..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ / ४३

कोयल परब, लग्नानंतर दामले झाली. बाबांवर गेली असल्याने तिचे त्यांचाच गोरा रंग, लांब नाक उचललं होतं आडनावाबरोबर तिचं नशीबसुद्धा पालटलं. दामले हा बँकेत टॉप मॅनेजर. प्रत्येक कर्ज प्रकरणाबरोबर घरात नवीन वस्तू येऊ लागली. सगळ्या मैत्रिणी तिचा हेवा करू लागल्या. घरात नवीन फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन, सगळं आलं. हिऱ्याच्या अंगठ्या आल्या, सोन्याचे दागिने घालून ती घरात सुद्धा मिरवू लागली. झाडल तरी नोटा सुपलित येऊ लागला. लांबलचक गाडी घेऊन ते मिरवू लागले.
नियतीला मात्र हे सहन झाल नाही. दामले भ्रष्टाचाराच्या आरोपात पकडला गेला. त्यात त्याने बँकेतही अपहार केला हे लक्षात आलं. शेवटी पोलीस त्याला पकडायला आले, तेव्हा कोयलला भरून आलेल्या डोळ्यांनी बघताना त्याने कोणतं गाणं म्हटलं असेल?

उत्तर
(श्रद्धा)

कितना प्यारा तुझे, रब ने बनाया जी करे देखता रहू.

कोयल परब, लग्नानंतर दामले झाली. बाबांवर गेली असल्याने तिचे त्यांचाच गोरा रंग, लांब नाक उचललं होतं >>>>

कितना प्यारा तुझे, (प)रब ने बनाया, जी करे देखता रहू!

हिऱ्याच्या अंगठ्या आल्या, सोन्याचे दागिने घालून ती घरात सुद्धा मिरवू लागली.

>>>>>
कितना सोना तुझे, (प) रब ने बनाया जी करे देखता रहू.

तेव्हा कोयलला भरून आलेल्या डोळ्यांनी बघताना त्याने कोणतं गाणं म्हटलं असेल?

देखता रहु साठी हि ओळ क्लू होती.

रिमिक्स - Enna Sona, ok janu च गाणं.
माझ्या सगळ्यात आवडत्या गाण्यांपैकी एक.

धागा वर काढण्यास असेच एक कोडे:

सायंकाळी नदी किनारी तिचे नाव घेऊन बोलावून तुला काळया रंगांची केशप्रक्षालन द्रावणे देईन असे सांगणारे गाणे.

Submitted by मानव पृथ्वीकर on 25 August, 2022 - 19:54
शाम ढले जमुना किनारे किनारे
आजा राधे आजा तोहे शाम पुकारे
???

Submitted by झिलमिल on 25 August, 2022 - 21:22
हा हा हा..... बरोबर वाटतंय

इतका वेळ मी काळ्या केशप्रक्षालन चा अर्थ काळा हेअर डाय घेत होते.

मानव भारी होतं हे. झिलमिल ग्रेट!

Submitted by मामी on 25 August, 2022 - 22:11
शाम म्हणजे रंगाचा संदर्भ समजला. पण केशप्रक्षालन द्रावणे चा संदर्भ कोठून लागतो?

Submitted by फारएण्ड on 25 August, 2022 - 22:15
शाम्पु

Submitted by मामी on 25 August, 2022 - 22:19
भारी!!! किती दिवसांनी हा बाफ जागा झाला...

फारएन्ड, शाम्पु कारे (काळी द्रावणे!)

Submitted by श्रद्धा on 25 August, 2022 - 22:23
Lol धन्यवाद मामी, श्र. जबरी प्रश्न आणि उत्तरही.

Submitted by फारएण्ड on 25 August, 2022 - 22:26
किंवा हे जर कोणा बंगाली ब्युटिपार्लरवाला / वाली म्हणत असेल तर तो / ती राधेला नदीकिनारी शाम्पु करण्याचं आमंत्रण देत आहे.

शाम्पु कारे (instead of saying करे)

Submitted by मामी on 25 August, 2022 - 22:34
मामी Lol

Submitted by फारएण्ड on 25 August, 2022 - 23:10
नवविवाहित जोडपे कार ने जात असते. एका ठिकाणी थांबून सोडा प्यायचे ठरते... मुलगा दोन सॉफ्ट ड्रिंक्स जास्तच पितो... आणि गॅस होतो... त्याला गॅस झाला कि एकदमच बाहेर पडत. विथ जोराचा फार्ट साऊंड अशी त्याची कंडिशन असते... एकच फार्ट आणि तो ओके ...आणि जर गॅस पास नाही केला तर अक्खा दिवस मळमळ होते ... नॉशिया होतो वगैरे वगैरे...
तिथून निघतात तर तिला फोन येतो कि पुढच्या सिग्नल जवळ तिची मोठी ताई आणि जिजाजी आहेत ज्यांना लिफ्ट हवीय...... इकडे मुलाची हालत गॅस अडकल्या मुळे आणि थोडयाच वेळात ते गाडीत चढतील हे माहित असल्यामुळे बेकार आहे...
तर मुलगी आपल्या नवऱ्याला काय गाणे म्हणेल??

Submitted by च्रप्स on 26 August, 2022 - 01:10
दिल पुकारे.. आ रे आ रे ?
किंवा आजा तुझ को पुकारे मेरे गीत रे
Angry

Submitted by वावे on 26 August, 2022 - 05:36
बरोबर झिलमिल, शाम्पू आणि पुढे कारे छा अर्थ बरोबर लावला मामी आणि श्रद्धा.
प्रक्षालन म्हणजे धुणे (बरोबर ना?) म्हणून केशप्रक्षालन द्रावण.

मामी बंगाली व्हर्जन परफेक्ट बसतय Lol

Submitted by मानव पृथ्वीकर on 26 August, 2022 - 07:48
तर मुलगी आपल्या नवऱ्याला काय गाणे म्हणेल?? >> सन सननन सनननन, जाजा रे जारे जारे जारे पवन

Submitted by मामी on 26 August, 2022 - 14:30
फिट बसतेय- पण माझ्या डोक्यात वेगळे आहे...

Submitted by च्रप्स on 26 August, 2022 - 18:04
आज कल फिर कभी, फिर कभी बाद मे
बात रह जाएगी, याद ही याद मे
हो जो नहीं है कहा, जो नहीं है किया
अभी न किया तो फिर, कभी नहीं, कभी नहीं

पाद को हो जाने दो, पाद में खो जाने दो
ऐतबार किसका है, इंतज़ार किसका है
अभी न हुआ तो फिर, कभी नहीं, कभी नहीं
पाद को हो जाने दो, पाद में खो जाने दो !!!

Submitted by च्रप्स on 30 August, 2022 - 08:19
सोळा दमड्या जवळ नसतील तर लांब जाऊ नये असा संदेश द्यायला ती कुठले गाणे म्हणते?
------
(आता कोडं बरोबर आहे, परत बदलायची गरज नाही. सोडवा.)

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 October, 2022 - 15:53
Lol

Submitted by वावे on 28 October, 2022 - 15:57
१ दमडी = ३/४ पै, १६ दमडी = १२ पै
२ दमडी = १ धेला, २ ढेला = १ पैसा, १६ दमडी = ४ पैसे

Submitted by हरचंद पालव on 28 October, 2022 - 18:18
योग्य दिशा.
शेवटली ओळ धरून पुढे चला.

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 October, 2022 - 18:21
मापृ : छनछन बजे रुपैया, नाचे दुनिया ( सिनेमा : चार पैसे) हे आहे का ?

Submitted by निकु on 28 October, 2022 - 20:12
नाही. दिलेला नेमका संदेश त्यात यायला हवा. चित्रपटाच्या नावाचा संबंध नाही. (ते मला माहीतही नाही.)
---
रुपया म्हणजे एकदम वर गेलात.
---
दमडी पासून रुपया पर्यंत सगळं आलं, पण काय राहीलं?

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 October, 2022 - 21:50
पास नहीं आना दूर नही जाना
तुमको सौगंध है के आज मुहब्बत बंद है

Submitted by भरत. on 28 October, 2022 - 21:58
भरत _/\_

Submitted by vijaykulkarni on 28 October, 2022 - 22:16

बरोबर!

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 October, 2022 - 22:16
Lol मानव.

कोडं आणि उकल दोन्हीही भारी.

Submitted by मामी on 28 October, 2022 - 22:29
यात सोळा दमडी कुठे आहे...

एक आना म्हणजे सोळा दमडी ?

Submitted by च्रप्स on 28 October, 2022 - 23:24
पास नहीं आना >>>> Lol

कोडं आणि उकल दोन्हीही भारी. >>> +१

Submitted by फारएण्ड on 29 October, 2022 - 00:17
पास नहीं आना >> भारी!

च्रप्स , पॉइंट आहे!

मानव, कल्क्युळेशन कळलं नाही. पूर्वी रेशो वेगळा होता काय? बहुतेक पूर्वी ६४ पैसे म्हणजे १ रुपया होता, त्यानुसार मग हे बरोबर आहे.

Submitted by हरचंद पालव on 29 October, 2022 - 04:21
हो च्रप्स, हरचंद. मी आधी १०० पैसे = १६ आणे हिशेबाने २५ दमडी असे कोड्यात लिहिले होते. मग दुरुस्त केले. कारण जेव्हा दमडी होती तेव्हा जुनेच गणित असणार, ४ पैशांचा आणा.
१६ दमडी = १ आणा

Submitted by मानव पृथ्वीकर on 29 October, 2022 - 07:45
कौतुक करायचे राहून गेले.. एक नंबर होते.. आणि उकल पण...

Submitted by च्रप्स on 29 October, 2022 - 07:47
छोट्या बंटीला एके ठिकाणी चित्रकार चित्र काढत असताना दिसतो. तो त्याचा जवळ जातो. चित्रकार त्याला नाव विचारतो. तो सांगतो आणि त्याला "तुम्ही चित्र काढत आहात का?" असे विचारतो. चित्रकार हा व्याकरणाचा पक्का आणि आग्रही असतो. त्याला बंटीने एक शब्द दीर्घ ऐवजी ऱ्हस्व उच्चारला आहे हे खटकते. मग तो त्याला करेक्ट करायला दीर्घ उच्चारावर भर देऊन, ऱ्हस्व उच्चार चुकीचा आहे हे सांगायला कोणते गाणे म्हणतो?

Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2022 - 19:30
१. गाणं हिंदी आहे.
म्हणजे चित्राला हिंदी शब्द शोधणे आले.
तो सापडला की फार अवघड नाही.

Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2022 - 20:40
तस्वीर बनाता हू तस्विर नही बंटी

Submitted by मोरोबा on 12 November, 2022 - 20:48
बिंगो मोरोबा! Happy

Submitted by मानव पृथ्वीकर on 12 November, 2022 - 20:58
एक लाजरीबुजरी म्हैस असते. ती पान्हा देत नसते. गवळी जाम वैतागतो आणि 'कशी दूध देत नाहीस बघतो' असं म्हणून आणखीच जोर लावतो. आरडाओरडा ऐकून पाचपन्नास बघे गोळा होतात. ते पाहून म्हैस आणखीच लाजते आणि हे गाणं म्हणते.....

Submitted by मोरोबा on 12 November, 2022 - 21:01
छोड दो आँचल जमाना क्या कहेगा

Submitted by वावे on 12 November, 2022 - 21:04
Happy करेक्ट

Submitted by मोरोबा on 12 November, 2022 - 21:08
मानवदादा व मोरोबा, कोडे व उकल धमाल Lol

Submitted by अस्मिता. on 12 November, 2022 - 21:24
Lol ही दोन्ही कोडी व उकल धमाल आहेत Happy

Submitted by फारएण्ड on 12 November, 2022 - 21:28
आंचल ... आंचळ कळायला वेळ लागला मला.. एक नंबर...

Submitted by च्रप्स on 12 November, 2022 - 21:32
:haha: दोन्ही कोडी आणि उत्तरं मस्त.

Submitted by मामी on 12 November, 2022 - 22:04
तस्वीर नहीं बंटी भारीच!

मोरोबा, मला त्या शब्दाचा लहानपणी तोच अर्थ वाटायचा. त्यामुळे असं वाटायचं की किती बोल्ड शब्द आहेत!

Submitted by हरचंद पालव on 13 November, 2022 - 03:29
नवीन कोडे.

बकासुर समोर काय येईल ते खात सुटला. खाता खाता त्याचा आकार इतका मोठा झाला की त्याला समोर काय आहे हे नीट दिसतही नसे. तो तसाच घाईघाईत बकाणा भरत असे. एकदा त्याला जेवण वाढायला आई आलेली असताना त्याने आईसकट अन्न पोटात गिळलं. आतून आईचा आवाज आल्यावर लक्षात आलं की आपल्या पोटात आई आहे. आता काय करायचं ह्या विचारात तो एका वैद्यबुवांना भेटला आणि म्हणाला माझ्यावर उपचार करा, माझ्या पोटात आई आहे. वैद्यांना एक असं झाड माहिती होतं, की ज्याचा डिंक खायला घालून मग ह्या प्रकारचा उपचार करता येतो. पण तो डिंक त्यांच्याजवळ नव्हता. ते बकासुराला म्हणाले की आधी तो डिंक घेऊन ये.

हा वरचा दोघांमधला संवाद कुठल्या गाण्यात चालेल?

Submitted by हरचंद पालव on 13 November, 2022 - 13:26
Lol

Submitted by mrunali.samad on 13 November, 2022 - 14:36
मेरे मेहेबूबचं कडवं?

एक यही मेरा इलाज-ए-गम-ए-तनहाई है..
..
अब तो मिल जा के मेरे जान पे बन आई है

Submitted by वावे on 13 November, 2022 - 15:59
हाहा. हे थोडं जुळतय, पण गाणं मराठी आहे. पण वावे, योग्य विचार करता आहात.

अजून एक क्लू देतो. नाट्यगीत आहे. शिवाय शब्द कळायला तुम्हाला मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत या चारही भाषा वापरायला लागतील (संस्कृत कदाचित नाही लागणार).

Submitted by हरचंद पालव on 13 November, 2022 - 17:46
मम आत्मा गमला...
मम आत मा, गम ला.. Proud
मराठी नाट्यगीत क्लु मुळे कळले चटकन. मी हिंदी गाणी आठवत होते.

Submitted by श्रद्धा on 13 November, 2022 - 18:08
.

Submitted by आंबट गोड on 13 November, 2022 - 18:09
श्रद्धा, ह पा ... छानच!!

Submitted by झिलमिल on 13 November, 2022 - 18:20
मम आत्मा गमला Lol

Submitted by वावे on 13 November, 2022 - 18:22
श्रद्धा, परफेक्ट!

Submitted by हरचंद पालव on 13 November, 2022 - 18:47
मम आत्मा गमला >>> Lol

Submitted by फारएण्ड on 13 November, 2022 - 19:58
वा वा! भारी हपा आणि श्र. Rofl

Submitted by मामी on 13 November, 2022 - 20:06
Pages

इतक्या कमी शब्दांत इतक्या भाषा बसवण्याचे कसबही महान आहे Happy

Submitted by फारएण्ड on 13 November, 2022 - 20:28
कोडे आणि उकल भारी!

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 November, 2022 - 20:33
इतक्या कमी शब्दांत इतक्या भाषा >> सिद्ध करतात की आपण इतकी मिश्र भाषा रोज लीलया वापरतो, किंबहुना तीच आपली भाषा आहे. 'आपल्या मदरटंगमधून आपले थॉट्स जितके क्लिअरली एक्सप्रेस करता येतात ...' आठवलं.

Submitted by हरचंद पालव on 14 November, 2022 - 05:11
मस्तं कोडं,
हो तर हर्पा , फक्त 'बावा लागी सुसू' होऊ नये एवढी काळजी घेतली की झालं ... Wink Proud

Submitted by अस्मिता. on 14 November, 2022 - 06:40
Lol

Submitted by हरचंद पालव on 14 November, 2022 - 07:01
राज्यात निवडणुका येऊ घातल्या म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांनी निशांत दुषणला पाचारित केले. तो आणि त्याची टीम मुख्यमंत्र्यांच्या पक्ष्याचा जनसंपर्क हाताळणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकीर्दीत हवी ती कामं न केल्याने (आणि नको ती कामं करून ठेवल्याने) जनता खवळली होती. निशांत दुषणचे लोकं जेव्हा जेव्हा संपर्क अभियानांतर्गत जनतेसमोर जात तेव्हा त्यांना जनतेचा संताप, सरकारला विचारलेले जळजळीत प्रश्न, जनतेच्या अहिताच्या कारभाराबद्दल शिव्याशाप आणि क्वचित प्रसंगी मारहाण होऊ लागली. या घटनांमुळे त्याचे टीममेंबर लोकांसमोर जाण्यास घाबरू लागले. तेव्हा आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी निशांतने एक मिटिंग घेतली आणि टीमला त्यांचे कार्य आणि ते करण्यासाठी लागणारे धैर्य यांची आठवण करून देण्यासाठी एक गाणेच म्हणून दाखवले .....

Submitted by मामी on 14 November, 2022 - 11:20
बावा लागी सुसू. >>> हे काय आहे अस्मिता?

Submitted by मामी on 14 November, 2022 - 11:20
हर्पा, अस्मिता... Lol
मामी, पुलंच्या पूर्वरंग पुस्तकातलं आहे. मलाय, इंडोनेशियन भाषेत सुसू म्हणजे दूध.. एका घरी असताना त्यांना चहात दूध हवे असते तेव्हा त्या बाई मेडला 'बावा लागी सुसू' (बावा म्हणजे आण) असं सांगतात.

Submitted by श्रद्धा on 14 November, 2022 - 11:24
ओह ओके. मी पुलं पारच विसरून गेले आहे हे जागोजागी जाणवत आहे. असो.

Submitted by मामी on 14 November, 2022 - 11:32
प्यार ( PR) किया तो डरना क्या?

Submitted by वावे on 14 November, 2022 - 11:43
PR प्यार हे विसरूनच गेलो होतो.
प्यार करने वाले कभी डरते नही

Submitted by मानव पृथ्वीकर on 14 November, 2022 - 11:46
PR Happy . वरची दोन्ही बरोबर वाटत आहेत.

Submitted by हरचंद पालव on 14 November, 2022 - 13:05
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी' म्हणजे 'आण'.

छातीला 'दादा' म्हणतात पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत!
शिवाय रॉंग नंबरला 'साला' म्हणतात मलाय भाषेत.
Lol

Submitted by वावे on 14 November, 2022 - 13:21
PR करने वाले कभी डरते नही. >>> हे माझ्या मनातलं गाणं होतं.

वावे, तुझंही बरोबर फिट होतंय.

PR करने वाले कभी डरते नही
जो डरते है वो, PR करते नही

Submitted by मामी on 14 November, 2022 - 13:22
छातीला 'दादा' म्हणतात पण पाठीला वहिनी म्हणत नाहीत! >>> Biggrin

Submitted by मामी on 14 November, 2022 - 13:23
श्रद्धा, मला वाटतंय 'लागी' म्हणजे 'आण'.<<< नाही. Happy बावा म्हणजेच आण. लागी म्हणजे 'पुन्हा/अजून'. पुस्तकात मात्र लागी चा अर्थ त्यांना माहीत नव्हता असे लिहिले आहे.

पुस्तक घरात आहे त्यामुळे 'लागी'च चेक करून घेतले. Proud

Submitted by श्रद्धा on 14 November, 2022 - 13:30
ओह अच्छा!
लागी'च चेक करून घेतले.Lol

Submitted by वावे on 14 November, 2022 - 13:34
लागीच Lol

कोडं भारी होतं मामी.

Submitted by हरचंद पालव on 14 November, 2022 - 13:38
लागी कलेजवा कटार हे हिंदीत पहिल्या प्रेमात तर इंडोनेशियन दुसऱ्या+ प्रेमात गात असतील.

Submitted by मानव पृथ्वीकर on 14 November, 2022 - 14:18
Biggrin

Submitted by मामी on 14 November, 2022 - 14:40
रघुरामन, त्याची बायको कीर्तिप्रिया आणि त्यांची जुळी मुलं, कीर्तिसूर्यउदयन आणि त्रिभुवनविजयन असं चौकोनी कुटुंब पुण्यात रहायला आलं. तिथे त्यांच्या शेजारी लेले कुटुंब रहात होतं. लेल्यांना, मुख्य म्हणजे मिसेस संजना लेल्यांना या दक्षिण भारतीय नावांमधली अक्षरांची उधळपट्टी पसंत नव्हती. त्यामुळे त्यांनी लवकरच त्या सगळ्यांसाठी संक्षिप्त नावं वापरायला सुरुवात केली.
एकदा रघुरामनची दोन्ही मुलं लेल्यांच्या मुलाशी, संदीपशी खेळायला नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेली होती. संदीपच्या आईने, म्हणजे संजनाने मनभावन ही बंगाली मिठाई बनवली होती. ती या दोन्ही मुलांना इतकी आवडली, की एरवी गोड न खाणाऱ्या त्या मुलांनी लेलेकाकूंची नजर चुकवून ती मिठाई संपवून टाकली. थोड्या वेळाने लेलेबाई स्वैपाकघरात गेल्या तेव्हा त्यांना मिठाई संपलेली दिसली. आपल्या पाककौशल्याला मिळालेली ही दाद बघून त्या मनात खूषच झाल्या, पण वर वर लटक्या रागाने रघुरामनला हाक मारून त्या मुलांची तक्रार सांगू लागल्या. रघुरामनला, आपल्या मुलांनी चोरून मिठाई खाल्ली याचं आश्चर्य वाटलं आणि तोही खेळकरपणे मिसेस लेल्यांना म्हणाला की माझी मुलं असं करणंच शक्य नाही!
फारसं हिंदी न येणारी कीर्तिप्रिया मात्र काहीशा संशयाने या दोघांमधला गाण्यातला संवाद ऐकत होती.
कुठलं गाणं म्हणत होते ते दोघे?

Submitted by वावे on 16 November, 2022 - 10:00
प्रचंड उत्सुकता आहे मला.. वावे काय खतरनाक चॅलेंज दिलेय ...

Submitted by च्रप्स on 16 November, 2022 - 10:48
नावं वाचून त्रिभुवनकीर्तीची गोळी घ्यावी असं वाटायला लागलंय. Happy

धमाल वर्णन आहे. बाजिराव-मस्तानी भेटी पोन्नियीन सेल्वन आले गा - असा अनुभव आला. आता कोड्याचा विचार करतो.

Submitted by हरचंद पालव on 16 November, 2022 - 10:54
नाट्यगीत आहे का?

Submitted by मानव पृथ्वीकर on 16 November, 2022 - 10:58
नाही मानव.
ह.पा. Lol

Submitted by वावे on 16 November, 2022 - 11:11
आत्तापर्यंतचे सर्वात भारी कोडे....:-)
उत्तर काहीही असो....वावे...तुलाच शंभर पैकी शंभर मार्क्स!!!

Submitted by आंबट गोड on 16 November, 2022 - 11:29
बाजिराव-मस्तानी भेटी पोन्नियीन सेल्वन आले गा >>> :haha:

Submitted by मामी on 16 November, 2022 - 12:59
वावे तू भारी आहेस.

Submitted by मामी on 16 November, 2022 - 12:59
बापरे मला आता टेन्शन आलंय Lol

लेलेबाई नुसती तक्रार करत नाहीत, तर मुलांना घेऊन जायलाही सांगतात Happy

Submitted by वावे on 16 November, 2022 - 13:06
जानेमन जानेमन तेरे दोन 'यन' (पोरांची नावं)
चोरी चोरी लेके गये देखो मेरा मन(भावन)
मेरे दोन यन चोर नही सजन (संजनाचं लाडिक रूप?)
तुमसे ही खोया होगा कही तुमहारा मन..

हा फारच अंधारातला तीर आहे! Lol आणि रघुरामनला शेजारीण जानेमन म्हणत असेल तर कीर्तिप्रिया संशयाने पाहील, हे ओघानेच आलं. Lol

जा ने 'मन' तेरे दोन यन... बसतंय आता बरोब्बर!

Submitted by श्रद्धा on 16 November, 2022 - 14:12
Pages

Happy श्रद्धा.... !!
दंडवत तुला!!

Submitted by आंबट गोड on 16 November, 2022 - 14:16
दंडवत श्रद्धा _/\_

Submitted by मानव पृथ्वीकर on 16 November, 2022 - 14:17
कर्रेक्ट श्रद्धा! सगळे शॉर्टफॉर्म्स बरोब्बर!
तू महान आहेस!!

Submitted by वावे on 16 November, 2022 - 14:18
बाब्बो! श्र, भन्नाट!!

कोडं घालणारी आणि उकल करणारी दोघीही भारी. दोघींना एक एक किलो मनभावन देण्यात येत आहे.

Submitted by मामी on 16 November, 2022 - 14:20
दोघींना एक एक किलो मनभावन >> Happy

Submitted by वावे on 16 November, 2022 - 14:33
श्रद्धा, महानच्याही पलीकडे! साष्टांग दंडवत.

Submitted by हरचंद पालव on 16 November, 2022 - 15:05
श्रद्धा, महान आहेस

Submitted by माधव on 16 November, 2022 - 17:58
श्रद्धा जबरी... कसे सुचते तुम्हाला?

काही दिवसांपूर्वी मी एक तरस पाळलेल्या मुलाचे कोडे घातले होते ... मला वाटले होते कोणालाही नाही जमणार पण श्रद्धा तेंव्हाही तुम्ही एकाच फटक्यात उत्तर दिले होते...
दंडवत तुम्हाला...

आणि वावे तुम्हालादेखील ... कठीण पेपर सेट केला होता... Happy

Submitted by च्रप्स on 16 November, 2022 - 18:31
पीएचडी लेवल कोड्यानंतर उतारा म्हणून एक बालवाडी लेवल कोडं.
'लेडीज वर्सेस.....' या चित्रपटाचा हिरो नाक्यावर उभा असतो. समोरून त्याची क्रश रिया जात असते. तिला पाहून तो 'ती पहा माझ्या हृदयाची स्वामिनी जात आहे' असं म्हणतो.

Submitted by मोरोबा on 16 November, 2022 - 19:22
श्र देवींनी अजून एक कोडं सोडवलं आहे.

हा धागा जुना आहे. इथे कोडी टाकू नका कृपया.

लेटेस्ट धागा : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८) : https://www.maayboli.com/node/79546

Submitted by मामी on 16 November, 2022 - 19:29

कोडं ८/०४४

रघुरामन जेंव्हा प्रथमच तामिळनाडूच्या बाहेर पडला, तेंव्हा त्याचे पोस्टींग राजस्थान / हरयाणाच्या बॉर्डरवर झाले होते. तो ज्यांच्या घरात भाडेकरु म्हणून रहायचा त्यांची मुलगी रीया त्याची पहिली क्रश होती आणि तीच त्याला हिंदी पण शिकवायची. तेंव्हा त्याचं हिंदी अगदीच तोडकं मोडकं होतं आणि बोलण्यात बर्‍याच चुका व्हायच्या. रीयाच्या खालोखाल त्याला तिथली मोहरीची शेती खूप आवडायची... दूरपर्यंत पिवळे गालिचे अंथरले आहेत असंच वाटायचं त्याला.

एकदा तो एकटाच राजस्थानी संगीताच्या कार्यक्रमाला जातो. त्याला सगळ्यात जास्त आवडते ते झांज हवेत उडवत सादर केलेलं गाणं. पांढरा शुभ्र चुडीदार कुर्ता घातलेला तो चिमुकला कलाकार आपल्या डोक्यापेक्षा भला मोठा आणि पिवळा जर्द फेटा बांधून झांज वाजवण्यात दंग होता. पण मध्येच धक्का लागून त्याचा तो फेटा सुटला. पण पठ्ठ्याने आपलं सादरीकरण काही थांबवलं नाही.

रघुला घरी आल्या आल्या रीयाला ते सगळे सांगायचे असते - ते पण गाण्यातून! कुठलं गाणं म्हणेल तो?

८/०४४
सर से (सरसों?) सरके सरके चुन रिया
लाज भरी अंखियोंसे
हो मैया.. गाए सजन, होके मगन..

एचडी लेवल कोड्यानंतर उतारा म्हणून एक बालवाडी लेवल कोडं.
'लेडीज वर्सेस.....' या चित्रपटाचा हिरो नाक्यावर उभा असतो. समोरून त्याची क्रश रिया जात असते. तिला पाहून तो 'ती पहा माझ्या हृदयाची स्वामिनी जात आहे' असं म्हणतो.

Submitted by मोरोबा on 16 November, 2022 - 19:22

>>>> या कोड्यातली रिया अजून भटकतेय. तिलाही जागेवर आणायचंय.

८/०४४
झांझरिया (झांज रिया ) उसकी छनक गयी
चुनरी भी सर से सरक गयी
???

माधव, कोड्यांना क्रमांक देण्याची परंपरा आवर्जून पाळल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना सतत सांगून सांगून इतकी कंटाळले की मी पण देणे बंद केले. पण खरं तर नंबर दिले पाहिजेत.

मीच तो कल्प्रिट मामी. जुना धाग्यावर कोडं देणाराही.
शोध सुविधेत २ नंबरचा धागा येतो त्यात ५ व्या नंबरची लिंक आहे. (आता ते संपादित करून तिथे पुढची लिंक देता येत नाही हे माहीत आहे. तरी तोच शेवटला समजून तिथे कोडे दिले.)

नवीन Submitted by झिलमिल on 16 November, 2022 - 22:03>>> बरोबर
लेडीज वर्सेस.....' या चित्रपटाचा हिरो रिकी बैल नाक्यावर उभा असतो. समोरून त्याची क्रश रिया जात असते. तिला पाहून तो 'चुराके दिल मेरा गो रिया चली' असं म्हणतो Lol

हेही एक बालवाडी कोडं
८/०४५
एक मधमाशी आणि एका बोकडाचे एकमेकांशी फार पटायचे. खरंतर प्रेमच होतं त्यांचं. सतत सोबत असायचे. पण ह्या विजोड प्रेमाला काही अर्थ नाही, हे कळत होतं. त्यामुळे ते दोघे सारखे देवाला प्रार्थना करायचे, की पुढच्या जन्मी तरी आम्ही एकाच प्रकारचे प्राणी असू दे.
शेवटी खऱ्या प्रेमाची प्रार्थना देवाने ऐकली आणि त्यांना पुढचा जन्म मनुष्याचा मिळाला. मधमाशी मुलगी आणि बोकड मुलगा. त्यांना मागचा जन्म लक्षात होता, त्यामुळे मोठेपणी एकमेकांना बरोबर ओळखून त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. दोघेही खूप आनंदात होते. पण एक घोळ झाला होता. दोघे होते तर मनुष्यप्राणीच; पण वेगवेगळ्या धर्माचे. दोघांच्याही घरचे खूप कट्टर होते. त्यांनी खूप विरोध केला. काही केल्या दोघेही एकत्र येऊ शकत नाहीत. शेवटी दोघेही खूप निराश होतात. "आधीचा जन्मच बरा होता, माणूस म्हणून जन्माला येऊन काय मिळवलं आपण?"; असा विचार करून दोघेही एकत्र, एक गाणं गाऊन आत्महत्या करतात.
कोणतं गाणं?

ह.पा., बरोबर वाटतंय. मी 'ए अज न बी, तू भी कहीं आवाज दे कहीं से.. मैं यहां टुकडों में जी रहा हूं' वगैरे विचार करत होते!

Pages