शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्द पावसाळा (३)

खाली एकूण ७ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून मॉन्सून संबंधी असलेला ७ अक्षरी शब्द तयार करायचा :

कलपकरूनटाक
परान्नभक्षणासह
अभिरुचीकरता

संहिताचांगली
मननकरण्यात

ताजाकलमसाठी
समाधानपूर्वक

नाही.
मॉन्सून वाऱ्यांच्या संदर्भात विचार करा... ' न्न ' युक्त आहे !

क्रमात दिले :
...
ताजाकलमसाठी
कलपकरूनटाक
समाधानपूर्वक

मननकरण्यात
अभिरुचीकरता

परान्नभक्षणासह
संहिताचांगली

शब्द पावसाळा (४)

खाली दिलेल्या वाक्यातून पावसासंबंधी
एक ७ अक्षरी सलग मराठी शब्द तयार करा :

"तो लहरी, तिचा अतिरेक नकोसा आणि तो झाला तर हाहाकार !"

Pages