चित्रपट कसा वाटला -८

Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44

आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

"डेथ विश - द फेस ऑफ डेथ" मधे एक डायलॉग आहे.
नो जज्ज, नो ज्युरी, नो अपील, नो डील्स

हिंदीत पण असाच एक डायलॉग आहे ना ?
फैसला ताबडतोब कि काही तरी ?

#CinemaGully
Rocky or Rani ki Premkahani
तो इंग्लिशवर प्रभुत्व असलेला, उत्तम बोलू शकणारा आणि उत्तम शिकलेला देखील ! ती तिच्या सामान्य ज्ञानावरील प्रश्नांच्या उत्तरांनी आधी ट्रोल झालेली पण नंतर आपल्या उत्तम , सर्वांगसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ! तो method actor तर ती स्वयंस्फुर्त ! तो रिअल life मध्ये तिचा सखा नव्हे सखी म्हणवून घेणं पसंत करतो आणि दोघांमधलं हेच नातं चित्रपटात कमाल करून जातं .
चित्रपटात तो झालाय थेट पंजाबी तो ही गर्भश्रीमंत त्यामुळे भव्यदिव्य सेट्स , पंजाबी culture मधलं सगळं ओव्हर the board करणं हे ओघाने आलंच . असं असलं तरी या चित्रपटात ते कुठेही खटकत नाही . सुखावून जाणारं वाटतं ( ये मौसम का जादू है मितवा !!) , चित्रपटाची सुरुवात होते त्याच्या दादूंच्या अर्थात धरमजी यांच्या आजारपणानं , dementia ची सुरुवात असतानाही " जामिनी '' या नावाला लक्षात ठेवण्याने ! चित्रपट या पहिल्या प्रसंगांपासूनच तुमच्या मनाची पकड घ्यायला सुरुवात करतो . या सुरुवातीच्या अर्धा तासात रणवीर आणि त्याची फॅमिली तुमच्यासमोर येते आणि रोलची कमी अधिक लांबी असली तरी प्रत्येक character तुमच्या मनात वेगळं स्थान निर्माण करतं आणि याला कारण आहे त्या प्रत्येक character च curation आणि त्याला साजेसा प्रत्येक पात्राचा अभिनय! मग ते स्वीट दादुच्या भूमिकेतले धरमजी असोत, पुरुषी अहंकाराने ग्रस्त पण वडिलांकडे पाहून पटकन हळवा होणारा त्यांचा मुलगा(अमीर बशीर )असो किंवा मुलगा पहायला आल्यावर , लग्न करायचं नसल्याने टेन्स होऊन " आई सगळं organise करते म्हणण्याऐवजी आई फक्त orgasm करते " म्हणणारी , बघण्याच्या कार्यक्रमात ,मुझको राणाजी माफ करना हे द्वयर्थी गाणं म्हणणारी रणवीर ची बहीण गोलू (अंजली आनंद ) , दबून -घाबरून वागणारी आई (क्षिती जोग )असो , प्रत्येकानी आपल्या भूमिकेप्रती आणि चित्रपटाने त्यांच्या प्रती न्याय केलेला दिसून येतो . खटकते ती अत्यंत लाऊड " धनलक्ष्मी दादी " ( जया बच्चन )! अत्यंत उच्च दर्जाचा अभिनय करू शकणाऱ्या जया जी या चित्रपटात कुठेतरी अवघडल्यासारख्या वाटत रहातात .
साधारण अर्ध्या तासानी , दादूंची लॉस्ट मैत्रीण "जामिनी च्या शोधकाऱ्यामुळे चित्रपटात एन्ट्री होते रानी म्हणजेच आलियाची , यात ती TV होस्ट झाली आहे आणि यात ती आपली भूमिका अत्यंत परफेक्ट निभावते , खूप सहज आणि मोकळेपणाने संपूर्ण चित्रपटभर वावरते , अभिनय रक्तात असणं म्हणजे काय हे तिच्या भूमिकेत शिरण्यानं कळतं . यात ती एका छोटेखानी elite आणि educated बंगाली फॅमिली ची मुलगी आहे . दिग्दर्शकाने याही फॅमिलीला आपल्यासमोर उभं करताना आपलं कौशल्य पणाला लावलंय . बहारदार शबानाजीं old wine वाटून जातात, रानी ची फर्राटेदार इंग्लिश बोलणारी आई आणि कथक प्रवीण वडील , its simple joy to see them !
माझ्यातरी प्रामुख्याने लक्षात राहिलेले चित्रपटातले दोन प्रसंग म्हणजे , रॉकीचं रानीच्या वडिलांकडून नृत्य शिकणं आणि रानीने रागाच्या भरात रॉकी च्या वडिलांचा हात झिडकारल्यावर तिच्या घरच्यांनी तिची चूक तिच्या लक्षात आणून देणं .
खूप वर्षांनी करण जोहर नी movie डायरेक्ट केलाय आणि he wins it , नेमक्या आणि मोजक्या शब्दात , हा चित्रपट म्हणजे अजूनही पुरुषी अहंकाराला गोंजारणाऱ्या समाजव्यवस्थेला काढलेले चिमटे आहेत आणि पुरुषांची बाजू मांडण्याचा प्रयत्न ही झालाय.
This movie is out and out entertainer so do not judge book by its cover , please go and see movie as you wont be disappointed.

तळटीप : चित्रपटात नात्यांमधला एक नवीन पण चांगला प्रयोग दाखवलाय आणि म्हणूनच इथे कथा उलगडण्याचा मोह आवरता घेतला .

मी शोधलं नाही. आपसूक दिसलं. हो. ही आधीची. मॅग्निफिसंट सेव्हन, सेव्हन सामुराई हे ऐकलं होतं. पण या फिल्मबद्दल माहीत नव्हतं. तो एक झोपाळा तेवढा आपला दिसतो.

ही फिल्म जुनी असणार न? >>>

पण या फिल्मबद्दल माहीत नव्हतं. तो एक झोपाळा तेवढा आपला दिसतो. >>>

वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्ट.

माझा पर्सनली फेवरीट वेस्टर्न सिनेमा (गुड, बॅड अँड अग्ली च्या बरोबर) , जर जुने वेस्टर्न सिनेमे आवडत असतील तर नक्की पहा.

दिग्दर्शक सर्जीयो लिओनी आणि संगीतकार एनीयो मॉरिकोने या जोडीचा अजून एक सुपरहिट चित्रपट.

ए२४ वाल्यांचा ‘टॉक टु मी‘ लागलाय. कथा तशी वेगळी वाटते आहे पण ट्रेलर जास्त भावला नाही. पहावा की नाही विचार करत आहे.

geetha govindam movie hindi dubbed hd
https://www.youtube.com/watch?v=E3yjVaUN-XM&t=5086s

टाईमपास आहे. मजेत वेळ घालवायचा असेल तर जरूर बघा.
फेसबूकवर सीन पाहिला. आवडला म्हणून युट्यूबवर शोधून बघितला

बार्बी खूप आवडला.

आपल्या प्रि-टीन आणि टीन मुलींसोबत सोबत आवर्जून बघावा असा सिनेमा आहे. गर्ली सिनेमा आहे असं वाटून मुलगा आला नाही घरीच 'जोकर' बघत बसला, मग मला पश्चात्ताप झाला की त्यालाही न्यायला हवे होते. कारण छुप्या पुरुषप्रधान संस्कृतीचा अवेअरनेस सगळ्यांनाच यायला हवा. काही काही विनोद वरून वरवरचे वाटतात पण त्याचा अर्थ खूप प्रोफाऊन्ड आहे. मार्गॉट रॉबी व रायन गॉसलिंग* दोघांनीही खूप छान काम केले आहे. दोघेही अतिशय सुंदर दिसतात, कधीकधी खोटे वाटतात पण त्यांचं खोटं वाटणं सुद्धा खरं वाटणं आहे. भावलाभावली आहेत नं Happy .

America Ferrera व तिच्या मुलीचं नातं खूप नॉर्मल आणि रिलेटेबल आहे, फार छान काम केले आहे त्यांनी. तिचे व बार्बीची जनक* रूथ हिचे त्यातले प्रोलॉग खूप चपखल वाटले. डोजोमोजोकासाहाऊस वगैरे पंचेसही सही जमलेत. शेवटची पंधरा मिनिटे कथानकावरची पकड सुटली आहे. शिवाय मला केनांचं गाणं कंटाळवाणं वाटलं. शॅन्गचीचा हिरो यात दुसरा केन आहे. तो नाचतो व दिसतो छान. अनेक केन व अनेक बार्बी आहेत. ही गोष्ट stereotypical Barbie ची आहे. आमच्याकडे यातली बरीचशी खेळणी होती अजूनही आहेत, आम्ही त्याचीही आठवण काढली. मला फार आवडला सिनेमा, बार्बी विषय व त्याची प्रतिमा उथळ आहे पण सिनेमा सखोल आहे. हा फार सुंदर धक्का होता. सिनेमा सखोल असूनही कुठेही कंटाळवाणा किंवा अतिगंभीर होत नाही. 'जस्ट राईट' आहे. Mansplaining वगैरेचा कथेतला वापर बघून किती वेळा 'अगदी-अगदी' झालं विचारू नका. लेकीलाही आवडला पण माझ्यापेक्षा किंचित कमी. तिच्या मते शेवटी केन पुन्हा बार्बीपेक्षा कमी महत्त्वाचा होतो. त्यामुळे यात समानता नाही. Equality means everyone is equal, men are not beneath woman or vice versa. तिचंही पटलं मला.

---------
*Mansplaining - पुरूषांना बायकांना कुठलीही गोष्ट समजावून सांगितली की त्यांचा अहंकार सुखावतो. यात कम्प्युटरपासून कांद्यापर्यंत कुठलाही विषय असू शकतो.

*Gosling - ऐकलं की रस्ता क्रॉस करणारी Goose पक्षांची पिल्लं डोळ्यापुढे येतात.

*जनक ऐवजी जननी लिहिणार नाहीये.

Gosling - ऐकलं की रस्ता क्रॉस करणारी Goose पक्षांची पिल्लं डोळ्यापुढे येतात. >>> हो Happy

धन्यवाद माहिती/रिव्यूबद्दल अस्मिता. साधारण असे काहीतरी आहे हे एक दुसरीकडचा रिव्यू वाचून वाटले होते पण नक्की माहीत नव्हते.

बार्बी नावाची एक बाहुली असते आणि ती किमान पूर्वी खूप लोकप्रिय होती व मॅटेल नावाची एक कंपनी ती बनवते इतकेच माहीत होते. या पिक्चरबद्दल वाचले तेव्हा मध्यंतरी मार्व्हल कॉमिक्स च्या कॅरेक्टर्स वर जसे पिक्चर बनू लागले व डब्यात जात असलेल्या त्या कंपनीला प्रचंड उर्जितावस्था आली तसे काहीतरी मॅटेल करायचा प्रयत्न करत आहे असे वाटले. मॅटेल युनिव्हर्स वगैरे Happy

एक बाजारात मिळणारी भावली व एक विषय म्हणून मुला/पुरुषांना हा विषय परका-पांचट वाटायची शक्यता आहे पण विषय चांगला आहे. मला सुद्धा परका-पांचट असावा असं वाटलं होतं खोटं का बोलू . Happy

काहीतरी मॅटेल करायचा प्रयत्न करत आहे असे वाटले. >>>
मार्केटिंगसाठी तसे प्रयत्न करत जरी असले तरी चित्रपट एक स्वतंत्र निर्मिती म्हणून सुद्धा विचार करायला लावणारा आहे. पुढं मागं हे तितक्याच ताकदीने येत राहील की नाही माहिती नाही.

धन्यवाद फा. Happy

मी पण पाहिला बार्बी, मैत्रीणीं बरोबर गुलाबी कपडे घालून वगैरे #शास्त्रंअसतंते
आवडला एकदा बघायला, अस्मिताचा रिव्ह्यु आणि तिच्या लेकीचं मत दोन्ही पटलं !

America Ferrera चा बार्बीजना दिलेला मोनोलॉग हायलाइट आहे सिनेमाचा, पण वन्स अगेन हे इश्युज घीसेपीटे आहेत , यात अजुनही काहीच बदल झाले नाहीत, अमेरीकेतल्या बायकांनाही ते फेस करावे लागतात हे ऐकून दर वेळी विचारात पडते मी !
बार्बीला जेंव्हा वाटतं कि आता सुंदर दिसत नाही तेंव्हाही ती परफेक्ट सुंदरच दिसते Happy
तरी सिनेमात सर्कॅस्टिक ह्युमर वगैरे भारी जमलाय , त्यात ब्लॅक सुट्स मेन सीन्स मधले जोक्स, पॅट्रियाकी बघून बदल झालेल्या केनचे जोक्स सर्वात भारी !
मलाही अस्मिताच्या लेकी सारखच वाटलं , २ एक्स्ट्रिम विश्वं , एकात केन्सना दुय्यम वागणूक दुसरीकडे बायकांना, इक्वॅलिटी कुठेच पॉसिबल नाही Happy
रिअल वर्ल्ड मधे जे बायकांना मिळायचं नाही त्यासाठी हे बार्बीच खोटं जग , तेही ‘मॅन मेड‘ , इन युअर ड्रिम्स !
बार्बीचं विश्वं हे एकता कपुरच्या शोज सारखं, दुय्यम पुरुष आणि पॉवर मधे स्त्रियाच स्त्रिया आहेत, त्या पॉवरफुल /बॉस लेडी आहेत जे खोटं आहे हे मेकर्सनाही माहित आहे , बट इट सेल्स इन युअर ड्रिम्स !

मी पण पाहिला बार्बी, मैत्रीणीं बरोबर गुलाबी कपडे घालून वगैरे #शास्त्रंअसतंते>>> हो तो इथला 'बाई पण भारी देवा 'ट्रेण्ड आहे म्हणे, लेक गेली तर पुर्ण सिनेमा हॉल गुलाबी गुलाबी..पुरुष माणस पण आवर्जुन गुलाबी शर्ट्/टिशर्ट मधे होते... मला बघायचाय.

हो, चालेल अदिती. Happy लहान मुलांची मतं कुठल्याही पूर्वग्रहांतून आलेली नसतात व फिल्टर्सही नसतात. त्यामुळे धमाल येते, दुसरं काय..!

धन्यवाद डीजे, Happy
तरी सिनेमात सर्कॅस्टिक ह्युमर वगैरे भारी जमलाय , त्यात ब्लॅक सुट्स मेन सीन्स मधले जोक्स, पॅट्रियाकी बघून बदल झालेल्या केनचे जोक्स सर्वात भारी !>>> हो, मस्त जमलेत ते.

बट इट सेल्स इन युअर ड्रिम्स !>>>> +१.

हो तो इथला 'बाई पण भारी देवा 'ट्रेण्ड आहे म्हणे,>>> Lol

Silenced कोरियन नेटफ्लिक्सवर सबटायटल्स
मुकबधीर मुलांच्या शाळेत नायक शिक्षक म्हणून नेमला जातो..तीथं मुलांवर शिक्षक,.हेडमास्तरांकडून पाशवी अत्याचार होत असतात.. नायक त्यांच्या विरोधात पोलिसात, कोर्टात जाऊन मदत घेऊ पाहतो पण ते इतके सोपे नसते..चाईल्ड अब्युज, इमोशनल, सुन्न करणारा सिनेमा.

रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपट काल थिएटर मध्ये जाउन बघितला. करमणूक प्रधान सिनेमा आहे. पण त्यातही सामा जिक इशूज वर भाष्य केले आहे. हे फार टोकदार नाही कार ण पॅन इंडिया प्रेक्षक वर्गा साठी आहे. संदर्भ भारतातील सद्य परिस्थिती व सामाजिक वातावरण ह्या वर आधारित आहेत. टाइम वार्प मध्ये अडकलेल्यांना ही सद्य परिस्थिती थोडी माहीत असते पण प्रत्यक्ष अनुभव नाही त्यामुळे चित्रपट भावणे जरा अवघड गेले असावे. खरे तर फार सिरीअस ली न घेता मजे मजेत बघण्याचा अनुभव वाटला. ओपेन हायमर, बार्बी नंतर हा ब्रेक आवश्यक होता.

जय बच्चन ह्यांनी नेहमीचा खडूस म्हातारीचा रोल फारच उत्तम केला आहे. म्हणजे घरच्यासारख्याच वावरल्या आहेत. व्हाट ए मीन ओल्ड लेडी.
ही नवर्यावर पहिल्या पासून च डॉमिनेट करत आहे असे फील्स येते. फारच मनी माइंडेड वाटते व नवरा कोमल कवि स्वभावाचा असल्याने व नंतर तर आजारीच पडल्याने त्याला दूर ढकलून देते व धंद्यावर वर्चस्व मिळवते. आता तो धंदा फारच मोठा झाला आहे. फिल्दी रिच पीपल विथ व्हेरी लिटिल क्लास आणि भडक श्रीमंत राहणे. असे सध्या दिल्ली/ गुरगाव साइडला बघ ण्यात येते. तरूण मुला मुलींची इन्स्टा अकाउंट्स बघितली की सहज लक्षात येते. ह्यात सुनेवर मन मारून स्वप्ने डब्यात बंद करुन जगण्याची वेळ येते. मुलगा ज्याचे नावच तिजोरी तो आईच्या ताटा खालचे मांजर व एकदम टॉक्सिक पॅट्रैआर्की १० एक्ष. आहे.

अश्या परिस्थितीत नवर्‍याच्या मनात कुठेतरी कधीतरी भेटलेली पण जिच्याशी मनाची तार जुळलेली आहे अशी मैत्रीण व तिच्या आठवणी
टिकून राहिल्या आहेत. नातू रणवीर सिंग त्या मैत्रिणीला भेटवण्याच्या निमित्ताने आलियाला भेटतो. हिची ती आजी आहे. हे एकदम वेगळे
उच्च शिक्षित बंगाली कुटुंब आहे. वडील कत्थक नर्तक आई इंग्रजीची प्रोफेसर. तिच्या नोकरी साठी नवरा आपले सर्व कल कत्त्यातले बस्तान सोडुन आला आहे व दिल्लीत क्लासेस घेतो. पण त्याच्या मनात स्टेज वर नाचायची इच्छा सुप्तच आहे. ह्या नटाने ह्या रोल साठी सहा महिने कत्थक ट्रेनिन्ग घेतले आहे.

आलिया एकदम चमकते. तिची एक न एक साडी व विशेष करुन ब्लाउजेस फार सुरेख डिझाइन केलेले आहेत. मला ती आव ड ते पहिल्या
पासून. मी टू स्टेट्स चा पण रिव्यू लिहिलेला आहे तो वाचून बघा. ह्यात ती जास्तच छान दिसलेली आहे. ही न्युज अँकर आहे पण गोदी मिडीआ वाली नव्हे. ती पहिल्या मुलाखतीत नेताजींसमोर जे स्वगत बोलते ते देशात तरी कोणी तरी वाइडर प्लॅट फॉर्म वरुन बोलु न दाखवण्याची सध्या गरज आहे.

रणवीर व हिची प्रेम कहाणी पॅरलली चालू होते. दोघांच्यात प्रथम तः केमिस्ट्री नाही कारण दोघांची सोशल कल्चरल बॅक ग्राउंड फारच वेगळी आहे. ही कामाच्या संदर्भात काश्मीरला जाउन तेथील संस्कृतीचे( धर्माचे नव्हे) चित्रण करते ह्यात पण एक सोशल कमें ट आहे. इथे यश चोप्रांना एक ट्रिब्युट गाणे आहे. शिफॉन सारीज स्नो. फुल्टु रोमान्स. हे आलियाने डिलिव्हरी नंतर शूट केले आहे.

क्रमशः

अमा,भारी लिहिलं आहे.पिक्चर बघणार नाही ओटीटी वर आल्याशिवाय.पण हे लिहिलेलं आवडलं खूप.
मृणाली, तू माझी ऑफिशियल मुव्ही सल्लागार. तू लिहिल्यावर पिक्चर पाहिला तर वेळ वसूल होतो.किलोमीटर अँड किलोमीटर पाहिला.आवडला.घरच्यांना दाखवायचा आहे पण ते हिंदी ऑडिओ नसताना सबटायटल वाचून बघायला नाकं मुरडतील.हिंदी ऑडिओ आला की दाखवेन.

पूर्ण चित्रपट भर दिग्दर्शकांना ट्रिब्युट आहेत. जसे दुर्गापूजेचे गाणे हे संजय लीला भन्साली ह्यांना ट्रिब्युट आहे. त्या वेळ्चा रणवीरचा कत्थक नाच नक्की बघा. गुणी अभिनेता आहे. प्लस हॉट दिसतो हे ही आहेच. त्याचा पूर्ण कपडे पट लाउड रिच गाय सारखा आहे. ओरिजिनल वर्साचे !!! ह्याचे बोललेले इंग्रजी हा फार विनोदाचा विषय आहे . आलिया व घरचे एकदम लै भारी सुशिक्षित इंग्रजी बोलुन राहिलेले असल्याने अधिकच जाणवते.

पूर्ण चित्रपट भर जुन्या गाण्यांचा यथोचित वापर केला आहे. व सारेगामाच्या रेडिओ ची प्रॉडक्ट प्लेसमेंट पण आहे. पण डोळ्यात येइल अशी नाही. जुन्यागाण्यांची प्ले लिस्ट तर अगदी माझीच चोरुन घेतली असावी अशी आहे. विशेषतः अभी न जाउ छोड कर, आज मौसम बडा बेइमान है. आज फिर जीनेकी तमंन्ना है. व इतर सर्व. झुमका गाणे झुमका गिरारे गाण्यावर बेतलेले आहे. पुरुष व स्त्री दोघेही सामाजिक दृष्ट्या लग्न बंधनात वेग वेगळ्या जोडिदारासोबत अडकले आहेत. तडका फडकी घट स्फोट घेणे जमण्यातले नाही पण सोल मेट सापडला आहे ह्याला रूढ अर्थाने विबासं म्हणायचे? का आपण एकदाच जगतो मग स्वतः शी प्रामाणिक राहून मिळेल ते प्रेम पदरात पाडून घ्यायचे. रूढ नात्यात जी मानसिक उपासमार होते आहे ती जरा तरी भरून काढायची. हा प्रत्येकाचा चॉइस आहे हे अधोरेखित केले आहे.

मोठ्यांचे ऐकायचेच आदर च करायचा ह्या भारतीय संकल्पने त खरे तर कितीतरी जीवने होर पळून निघतात पण शेवटी मुलगा सून व नातवंडे जया भादुरीच्या भयंकर दडपणा खालुन निस टून आपल्या जीवनातील गोल्स सुख स्वप्ने मिळ्वायचा प्रयत्न करायच्या जर्निवर निघतात इथे सिनेमा संपतो.

आलिया रणवीरच्या घरी राहयाला जाते त्या सीन मधील तिची साडी ऑसम बंगाली प्रकारातली आहे व हँड बॅग पण. सॉलिड दिसते ती. शबाना व आलियच्या आईचा वॉर्ड्रोब पण व्यवस्थि त डिझाइन केला आहे. लग्नाच्या सीन मध्ये जिथे जया आलियाच्या बाबांना नाचायला भाग पाडते व सर्व तुच्छतेने हसतात त्या सीन्स मध्ये शबाना व आलियाची आई ह्यांच्या साड्या व गळ्याती ल नेक लेस, काना तले मला खूप आव्डले. दिवाळीत घ्यायला जमते का ते बघते. आलियाच्या आईचा पूर्ण साडी पट माझ्या वयाच्या बायकांना सहज कॅरी करता येइल असा आहे. क्वाइट नाइस.

रणवीर ला ब्रा घालायचा सीन चित्रपटाच्या ओघा ओघातच येतो. तिथे विक्रेता पण बाप्याच आहे. व आलीयाची आई पाच मिनिटाचे संवाद बोलते ते ऐकण्याजोगे आहेत. मला तरी फार विचित्र वाटले नाहीत. बार्बीचा संदर्भ घ्या. हॉलिवूड चित्रपटांमध्ये व एकं दरीत बार्बी युनिवर्स मध्ये
बार्बीला जननेंद्रिये व एकूणच गर्भाशय व्गैरे नाही. प्रेग्नंट बार्बी डिस्कंटिन्यू केली लगेच. तर जेव्हा बार्बी ची क्रिएटर शेव्टी येते तेव्हा सहज म्हणून जाते की तुला काय वाटले मी पण चिरतरूण आहे? की एक म्हातारी बाई आहे डबल मॅसेक्टमी झालेली.( हा स्त्रियाना ग्रासणारा फार कॉमन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर संबंधित उल्लेख आहे.) जनरली स्त्रिया / स्त्री व्यक्तिरेखांना शोभेची भावली म्हणून दाखवले जाते. पण त्यांचे खरे प्रश्न बोलुनही दाखवले जात नाहीत. ) बार्बी शेव्टच्या सीन मध्ये आपले माहेरचे आडनाव सुद्धा लावते व तिच्या जीवनातली गायनाकॉलोजिस्टची पहिली अपॉइन्ट मेंट घेते. ( हॉलिवूड मध्ये एक अन रिटन लॉ आहे की गायनाकॉलोजिस्ट वगैरे काही कधी स्क्रिप्ट मध्ये येउ द्यायचे नाही .)

हे दिग्दर्शक फार न बोलता एकेका सीन मधून भाष्य करतात ते समजून घ्यायचा प्रयत्न मी करते. न बोलता सोशल कमेंट्री तसा मला तो सीन वाटला. फार वैतागायला झाले नाही. बरेच इशू जसे फॅट शेमिन्ग, जेंडर रोल स्टि रिओ टाइप्स वर भाष्य आहे ते वरवरचे वाटू शकते पण देशातील सद्य परिस्थितीत भावना न दुखवता इतके तरी मांडले ग्रेट असे वाट्ते. व ते करण जोहर इस्टाइल शुगर कोटेड आहे. त्यामुळे पब्लिकला पचायला जड जात नाही. जया बच्चन व्यक्तिरेखेला शेवटाला एक पाच मिनिटाचे एक्स्प्लेनर स्वगत द्यायला हवे होते. ती अशी का झाली ते तिची बाजु आपल्याला कळ ली नाही असे फील्स आले.

चित्रपटात एक दु:खद घटना होउन शेवटी मनो मिलन व सुखांतिका.

अमांनी वरचा रिव्ह्यू सारकॅस्टिक लिहिलाय की काय असे वाटून गेले Happy ( सिरियसलीच असेल तर ऊप्स! सॉरी अमा Happy )
रॉकी और रानी मला अ‍ॅबसोल्यूट ट्रॅश वाटला! क्रिन्ज मटेरियल. (मी आउट ऑफ टच असण्याची शक्यता आहेच.)
डीजे ने तरी रणवीर चे अन आलियाच्या साड्यांचे थोडे कौतुक केलेय . मला तर रणवीर पण क्रिन्ज वाटला आणि साड्यांकडे लक्षच गेले नाही. ( एक्सेप्ट मनात आलेला प्रश्न - हास्यजत्राच्या समीर चौगुलेच्या स्टाइल मधे - "अरे कुठली जागा आहे ही? कुठला टाइम आहे हा? कोण ही बाई कायमच साड्याच नेसून वावरतेय?")
ते सोलमेट जुनी प्रेयसी ८० वर्षाच्या दादाजीला पुन्हा भेटते वगैरे सांगायला ठीके पण प्रत्यक्षात असे घडले तर ? ते म्हातारे प्रेमाने आनंदाश्रूंनी बघतील, हातात हात घेतील, गुजगोष्टी करतील ? की हॉर्नी टीनेजर्स सारखे चान्स मिळेल तेव्हा किसिंग करत राहतील? Uhoh #क्रिन्जफेस्ट.
जुनी एवरग्रीन गाणी वापरणे या केजोच्या हुषारीला मात्र मानले, जुन्या गाण्याचे प्रेम असलेले बरेच लोक जाळ्यात अलगद फसणार Happy वर अमक्या तमक्याला "ट्रिब्यूट" म्हटले की कॉपीचा शिक्का पण नाही!!
केजोचे टिपिकल जोक्स - "जाओ बेडरूम मे जाके कपडे निकालो मै आती हूं " असे सासू ने रणवीर ला म्हणणे ( लाँड्रीसंदर्भात)
तसेच ते ऑर्गनाइज च्या ऐवजी ऑर्गॅजम , इन्टरकास्ट ऐवजी इन्टरकोर्स म्हणणे हे जोक्स घडावे म्हणून ते रणवीर च्या बहिणीचे कॅरेक्टर घुसडलेय. फॅट मुलगी = स्टुपिड असा स्टिरिओटाइप लोकांना हसवायला आधी दाखवायचा आणि मग फॅटशेमिंग बद्दल १ डायलॉग बोलला की झाले प्रबोधन? #क्रिन्जफेस्ट.
ते कथक टीचर चे ह्यूमिलिएशन पण मला काही झेपले नाही. असा कोणी कथक गुरु असेल, अगदी बिरजू महाराज नसतील पण शास्त्रीय शिकवणारे गुरु असतील तर रिस्पेक्ट मिळतो की त्यांना, उलट दरारा च असतो. असे कोण पंजाबी दारू पार्टीत त्यांना नाचो म्हणायची हिंमत सहसा करणार नाहीत आणि त्यांनी केली तरी हे गुरु बावळटासारखे नाचायला जात नाहीत. ( "अरे कुठली जागा आहे ही? कुठला टाइम आहे हा? " )
असो. डीजेने सांगितले होते तरी मी पाहिला, त्यामुळे इतरांना बघू नका असं म्हणणारी म्या कोन? बघायचा तर बघा बुवा, आपापले ठरवा. Proud

अमा,भारी लिहिलं आहे.पिक्चर बघणार नाही >> +१

आज स्पाय नावाचा मद्रदेशीय सिनेमा पाहिला. उजव्या विचारसरणीचे लोक एक तर ताश्कंद फाईल्स सारखे चित्रपट बनवतात नाहीतर मग रॉ वगैरे तडका मारलेले स्पाय मूव्हीज. नेताजींचं गूढ हे इतकं वाईट रितीने कंटाळवाणं घेतलंय कि बस. अजेण्डा रेटणे हा उद्देश ठळक असल्याने लॉजिक वारले तरी चालते. नका बघू.
काहींना आवर्जून पहावासा वाटेल.

पूर्ण चित्रपट भर दिग्दर्शकांना ट्रिब्युट आहेत>>>. केजो कायम असं काहितरी करतो. ए दिल मधे ही जुनी गाणी होतीच.. नोस्टेल्जिक होऊन काही पब्लिक फसतं ते त्याला एनकॅश करायचं असतं.
असो! रॉकी रानी ओटीटी वर आला तरच बघेन. भपकेबाज वाटतोय..

अमक्या तमक्याला "ट्रिब्यूट" म्हटले की कॉपीचा शिक्का पण नाही!!>> जुनी गाणी सारेगामा रेडिओ सेट वर लावलेली आहेत. व सारेगामा म्युझिक कंपनीने कॉपिराइट संबंधा ने सोपस्कार पूर्ण केले असावेत. इट इज अ लीगल बिझनेस. बरीच गाणी आता कॉपिराइट फ्री पण असतील इतकी जुनी आहेत. टायटल्स सिक्वेन्स मध्ये सारेगामाच्या मॅनेजर चे नाव दिलेले आहे.

आलियाच्या वाढदिवसाच्या प्रसंगाची साडी काळी शिफॉन बनारसी आहे असे वाटले. नक्की प्रकार माहित नाही. पण जबरी दिसतो व त्यावरचे मागे टिकल्या लावलेले बिलोज एकदम भारी आहे. फुल बॅक ठेवुन ती फॅशन करता येण्याजोगी आहे. घरीच टिकल्यांचे पॅनेल लावता येइल.
करून बघते. तेव्हाचे ते सुनो मिस चॅटर्जी गाने तर खरेच फार जुने आहे. सो स्वीट ऑफ रणवीर.

ओपेन हायमर बघून आल्यावर ऑडिबल वर अमेरिकन प्रॉमेथिअस पुस्तक ऑडिओ बुक घेतले व ऐकत आहे. पुस्तकात फारच व्यवस्थित डिटेल आहे. सिनेमात एका वाक्यात जी घटना उडवली आहे त्याला पुस्तकात एक अर्धा चॅप्टर असे आहे. फारच माहिती पूर्ण पुस्तक आहे. इंटरेस्ट असेल तर नक्की वाचा/ ऐका.

रॉकी ऑर राणी बघितला. फारच सर्वसाधारण आहे. मला फक्त त्यातल्या सगळ्यांच्या साड्या आवडल्या. बाकी सिनेमा typical k Jo!
OTT वर आला तरच बघा!

रानी और रॉकी... डिजेचा रिव्ह्यू... Rofl

बघणार नव्हतेच. अगदी ott वरही बघणार नव्हतेच. आता तर बघणारच नाही.

मंजूताई धन्यवाद Happy
दिपांजलीचा रिव्ह्यू भन्नाट Lol
मला आधी रणवीर सिंग आवडायचा. बाजीराव मस्तानी मधे तर काय डायलॉग फेकलेत..गुंडामधे आवडलेला.रामलीला मधे पण.. वाटायचं बॉलिवूड चा नेक्स्ट सुपरस्टार हाच..पण सिम्बा,जयेशभाई, सर्कस आणि आता रा ऐन्ड रा ने अपेक्षा धुळीस मिळवल्या Sad

Pages