..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी मामी.
८/७४

क्लू देतो. ॲक्च्युअली माझ्या लक्षात आलं की कोड्यात मी चूक केली आहे. तो विष्णूचा अवतार नसतो, तर त्याचा शत्रू असलेला एक पुरुष असुर असतो. पण गाण्यात तो दोन स्त्री रुपात येतो. त्याचं नाव शोधायचं म्हणजे, मुंबईच्या नळात मासे शिरतात तसं महाभारतातल्या नळात हा शिरतो (आठवा - पाळीव प्राणी).

बरोबर वाटतेय.. खेळणे - भवरा
गणित सोडवणे - गुणगुणा
दोन स्त्री रूपात राक्षस कली ...
खिल रही - स्त्री रूप

८/७५
दिपक, ज्योती, प्रकाश, समई आणि भ्रमर हे बेस्ट फ्रेंड्स असतात. त्यातही दिपक आणि समईचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. पण ज्योतीला कूणकूण लागते की अलिकडे त्या दोघांची खूप भांडणं होत आहेत आणि आता कोणीतरी मध्यस्थी केल्याशिवाय ब्रेकअप अटळ आहे. आपण समईची समजूत घालू आणि भ्रमर आणि प्रकाश दिपकला पटवतील अशा विचाराने ती इंटरवेंशन योजते आणि सगळ्यांना तिच्या घरी बोलावते. दिपक, समई, प्रकाश येतात पण भ्रमर बराच वेळ येत नाही. ज्योतीची घालमेल होत असते पण शेवटी एकदाची बेल वाजते. ज्योती दरवाजा उघडते तर भ्रमर आलेला असतो. त्याला पाहून ती खूष होते आणि आता ब्रेकअप नक्की टळलाच अशा समजूतीने भ्रमरला उद्देशून हे गाणं म्हणते.

तुम आ गए हो
नूर (प्रकाश) आ गया है
नहीं तो चरागों (दीपक) से
लौ( flame = समई) जा रही थी

झिलमिल आणि मोरोबा...ग्रेट कोडे आणि ग्रेट उकल!!) Happy

पण...

म्हणजे आता तसा अर्थ काढायचाच म्हटले तर ठिके..पण लौ म्हणजे खरे तर ज्योती पण होऊ शकते ना?

झिलमिल great thinking.
पण यात भ्रमर ज्योति राहिले आहेत.

झिलमिल, दंडवत.
मला अपेक्षित उत्तर किंचित वेगळं होतं पण हे पण चालेल.

तुम (भ्रमर) आ गए हो
नूर (प्रकाश) आ गया है
नहीं तो चरागों (दीपक, समई) से
Love जा रही थी
आणि भ्रमर नाव लोक भंवरा, शमा, परवाना मध्ये अडकून पडावेत म्हणून मुद्दाम टाकलं होतं, पण माबोकर असे फसत नाहीत Happy

धागा वर काढायला एक कोडे सहज:
८/७६
ती सारखी त्यालाच पाडत असते. तो तिला बाकीच्यांना पाडायला सांगतो.

गुलाब
मोगरा
चाफा
गुलमोहर
झेंडू
केवडा
निशिगंध
यापैकी?

हिंदी गाणं.
एका हिंदी शब्दाचा मराठी अर्थ घ्यायचा.

सुन सुन सुन ओ गुलाबो कली
मुझे छोड दुनिया गिराते चली

अर्रर्र, उत्तर आलं होय?
नवीन गाणं लिहीत होतो.

८/७७
एका फळ विक्रेत्याने दुग्धजन्य पदार्थ तयार केला. त्याची स्तुती करणारे गाणे.

हे गाणे माबोच्या नविन भाषेनुसार खंगरी या प्रकारात मोडेल. म्हणजे हे गाणे कुणी ऐकले असण्याची शक्यता नगण्य आहे. पण दिलेल्या क्लू वरून ते शोधणे कठीण नसावे.

मी गाणं ओळखलं आहे पण कोणाला हवे तर क्लू
१. चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माता - एकच आहे- जन्म पाकिस्तान
२. सुप्रसिध्द गायक

Pages