..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८/०५०

मेहता कुटुंब फ्रान्समधून अहमदाबदला मूव झाले. जिग्नेस मेहता तेंव्हा नुकताच तारुण्यत पदार्पण करता झाला होता. आधीच जीभेला जड व्यन्जनांचे वळण नव्हते त्यात आता एक वेगळीच भाषा पण शिकायची.

तर भारतात आल्यानंतरच्या पहिल्या वॅलेंटाइन डेला तो कुठलं गाणं म्हणेल?

माऊमैया, नाही.

८/०५०
हिंट १ - गुजराथी ऐवजी फ्रेंच उच्चार महत्वाचा.

कोडं क्र. ८/५१

(खालील गोष्टीतील राम सीता हे त्रेतायुगातील रामायणातील रामसीता आहेत याची कृपया नोंद घ्यावी. )
शिवधनुष्य तोडून रामानं स्वयंवरातील सीतेनं लावलेला पण जिंकला आणि त्यांचा विवाह झाला. विवाहविधींदरम्यान गुरुजींनी रामाला सांगितले की "आता तुम्ही पतीपत्नी एकरुप आहात. संपूर्ण जीवन एकत्र व्यतीत करणार आहात. एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेणार आहात. तर तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला स्मरून अशी शपथ घ्या."
प्रिय व्यक्ती कोण असा विचार करायला रामाला अर्थातच वेळ लागला नाही. त्याने लगोलग एक गाणं म्हणून शपथ घेतली.

थांब जरा. हाय का कोणी? अर्ध्या तासाने दे उत्तर. तोवर मला कोपच्यात सांग.

क्रेक्ट!

कोडं क्र. ८/५१

(खालील गोष्टीतील राम सीता हे त्रेतायुगातील रामायणातील रामसीता आहेत याची कृपया नोंद घ्यावी. )
शिवधनुष्य तोडून रामानं स्वयंवरातील सीतेनं लावलेला पण जिंकला आणि त्यांचा विवाह झाला. विवाहविधींदरम्यान गुरुजींनी रामाला सांगितले की "आता तुम्ही पतीपत्नी एकरुप आहात. संपूर्ण जीवन एकत्र व्यतीत करणार आहात. एकमेकांची सुख-दु:ख वाटून घेणार आहात. तर तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला स्मरून अशी शपथ घ्या."
प्रिय व्यक्ती कोण असा विचार करायला रामाला अर्थातच वेळ लागला नाही. त्याने लगोलग एक गाणं म्हणून शपथ घेतली.

उत्तर : (श्रद्धा)

'जानकी' (जान की) कसम, सच कहते है हम
खुशी हो या गम बांट लेंगे हम आधा आधा...

Happy मला वाटलं...सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे...कौसल्या.......! (असावी! )....कारण तोपर्यंत लग्न नव्हते झाले ना!..
म्हणून मा कसम वर च माझी पिन अडकली होती...!! Happy

मी लिहीणार होते की लेटेस्ट प्रिय व्यक्ती समोरच होती. पण ते म्हणजे फारच उघड झाले असते.

कौसल्या, दशरथ ... Lol

सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे...कौसल्या.......! (असावी! )....कारण तोपर्यंत लग्न नव्हते झाले ना!..
>>> मलाही असेच वाटले. . .
गाणं.. 'कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम'' :p

कोडं क्र. ८/५२ (रामायण मोड ऑनच....... पण सध्याच्या काळातील)

एका मोठ्या मैदानावरील भव्य रंगमंचावर यंदा रामलीला साजरी होणार असते. अनेकानेक मान्यवर व्यक्ती उपस्थित रहाणार असतात. इवेन्ट मॅनेज करणार्‍यांनी आसनांच्या ओळींना देखिल रामायणातील व्यक्तींची नावं दिलेली असतात. उदा. पहिली ओळ सीता, दुसरी राम, तिसरी लक्ष्मण, चौथी हनुमान, पाचवी सुग्रीव, सहावी वाली ... अगदी रावणाच्या नावाचीही ओळ असते.

रामलीला सुरु होण्याच्या काही क्षण आधीच खुद्द पंतप्रधानांचं आगमन होतं. मुख्य द्वारापाशी त्यांचं स्वागत वगैरे झाल्यावर तिथली मॅनेजर त्यांना आत स्थानापन्न करण्यासाठी घेऊन जाण्यास येते आणि एक गाणं म्हणून त्यांना आत त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेकडे कूच करावं अशी विनंती करते.

मंडळी, काही तर्क, अंदाज असतील तर लिहा की. त्या दिशेनं हिंट द्यायला बरं पडतं.

डायरेक्ट उत्तर येत असेल तरच लिहायचं असं थोडीच आहे?

कोडं क्र. ८/५२ (रामायण मोड ऑनच....... पण सध्याच्या काळातील)

एका मोठ्या मैदानावरील भव्य रंगमंचावर यंदा रामलीला साजरी होणार असते. अनेकानेक मान्यवर व्यक्ती उपस्थित रहाणार असतात. इवेन्ट मॅनेज करणार्‍यांनी आसनांच्या ओळींना देखिल रामायणातील व्यक्तींची नावं दिलेली असतात. उदा. पहिली ओळ सीता, दुसरी राम, तिसरी लक्ष्मण, चौथी हनुमान, पाचवी सुग्रीव, सहावी वाली ... अगदी रावणाच्या नावाचीही ओळ असते.

रामलीला सुरु होण्याच्या काही क्षण आधीच खुद्द पंतप्रधानांचं आगमन होतं. मुख्य द्वारापाशी त्यांचं स्वागत वगैरे झाल्यावर तिथली मॅनेजर त्यांना आत स्थानापन्न करण्यासाठी घेऊन जाण्यास येते आणि एक गाणं म्हणून त्यांना आत त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेकडे कूच करावं अशी विनंती करते.

उत्तर : (वावे, झिलमिल)

आओ हुजुर तुम को
सीता Row मे ले चलूं

पंप्र असल्याने ते अर्थातच पहिल्या रांगेत बसणार.

Pages