मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162
सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....
हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/
ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year
मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.
अरे सहीच हर्पा ,मानव. पण
अरे सहीच हर्पा ,मानव. पण मामीला एक्स्ट्रा धन्यवाद तिच्या मुळे मला नीट उकल कळली मी तुम मुझे यु भुला ना पाओगे पुढे पार कडव्या पर्यंत जाऊन बघितलं. नंतर हे वाचलं आणि मग मानवनी लिहीलेले नीट कळलं स्वल्पविरामांसकट
8/80
8/80
"तिकीट काढलंस?"
"हो हो. माझी रजा मंजूर होताच लग्गेच काढलं."
"कधी पोचतीयेस मग इथे?"
"30 एप्रिलला रात्री उशीरा पोहचेन"
"वॉव! दुसरा दिवस पूर्ण वेळ एकमेकांबरोबर घालवू. मलाही सुटीच आहे त्यामुळे तोही प्रश्न नाही. आता तुझा विरह सहनच होत नाही."
"मलाही नाही सहन होत. केव्हा एकदा तुला भेटतेय असं झालंय."
मग दोघांनी हसत हसत एक गाणं म्हटलं....
एक मै और एक तू ?
एक मै और एक तू ?
कोड क्रं ८/८१
कोड क्रं ८/८१
सोमनाथ नशेमन हा दारूचा व्यापार करायचा, पण अर्धा माल तोच रिचवून टाकायचा. त्याला शहरातल्या नव्याने विकसित झालेल्या गगनचुंबी इमारतींचे जाळे असलेल्या भागात बेकायदेशीर दारूची डिलिव्हरी द्यायची होती. तो बराचसा पिलेला होता. त्यातच इथले सगळे सेक्टर्स सारखे, सगळ्या इमारती सारख्या दिसत होत्या. त्याला हव्या असलेल्या हॉटेलचा शोध घेत तो तोल सावरत अनेक हॉटेल्स फिरत होता.
एक हॉटेल पाहून हेच आपले गंतव्य स्थान असावे असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन वर अडचण सांगितली.नावही आठवत नव्हते. तेव्हां तो म्हणाला कि मी सगळ्या मजल्यांवर जाऊन पाहून येतो. तिथला रिसेप्शनिस्ट नाही म्हणाला. तो म्हणाला एक दोन मजले तरी पाहून येतो. त्यालाही नकार मिळाला. आता सोमनाथ चिडला. तुमच्या लिफ्टने नाही जात. जिन्याच्या रस्त्याने जाईन, मजले चढून जाईन. ते रस्ते, ते मजले काय घरी घेऊन जायचेत का ?
आता रिसेप्शनिस्टने बाऊन्सर हाक मारली " अरे कदम, कुठेय तू ? हे बघ दारूडा आहे. धक्के मारून बाहेर काढ"
सोमनाथ नशेमनला बाहेर काढले. त्याने हॉटेलकडे पाहिले. खालपासून वरपर्यंत पाहिले आणि एका गाण्याच्या अंतर्यातल्या दोन तीन ओळी गायला सुरूवात केली.
ते गाणे आणि त्या ओळी कोणत्या ?
मंजिले अपनी जगह हैं, रास्ते
मंजिले अपनी जगह हैं, रास्ते अपनी जगह
जब कदम ही साथ ना दे, तो मुसाफिर क्या करे
बरोबर माधव.
बरोबर माधव.
8/80
"तिकीट काढलंस?"
"हो हो. माझी रजा मंजूर होताच लग्गेच काढलं."
"कधी पोचतीयेस मग इथे?"
"30 एप्रिलला रात्री उशीरा पोहचेन"
"वॉव! दुसरा दिवस पूर्ण वेळ एकमेकांबरोबर घालवू. मलाही सुटीच आहे त्यामुळे तोही प्रश्न नाही. आता तुझा विरह सहनच होत नाही."
"मलाही नाही सहन होत. केव्हा एकदा तुला भेटतेय असं झालंय."
मग दोघांनी हसत हसत एक गाणं म्हटलं....
उत्तर :
1 मे और एक तू, दोन मिले इस तरहा
मोरोबा बरोबर.
मोरोबा बरोबर.
८/८२ -
८/८२ -
अकबर बादशहाला रोज तेच तेच जेवण खाऊन कंटाळा आलेला असतो, म्हणून तो त्याच्या खानसाम्याला काहीतरी नवीन पदार्थ बनवायला सांगतो. खानसामा त्या रात्री पन्नास शेर तूरडाळ एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात पावशेर हळद, दोनशे हिरव्या मिरच्या, तीन शेर आलं, अठ्ठावीस लसूण, दोन मुठी कडीपत्ता, एकवीस कांदे, पाव रत्तल सुका मेवा आणि आठ मुठी केशर घालून शिजवत ठेवतो. दुसरीकडे तो तंदूर पेटवतो आणि त्यात एक मोर, एक तितर, एक काकाकुवा, एक घुबड, एक हंस, एक पोपट आणि एक कुकुडकुंभा एवढे सगळे खरपूस भाजून घेतो आणि भांड्यात ऍड करून रात्रभर कमी आचेवर शिजवत ठेवतो.
दुसऱ्या दिवशी बादशहाच्या पंगतीत तो ते भांडं आणून मधोमध ठेवतो आणि उघडतो. मस्त घमघमाट सुटतो. बादशहा खूष होतो आणि 'बिस्मिल्ला' म्हणून जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्या भांड्यातून गाणं ऐकू येतं....
हम पंछी एक 'डाल' के?
हम पंछी एक 'डाल' के?
श्रद्धा करेक्ट.
श्रद्धा करेक्ट.
मोरोबा कोडं मस्त रचलंत. पण
मोरोबा कोडं मस्त रचलंत. पण श्र कशाचाही फडशा पाडतेच.
एवढे सगळे खरपूस भाजून घेतो
एवढे सगळे खरपूस भाजून घेतो आणि भांड्यात ऍड करून रात्रभर कमी आचेवर शिजवत ठेवतो >> केवढी ती सविस्तर पाकृ!! मी करायला गेलो तर अजिबात चुकणार नाही हा पदार्थ.
खरंय हपा.
८/८३
८/८३
डोळ्यांचे ऑपरेशन होऊन दृष्टी आल्यावर मधु आज पहिल्यांदाच अंगणात आली होती. भोवती दिसणारं जग आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचा प्रयत्न चालला होता तिचा. हिरवं गवत, त्यावरची छोटी छोटी रानफुले, उडणारी फुलपाखरे - सगळं सगळं तिच्याकरता नविन होते. ती इकडून तिकडे धावत होती होती तोच झाडाच्या पानांमधून प्रकाशाचा एक किरण गवतावर पडला. तो सोनसळी किरण बघून मधु तर वेडावलीच पण मधुचं सौंदर्य बघून तो किरणही थबकलाच. रटरटत्या भट्टीत त्याचा जन्म झाला आणि लगेचच त्याला प्रवासाला निघावे लागले. प्रवासात इतकी सुंदर मुलगी भेटेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
मग काय मधु आणि तो किरण मनसोक्त बागडले. प्रेमातच पडले एकमेकांच्या. गाणही गायलं मधुने. कुठलं ?
हिंट १: सिनेमा कृष्णधवल जमान्यातला आहे.
हिंट २: गाण्यात खरोखर मधु आहे.
धुंद मधु मती हास रे(ray)
धुंद मधु मती हास रे(ray) नाच रे ?
(हे नाही माहिती आहे, पण एक दिशा द्यायला, दिशा बरोबर आहे का यासाठी .)
मानव, नाही. ते 'हास' नाही
मानव, नाही. ते 'हास' नाही 'रात' आहे हो. रात्रीचा कुठला आला सूर्याचा 'रे'?
हास' नाही 'रात' आहे>>
हास' नाही 'रात' आहे>> कपाळबडवती बाहुली.
उन (किरण) से प्यार हो गया ???
उन (किरण) से प्यार हो गया
???
मधुबाला- बादल 1951
बरोबर वाटतंय झिलमिल. ग्रेट.
बरोबर वाटतंय झिलमिल. ग्रेट.
व्वा! झिलमिल बर्याच
व्वा! झिलमिल बर्याच दिवसांनी दिसलात आणि आल्या आल्या बक्षीस पण पटकावलेत - तुम्हाला एक थंडगार मँगो लस्सी !
८/८३
डोळ्यांचे ऑपरेशन होऊन दृष्टी आल्यावर मधु आज पहिल्यांदाच अंगणात आली होती. भोवती दिसणारं जग आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचा प्रयत्न चालला होता तिचा. हिरवं गवत, त्यावरची छोटी छोटी रानफुले, उडणारी फुलपाखरे - सगळं सगळं तिच्याकरता नविन होते. ती इकडून तिकडे धावत होती होती तोच झाडाच्या पानांमधून प्रकाशाचा एक किरण गवतावर पडला. तो सोनसळी किरण बघून मधु तर वेडावलीच पण मधुचं सौंदर्य बघून तो किरणही थबकलाच. रटरटत्या भट्टीत त्याचा जन्म झाला आणि लगेचच त्याला प्रवासाला निघावे लागले. प्रवासात इतकी सुंदर मुलगी भेटेल हे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
मग काय मधु आणि तो किरण मनसोक्त बागडले. प्रेमातच पडले एकमेकांच्या. गाणही गायलं मधुने. कुठलं ?
उनसे (ऊन से) प्यार हो गया उनसे प्यार हो गया
दिल मेरा खो गया दिल उनका (ऊन का) खो गया
थंडगार मँगो लस्सी !
थंडगार मँगो लस्सी !
कोडं-डिकोडं दोन्ही मस्तच.
कोडं-डिकोडं दोन्ही मस्तच.
८/८४:
८/८४:
मी खेड्यात गेलो आणि सकाळी उठुन खेड्याबाहेर फिरायला गेलो. तिथे मला खालील अजबच दृश्य दिसले.

ते पहाताच मी एका गाण्याच्या कडव्यातील ओळ गुणगुणली. ओळखा बघु कोणती?
अंबुआ की डाली पे
अंबुआ की डाली पे
गाये मतवाली
कोयलिया काली निराली
===(गाय ए मतवाली)
गाणे - छुप गये सारे नजारे ओय क्या बात हो गयी
बिंगो माझमन
बिंगो माझेमन
मस्त माझेमन!
मस्त माझेमन!
मला 'तौबा ये मतवाली चाल, झुक जाए फूलों की डाल' हे आठवलं होतं. पण एक तर ही कडव्यातली ओळ नाही आणि फलों की डाल पाहिजे, फूलों की नाही
काय चित्र बनवलंय मानव.
जबरी!
जबरी!
मतवाली गाय सुपरलोल
मतवाली गाय सुपरलोल
८/८५
८/८५
हे कठीण नाही, पण ओढुन ताणुन कठीण करण्यात मजाही नाही, तेव्हा सोडवा पटकन:
तिचे केस सुंदर असतात, तो तिला भेटला की तिच्या केसांचे चुंबन घेतच असतो. (ओठांचेही घेत असतो हो. कोड्यात सगळंच सविस्तर लिहायला हवं का?) लग्नाचा मुहूर्त लांब असतो.
एकदा ती त्याच्या घरी आलेली असते तेव्हा तिच्या डोक्यात भयंकर उवा झालेल्या असतात. त्याची आई त्याला बजावते तिच्या केसांपासुन लांब रहा. ती परत जाताना दोघे गच्चीवर जातात. तो तिला केस झटकायला सांगतो आणि केसांचे(ही) चुंबन घेतोच. पण ती केस झटकते तेव्हा उवांची अंडी त्याच्या डोळ्यात जातात. मग तिला फाटका पर्यंत सोडुन हा घरात परत आल्यावर आई डोळ्यानेच विचारते. हा नाही अशी मान हलवतो आणि डोळे चोळतो जरा आणि बोटाकडे बघतो. त्यावर काय आहे हे आईला कळते आणि ती एका शब्दाच्या हिंदी व मराठी अशा द्व्यर्थी अर्थाने हे गाणे म्हणते.
Pages