..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, कोडं अतिशयच महान होतं. एकदम भारी! :टाळ्या:

झिलमिलला या डिकोडसाठी एक स्पेशल बक्षीस!! महान डिकोड! शाब्बास.

नवीन कोणाला सुचत नाहीये असे दिसते. तर हे घ्या. सोपे असेल.

८/३८
एका प्रियकराला प्रेयसीने लग्नानंतर कामाला लावले. तू खवा तयार केलास तरच तुला रंगीत टीव्ही पाहू देइन अशी कंडिशन घातली. पण तो अजून प्रेमाने ओथंबलेल्या मोड मधून बाहेर आलेला नाही. तो तिला प्रेमाच्या शपथा घालत खवा झाला आहे टीव्ही लाव हे कसे सांगेल?

हिंट - याच गाण्यात अंडरएज ड्रिन्किंगचा उल्लेख आहे Wink तो ही ओळखलात तर बोनस पॉइण्ट्स

वावे, भारी होतं कोडं. झिलमिल जबरी!

फारएण्डा, मी पण 'खोया हुआ' वगैरे विचार करतोय. पण अशी कित्येक गाणी असल्यामुळे त्यात रंगीन/पर्दा वगैरे काही आहे का बघतोय. ह्या हिंट्स ठरल्या तर फोडल्याबद्दल क्षमस्व.

८/३८

मेरे महबूब तुझे मेरी मुहब्बत की क़सम
(फिर मुझे नर्गिसी आँखों का सहारा दे दे)
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे...

अंडरएज ड्रिंकिंग बद्दलची ओळ हीच का?

याद है मुझको मेरी उम्र की पहली वो घड़ी
तेरी आँखों से कोई जाम पिया था मैने...

पर्फेक्ट, श्र Happy आणि बोनसही बरोब्बर!

विकु, तुम्ही हेच सांगणार होता काय? मग क्रेडिट्स मधे तुमचेही नाव घालेन. आणि बोनसही ओळखला होतात?

८/३८
एका प्रियकराला प्रेयसीने लग्नानंतर कामाला लावले. तू खवा तयार केलास तरच तुला रंगीत टीव्ही पाहू देइन अशी कंडिशन घातली. पण तो अजून प्रेमाने ओथंबलेल्या मोड मधून बाहेर आलेला नाही. तो तिला प्रेमाच्या शपथा घालत खवा झाला आहे टीव्ही लाव हे कसे सांगेल?

हिंट - याच गाण्यात अंडरएज ड्रिन्किंगचा उल्लेख आहे Wink तो ही ओळखलात तर बोनस पॉइण्ट्स

उत्तर: श्रद्धा, आणि विकु!

मेरे महबूब तुझे मेरी मुहब्बत की क़सम
(फिर मुझे नर्गिसी आँखों का सहारा दे दे)
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे...

अंडरएज ड्रिंकिंग बद्दलची ओळ >>

याद है मुझको मेरी उम्र की पहली वो घड़ी
तेरी आँखों से कोई जाम पिया था मैने...

हरचंद पालव, भारतातल्या रात्री आलंय कोडं. पाहिल्या पाहिल्या आमी पण शून्य मिनिटांतच ओळखलं बरं. Proud पण, 'गाडी बुला रही है' ओळखणे याला तोड नाही. त्याबद्दल झिलमिलला खरोखर दंडवत. विकुंनाही दंडवत. हे कोडे रचणाऱ्या फारएन्डलाही दंडवत. अजून काही आडव्हान्समधी दंडवत द्यून ठेवते. आता फुडचं कोडं यिऊ द्या.

> गाडी बुला रही है' ओळखणे याला तोड नाही. त्याबद्दल झिलमिलला खरोखर दंडवत

हे मात्र खरे आहे. फारेंड चे कोडे त्यामानाने सोपे होते शिवाय हिंटही दिलेली होती.

श्रद्धा, तुमची ख्याती सर्वदूर आहेच! ह्यावेळी (समय-झोन-सोयीस्करत्वामुळे का होईना) वेगळ्या कुणीतरी पहिल्यांदा उत्तर दिलं म्हणून जरा कौतुक. तुम्हाला कायमची पैठणी (न संपणारी) आहेच Happy

8/39
प्रेम आणि संध्या यांचे सूत जुळले.... प्रेम बिडी कारखान्यात सुपरवायझर तर संध्या एक नॅनी. लहान मुले तिला फार आवडत..
एकदा संध्या प्रेम ला भेटायला त्याचा ऑफिसात गेली तेंव्हा तिथल्या कामगारांनी प्रेम ला विचारले कि तुमची प्रेयसी काय काम करते तर तो काय गाणे गाईल ?

'आया' है Lol
भारी कोडं च्रप्स आणि मामी मस्तच उत्तर!!

Pages