..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही सपा.

क्ल्यु 3 : हेराफेरी करून लोकांना फसवणार्यांना इंग्रजीत काय म्हणतात?

करेक्ट!

८/२९

शहरातील फेमस आर्ट गॅलरीत क्युरेटर समोर ठेवलेलं ते छोटं पेंटिंग बघत होता. त्याच्यासमोर बसलेला माणूस ते व्हॅन गॉह चं आहे का याची खातरजमा करण्यासाठी आला होता. असेल तर हे पेंटिंग त्याला विकायचं होतं. हे असं व्हॅन गॉहचं पेंटिंग एका प्रायव्हेट कलेक्शनमध्ये होतं. ते आता इतक्या वर्षांनी मार्केटमध्ये आलं की काय? ही समोर आलेली संधी बघून झालेला आनंद आणि एक्साईटमेंट कशीबशी काबूत ठेऊन क्युरेटरनं आपल्या सहकार्‍याला केबिनमध्ये बोलावलं. त्याचा सहकारी आला. त्यानं त्या पेंटिंगकडे पाहिलं आणि मग ते घेऊन आलेल्या माणसाकडेही रोखून पाहिलं. आलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर झालेली किंचित चलबिचल त्याच्या सराईत नजरेनं टिपली आणि आपलं मत त्यानं एक हिंदी गाणं म्हणून सांगितलं ........

उत्तर (श्रद्धा)

ये con चित्रकार है, ये con चित्रकार

हे सुंदर गाणं इथे ऐकता येईल : https://youtu.be/ZfTCZHE6dV0

८/३० एक खूप सोप्पं कोडं:

बगदादच्या गजबजलेल्या रस्त्यावरून ती चालली होती. अचानक एक आलिशान गाडी भरधाव येत तिच्या शेजारी करकचून ब्रेक दाबत उभी राहिली. गाडीतून तो नराधम उतरला. त्याला पाहताच आता काय होणार हे सर्वांना माहीत होतं. गर्दी चुपचाप पांगली. लोकांनी नजरा फिरवल्या. तिने काही बोलायच्या आत त्याने तिला गाडीत खेचून घेतले. तेवढ्यात बाजूला दुसरी गाडी येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या निरोप्याने सांगितले की तुमच्या वडिलांनी ताबडतोब रिपब्लिकन पॅलेसवर बोलावले आहे. त्याने तिला सोडून दिले आणि आला तसा पुन्हा नाहीसा झाला.

घडलेली घटना तिने भीत भीत आईला सांगितली. आईला कल्पना आलीच, पण तरी खात्री करावी म्हणून तिला विचारलं, "कोण होता तो?"

तिने उत्तर एका गाण्यात दिलं. ते गाणं ओळखा.

गाण्यांपेक्षा त्याच्या गोष्टी वाचायलाच मला मजा येते. >>> हा हा हो ना. इतकी कसरत करून ते गाणं जुळेल अशी सिच्युएशन तयार करावी लागते. पण मजा येते.

श्रद्धा (नुसती श्रद्धा, 'ए' नाही) _/\_ तुमचं उत्तर बरोबर आहे Happy

ए_श्रद्धा, नाही. दुसरा क्लू देतो - ती एक खरी व्यक्ती आहे. वर लिहिलेली घटना द अर्बन नोमाड ह्यांच्या कुठल्यातरी माबोवरच्या धाग्यात येऊन गेली असण्याची शक्यता आहे.

सद्दामच्या मुलाचे नाव असलेलं एखाद गाणं आहे का? की बगदादी बगदादी असे शन्द असलेल एखादं गाणं आहे अस्तित्वात?

(मी आपल उगाच इतरांना खाद्य पुरवतेय. मला काहीएक सुटायच नाही इथे Lol )

कविन, बरोबर विचार करता आहात. तुमच्या दोनपैकी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे, पण ते सांगितलं तर लगेच गाणं कुठलं आहे ते कळून जाईल.

माऊमैया, अगदी जवळ आहात. उदे नाव बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं गाणंही चालू शकेल.

MazeMan, राग भैरव Happy पण इथे ते नाहीये.

श्रद्धा / माऊमैया, उत्तर देऊन टाका

"कोण होता तो?"<<<<
या प्रश्नाचे उत्तर असलेले लोकप्रिय मराठी गाणे. Happy (अजून कुणाला ट्राय करायचं असेल तर!)

त्याचं नाव उदे हुसेन आहे (उदय नव्हे!)

त्याचं नाव उदे हुसेन आहे (उदय नव्हे!) >> हो, त्याच्या नावाच्या स्पेलिंगवरून अनेकांचा गोंधळ होतो. त्याच्यावरती 'द डेव्हिल्स डबल' नावाचा जो चित्रपट आहे, त्याच्या हिंदी डबिंगमध्येही उदय म्हणलंय त्यांनी. (डोक्यावर हात मारणारी बाहुली)

८/३० एक खूप सोप्पं कोडं:

बगदादच्या गजबजलेल्या रस्त्यावरून ती चालली होती. अचानक एक आलिशान गाडी भरधाव येत तिच्या शेजारी करकचून ब्रेक दाबत उभी राहिली. गाडीतून तो नराधम उतरला. त्याला पाहताच आता काय होणार हे सर्वांना माहीत होतं. गर्दी चुपचाप पांगली. लोकांनी नजरा फिरवल्या. तिने काही बोलायच्या आत त्याने तिला गाडीत खेचून घेतले. तेवढ्यात बाजूला दुसरी गाडी येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या निरोप्याने सांगितले की तुमच्या वडिलांनी ताबडतोब रिपब्लिकन पॅलेसवर बोलावले आहे. त्याने तिला सोडून दिले आणि आला तसा पुन्हा नाहीसा झाला.

घडलेली घटना तिने भीत भीत आईला सांगितली. आईला कल्पना आलीच, पण तरी खात्री करावी म्हणून तिला विचारलं, "कोण होता तो?"

तिने उत्तर एका गाण्यात दिलं. ते गाणं ओळखा.

बरोबर उत्तर - श्रद्धा
गाणं - उदे गं अंबे उदे
(सद्दाम हुसेनचा मुलगा 'उदे' हुसेन हा असले धंदे करण्याबाबत कुप्रसिद्ध होता - जाता जाता सामान्यज्ञान)

उत्तेजनार्थ बक्षीस - माऊमैय्या

उत्तेजनार्थ बक्षीस - माऊमैय्या >>>>> अरे वा,,,, श्रद्धाच्या खालोखाल नाव वाचून खरंच उत्तेजन मिळालं.
धन्यवाद हपा.

८/३१
एका आर्मी ट्रेनिंग कँपमध्ये, कर्नल करणकुमार खुराना , १६ जवानांच्या तुकडीला ट्रेन करत होते. ते सर्वजण कर्नल सरांच्या खडतर ट्रेनिंगमध्ये बरंच काही शिकत होते. पुढे जाऊन हे जवान हनी ट्रॅपमध्ये अडकू नये, म्हणून कर्नल सर्वांची परीक्षा घ्यायची ठरवतात. त्यानुसार कँपजवळच्या भागात काही तरुणी राहायला येतात व वारंवार जवानांच्या नजरेस पडू लागतात. सरांचं लक्ष असतंच सर्वांवर. १०-१५ दिवसांत, त्यांच्या लक्षात येतं की, अर्ध्यापेक्षा जास्त जवान त्यांच्या परीक्षेत नापास झालेत.

लगेच ते संध्याकाळी सर्व जवानांना एकत्र बोलावून, नापास झालेल्या जवानांना चांगलंच खडसावतात. म्हणतात, ' माझं ऐका. प्रेमबिम सब झूठ आहे. कधीच प्रेमात पडू नका.'
तरीही, एक जवान त्यांना उलट उत्तर देतोच, की 'काही झालं तरी आम्ही प्रेम करणारच.'
हे सर्व ते दोघंजण एका गाण्यातून बोलतात. ते गाणं कोणतं?

Pages