Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केजो घरात इंग्रजी बोलणार्या
केजो घरात इंग्रजी बोलणार्या पात्रांचे हिंदी सिनेमे काढतो म्हणून .
अरिजीत ची टोनल क्वालिटी वेगळी
अरिजीत ची टोनल क्वालिटी वेगळी आहे. सगळ्यांना आवडेलच असं नाही. तसं तर किशोर कुमार, रफी, मुकेश, तलत चे तरी कुठे सगळेच चाहते होते. सी. रामचंद्रला रफी, एस. डी. बर्मनला मुकेश, आणि अनिल विश्वासला किशोर कुमार चा आवाज आवडायचा नाही (सर्वसामान्य चाहत्यांत तर मोठी मतमतांतरं आहेत). पण अरिजीतचा आवाज 'बेसूर' झाल्याचं एकही उदाहरण मला आठवत नाही. लाईव्ह कार्यक्रमात कुणी ऐकलं असेल तर माहित नाही. आता तर टेक्नॉलॉजीमुळे स्टुडिओत रेकॉर्ड होणार्या गाण्यात अर्ध्या-पाव सुराचं सुद्धा करेक्शन होतं.
असो तर रॉकी-रानी पाहिला. मी केजो च्या मूव्हीजचा कट्टर क्रिटीसायझर आहे. पण तरिही मला रॉकी-रानी मधला - टिपिकल केजो सादरीकरण वगळून - अंडरलाईंग थीमचा भाग आवडला. केजो चे सिनेमे प्रेक्षणीय तर असतातच. पण रिस्पेक्ट एव्हरीवन, पुरूषप्रधान मानसिकतेवर केलेलं भाष्य, स्त्री-पुरूष समानता, वैचारिक स्वातंत्र्य हे करंट्स आवडले. (बाकी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स वगैरे आहेतच. पण ते सुद्धा रिलेट करणारा ऑडियन्स असेलच असं मी समजतो).
करन जोहर समाज प्रबोधन करणारा
करन जोहर समाज प्रबोधन करणारा दिग्दर्शक आहे.
त्याच्या या गुणाचा मी कभी अलविदा ना केहना पासून चाहता आहे.
बाकी दुर्गुणा बद्दल नो comments
ख्रिस्तोफर रीव्ह लंगडा असतो
ख्रिस्तोफर रीव्ह लंगडा असतो तो मूव्ही कोणता ? Above Suspicion तर नाही ना ?
सेम प्लॉटवर सनी देओलचा राईट या राँग अशा अजब टायटलचा मूवी युट्यूबवर दिसू लागलाय.
मूळचा चित्रपट पाहण्याचे कारण होते कि ख्रिस्तोफर रीव्ह खरोखरच अपंग झाला होता. त्याने मेहनतीने उभे रहायल सुरूवात केली हे वाचलेले होते.
तो गेला त्या वेळी हा चित्रपट पाहिला होता. भलताच देखणा नट !
अरिजीत बद्दल फेफला +१. तो
अरिजीत बद्दल फेफला +१. तो बेसुरा मलाही कधी दिसला नाही.
त्याची गाणी एकाच टेम्प्लेट मधुन निघालेली असतात, रादर त्याला तशीच गाणी मिळतात ला +१.
अरिजीतचा आवाज 'बेसूर'
अरिजीतचा आवाज 'बेसूर' झाल्याचं उदाहरण>>> बिनते दिल.
पार वाट लावलीय चांगल्या गाण्याची. 'आतिश कदा अदाओं से' या ओळीत तर ड्रायव्हरचा स्टिअरिंगवरचा ताबा सुटल्याने रस्त्यावरुन घसरलेल्या गाडीसारखा धाडधाड इथेतिथे आपटत गेलाय.
बेसुरा पेक्षा एकसुरी म्हणायला
बेसुरा पेक्षा एकसुरी म्हणायला हवं. एक ते प्रेमात विरहात विव्हळणे हा जो जॉनरा धरलाय तो फार कंटाळवाणा अन तोच तो वाटतो. एकदा एका फ्रेन्ड बरोबर कार राइड मधे अरिजित टॉप २५ की काय अशी गाणी ऐकावी लागली होती. डोकेदुखी. एकच गाणे २ तास सुरु आहे असा फील आला होता.
एकच गाणे २ तास सुरु आहे असा
एकच गाणे २ तास सुरु आहे असा फील आला होता. >>>


हनीमूनला हॉटेलजवळ पंजाबी टूरवाला भेटला. भारताबाहेर भारतीय दिसल्याने आनंद झाला होता. मग त्याचीच टॅक्सी घेतली.
चार तास पंजाबी गाणी ऐकल्यावर डोकं उठलं.
विच विच... कुडा ...चिमटा... धाडा..नाल्ला, गल्ला
. 'आतिश कदा अदाओं से' >>
. 'आतिश कदा अदाओं से' >> दॅट्स बाय डिझाईन!

जोक नाही, ते तसं असल्याने मला अरेबिक साँगचा फील येतो. अरेबिकचा असा काही अभ्यास नाही, त्यामुळे बारकावे माहित नाहीत पण धाडधाड आपटत ऐकणं सुरीलं वाटतं इतकं खरं.
Paradise जर्मन, हिंदीत
Paradise जर्मन, हिंदीत,नेटफ्लिक्सवर.
Aeon हि कंपनी लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करायला पैसा देत असते, त्याबदल्यात तुम्ही त्यांना आपली काही १०,१५,२०,४०..वर्षे डोनेट करायची.. नायक या कंपनीचा बेस्ट एम्लॉयी...हि वर्षे गरजू?श्रीमंत लोकांचं आयुष्य वाढवायला वापरण्यात येत..काही शस्त्रधारी संस्था याच्या विरोधात आहेत..घेतलेले कर्ज फेडता न आल्याने नायकाच्या पत्नीची चाळीस वर्षे जबरदस्तीने घेतली जातात...इथून सुरू होते गोष्ट, नायक ती वर्षे परत मिळवण्यासाठी काय करतो..ट्वीस्ट्स आहेत..एंगेजींग सिनेमा.. sci fi, मिस्ट्री सिनेमा.. चांगला आहे.
बर एकसुरा म्हणा , पण मला तो
बर एकसुरा म्हणा , पण मला तो आतिफ आस्लमचेच भारतीय व्हर्जन वाटतो!
अर्थात आतिफ आणि अरिजीतचीही काही गाणी आवडतात पण जणु तेवढाच एक आवाज उरलाय हिन्दी सिनेमात असं झालय.. आवडतात त्यात चन्ना मेरेया, रे कबीरा, मराठीतलं शिव भोला भन्डारी.
पण मोस्ट्ली बाकी बरीच गाणी त्यात आशिकी २ ची गाणी, तू है तो मुझे फिर और क्या चाहिये वगैरे , तुम क्या मिले ,केसरीया तेरा इष्क है पिया ही सगळी एकदमच आतिफ कॅटॅग्गरी अनॉयिंग आहेत , ऐकायला आटो ट्युन्ड वाटतात , “केसरीया तेरा “ मला “बेसुरीया तेरा इष्क है पिया“ वाटायच
“ त्याची गाणी एकाच टेम्प्लेट
“ त्याची गाणी एकाच टेम्प्लेट मधुन निघालेली असतात, रादर त्याला तशीच गाणी मिळतात” - सहमत. पण त्यात गायकापेक्षा कंपोजर्सना जास्त जवाबदार धरावं लागेल. प्रत्येक काळाची आयडेन्टिटी वाटावी अशी एक गाण्यांची स्टाईल बॉलीवूडमधे येते. ९० च्या दशकातली नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, जतिन-ललितची स्टाईल होती. नुसरत च्या बॉलीवूड / भारतीय पॉप अल्बम्समधलल्या आगमनानंतर सूफी गाण्यांचा ट्रेंड आला होता. काही वर्शांपूर्वी ‘पब साँग्ज‘ (छोटे, कॅची र्हिदमिक शब्द, पंजाबी शब्द, रेकॉर्डिंगमधे बीट्स ची लेव्हल व्होकलच्या वरची). तशीच ही सध्याची एक स्टाईल आहे आणि ती जरा जास्त एकसूरी वाटते ऐकायला.
“बेसुरीया तेरा इष्क है पिया“
“बेसुरीया तेरा इष्क है पिया“ डीजे
सुटलीयेस
मला पण अरिजीत नाही आवडत. म्हणजे टॉप २५ वगैरे तर बिग नो नो . डीप्रेशन येईल.
आयत एकच आवडतं पण ते दुसर्या कोणीही गायलं असतं तरी आवडलं असतं कारण ते गाणंच फार सुंदर आहे. चाल, शब्द, अर्थ सगळंच सुंदर!
नक्की बघणार पॅरेडाईज
नक्की बघणार पॅरेडाईज
मी सुद्धा लिस्टमधे टाकला.
मी सुद्धा लिस्टमधे टाकला. आधीचे ८५१ अद्याप पाहिलेले नाहीत.
अरिजित सिंगची शैली माझ्या
अरिजित सिंगची शैली माझ्या आवडीची नाही. पण आयत मुळे तो चांगला गायक आहे हे लक्षात आले.
त्याने एकदा चक्क त्याच्या एका गाण्यात ऑटोट्युनचा वापर केल्याने ट्विट करून निषेध केला होता.
इंडस्ट्रीत सुखविंदरसिंग हा असा गायक आहे ज्याने ऑटोट्युनच्या विरोधात मतं व्यक्त केली आहेत. त्याने आजवर एकाही गाण्यात ऑटोट्युनचा वापर केलेला नाही. अरिजितने सुद्धा नाही केलेला.
अरिजितच्या आवाजाला अजिबात
अरिजितच्या आवाजाला अजिबात फिरत नाही. नुसता एका सुरात रडत राहतो. चुकून आवाज चढवायची वेळ आली तर आवाज फाटतो त्याचा. आशिकी २ मध्ये जरा बरा वाटला होता. त्यानंतर गंडत गेला. लेटेस्ट उदाहरण पी एस २ मधल्या मेरा आसमां जल गया चं आहे. याचं original तामिळ गाणं (chinnanjiru nilave) कितीतरी सरस आहे. अरिजितने एका सुरात ओढलं आहे गाणं. हीच तऱ्हा पी एस २ anthem ची. Original गाणं रहमानच्या आवाजात आहे आणि हिंदीत अरिजितने वाट लावली आहे.
“ भैतादच मिलुन राह्यले सगले.”
“ भैतादच मिलुन राह्यले सगले.” - तुमी तर रिक्शा पारक करून रॉकी आनी रानीची लौश्टोरी बगून याच एकदा. एका गान्यात तर झान्वी (तिची आये असंच म्हनैची), सारा अलीन्खा, अन्यना पान्दे आनी वरुन ध्वन अशे सर्व चान्ग्ले लोक आयेत.
विच विच... कुडा ...चिमटा...
विच विच... कुडा ...चिमटा... धाडा..नाल्ला, गल्ला >>>

केजो आणि आरिजितला बाजूला ठेवा आणि मुख्य विषयाकडे वळा आता.
अन्यना पान्दे >> कैतरी भलतच
अन्यना पान्दे >> कैतरी भलतच वच्ल.
“ कैतरी भलतच वच्ल” -
“ कैतरी भलतच वच्ल” -
टारगट ऑड्यन्स ल्क्शात घ्युन ल्यावं लाग्तं.
सुखविंदर कसला भारी आवाज लावतो
सुखविंदर कसला भारी आवाज लावतो. त्याच्या आवाजाला सिमीलर पर्यायच नाहीये.
सुखविंदर कसला भारी आवाज लावतो
सुखविंदर कसला भारी आवाज लावतो. त्याच्या आवाजाला सिमीलर पर्यायच नाहीये.
<<<<
Actually Ajay Gogawle (of Ajay Atul) sounds like Sukhwinder to me sometimes!
हो, अजय पण मस्त आवाज लावतो
हो, अजय पण मस्त आवाज लावतो(किंवा कोणाला एकेरी उल्लेख खटकल्यास)/लावतात.नटरंग मध्ये सुंदर.
पण आवाजाला ग्रामीण लोकगीत छटा जास्त आहे.ते नैसर्गिक आहे.
पण मला तो आतिफ आस्लमचेच
पण मला तो आतिफ आस्लमचेच भारतीय व्हर्जन वाटतो!
>>>>
आता आतिफ अस्लम चा धागा सुध्दा वर काढावा लागणार
काढावा लागणार वैगरे काही नाही
काढावा लागणार वैगरे काही नाही हो. नाही काढला तरी चालेल. नामोल्लेख झाला म्हणून धागे वर काढायचे असे नसते
काढला वर
काढला वर
त्याची नवीन गाणी जोडायची होतीच त्या धाग्यात
https://www.maayboli.com/node/55443
फरहान ने डॉन 3 ची घोषणा केलीय
फरहान ने डॉन 3 ची घोषणा केलीय... आणि त्यात शाहरुख नाही .. याला म्हणतात आ बैल मुझे मार... शाहरुख शिवाय डॉन कोणी इमॅजिन केलाय???
मायबोलीकरांना कदाचित माहित नसेल - एक जुना डॉन देखील आहे... अमिताभ चा.. एकदा बघा नक्की... शेवट थोडा वेगळा आहे शाहरुख च्या डॉन 1 पेक्षा..
फरहान ने डॉन 3 ची घोषणा केलीय
फरहान ने डॉन 3 ची घोषणा केलीय... आणि त्यात शाहरुख नाही
>>>
बहुधा त्याचे बजेट नसेल
शाहरूख आता फक्त हजार करोडचे पिक्चर करतो.
शाहरुख डॉन १ आणि २ मधे
शाहरुख डॉन १ आणि २ मधे पर्फेक्ट वाटला होता . आता तिसर्यात तो कसा नाही याचे आश्चर्यच वाटले मला. आताच्या त्याच्या अॅक्शन इमेज ला सूट पण झाला असता.
आता रणवीर आहे डॉन३. ही इज केपेबल. आणि फरहान अख्तर करतो आहे म्ह्टल्यावर आशा आहे चांगला करेल.
Pages