल पुढे लावून त्यावर गूगल मॅप्स चालू ठेवून जाणारे ( रिक्षा, टॅक्सी, स्विगी/ झोमॅटो/ ब्लिंकिट/ पिझ्झा हट आणि तत्सम लोक). या लोकांना आजूबाजूच्या वाहनांची काही पर्वाच नसते. त्यांना आपल्या फोनवर दिसणारा रस्ताच फक्त खरा वाटतो आणि त्या रस्त्यावरून जाण्याचा आपल्यालाच फक्त हक्क आहे अशा आविर्भावात ते आक्रमकपणे पुढे जात असतात. इतरांनी दाखवलेले इंडिकेटर त्यांना महत्त्वाचे वाटतच नाहीत. अक्षरशः कानाखाली मारावी इतका राग मला या लोकांचा येतो.
मला मायबोलीवरच्या खटकणार्या
मला मायबोलीवरच्या खटकणार्या गोष्टी.
उगाचच्या उगाच आधीचा प्रतिसाद quote करून उत्तर देणं. हे प्रत्यक्ष पाहिलं आहे - वाहत्या धाग्यावर जेवलास का विचारल्यावर पुढच्याच प्रतिसाद जेवलास का quote करून हो म्हटलंय.
तसंच कोणाला +१ करायचं असेल तर, आभार मानताना अख्खा दहा बारा ओळींचा प्रतिसाद quote करणं.
काही लोक तर त्यात <<< हेही वापरत नसत, त्यामुळे आपण तो नवा मजकूर समजून मन लावून वाचावं आणि मग quote आहे , हे समजावं असं होतं.
आपल्या लेखनावर प्रतिसाद आला रे आला की त्याला धावत येऊन उत्तर देणं. प्रतिसाद सहमतीचा, कौतुकाचा असला तर ते जास्तच खटकतं.
वर प्रतिसादांत आलेल्या अनेक गोष्टी खटकतात.
अंकल हा शब्द सर या अर्थी वापरला जातो, असं दिसतं. आँटी मॅडम या अर्थी असावा. सर मॅडम फक्त ऑफिसांत, इतरत्र अंकल आँटी.
आमच्या वरच्या = तिसर्या मजल्यावरची शेजारीण नवरा , मुलगे घराबाहेर पडून एक मजला उतरल्यावर किंवा अगदी रस्त्यावर पोचल्यावर हाका मारून हे घेतलंस का, ते घेतलंस का असं विचारते.
तिची नणंद बरोबर याच्या उलट. जवळजवळ रोज. तीन मजले खाली उतरून हाका मारून हे दे, ते दे असं सांगणं .
सार्वजनिक ठिकाणी , उदा: डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये , बस ट्रेनमध्ये फोनवर मनसोक्त बिनकामाच्या गप्पा मारणारे लोक.
आपण फोन करून हां बोल असं म्हणणारे.
माझी एक गोष्ट इतरांना खटकत असे , कोणीतरी सांगितल्यावर बदल केला. फोनवर कामाचं बोलून झालं की मी सरळ कट करत असे. आता ठेवू का? असं विचारतो.
माझी सगळ्यात जास्त चिडचिड
माझी सगळ्यात जास्त चिडचिड पेट्रोल पंपावर होते...पेट्रोल भरल्यावर पैसे द्यायचे आहे....पेट्रोल टाकीचा ची नॉब उघडल्याशिवाय पेट्रोल भरता येणार नाही हे माहीत नसल्यासारखं पेट्रोल भरणाऱ्याच्या समोर येऊन उभ राहील की मग पेट्रोलची टाकी उघडणार ..पेट्रोल भरून झालं की मग खिशातून किंवा पर्समधून पैसे किंवा कार्ड काढणार....जसे काही हे एकटेच आहेत पंपावर..मागची रांग थांबलीये ह्याच्याशी काही घेण देण नसत...
मस्त धागा.
मस्त धागा.
बेसिनमध्ये हात धुतल्यावर ते तिथेच बेसिनमध्ये न झटकता अथवा नॅपकीनला न पुसता बाजूला फरशीवर झटकणे.
जेऊन झाल्यावर बेसिनमध्ये तोंड धुतल्यावर अन्नकण बेसिनवर दिसणार नाहीत अशी काळजी न घेणे.
वॉशरूम वापरल्यावर तशीच खराब, ओली, सीट स्वछ न करता सोडणे.
कॉमन वॉशरूममध्ये पुरुषांनी स्त्रियांचा विचार न करता सीट खराब करून ठेवणे.
स्वयंपाकघरात शिरल्यावर हात न धुता जेवणाच्या भांड्यांना हात लावणे.
बाहेरून आणलेल्या पिशव्या वगैरे ओट्यावर ठेवणे.
अनेक मित्रमंडळी गप्पा मारत असताना एका/एकीनंच स्वतःकडे फोकस वळवून स्वतःसेंट्रिक गप्पा मारून इतरांना बोअर करणे.
याचाच उपप्रकार म्हणजे आपलं आगाऊ मूल आपल्या मित्रमंडळींच्या गप्पात भाग घेऊन अति बोलत आहे हे लक्षात न घेणे किंवा लक्षात येऊनही 'कसं गं माझं बबडं चुरूचुरू बोलतंय' असा मायेचा भाव डोळ्यात घेऊन बसणे.
व्हॉट्सअॅप गृपात सतत आपले फोटो टाकणे, सतत आपल्या बद्दल बोलत राहणे आणि गृप monopolize करणे.
सामो तुझ्या या धाग्यामुळे
सामो तुझ्या या धाग्यामुळे अनेकांच्या अनेक दुखर्या नसांना वाचा फोडली जातेय.
एकंदरीतच सिव्हीक सेन्सची फार
एकंदरीतच सिव्हीक सेन्सची फार बोंब आहे आपल्याकडे.
रस्ता अडवून उभे राहणे?चालणे कुठेही बघायला मिळेल.
लिफ्ट आली की त्यातून बहुतकरून माणसं बाहेर पडतात आधी हे वर्षानुवर्षे अनुभवुन सुद्धा लिफ्ट समोरच घोळक्याने उभे रहाणाऱ्या लोकांना कळत नाही. मग लिफ्टचे दार उघडले की " अरेच्या असं कसं! कसे काय हे लोक बाहेर येतात?काहीही!" अशा अविर्भावात कशीबशी त्यांना वाट करून देणार.
अजुन एक प्रकार म्हणजे गाडीला रिव्हर्स गिअर हॉर्न लावणारे. आणि त्यात आणखी वात म्हणजे रिव्हर्स गिअर टाकला की हा हॉर्न वाजणारच, बंद नाही करता येत. हा हॉर्न लावलाच तर खरं तर पुढचा हॉर्न वाजवतात तसे हवा तेव्हाच पुश बटन दाबल्यावर वाजेल असा लावायला हवा.
--
मामी
लिफ्ट आली की त्यातून बहुतकरून
लिफ्ट आली की त्यातून बहुतकरून माणसं बाहेर पडतात आधी हे वर्षानुवर्षे अनुभवुन सुद्धा लिफ्ट समोरच घोळक्याने उभे रहाणाऱ्या लोकांना कळत नाही. मग लिफ्टचे दार उघडले की " अरेच्या असं कसं! कसे काय हे लोक बाहेर येतात?काहीही!" अशा अविर्भावात कशीबशी त्यांना वाट करून देणार. >>> अगदी.
शिवाय भारतीय लोकांची अ ति श य
शिवाय भारतीय लोकांची अ ति श य वाईट सवय म्हणजे रांगेत चिकटून उभे राहणे. जसं काय दोन-पाच इंचाची गॅप दिसली तर दुसरं कोणी येऊन मधेच घुसेल. पर्सनल स्पेस कशाशी खातात याची कल्पनाच नसते.
रिव्हर्स हॉर्नबद्दल +१.
रिव्हर्स हॉर्नबद्दल +१. आमच्या इथे एकाने नव्याने गाडी घेतली तेव्हा तो इंच इंच लढवुनी दहा दहा मिनिटे पार्क करायला लावायचा. ( सोसायट्या पार्किंग पूर्व जमान्यातल्या आहेत. पार्किंग समोरच्या रस्त्यावर.) तेवढा वेळ हे म्युझिक ऐकायला लागायचं.
एक पिता आपल्या बाळ्याला कुठूनसा घेऊन यायचा आणि सोसायटीच्या गेटमधून आत सोडून तो दुसर्या मजल्यावरच्या घरात पोचतोय ते पाहत थांबायचा. तेवढा वेळ तो मोटरसायकलचा हॉर्न वाजवी. जणू हॉर्न नाही, त्या मुलाचा रिमोट कंट्रोल आहे.
मानव, त्या रिव्हर्स गियर
मानव, त्या रिव्हर्स गियर म्युझिकप्रेमींना एकदा रिव्हर्समध्ये कार चालवत दिवसभर फिरवून आणावसं वाटतं. ऐका मेल्यांनो तुमच्या कारचं सुश्राव्य संगित!
बरेच आहेत, त्यांना आणि त्या
बरेच आहेत, त्यांना आणि त्या घटना टाळतो. काम सोपे होते.
__________________
१) चप्पल उलटी पडणे, खरं तर मुद्दाम उलटी ठेवतात. जादुटोणा चालत नाही. तर त्या काळातले लोक.
२)फोडणीतील कच्ची मोहरी - ढोकळ्यावर गुजराथी दुकानदार अशीच वापरतात.
३)गप्पांच्या मध्ये घुसणारे. ते आले की सटकायचं.
४)वाहनात मोबाइलवर मोठ्या आवाजात विडिओ, कॉल्स लावणाऱ्यांना टाळणे शक्य नाही. जाणार कुठे सीट सोडून?
५) रस्त्यावरचे गट. लांबूनच जायचे. त्यांना भरपूर वेळ असतो. आपल्याकडे नसतो.
मी जितके लोक पाहिलेत ते जुने
मी जितके लोक पाहिलेत ते जुने अजिबात नाहीयेत.फक्त आळशी आहेत.चप्पल पायावर चढलेले विंचू असल्यासारखे दारात भिरकावून त्याच्याकडे उलट पडली का सुलट, जवळ पडल्या का 5 फूट लांब हे न बघता तरातरा पुढे निघून जातात
अजून एक कॅटेगरी: बाई गाडी विकत घेणार आहे, चालवणार आहे, ती काही प्रश्न विचारतेय हे स्पष्ट दिसून तिला पुर्ण इग्नोर मारून तिच्या बरोबर आलेल्या पुरुषाला फक्त त्याच्याकडे बघून सर्व माहिती आणि पूर्ण महत्व देणे. एका मी घेणार असलेल्या छोट्या कार च्या टेस्ट ड्राईव्ह ला आलेला सेल्समन कारमध्ये मागे सतरंज्या ठेवल्यात म्हणून मला रस्त्यावर सोडून फक्त नवऱ्याला बाजूला बसवून टेस्ट ड्राईव्ह ला घेऊन गेला मग मी त्याला रिव्ह्यू पण त्या मागे ठेवलेल्या सतरंज्यांच्या लायकीचाच दिला.
नाही ओ मामी. तसे आता वाटत
नाही ओ मामी. तसे आता वाटत नाही कशाचे काही. वाटायचं बंद झालं कधीच पण आता आपलं धागा काढलाच आहे म्हणून उगीच
रांगेत चिकटून उभे राहणे.>>
रांगेत चिकटून उभे राहणे.>> यात पाठीला मागच्याची ढेरी लागली की मला खूप राग यायचा/येतो. याच मुख्य कारणास्तव मी केव्हाच ठरवले की आपली ढेरी सुटू द्यायची नाही आणि सुटलीच तर नीट जागा सोडून उभे राहीन.
या निमित्ताने आठवलेली एक
या निमित्ताने आठवलेली एक घटना.
१९९०. दादर पश्चिमला उतरून पूर्वेला ट्रेन पकडण्यास जात होतो, पुलावर प्रंचडच गर्दी मध्येच थांबत सरकत चालली होती. तेवढ्यात माझ्या पाठीत काहीतरी जोरात टोचलं. कळवळलो अक्षरशः. चिडून मागे वळलो तर सत्तर पंचाहत्तरीच्या आजी छत्री घेऊन. मी "किती जोरात लागलं" असं बोलायला सुरवातही केली नाही तर त्या म्हणाल्या "चल मेल्या पुढे नाहीतर अजुन टोचेन." मी अवाक. म्हणजे यांनी मुद्दाम टोचली होती. काय करणार बोलणार अशा परिस्थितीत? मी पुढे सरकत जमेल तसे पुढे एका बाजूला झालो, त्यांना पुढे जाऊ दिलं.
जेवताना अती आग्रह करणारे लोक
जेवताना अती आग्रह करणारे लोक अजिबात आवडत नाहीत. एखाद् दुसऱ्या वेळी आग्रह ठीक आहे पण जबरदस्तीने ताटात वाढणारे नाही खपत.
Meetings मध्ये , laptop वर
Meetings मध्ये , laptop वर type करणारी लोक . आत्ताच त्या मेसेजला उत्तर नाही दिलत तर server crash होणारेय का ?
टूथपेस्टचं मध्येच कंबरडं
टूथपेस्टचं मध्येच कंबरडं मोडणारे लोक. यात घरचेही आलेच. त्यांचाही आकार त्या टूथपेस्टसारखा करावा वाटतो.
ते रांगेत ढेरी टेकवून उभं राहणं कोविडकाळात कमी झालेलं. आता कोविड कधी आलाच नव्हता अशा थाटात जसं सारं सुरू आहे, तसंच हेही. सिविक सेन्सेस मधल्या बर्याच गोष्टींची यादी आहे.
आणखी असलेले बरेच पेट पीव्ज वरती लोकांनी आधीच लिहिले आहेत
माझ्या almost रोज डोक्यात
माझ्या almost रोज डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे सिग्नलला पचकन थुंकणारे. मग ते रिक्षावाले, टू व्हिलर वालेही असतात आणि मर्सिडीझ मधून जाणारेही असतात. आणि माझे नशीब असंय की नेमके सिग्नलला माझ्यासमोर थुंकणारेच थांबतात. कोविड नंतर हे कमी होईल अशी वेडी आशा होती पण काही फरक पडलेला नाही.
शिवाय भारतीय लोकांची अ ति श य वाईट सवय म्हणजे रांगेत चिकटून उभे राहणे. > +१११
हेही कोविड नंतर कमी होईल असे वाटलेले..पण नाही. मला अजिबात आवडत नाही आणि लोकांना सांगितले लांब राहा तर काय विचित्र बाई आहे, एवढे काय होते असे लूक्स देतात. सोशल डिस्टंसिन्ग या बाबतीत अमेरीका आवडते.
अजून एक गोष्ट म्हणजे आज नक्की संध्याकाळी रिपोर्ट/डिझाइन्स पाठवते म्हणून दोन दिवस काही हालचाल न करणारे. नाही पाठवणार तर स्पष्ट सांगावे की २ दिवस लागतील. किंवा काम जमत नसते पण तसे स्पष्ट न सांगणारे.
धमाल धागा आहे.
धमाल धागा आहे.
रांगेतील ढेरीचा उल्लेख म्हणजे शब्दशः "पेट" पीव्ह आहे
रस्त्यावर थुंकणार्यांना शिक्षा म्हणून मुंबई लोकल्स मधे पुढचे स्टेशन कोणत्या बाजूला येणार आहे याचा बोर्ड येतो तसा एक बोर्ड यांच्या पाठीवर आजन्म लावायची सक्ती करावी व फक्त त्याच बाजूला थुंकण्याचीही. म्हणजे मागचे लोक ती बाजू टाळतील
त्या रिव्हर्स गियर म्युझिकप्रेमींना एकदा रिव्हर्समध्ये कार चालवत दिवसभर फिरवून आणावसं वाटतं >>>
माझा सगळ्यात मोठा पेट पीव्ह म्हणजे मुंबईला बॉम्बे म्हणणं.. विशेषतः "मद्रासी" लोकांनी >>> (यातली खोच भारी आहे)
तुमचा वैताग पोहोचला, मी_अनु ! >>>
पॅसिव्ह कडीपत्ता हे सुपरलोल आहे.
>> चिडून मागे वळलो तर सत्तर
>> चिडून मागे वळलो तर सत्तर पंचाहत्तरीच्या आजी छत्री घेऊन........ "चल मेल्या पुढे नाहीतर अजुन टोचेन."
मानव सिरीयसली! काय कॅरॅक्टर असतात एकेक! सिनेमाच्या सुरवातीला दहा एक मिनिटे "पात्र परिचय" भाग असतो तिथे हा प्रसंग शोभतो अगदी.
--x--
व्हाट्सपवर नीट संवाद साधता न येणारे व्यावसायिक सुद्धा डोक्यात जातात. विशेषतः सुरवातीच्या इन्क्वायरी च्या वेळी चार प्रश्न विचारले कि यांचे फक्त शेवटच्या प्रश्नाला "yes. that's correct'' असे काहीसे त्रोटक उत्तर येते. अरे, आधीच्या प्रश्नांचं काय?
छत्रीपुलावर !!
छत्रीपुलावर !!
१) "मेरी आवाज सुनो", २) "मला
१) "मेरी आवाज सुनो", २) "मला अगोदरच ठाऊक होते" आणि ३) 'मी हे हे आधीच केलेले आहे" वाले सर्वच !
सारखे मी मी मी आणि माझे माझे यापलीकडे बोलता न येणारी माणसे प्रचंड संख्येने संपर्कात येतात. I am a magnet for such people. यांची विशेष लकब म्हणजे समोरच्याला एकही वाक्य पूर्ण बोलू न देणे. सारखी स्वस्तुती. आपलीच टकळी आणि 'मी पुराण" लावणे. आपण हात दुखतोय असे काही म्हणायचा अवकाश की दोन वर्षांपूर्वी माझा हात-दात-पाय सुद्धा असाच दुखत होता आणि मग ....... असे पाल्हाळ. माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझी गाडी, माझे हे माझे ते !
२) "मला अगोदरच ठाऊक होते" आणि ३) 'मी हे हे आधीच केलेले आहे" ये वरच्या प्रकारचे एक्स्टेंशन एकप्रकारे. फ्रेंच पॉलीनेशिया ? आम्ही मागच्याच वर्षी गेलो होतो .... हे? हे तर आधीच बघितले होते. ते ? ते तर मी लहानपणीच शिकलेय.. आपण अगदी मला कॅन्सर झालाय म्हटले तर मला मागच्याच महिन्यात झाला होता असे म्हणायला कमी करणार नाहीत, व्हेरी कॉम्पिटिटिव्ह
सिव्हिक सेन्स, खरे बोलणे, प्रामाणिकपणा हे दुर्मिळ आहे पण यांच्या अभावाचे दुःख होते, पेट पिव्ह लेव्हल ला नाहीये ते.
रिव्हर्स हॉर्न प्रकार कर्णकटू
रिव्हर्स हॉर्न प्रकार कर्णकटू व भयंकर वाटला.
@ मानव - हहपुवा. "चल मेल्या पुढे नाहीतर अजुन टोचेन." ...... =)) =)) फारच मजेशिर आहे.
>>>>> 'कसं गं माझं बबडं चुरूचुरू बोलतंय' असा मायेचा भाव डोळ्यात घेऊन बसणे.
हाहाहा हे सुद्धा हहपुवा आहे मामी. कहर!!
थुंकणे हे 'पेट पिव्ह' च्या पुढे गेलेले प्रकरण आहे. घोर वाईट्ट सवय आहे ती.
>>>>कॅन्सर झालाय म्हटले तर मला मागच्याच महिन्यात झाला होता असे म्हणायला कमी करणार नाहीत, व्हेरी कॉम्पिटिटिव्ह Happy
हाहाहा
>>>>>>रांगेतील ढेरीचा उल्लेख म्हणजे शब्दशः "पेट" पीव्ह आहे Happy
हेही निव्वळ आहे निव्वळ!!!
>>>>>>अजून एक कॅटेगरी: बाई गाडी विकत घेणार आहे, चालवणार आहे, ती काही प्रश्न विचारतेय हे स्पष्ट दिसून तिला पुर्ण इग्नोर मारून तिच्या बरोबर आलेल्या पुरुषाला फक्त त्याच्याकडे बघून सर्व माहिती आणि पूर्ण महत्व देणे.
अगदी अगदी.
अगं आमच्याकडे भारतात घराच्या रंगाच्या कन्सल्टेशनकरता एक माणूस आलेला. आम्ही बोलत होतो तर हा मी काय म्हणते ते न ऐकता सासूबाईंनाच लक्ष पुरवत बसला. आणि अर्थात सासूबाई मी म्हणेन त्याच्या विरुद्ध बोलून हे घर कसं आपलं आहे आणि आपलाच हक्क आहे हे ठसवुन देतच होत्या. तो मनुष्य त्याने ताडले - या घरात मोठा आवाज कोणाचा ते.
>>>>>>त्यांचाही आकार त्या टूथपेस्टसारखा करावा वाटतो.
हाहाहा
>>>>>>>" अरेच्या असं कसं! कसे काय हे लोक बाहेर येतात?काहीही!" अशा अविर्भावात कशीबशी त्यांना वाट करून देणार.
हे नीरीक्षणही उच्च आहे.
रांगेतील ढेरीचा उल्लेख म्हणजे
रांगेतील ढेरीचा उल्लेख म्हणजे शब्दशः "पेट" पीव्ह आहे
ही फाको कुणाची असणार हा अंदाज बांधला होता व तो खरा निघाला !
<< आपण हात दुखतोय असे काही
<< आपण हात दुखतोय असे काही म्हणायचा अवकाश की दोन वर्षांपूर्वी माझा हात-दात-पाय सुद्धा असाच दुखत होता आणि मग ....... असे पाल्हाळ. >>
अवांतर : यावरून वपुंची एक कथा आठवली, ज्यात एक व्यक्ती मुंबईच्या लोकलमध्ये दुःखी दिसणाऱ्यांची चौकशी करून आपल्या बाबतीत सुद्धा असेच वाईट घडले होते असे खोटेच सांगत असे. समदुःखी भेटला कि आपले दुःख थोडे हलके होते हा विचार त्या पाठीमागे.
<< जेवताना अती आग्रह करणारे लोक अजिबात आवडत नाहीत. एखाद् दुसऱ्या वेळी आग्रह ठीक आहे पण जबरदस्तीने ताटात वाढणारे नाही खपत. >>
मलासुद्धा. पण याची दुसरी बाजू हि आहे कि काही पाहुणे मंडळी आग्रह केल्याशिवाय खात नाहीत. आणि आग्रह केला नाही तर नंतर टीका होण्याची श्यक्यता.
जर मूळ प्रतिसाद कोट केला नाही तर कोणत्या मुद्द्याला प्रतिसाद दिला ते कसे कळणार? अवांतर : काही संस्थळावर असे कोट करण्याची वेगळी सुविधा असते.
Pages