शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर सामूहिक प्रयत्न.
सर्वांना धन्यवाद !
या खेळामध्ये सर्व जण असेच नियमित सहभागी होत राहोत ही इच्छा !

ओळखा किंवा कल्पनेने लिहा !

खाली एका घटनेसंदर्भातील चित्र आहे. ही घटना 2001 ते 2005 या कालखंडातील आहे. सदर घटनेसंदर्भात वृत्तपत्रात काही मजकूर प्रसिद्ध झाला होता. त्यासोबत हे चित्रही छापलेले होते.

puzz pict (2).jpg

तुम्हाला दोन पर्याय आहेत :
१. ही घटना अचूक ओळखा व तिच्याबद्दल थोडक्यात लिहा. किंवा,

२. ओळखता येत नसेल तर अंदाजाने किंवा कल्पनेने या चित्राला व त्या कालखंडाला अनुरूप अशी घटना तयार करा.
…..
संबंधित घटना अचूक ओळखल्यास कौतुक आहेच, पण ते न जमल्यास प्रत्येकाने रंगवलेले कल्पनाचित्र वाचायला मजा येईल !
शक्यतो प्रश्न विचारू नका.

आतापासून पूर्ण 24 तास मुदत देतो. तुमचे तयार झाले की कधीही लिहू शकता. तुमच्या आधी एखाद्याने उत्तर लिहिलेले असेल तर त्याला उगाचच अनुमोदन देऊ नका. तुमच्या मनातले काय असेल तेच लिहा.
धन्यवाद !
..............
माझे उत्तर २४ तासांनीच लिहीन. तोपर्यंत मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही.

सूचना
तुम्हाला जे काय वाटतं ते प्रश्नचिन्ह न वापरता बिनधास्त लिहा !
दिलेली माहिती मर्यादित आहे. प्रत्येकाचे कल्पनाचित्र वाचण्यात मजा येणार आहे.

घटना ओळखणं हा भाग दुय्यम आहे.

अजून ४ ,तास आहेत
आज एकदम शांतता दिसतेय.....

सर्वप्रथम मी मानव यांचे एकमेव प्रतिसादाबद्दल मनापासून आभार मानतो ! त्यांनी छान तर्क लढवून उत्तर दिले आहे. दिलेली माहिती तशी मर्यादित होती. त्यामुळे संबंधित घटना ओळखले जाणे तसे अवघड होते.

आता मी थेट उत्तर देण्याऐवजी माहितीची थोडी भर घालतो. मला खात्री आहे की त्यानंतर क्षणार्धात तुमच्यापैकी कोणीतरी प्रत्यक्ष घटना ओळखेल ! Bw

वृत्तपत्रातील सदर मजकूर मार्च 2004 मधील आहे. चित्रात दाखवलेली कार ही फेरारी आहे. ती एका अतिप्रसिद्ध व्यक्तीला परदेशातून भेट मिळाली होती. ती भारतात आणताना वादंग झाले होते...

आलं का लक्षात ?
आणि आता सांगा बरं भारत पेट्रोलियमचा संबंध काय असावा…….

Sachin Tendulkar ani ferari इतकेच माहीत आहे.तेही आता दिलेल्या क्लु मुळे.

छान.
सदर फेरारीसाठी भारत पेट्रोलियमने खास वेगळे पेट्रोल तयार केले होते. वर ते पेट्रोल सचिनला फुकट देणार अशी घोषणा केली होती !

या बातमीवर टीकाटिपणी करणारे ते वाचकांचे पत्र होते.

खाली एकूण ८ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ८ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.

सूत्र : तुलनात्मक शब्द
...
सर्वपल्लीकृष्णन
सम्यकविकासाच्या

बहारदारसंगीत
वरचामजलानाही
कोणेएकेकाळी

रखेलीसंदर्भात
मरणासन्नअवस्था
दिवसामागूनदिवस

हा हा सामो!
-------
अरे, वर कोडे शिल्लक आहे हे लक्षातच नाही आले.
मला वाटले सामो मी_आर्या यांच्या पोस्ट वरून गमंत करताहेत.

जाऊद्या !
खूप दिवस तिकडे कोणी न फिरकल्याने मलाही याचे उत्तर आठवणार नाही
Bw

आर्या,
हे अपेक्षित उत्तर नव्हते .
परंतु आता तुम्ही एवढे कष्ट घेतले असल्याने पर्यायी बरोबरच धरू !....

अपेक्षित उत्तर
एकसारखेपणाचा

मनोगत मधले एक गूढ शब्दकोडे इथे देतो:
स्पष्टीकरणासहित उत्तर अपेक्षीत.

हा एखाद्या गोष्टीचा आशय समजावून सांगतो तेव्हा कारटी का बिथरतात? (४)

हा एखाद्या गोष्टीचा आशय समजावून सांगतो तेव्हा कारटी का बिथरतात? (४) >> कारण त्यांना वाटत की तुम्ही सतत "टीकाकार" बनता. Happy

टीकाकार उत्तर बरोबर आहे.
स्पष्टीकरण असे आहे:
"हा एखाद्या गोष्टीचा आशय समजावून सांगतो" हा कोड्याचा अर्थ.
"तेव्हा" वाक्य पूर्ण करण्यास वापरलेला शब्द, कोडे सोडवण्यास अनावश्यक.

"कारटी का" "बिथरतात". इथे "बिथरतात" (बिथरणे) हा (ऍनाग्राम इंडिकेटर) अक्षरांची अदलाबदल दर्शवतो.
"कारटी का" या अक्षरांची अदलाबदल करून : "टीकाकार".

पेपरात आलेले एक गूढ शोधसूत्र मला सुटलेले नाही. कोणाला येते का बघा.
सूत्र:
"इतका पगार असून या बाई धड काम करत नाहीत"

आ ? ? ?
चार अक्षरी

Pages