..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द बरोबर ओळखला अवनी. Happy
तरीही तुम्ही आणि हे वाचले असेल त्यांनी ओळखले नाही म्हणजे हे गाणे तुम्हाला माहीत नाहीच.

जरा वेळ वाट बघून उत्तर लिहीन.

नाही गजानन.
ते गाणे:
सांग ना रे पाव, साला किती मला छळतो
काय सांगू मीच माझा किती आत जळतो.

गाणे आंतरजालावर परत शोधले पण सापडले नाही.
इथे कुणीतरी या दोन ओळी चालीवर म्हटल्या आहेत.

८-७२
हिमालयात सोलो ट्रेकिंगला गेलेली एक तरुणी हिमवादळात सापडते आणि बेशुद्ध होते. एका लोकल तरुणाला ती सापडते आणि तो तिला निवाऱ्यासाठी एका गुहेत घेऊन जातो. ती हायपोथर्मियाने मरणार हे त्याच्या लक्षात येतं. पण त्याने मनमोहन देसाईंचा गंगा जमुना सरस्वती पाहिला असतो. मग तो चित्रपटात दाखवल्याप्रमाणे उपचार करतो. दुसऱ्या दिवशी ती जागी होते पण त्याला आपण काय केले ते सांगायचं धैर्य होत नाही.
असेच दिवस जातात Uhoh
तिची आई म्हणते कार्टे काय केलंस हे.
तिला काहीच आठवत नाही. मग तिला आठवतं हिमालयात तरुण भेटला होता. 'मग पुढे?' आई विचारते. तेव्हा ती हे गाणं म्हणते.

माझे मन, चूक.
क्लू - गाण्यातली हिरोईन किशोरकुमारची कितवीतरी पत्नी आहे.
क्लू 2 - हिरो convertible कार चालवत गाणं म्हणत आहे.

८-७३
गोल्ड-डिगर स्त्रीचे आवडते गाणे

सोना कितना सोना है....
......तू मेरा हिरो नंबर वन?

की
'मुझे नौलखा मंगा दे रे ओ सैया दिवाने'?

नाही
गाण्यात सोन्याचा उल्लेख नाही

श्रीनिवास रामानुजन एक प्रचंड अवघड गणित घालतात. ते कुणालाच सोडवता येत नाही. शेवटी ते विष्णूची उपासना करतात. तर विष्णूचं सुदर्शनचक्र एक खेळणं बनून गरगरत येतं आणि ते गणित सोडवायला लागतं. आणि ते होत असताना विष्णूचा एक अवतार दोन स्त्रीरुपांत तिथे प्रकट होतो.

रामानुजन कुठलं गाणं म्हणतील?

हो हो द्या हपा क्ल्यु.

वामन अवतार आहे का? नन्ही, छोटी इ. ? सुदर्शन चक्राचं खेळणं म्हणजे भिरभिरं, फुगे वगैरे काही?

च्रप्स, मोहिनी अवतार वरुन तेजाबच मोहिनी मोहिनी ..... एक दो तीन .... आठवलं. पण त्यात सुदर्शन चक्राच काही आहे का आठवत नाही म्हणून ते नसावेच बहुदा

Pages