..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर भरत, वावे.

तुझ्या डोळ्यात लिखा आहेत आणि अशा रीतीने तू घेतलेल्या चुंबनाचा अफसाना डोळ्यात लिहिला गेलाय या अर्थाने
लिखा है तेरी आंखो मे किसका अफसाना.

सहीच!

तिला मग कळतं की तो आपल्या उवा डोळ्यात घेऊन गेलाय. ती त्याला उवा (ती त्यंना 'हुवा' म्हणते) परत मागायला येते आणि हिंदीत हे गाणं म्हणते. (मला इतका कंटाळा आला की मी उत्तरच देऊन टाकलं इथे)

८/८६ - एक कॉमन चतुष्पाद प्राणी प्रियाराधन करताना कोणते गाणे गाईल?
(इतक्या पकाव कोड्याचं उत्तर मीच देऊन टाकतो..)
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अश्विनी ये ना !

८ / ८७
सूर्य कासराभर वर आला तेव्हा श्रीपतराव आळोखेपिळोखे देत उठले आणि रोजच्याप्रमाणे प्रभातफेरीला निघाले. वाटेत एक अक्राळविक्राळ कुत्रा त्यांना दिसला म्हणून त्यांनी पटकन एका कुंपणावरून उडी मारली आणि ते नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्याने जाऊ लागले. रस्त्यात त्यांना एका घरासमोर एक सुंदर बगीचा दिसला. त्या बगीच्यात मधोमध एक छोटेसे तळे होते आणि तळ्यात एक फूटभर लांबीचा रंगीबेरंगी मासा विहरत होता. त्याच्या अंगावरचे रंग सूर्यप्रकाशात चमकत होते. श्रीपतराव मंत्रमुग्ध होऊन ते दृश्य बघत उभे राहिले. मासा पोहत त्यांच्या जवळ आला. तेव्हा त्यांनी उडी मारून तो पकडला आणि गट्ट करून टाकला. त्यानंतर ते प्रभातफेरी आटपून परत आले आणि त्यांनी पुन्हा ताणून दिली. संध्याकाळी ते जागे होऊन पहातात तर नेहमीप्रमाणे गोपाळराव येऊन बसले होते. दोघे एकमेकांना चाटत गप्पा मारू लागले. 'मग आज काही विशेष घडलं का?' गोपाळरावांनी विचारले. तेव्हा श्रीपतरावांना सकाळचा प्रसंग आठवला आणि त्यांनी हे गाणे म्हटले.

८ / ८८

चंदू परिस्थितीने गांजलेला एक गरीब चोर होता. त्याची कजाग बायको त्याला नेहमी पुरेशा चोऱ्या न करण्यावरून जाचत असे. एक दिवस अशाच एका भांडणानंतर तो वैतागून कुठे काही किडूकमिडूक चोरायला मिळते का ते पहावे म्हणून घरातून निघाला. रस्त्यात पाहतो तर एका आलिशान शोरूमवर झाड कोसळून मागची भिंत कोसळली होती. चंदूने एका भगदाडातून आत प्रवेश केला आणि पाहतो तर काय, आत रोलेक्स, ओमेगा, कार्टियरची अफाट किमतीची घड्याळे विखुरलेली होती. त्याने घाईघाईने सापडतील तेवढी घड्याळं गोळा केली. आता आपलं दैन्य कायमचं संपलं म्हणून तो खूष झाला आणि त्याने लगेचच आयुष्याचा पुढचा प्लॅन आखला. आता परत त्या कजाग महामायेकडे जाण्याऐवजी लांब कुठेतरी निघून जावे, एखादी तरणी सुंदर बायको करावी आणि सुखासमाधानात आयुष्य घालवावे. पण जाण्यापूर्वी बायकोला थोडे डिवचून जाण्याची उर्मी त्याला आवरता आली नाही. म्हणून तो घरी गेला आणि त्याने तो सगळा मुद्देमाल तिला दाखवून हे गाणे म्हटले.

८/८८:
हम को मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से

मानव बरोबर.
हमको मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से
जी भर के देख लीजिये हमको क़रीब से
फिर आपके नसीब में ये बात हो न हो
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

८/८७ चे उत्तर -
चलते चलते युंही कोई मिल गया था
सरे राह चलते चलते

मी सुरमई, मोरी वगैरे शोधत होतो.

८/८८ ८९
तो फिश म्युझियम मध्ये जातो. तिथे वेगवेगळे मासे बघत फिरत असताना स्वतंत्र कक्ष असलेल्या माशाकडे येतो. कोणता मासा ते लगेच ओळखतो.
हा मासा आधी स्थिर असतो. मग एकदम पोहण्याची भयंकरच हौस असल्यासारखा पोहतो. मग वेड्या सारखे काहीतरी करतो. मग अचानक याच्याशी मूर्खासारखी अखंड बडबड करु लागतो.

हे सगळे पाहुन तो त्या माश्याच्या वर्तणुकीचे वर्णन करणारे गाणे म्हणतो.

89 -

कुछ है जुनून सा
कुछ पागलपन है
सौ बातें करता ये बुद्धू सामन है...

यावरचं कोडं मी आधी दिलंय बहुधा याच धाग्यात. Happy

दोघे एकमेकांना चाटत गप्पा मारू लागले.
याचा काय संबंध?
ते बोके आहेत हे सांगण्यासाठी तो क्लू होता. माणूस जिवंत मासा कसा खाईल? Happy

८/९०

बद्धकोष्ठतेचं शुक्लकाष्ठ कायमचं कबीरच्या मागे लागलेलं होतं. त्याला रोज एनिमा घ्यावा लागे आणि तो द्यायला एक मेल-नर्स त्याच्याकडे रोज येत असे. एकदा त्या मेल-नर्सची सुटी होती. नेमका त्याच दिवशी कबीरचा एक मित्र त्याला भेटायला आला होता. नर्स नसल्यामुळे अस्वस्थ असलेल्या कबीरला मदत करावी म्हणून त्या मित्रानं त्या दिवशी कबीरला एनिमा दिला. पण मित्राला सवय नसल्यानं या भानगडीत कबीरला बरीच इजा झाली ( कशी, कुठे वगैरे मुद्दे गौण आहेत) आणि ती सहज बरी होण्यासारखी नव्हती. तर कबीर कोणते गाणे गाईल? (मूळ गाणे स्त्री च्या आवाजात आहे)

९०
दुश्मन न करे दोस्त ने ये काम किया है
उम्रभर का गम हमे इनाम दिया है

दुश्मन न करे दोस्त ने ये काम किया है
उम्रभर का गम हमे इनाम दिया है
>>> हम्म हेच जास्त अप्रोप्रिएट वाटते आहे

बरोबर कविन. शाब्बास!

८/९०

बद्धकोष्ठतेचं शुक्लकाष्ठ कायमचं कबीरच्या मागे लागलेलं होतं. त्याला रोज एनिमा घ्यावा लागे आणि तो द्यायला एक मेल-नर्स त्याच्याकडे रोज येत असे. एकदा त्या मेल-नर्सची सुटी होती. नेमका त्याच दिवशी कबीरचा एक मित्र त्याला भेटायला आला होता. नर्स नसल्यामुळे अस्वस्थ असलेल्या कबीरला मदत करावी म्हणून त्या मित्रानं त्या दिवशी कबीरला एनिमा दिला. पण मित्राला सवय नसल्यानं या भानगडीत कबीरला बरीच इजा झाली ( कशी, कुठे वगैरे मुद्दे गौण आहेत) आणि ती सहज बरी होण्यासारखी नव्हती. तर कबीर कोणते गाणे गाईल? (मूळ गाणे स्त्री च्या आवाजात आहे)

उत्तर ८/९०

९०
दुश्मन (Douche-man) न करे दोस्त ने वो काम किया है
उम्रभर का गम हमें इनाम दिया है

या सिनेमात - आखिर क्युं - राजेश खन्नाचं नाव कबीर सोनी असतं.

’हिंदी लोकांचे मराठी” टाईप मराठी की हिंदी बोलणारी ती या गाण्यातून
"निर्वाह झाला आहे. या सगळे. पण लगेच नाही" असे सांगुन पुढे निश्चित वेळ सांगते.

नाही.
कोडे अजुन स्पेसिफिक करण्याचा प्रयत्नः
"गुजरा झाला. एकत्र व्हा ना. यावेळी नाही." असे सांगुन पुढे एका शब्दात निश्चीत वेळ सांगते.
हिंट: त्यावेळेस सूर्य डोक्यावर असतो.

Pages