..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, चांगला प्रयत्न, पण हे नाही.

अज्ञातवासी, शब्द बरोबर सापडलाय तुम्हांला. पण गाणं हे नाही. गाणं आता इतकं अवघड नाही.

बरोबर.


८/४२ -
चंद्रकांता मालिका माहीत असेल सगळ्यांना. त्यात एकदा कुंवर वीरेंद्र विक्रम सिंगला चंद्रकांताच्या राज्याच्या सैनिकांनी कैद केलं. तो चंद्रकांताला भेटायचं म्हणून काहीही सैन्य, कुमक न घेता एकटाच लपूनछपून गेला होता. पण कसं कोण जाणे, त्यांच्या या गुप्त भेटीची माहिती कळलीच शत्रुसैन्याला. फारच धोकादायक परिस्थिती. पण नशिबाने कुंवर वीरेंद्रसोबत त्याचा जांबाज नावाचा विश्वासू मित्र होता. त्याने स्वतःला अवगत असलेली रूप बदलण्याची कला वापरली, इतर काही जादू केली, तो लीलया शंभर सैनिकांशी एकटा लढला, काहीतरी चूर्ण हवेत फेकून त्याने धूर निर्माण केला आणि शेवटी कुंवर वीरेंद्रला घेऊन तिथून सहीसलामत निसटला. कुंवरला आपल्या मित्राबद्दल अतिशय अभिमान वाटला आणि त्याच्या मैत्रीची महती त्याला पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली. वीरेंद्रने जांबाजला उद्देशून कोणते गाणे म्हटले?
उत्तर -
(अज्ञातवासी)
ऐ यार (अय्यार) सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है..
(चंद्रकांतामध्ये रूप बदलू शकणाऱ्या, जादू करू शकणाऱ्या, शूर, लढवय्या गुप्तहेरांना अय्यार म्हणतात.)

८ / ४३

कोयल परब, लग्नानंतर दामले झाली. बाबांवर गेली असल्याने तिचे त्यांचाच गोरा रंग, लांब नाक उचललं होतं आडनावाबरोबर तिचं नशीबसुद्धा पालटलं. दामले हा बँकेत टॉप मॅनेजर. प्रत्येक कर्ज प्रकरणाबरोबर घरात नवीन वस्तू येऊ लागली. सगळ्या मैत्रिणी तिचा हेवा करू लागल्या. घरात नवीन फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, सगळं आलं. हिऱ्याच्या अंगठ्या आल्या, सोन्याचे दागिने घालून ती घरात सुद्धा मिरवू लागली. झाडल तरी नोटा सुपलित येऊ लागला. लांबलचक गाडी घेऊन ते मिरवू लागले.
नियतीला मात्र हे सहन झाल नाही. दामले भ्रष्टाचाराच्या आरोपात पकडला गेला. त्यात त्याने बँकेतही अपहार केला हे लक्षात आलं. शेवटी पोलीस त्याला पकडायला आले, तेव्हा कोयलला भरून आलेल्या डोळ्यांनी बघताना त्याने कोणतं गाणं म्हटलं असेल?

१. गाण्यात दोन शब्द आहेत, जे कोड्यात आहेत. दोन्ही शब्दात शब्दछल आहे, आणि दोन्ही शब्द गाण्यात एकाच वाक्यात येतात.

२. हे गीत प्रचंड लोकप्रिय ठरलं होत. याच काही वर्षांपूर्वी लेटेस्ट वर्जन आलं होतं तेही लोकप्रिय ठरलं.

३. परब - हा एक शब्द आहे.

४. चित्रपट १९९० - २००० या दशकातील आहे, आणि अतिशय गाजलेला आहे.
५. या चित्रपटाला बरेच अवॉर्ड सुद्धा मिळाले होते.

एक रँडम गेस. 'तू चीज बडी है मस्त मस्त' आहे का? त्यात पोलिसांनी पकडलं तरी तो बायकोला 'नही तेरा कोय(ल) दोष दोष..' म्हणत असेल.

ती कोयल तर हा कोयला.

कोयला काला है चट्टानोने पाला है... (म्हणजे मला काही नाही होणार जेल मध्ये, काळजी करू नकोस.)

कितना प्यारा तुझे (प)रबने बनाया जी करे देखता रहूं? राजा हिंदुस्थानीचे गाणे?
याचे रिमिक्स आले होते एका सिनेमात.
पण बाकी काही फार जुळत नाहीये.

@श्रद्धा बरोबर.

पुढे लगेच कितना सोना तुझे रब ने बनाया...

कोड्याची फोड थोड्याच वेळात देतो.

कोयल परब, लग्नानंतर दामले झाली. बाबांवर गेली असल्याने तिचे त्यांचाच गोरा रंग, लांब नाक उचललं होतं >>>>

कितना प्यारा तुझे, (प)रब ने बनाया, जी करे देखता रहू!

हिऱ्याच्या अंगठ्या आल्या, सोन्याचे दागिने घालून ती घरात सुद्धा मिरवू लागली.

>>>>>
कितना सोना तुझे, (प) रब ने बनाया जी करे देखता रहू.

तेव्हा कोयलला भरून आलेल्या डोळ्यांनी बघताना त्याने कोणतं गाणं म्हटलं असेल?

देखता रहु साठी हि ओळ क्लू होती.

रिमिक्स - Enna Sona, ok janu च गाणं.
माझ्या सगळ्यात आवडत्या गाण्यांपैकी एक.

ओह मला वाटलं होतं की परब ( उपर ब... किंवा पर ब... किंवा ...प रब असं काही) शब्द पूर्ण असेल!
मस्त श्रद्धा!

Pages