..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाव बरोबर मी_आर्या आणि गाणं बरोबर मामी.

८/२५ एक मुलगा मुकेशचं एक गाणं ऐकत असतो. आणि मध्येच "तेरे" असं म्हणत असतो, धृपद (की मुखडा काय ते) आलं की. तर तो कोणतं गाणं ऐकत होता आणि त्याचं नाव काय असतं?
उत्तर: त्याचं नाव: प्यारेलाल.
गाणं: इक दिन बिक जाएगा, माटी के मोल
जग में रह जाएंगे,
प्यारे, "तेरे" बोल.

मानव, कल्पना करून बघितली हो! Lol

आज उडी मारतेच यात Proud
(होप, हे गाणं आधीच झालेलं नसेल.)

८/२६

शाळेच्या एका शिपायाने आधी न कळवता आठवडाभर कामाला दांडी मारलेली असते. म्हणून मुख्याध्यापक त्याला उन्हात अनवाणी उभं राहण्याची शिक्षा करतात. त्याचदिवशी एका समूहगायनाच्या कार्यक्रमासाठी काही मुली निवडलेल्या असतात. त्यांची नावं, रोल नंबर इ.सहित यादी करण्याचं कामही त्या शिपायाला दिलेलं असतं. ते पण त्याने ऊन्हात उभं राहूनच करायचं, असं फर्मान असतं.
ऊन्हात फरशीवर शिपायाचे पाय भाजत असतात. बारा मुलींचे रोल कॉल होतात. पुढच्या मुलीच्या रोल कॉलला तो कुठलं गाणं म्हणेल?

८/२६
मुख्याध्यापक म्हणतील

मुझे तुमसे है कितने गिले
तुम कितने दिन बाद मिले
बोलो इतने दिन क्या किया?

शिपाई म्हणेल
'तेरा' नाम लिया

पण यात ऊन येत नाहीये त्यामुळे हे नसणार!

लले, स्वागत!

गाणं आधी झालेलं असेल तरीही हरकत नाही. कारण कोडं वेगळं असणार.

८/२६

शाळेच्या एका शिपायाने आधी न कळवता आठवडाभर कामाला दांडी मारलेली असते. म्हणून मुख्याध्यापक त्याला उन्हात अनवाणी उभं राहण्याची शिक्षा करतात. त्याचदिवशी एका समूहगायनाच्या कार्यक्रमासाठी काही मुली निवडलेल्या असतात. त्यांची नावं, रोल नंबर इ.सहित यादी करण्याचं कामही त्या शिपायाला दिलेलं असतं. ते पण त्याने ऊन्हात उभं राहूनच करायचं, असं फर्मान असतं.
ऊन्हात फरशीवर शिपायाचे पाय भाजत असतात. बारा मुलींचे रोल कॉल होतात. पुढच्या मुलीच्या रोल कॉलला तो कुठलं गाणं म्हणेल?

उत्तर :
हाय! तबस्सुम तेरा Proud
(सिनेमा : निशान, गायक : रफी)

लले पहिलंच कोडं असं कठीण घातलंस ना? शाब्बास. येऊ देत अजून.

कोडं मस्त होतं. मला हे गाणं माहित आहे पण आठवणं शक्यच नव्हतं.

ह्यातलं बारा समजलं, कारण पुढचा रोल कॉल तेरा येणार, जो गाण्यात आहे. बाकी मलाही समजलं नाही.

<<त्यांची नावं, रोल नंबर इ.सहित यादी करण्याचं कामही त्या शिपायाला दिलेलं असतं>>
हाय (उन्हात पाय भाजल्या मुळे निघलेले उद्गार) तबस्सुम (मुलीचं नाव) तेरा (रोल नंबर)

हाय (उन्हात पाय भाजल्या मुळे निघलेले उद्गार) तबस्सुम (मुलीचं नाव) तेरा (रोल नंबर)>>> आत्ता झेपले हे Happy

चालतील अशीही. येउ द्या.

८/२७ : कर्नाटकातील एका कुटुंबाची बदली उत्तर भारतातील गावी होते. त्यातील तरुण मुलीला हिंदी नीट येत असतं तर तिच्या आईला अगदीच थोडं येत असतं.
मुलगी दूधवाल्या देखण्या मुलावर लट्टू होते, दूध टाकायला तो आला आणि आई बाबा आत असले की मग ही मग त्याच्याशी गुलूगुलू बोलत असे.
पण एका आठवड्यात सतत बाबा नाहीतर आई तो यायच्या वेळेस नेमके बाहेरच्या खोलीतच असतात.
त्यामुळे बरेच दिवस अशी पंचाईत झाल्याने आई बाहेरच्या खोलीत असतानाच ती हिंमत करून त्याची चौकशी गाण्यातून करते, त्याला कळावे पण आईला कळु नये याची दक्षता घेऊन.

कोणते गाणे ते?

Pages