..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर हरचंद.

८/२७ : कर्नाटकातील एका कुटुंबाची बदली उत्तर भारतातील गावी होते. त्यातील तरुण मुलीला हिंदी नीट येत असतं तर तिच्या आईला अगदीच थोडं येत असतं.
मुलगी दूधवाल्या देखण्या मुलावर लट्टू होते, दूध टाकायला तो आला आणि आई बाबा आत असले की मग ही मग त्याच्याशी गुलूगुलू बोलत असे.
पण एका आठवड्यात सतत बाबा नाहीतर आई तो यायच्या वेळेस नेमके बाहेरच्या खोलीतच असतात.
त्यामुळे बरेच दिवस अशी पंचाईत झाल्याने आई बाहेरच्या खोलीत असतानाच ती हिंमत करून त्याची चौकशी गाण्यातून करते, त्याला कळावे पण आईला कळु नये याची दक्षता घेऊन.

कोणते गाणे ते?

उत्तर: हाल कैसा है जनाब का?
कानडीत हाल/हालु म्हणजे दूध. आईला वाटतं दूध पातळ असेल (गावात मोकळं दूध भांड्यात देतात) म्हणून दुधाबद्दल त्याला हटकत असेल.

पाक मागे गेला की वो धागा.. वर आनायला सोप्पं कोडं एक.

८/२८ -

सुमतीबाईंचं आपल्या किचन गार्डन वर जीवापाड प्रेम होतं. मेहनत करून त्यांनी कितीतरी भाज्या तिथे लावल्या होत्या. पण गेले काही दिवस भाज्या पहाटे कधीतरी गायब होत होत्या. कांदे, टोमॅटो, लिंबं... त्यांनी हौसेने लावलेली ब्रोकोली सुद्धा गायब झाली तेव्हा मात्र त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पहाटे अंधारात उठून वॉच ठेवायचं ठरवलं. साडेपाच सहाला खसफस आवाज आला आणि कुणीतरी भाजी घेऊन पळत सुटलं. 'अग्गोबाई, ही तर समोरच्यांची कार्टी...'! त्या 'थांबा चोरांनो.. एकेकाला चोप देते... थांबा' करत ओरडत आल्या, तोवर ती पोरं पसार झाली होती. त्यांनी दम खात आजूबाजूला पाहिलं तर एवढ्या गोंधळातही मनःशांती ढळू न देता त्यांचे यजमान रामराव बागेत योगासनं करत होते. त्यांना पाहून सुमतीबाई कोणतं गाणं म्हणतील?

८/२८ मे क्या करू राम मुझे बुढढा मिल गया?

सब जो गये बाग मेरा बुढ्ढा भी चला गया ! या वरून वाटल ,पण श्रद्धा एवढ सोप देईल का Lol

क्लु देऊ का एखादा? एका गाण्याची सुरुवातीची ओळ आहे, शब्दच्छल आहे एका शब्दावर. बाकी कोड्यात वापरलेले शब्द दिशाभूल करणारेही असू शकतात. घडलेली घटना, त्यात इंव्हॉल्व्हड पार्ट्या आणि त्यावर रामरावांच्या प्रतिक्रियेमुळे वैतागलेल्या सुमतीबाई याच गोष्टींवर फोकस करा. Proud त्या काय म्हणतील?

हाय रामा <<<< नाही.
नाही मामी. भाजी कुठली नेली ते महत्त्वाचं नाहीय.
चोर पार्टी कोण आहे त्यावरून काही क्लु लागतोय का बघा.

हे उत्तर मी नाही, जिप्सीनं दिलं आहे. तो त्याचा पासवर्ड विसरला म्हणून त्यानं मला हे मेसेज करून सांगितलं.

बोलो बोलो कुछ तो बोलो
सामनेवाले ले गये बाजी (भाजी)

हे बरोबर असेल तर सुमतीबाईंना मूळ बंगलोरची करून टाकायचं.
बंगलोरचे लोक आपल्या गुरख्याला "बया काना काया?" असं विचरताना ऐकलंय बरेचदा.

करेक्ट उत्तर आहे. Happy
मानव, अर्थातच तुमचंही बरोबर आहे.


८/२८ -
सुमतीबाईंचं आपल्या किचन गार्डन वर जीवापाड प्रेम होतं. मेहनत करून त्यांनी कितीतरी भाज्या तिथे लावल्या होत्या. पण गेले काही दिवस भाज्या पहाटे कधीतरी गायब होत होत्या. कांदे, टोमॅटो, लिंबं... त्यांनी हौसेने लावलेली ब्रोकोली सुद्धा गायब झाली तेव्हा मात्र त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पहाटे अंधारात उठून वॉच ठेवायचं ठरवलं. साडेपाच सहाला खसफस आवाज आला आणि कुणीतरी भाजी घेऊन पळत सुटलं. 'अग्गोबाई, ही तर समोरच्यांची कार्टी...'! त्या 'थांबा चोरांनो.. एकेकाला चोप देते... थांबा' करत ओरडत आल्या, तोवर ती पोरं पसार झाली होती. त्यांनी दम खात आजूबाजूला पाहिलं तर एवढ्या गोंधळातही मनःशांती ढळू न देता त्यांचे यजमान रामराव बागेत योगासनं करत होते. त्यांना पाहून सुमतीबाई कोणतं गाणं म्हणतील?

उत्तर - (जिप्सी आणि मानव)
बोलो बोलो कुछ तो बोलो
सामने वाले ले गये भाजी (बाजी)
Proud

८/२९

शहरातील फेमस आर्ट गॅलरीत क्युरेटर समोर ठेवलेलं ते छोटं पेंटिंग बघत होता. त्याच्यासमोर बसलेला माणूस ते व्हॅन गॉह चं आहे का याची खातरजमा करण्यासाठी आला होता. असेल तर हे पेंटिंग त्याला विकायचं होतं. हे असं व्हॅन गॉहचं पेंटिंग एका प्रायव्हेट कलेक्शनमध्ये होतं. ते आता इतक्या वर्षांनी मार्केटमध्ये आलं की काय? ही समोर आलेली संधी बघून झालेला आनंद आणि एक्साईटमेंट कशीबशी काबूत ठेऊन क्युरेटरनं आपल्या सहकार्‍याला केबिनमध्ये बोलावलं. त्याचा सहकारी आला. त्यानं त्या पेंटिंगकडे पाहिलं आणि मग ते घेऊन आलेल्या माणसाकडेही रोखून पाहिलं. आलेल्या माणसाच्या चेहर्‍यावर झालेली किंचित चलबिचल त्याच्या सराईत नजरेनं टिपली आणि आपलं मत त्यानं एक हिंदी गाणं म्हणून सांगितलं ........

चोरीचा मामला असावा, आधी ते चित्र कुठंतरी पाहिलं आहे.

'जरासी आहट होती है, के दिल सोचता है,
कही ये 'वो' तो नहीं'

नाही ह पा.

क्ल्यु १ : चित्रांच्या बाबतीत हेराफेरीची अजून एक शक्यता असते.

बनावट असेल तर...

साड़ी के फॉल सा कभी match किया रे
कभी छोड़ दिया कभी catch किया रे

(दुसर्‍या ओळीचा नीट अर्थ लागत नाहीये, सो ते नसावं)

नाही.

क्ल्यू 2: पेंटिंग घेऊन आलेला माणूस दुसर्या प्रकारची हेराफेरी करणारा आहे हे त्या सहकाऱ्याच्या लक्षात येतं आणि तेच तो गाण्यातून सांगतो.

८/२९
लाख छुपाओ छुप नही सकता राज़ हो कितना गहरा
दिल की बात बता देता है "असली-नकली" चेहरा??

Pages