मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
या धाग्यावर कोड्यांचे नंबर ८
या धाग्यावर कोड्यांचे नंबर ८/१, ८/२, ८/३ ...... असे द्यावेत.
८/१:
हे कोडे आधीच्या धाग्यावर ७/१९२ वर हलवले आहे.
माफ करा.
अजून आधीच्या धाग्यावरचे 200
अजून आधीच्या धाग्यावरचे 200 नाही ना झालेत पूर्ण! तिकडे हवे का हे कोडे?
अच्छा, हे माहीत नव्हते.
अच्छा, २०० कोड्यांचे आता बघितले. श्रद्धा, तिकडे टाकतो. मला वाटले नवा धागा आला म्हणजे इकडे सुरू ठेवायचे आहे.
हिंट द्या गजानन...
हिंट द्या गजानन...
सातव्या धाग्यावर २०० कोडी
सातव्या धाग्यावर २०० कोडी डिकोड करून झाली की इथे या. तोवर तिकडेच बागडा.
इथे आता कोडी येउंद्यात.
इथे आता कोडी येउंद्यात.
शहरी पाऊस, धावपळ, गडबड,
८/१
एक सोपे.
शहरी पाऊस, धावपळ, गडबड, गोंधळ, ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न या सगळ्याला वैतागून शेवटी जाणीवपूर्वक शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून आणखी दोन दिवसांची सुट्टी काढून तो मस्तपैकी एका हिलस्टेशनला फिरायला आला. अगदी मित्र पण नको. फक्त निवांतपणा हवा होता त्याला. त्या घड्याळाच्या फिरणार्या काट्यांची त्याला जणू दहशतच वाटू लागली होती. जरा म्हणून मोकळा श्वास घ्यायला जागा नाही. सगळ्यात झीट आणणारी आणि संयमाचा कडेलोट करू पाहणारी गोष्ट म्हणजे तो ट्रॅफिक जाम!
त्याच्या येण्याजाण्याच्या वेळी नुसता असे ट्रॅफिक जाम जाम जाम!
परंतु त्याला केल्याखेरीज भागत नसे काम काम काम!
पण बरे का!
त्याला त्याचे आवडे फार काम काम काम!
त्यासाठी तो सहन करी तो जाम जाम जाम!
(अरे काय! असो.)
तर फिरायला आल्यानंतर त्यादिवशी तो निवांतपणे सभोवतालच्या छोट्या छोट्या टेकड्यांवर हिरव्यागर्द झुडुपांमधून एकटाच भटकला. कधी पाऊस, कधी ऊन, कधी टेकडीच्या माथ्याचे चुंबन घेऊ पाहणारे ढग! शेवटी सायंकाळ होण्याच्या सुमारास तो हळूहळू रूमवर येण्यास परत फिरला. हॉटेलवर पोचण्यापूर्वी एक डांबरी रस्ता ओलांडावा लागणार होता. तो रस्ता ओलांडण्यास आला तर तिकडून नेमक्या त्याच वेळी तीनचार मोटारगाड्या हॉर्न वाजवत वाजवत निघून गेल्या. बाकी सगळ्याचा विसर पडून त्याला क्षणभर आपण शहरातल्या ट्रॅफिकजाममध्येच असल्याचा भास झाला. काय ही कटकट नुसती! इथेही तो ट्रॅफिक जामचा विचार पिच्छा सोडत नाही. चिडचिडच झाली! पण ट्रॅफिकजॅमवरून लगेचच आपल्या लाडक्या कामाचीही आठवण झाली. हे तो कसे सांगेल?
(मामी, क्रमशः मध्ये हे जोडू नका. हा बंडू नाही बरे का. )
(No subject)
मी जामवाली गाणी शोधून बघितली,
मी जामवाली गाणी शोधून बघितली,
छलकाये जाम ( नाही)
रातभर जामसे जाम टकराएगा ( नाही)
शाम है, जाम है और है नशा ???
शाम है, जाम है
और है नशा
???
झिलमिल, ट्रॅकवर आहात.
झिलमिल, ट्रॅकवर आहात.
हिंट : नॉनफिल्मि गझल आहे.
शाम के वक़्त जाम याद आया
शाम के वक़्त जाम याद आया
कितना दिलचस्प काम याद आया
वॉव झिलमिल. मला ही गजल माहीत
वॉव झिलमिल. मला ही गजल माहीत नव्हती.
८/१
झिलमिल, बरोबर!
८/१
एक सोपे.
शहरी पाऊस, धावपळ, गडबड, गोंधळ, ट्रॅफिक, गाड्यांचे हॉर्न या सगळ्याला वैतागून शेवटी जाणीवपूर्वक शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून आणखी दोन दिवसांची सुट्टी काढून तो मस्तपैकी एका हिलस्टेशनला फिरायला आला. अगदी मित्र पण नको. फक्त निवांतपणा हवा होता त्याला. त्या घड्याळाच्या फिरणार्या काट्यांची त्याला जणू दहशतच वाटू लागली होती. जरा म्हणून मोकळा श्वास घ्यायला जागा नाही. सगळ्यात झीट आणणारी आणि संयमाचा कडेलोट करू पाहणारी गोष्ट म्हणजे तो ट्रॅफिक जाम!
त्याच्या येण्याजाण्याच्या वेळी नुसता असे ट्रॅफिक जाम जाम जाम!
परंतु त्याला केल्याखेरीज भागत नसे काम काम काम!
पण बरे का!
त्याला त्याचे आवडे फार काम काम काम!
त्यासाठी तो सहन करी तो जाम जाम जाम!
(अरे काय! असो.)
तर फिरायला आल्यानंतर त्यादिवशी तो निवांतपणे सभोवतालच्या छोट्या छोट्या टेकड्यांवर हिरव्यागर्द झुडुपांमधून एकटाच भटकला. कधी पाऊस, कधी ऊन, कधी टेकडीच्या माथ्याचे चुंबन घेऊ पाहणारे ढग! शेवटी सायंकाळ होण्याच्या सुमारास तो हळूहळू रूमवर येण्यास परत फिरला. हॉटेलवर पोचण्यापूर्वी एक डांबरी रस्ता ओलांडावा लागणार होता. तो रस्ता ओलांडण्यास आला तर तिकडून नेमक्या त्याच वेळी तीनचार मोटारगाड्या हॉर्न वाजवत वाजवत निघून गेल्या. बाकी सगळ्याचा विसर पडून त्याला क्षणभर आपण शहरातल्या ट्रॅफिकजाममध्येच असल्याचा भास झाला. काय ही कटकट नुसती! इथेही तो ट्रॅफिक जामचा विचार पिच्छा सोडत नाही. चिडचिडच झाली! पण ट्रॅफिकजॅमवरून लगेचच आपल्या लाडक्या कामाचीही आठवण झाली. हे तो कसे सांगेल?
उत्तर : (झिलमिल)
शाम के वक़्त जाम याद आया
कितना दिलचस्प काम याद आया
वॉव झिलमिल. मला ही गजल माहीत
वॉव झिलमिल. मला ही गजल माहीत नव्हती. >>> +१ टोटली.
एक क्लू लागला तर खूप सोपे आहे. घ्या.
८/२ - प्रियकराच्या शोधात असलेली ती सिल्क रूट वर येते. तेथेही तिला अनेक रस्ते दिसतात सिल्क रूटचेच. त्यातला योग्य रस्ता कोणता ते ठरवताना ती कोणते गाणे म्हणेल? हिंट - ही माहिती कडव्यात आहे.
इन रेशमी राहों मे
इन रेशमी राहों मे
इक राह तो वो होगी
तुम तक जो पहुंचती है
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
परफेक्ट!
परफेक्ट!
८/२ - प्रियकराच्या शोधात असलेली ती सिल्क रूट वर येते. तेथेही तिला अनेक रस्ते दिसतात सिल्क रूटचेच. त्यातला योग्य रस्ता कोणता ते ठरवताना ती कोणते गाणे म्हणेल? हिंट - ही माहिती कडव्यात आहे.
उत्तर (मामी)
इन रेशमी राहों मे
इक राह तो वो होगी
तुम तक जो पहुंचती है
इस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें
वा, दोन्ही कोंडी छान. जामवाली
वा, दोन्ही कोडी छान. जामवाली गझल ऐकली नव्हती.
८/२ पण सहीच फारेण्ड आणि मामी
फार छान, फारएंड !
फार छान, फारएंड !
रेशमी राहोमे .......च एकदम सिल्क रूट!
सिल्क रूटचं कोडं आवडलं. एकदम
सिल्क रूटचं कोडं आवडलं. एकदम फक्कड हो!
८/3- लहान साकेत ला जांभूळ हे
८/3- लहान साकेत ला जांभूळ हे फळ फार आवडत असे.. एकदा त्याला घरचे जत्रेत फिरायला घेऊन गेले. जत्रेत एक स्टॉल एका शेतकऱ्यांने लावला होता, त्यात विविध प्रकारचे फळे लावली होती, त्यात एक प्रचंड मोठे जांभूळ होते... साकेत जांभूळ बघण्यात इतका गुंग झाला कि आई बाबा यांचा हात कधी सुटला कळले नाही. हरवलेल्या साकेत ला आईबाबा दोन तासानंतर भेटले...
दुसऱ्या वेळी मात्र जत्रेत तो ठरवतोच की ते जांभूळ त्याला हवेच... तो आईबाबांना सांगतो की मला त्या जांभळासोबत प्रेम झालेय.. तो तिथून हलायलाच तयार नाही होत.. हळूहळू बातमी पसरते तिथे की एक मुलगा इतका जांभूळ वेडा झालाय.. इंडिया टीव्ही योगायोगाने तिथे असतात, ते त्याची मुलाखत घेतात विचारतात तू या जांभळासाठी काय करू शकतो... तो म्हणतो मी जीव देऊ शकतो...
अच्छा, पण तो काही गाणं बिणं
अच्छा, पण तो काही गाणं बिणं म्हणत नाही वाटतं
जांभूळ म्हणजे जाम. जाम, जान
जांभूळ म्हणजे जाम. जाम, जान वरून गाणे असावे.
बरं! सातव्या भागात पेरू
बरं! सातव्या भागात पेरू म्हणजे जाम असं ठरलं होतं ना? एक पे रेहना जी.
एखाद्या शब्दाच्या शेवटी जा/जान आणि पुढचा शब्द भूल असंही असू शकेल.
फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम
फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया
सेकंड टाइम में लव हो गया
यह अक्खा इंडिया जानता हैं
हम तुमपे मरता हैं
दिल क्या चीज हैं जानम
अपनी जान तेरे नाम करता हैं
???
बरोबर वाटतंय झिलमिल.
बरोबर वाटतंय झिलमिल.
८/ ४
८/ ४
पंचवटीतील पर्णकुटीतून राम घाईघाईनं बाहेर पडला. पर्णकुटीत सीता मूर्छित होऊन पडली होती. जवळच्या वस्तीवरून राहणार्या एका वैद्यमुनींनी सीतेला तपासलं ( नाही नाही, त्यांनी नाडी बघून 'सीता अब राम के बच्चे की मां बननेवाली है' वगैरे काही घोषित केलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे तोवर हिंदी सिनेमे जन्माला आले नसल्याने असला काही ड्रामा करण्याचं त्यांना कारण नव्हतं. दुसरं कारण असं की तसंही सीतेला बाळं बरीच नंतर झाली. ) तर सीतेला तपासून त्यांनी सांगितलं की हे अतिउष्णतेमुळे झालं आहे. एखाद्या पामच्या हिरव्यागार झावळ्या आणून सीतेच्या अंगावर पांघरल्यास तिला आराम मिळेल.
राम पर्णकुटीतून बाहेर पडून जंगलात भटकत हिरव्या झावळ्या शोधत होता पण सगळी पामची झाडं सुकलेली दिसत होती. शेवटी एका नदीच्या पात्रात त्याला हिरव्या पानांनी डवरलेली पामची झाडं दिसली आणि त्या झावळ्या घेऊन परत आला.
' इतका वेळ का लागला, दादा?' लक्ष्मणानं विचारलं.
रामानं सगळी रामकहाणी सांगितली.
' मग कुठे मिळाल्या या हिरव्या झावळ्या?' लक्ष्मणानं उत्सुकतेनं विचारलं.
उत्तरादाखल राम गाऊ लागला ........
झिलमील बरोबरच असेल. ते
झिलमील बरोबरच असेल. ते जांभूळ मुद्दाम distract करायला टाकलं असेल.
मामी, तडपती/ तडपाती अस काही
मामी, तडपती/ तडपाती अस काही आहे का?
Pages