..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोरदार टाळ्या झाल्यावर सहसा विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार असतात ना, ते टाकलेत.

विराट अनुष्का आपल्या मागावर आहेत. >> Lol Lol

कोडे, उकल छान.

विशेष अभिनंदन आहे मामी आपले.
असे मला ते वाटले होते.

मोजके परंतु बहुतेक दर्जॆदार चित्रपट देणाऱ्या भारतीय दिग्दर्शक-संगीतकाराची ही एक गंमत.
एका प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्मात्याला तो भेटायला गेला असताना निर्मात्याने त्याला वाईन ऑफर केली. मद्य कधीच घेतले नसल्याने त्याला हे घेतले तर आपल्याला भलतेच काही होणार नाही ना असा प्रश्न पडला आणि चाचरत त्याने निर्मात्याला तसे विचारले.
त्यावर निर्माता "काहीतरीच काय!" अशा अर्थाचा उद्गार काढुन त्याला प्यायला सांगितले त्याचे नाव घेउन. यासाठी त्याने एक इंग्रजी नर्सरी सॉंग म्हटले. त्या दिग्दर्शकाचे नाव आणि ते गाणे, दोन्ही ओळखा.

हिंडेनबर्गचा परिणाम या धाग्याच्या टीआरपीवरही झालेला दिसतोय.
--------
हिंट: १. गाणे इंग्रजी असले तरी त्याच शब्दांचा मराठी अर्थ वर सांगीतले तसा निघतो. दिग्दर्शकाचे नाव सरळ न सांगण्याचे कारण एवढेच की नाव दिले तर अर्धे उत्तर सांगण्यासारखे होईल. निर्माता दाक्षिणात्य आहे यावर जास्त विचार करू नका. त्याला दाक्षिणात्य का केले हे उत्तर आले की कळेल, आधी कळण्याची आवश्यकता नाही.

अरे बाप रे! इंग्रजी? "काहीतरीच काय!"ला इंग्रजीत काय म्हणतात इथपासून माझी सुरुवात आहे. असो. एक अंदाज - वी शाल ओव्हरकम.... हे काही नर्सरी साँग नाही, पण ह्यात विशाल भारद्वाज आहे.

अरर नंबर द्यायचं राहून गेले. उतर आले की मग खाली देईन.
विशाल भारद्वाज बरोबर. गाणं दुसरं आहे.
"काहीतरीच काय!" साठीचा उद्गार मराठीच आहे.

Three little kittens नावाच्या गाण्यात we shall have no pie अशी ओळ आहे. (विशाल हॅव नो "पेय") असं ओढून ताणून बसवता येईल. म्हणजे त्याचं वाईन न घेणं त्यात येईल.

ओह! म्हणजे ते गाणे सगळीकडे प्रसिद्ध नव्हते तर!
पण आमच्याकडे आणि मुंबईला सुद्धा ऐकलंय मी. अंधेरीला राहत होतो त्या इमारती मध्ये तळमजल्याला नर्सरी होती. तिथे म्हणायचे हे गाणे. ABCD शिकण्याचे गाणे आहे.

सांगुन टाकु का उत्तर?

कोडे क्र. ८/५३: मोजके परंतु बहुतेक दर्जॆदार चित्रपट देणाऱ्या भारतीय दिग्दर्शक-संगीतकाराची ही एक गंमत.
एका प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्मात्याला तो भेटायला गेला असताना निर्मात्याने त्याला वाईन ऑफर केली. मद्य कधीच घेतले नसल्याने त्याला हे घेतले तर आपल्याला भलतेच काही होणार नाही ना असा प्रश्न पडला आणि चाचरत त्याने निर्मात्याला तसे विचारले.
त्यावर निर्माता "काहीतरीच काय!" अशा अर्थाचा उद्गार काढुन त्याला प्यायला सांगितले त्याचे नाव घेउन. यासाठी त्याने एक इंग्रजी नर्सरी सॉंग म्हटले. त्या दिग्दर्शकाचे नाव आणि ते गाणे, दोन्ही ओळखा.

हपांनी यातील दिग्दर्शक बरोबर ओळखला. पण गाणे कुणाला माहित नसावे . मला वाटले सगळीकडे म्हणत असतील.

उत्तर: Happy happy we shall be
हॅ! पी, हॅ! पी विशाल बी.
(आडनावाचे initial करतो.)

(आता हे गााणे शोधताना हे पण दिसले. हे कुणाला माहित असणे शक्यता अगदीच कमी, सहज दिसले म्हणुन पेस्टले.)

हॅ! पी, हॅ! पी! >> Lol . विशाल बी फॉर भारद्वाज पण भारीच. गाणं माहीत नव्हतं. तसं मला ते थ्री लिट्ल किटन्स पण माहीत नव्हतं, शोधून काढलं. इंग्रजी कच्चं आहे. मागे एकदा आमच्या गावात आलेल्या शिवराम गोविंदचं लायसन आमच्या आर्डरलीसकट गावात कुणालाच वाचता येईना.

उगाचच जुळवून आणलेले कोडे... पूर्वीसारखी इंटरेस्टिंग कोडी राहिली नाहीत.. मलाच द्यावे लागेल एखादे...

कोडे क्र. ८/५४: वेगळी होताना ती दोघं मराठी लोकांच्या हिंदीत 'नाहीतरी नक्की नव्हतंच' अशा आशयाचं गाणं म्हणतात.

एक मैं और एक तू?
.... ये तो "हो - नाही" था अशी ओळ आहे त्यात.

हो.

कोडे क्र. ८/५५

गुलाम नबी आजाद एकदा एका 'वेणूगोपाल अय्यर' नावाच्या ज्योतिषाकडे जातात. त्यांचा हात बघून वेणूगोपाल विचारतो की तुमच्या मुलांपैकी कुणी गातं का? आजाद साहेब म्हणतात की त्यांची मुलं - सद्दाम आणि सोफिया दोघेही बाथरूम सिंगर आहेत, पण फारसे काही खास गात नाहीत. वेणूगोपाल म्हणतो की काहीतरी गडबड आहे. तुमचा मुलगा अतिशय दैवी आणि गोड गळ्याचा असायला हवा होता. कदाचित तुमच्या त्या गायक मुलाचा जन्मच झालेला नाही. त्याचा आत्मा अजून भटकतो आहे.
'बरं मग?' - आजाद.
'मग काही नाही... माझ्याकडे दोन गोळ्या आहेत. त्यातली निळी गोळी घेतलीत, तर आज तुम्ही घरी गेल्यावर झोपून जाल आणि मी सांगितलेलं सगळं विसरून जाल. पण लाल गोळी घेतलीत तर मी प्लँचेट करून त्या आत्म्याला बोलवू शकतो... लक्षात घ्या, एकदा का लाल गोळी घेतलीत, तर पुन्हा मागे फिरणे नाही'

ख खो अ जा, परंतू निदान खरंच असा काही दैवी आवाज असू शकतो का हे तरी कळेल, म्हणून आजाद साहेब लाल गोळी घेतात आणि त्यांना घेरी येते. जागे होतात तेव्हा एका प्रचंड मोठ्या पांढर्‍या खोलीत ते आणि ज्योतिषी बसलेले असतात. ज्योतिषासमोर कसला तरी कागद असतो. त्यावर एक नाणं ठेवून त्यावर त्याने बोट ठेवलेलं असतं. टेबलावरचा सी एफ एल बल्ब अचानक फुटतो आणि बाहेर विजा कडाडतात. आजाद साहेबांचे डोळे विस्फारतात. त्या अंधूक प्रकाशात त्यांना जवळचा पाण्याचा ग्लास अचानक आपोआप सरकताना दिसतो. ज्योतिषी आनंदविभोर होऊन नाचू लागतो. 'माझा प्रयोग सक्सेसफुल झाला. तुमच्या न जन्मलेल्या मुलाचा आत्मा इथे उपस्थित आहे. तुम्ही आता त्याच्याशी बोलू शकता.' आजादांना आता तो अ-शरीर दैवी गळा कसा आहे ते ऐकायचं असतं. पण इकडे त्या ज्योतिषाचीच नुसती बडबड चाललेली असते. तर मग आजाद त्या आत्म्याला कोणतं गाणं म्हणून विनवतील?

कोडे क्र. ८/५५ >>>
चूप चूप बैठे हो जरूर कोई बात है
पहली मुलकात है जी पहली मुलकात है
?????

नाही. क्लू देतो.

गुलाम नबी आझाद यांच्या मुलांची पूर्ण नावं विकी वर शोधा. मग त्या कोड्यातल्या मुलाचं नाव काय असेल ह्याचा अंदाज लावा. मग येईल.

अजून एक क्लू
त्याचा जन्म झालेला नाही, हे महत्त्वाचं आहे. त्याचं नाव काय असेल?

Pages