शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या सकाळमधील गूढ कोड्यातील फक्त एक शोधसूत्र अडले आहे.

सूत्र : मला (कोणीही) गुडघे टेकलेले आवडत नाही- अगदी (मिहीर) दासने देखील
( तीन अक्षरी)

गु * *

छान.

मला गु <-- उलटे करण्यास गूढ शब्दकोड्यांच्या नियमानुसार तशी सूचना कोड्यातच द्यायला हवी. मागील एका कोड्यात सुद्धा तशी सूचना कोड्यात न देता उलटे केले होते.

आजच्या सकाळमधील हे एक बरे वाटले. तसे गुंतागुंतीचे आहे.
मला जमले आहे. बघा जमते का :
सूत्र :
पन्नास टक्के (वेळा) अमिताभ जर ग्रहण सुरू होताच श्रीराम नामाचा उदघोष करत असेल तर ....

पाच अक्षरी

पन्नास टक्के अमिताभ >>> भ * ता
ग्रहण सुरू>>>ग्र
जर>> र **ज

भरत श्रीराम नामाचा घोष करीत असे.
अग्रज =मोठा भाऊ (श्रीराम)

कुमारसर,धन्यवाद!
भरताग्रज शब्द कसा आला असेल याचा खूप विचार(?) केला.पण तो चहाचा कप माझा नाही. Wink

अश्विनी,

५. वा इ ज (हे उलटे लिहायचे)

८. अ द र

(वाईज अँड अदरवाईज हे पुस्तक)

अरे, असे होते का ? माझी विचाराची दिशा चुकत होती . भाषा विचारल्याने मातृभाषेत , सोप्या , कन्नड अनुषंगाने विचार करत होते.

कन्नड/ कानडी>>>
मी पण बराच वेळ तसाच विचार करत होतो...
या खेपेस त्या कोड्याने तासभर खाल्ला .

पावसात अडकलेले शब्द !
सादर आहे सर्वांसाठी पावसाळा विशेष शब्दखेळ.

या खेळात तुम्हाला पावसासंबंधी ८ मराठी शब्द ओळखायचेत. त्यासाठी खालील दोन चौकटी पहा :

paus khel 1.jpg
......

paus kel 2.jpg

या दोन चौकटींमध्ये मिळून एकूण आठ शब्द अडकलेत. ते हुडकून काढायचे.

शोध माहिती:
· प्रत्येक नाव ५ अक्षरी, सलग आणि मराठी भाषेतच.
· प्रत्येक नावाचे १ले व ५ वे अक्षर चौकट क्रमांक १ मध्ये शोधायचे,
तर दुसरे व चौथे अक्षर चौकट क्रमांक २ मध्ये.
आणि
३रे अक्षर इथे दिलेले नाही. ते तुम्हीच संदर्भाने ओळखायचे..

· प्रत्येक अक्षर एकदा आणि फक्त एका शब्दासाठीच वापरले गेले पाहिजे.
· एक बरोबर उत्तर दिल्यानंतर त्याची ४ अक्षरे पुढच्या खेळासाठी बाद होतील
· एखाद्या अपेक्षित उत्तराऐवजी जर पर्यायी उत्तर दिले गेले तर ते प्रलंबित ठेवले जाईल. खेळाच्या शेवटी ते आपोआप बाद ठरेल.

चला तर, काढा बाहेर या आठ पाऊस-शब्दांना …

होय, ते बरोबरच.
ना दुसरे अक्षर असल्यामुळे दुसऱ्या चौकटीत.
...
प्रत्येक नावाचे १ले व ५ वे अक्षर चौकट क्रमांक १ मध्ये शोधायचे,
तर दुसरे व चौथे अक्षर चौकट क्रमांक २ मध्ये.

Pages