शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खजूर बरोब्बर !
छान
.........................
आता

२. याला **** व कोरडी हवा वाढीसाठी लागते.
३. याचे ** व ** भाजीसाठीही उपयोगात आणतात.
४. याच्या *** पीठ करून त्याचा **** म्हणून वापर करतात.

२. याला उष्ण व कोरडी हवा वाढीसाठी लागते.
४. याच्या खारका पीठ करून त्याचा सुकामेवा म्हणून वापर करतात.

उष्ण >>> ४ अक्शरी हवा.

याच्या खारका पीठ करून त्याचा सुकामेवा म्हणून वापर करतात. >>
हे पर्यायी बरोबर.
अपेक्षित वेगळे होते. पाहा प्रयत्न करून.

वाळवंट म्हणून अतिउष्ण
होय !
.....
३. याचे ** व ** भाजीसाठीही उपयोगात आणतात.

४. याच्या **चे पीठ करून त्याचा **** म्हणून वापर करतात.

गेले वर्षभर शब्दखेळाचे नेहमीचे प्रकार अनेक वेळा सोडवून झालेले होते. म्हणून जरा बदल केला. सर्वांनी मिळून छान सोडवले.
चित्र खेळासाठी चित्र वैयक्तिक संग्रहातील घेणे हे सांगणे न लगे Bw

धन्यवाद

पशुखाद्य माहिती नव्हते. हे अलेक्झँडर कसे आले ते सांगता का कुमार सर ?? मी पाम ट्री गुगल केले तर एक अलेक्झँडर पाम ट्री प्रकार वाचला पण खजूर आणि अलेक्झँडर राजा यांचा काय संबंध आहे ?

सचित्र कोड्याचा बदल आवडला. Happy

अस्मिता,
धन्यवाद.

ही झाडे अलेक्झांडर यांच्या स्वारीबरोबरच सिंधमध्ये आली असावी, असेही मत प्रचलित आहे.
https://vishwakosh.marathi.gov.in/22903/

किती सुरेख भाषा वापरली आहे !
महाच्छदापासून ‘तारा’ नावाचे सुगंधी द्रव्य काढतात व ते पाण्यात वगैरे मिसळून अरबस्तानादी देशांतून सरबतासारखे वापरतात. 
कृत्रिम रीत्या पुं-पुष्पाची स्थूलकणिशे स्त्री-पुष्पांवर बांधून परागण घडवितात. 

खजुराच्या झाडाबद्दल कबीरांचा एक दोहा प्रसिद्ध आहे. त्याचा आशय असा :

हे झाड वाटसरूला सावली देत नाही आणि त्याची फळेही किती उंचावर लागतात !

केया , सुरेखच . Happy
अर्थही छान आहे.
कबीर का दोहा

बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर |
पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर ||

खजूर के पेड़ के भाँति बड़े होने का कोई फायदा नहीं है, क्योंकि इससे न तो यात्रियों को छाया मिलती है, न इसके फल आसानी से तोड़े जा सकते हैं | आर्थात बड़प्पन के प्रदर्शन मात्र से किसी का लाभ नहीं होता |

Tamar (Hebrew: תָּמָר‎) is a female name of Hebrew origin, meaning "date" (the fruit), "date palm" or just "palm tree". ... Tamar was also among the Biblical names used by Puritans in the American Colonial Era in the 17th and 18th centuries.

शिवाय माबोवरच वाचले होते. तमार-ए-हिंद म्हणजे tamarind, चिंच म्हणजे भारतीय खजूर. सहज गंमत म्हणून शेअर करतेयं. Happy

छान !
...................................

९ अक्षरी मराठी शब्द ओळखा.
सूत्र : वागण्याशी संबंधित.

उपशब्दांची सूत्रे अशी :
235 हेतू
67 शब्दाला लावायचा प्रत्यय

19 कोंडाळे
145 मुलाचे नाव
82 हा विचार करतो

67 पण

Pages