शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शमदममदनमदभेद
ज्ञानेश्वरीतील शब्द

अर्थ : मनसंयमन व इंद्रिय विजय यांच्या योगाने कामाचा गर्व नाहीसा करणारा.
............
धन्यवाद !

खाली एकूण १० शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून १०अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : कामाच्या आखणीबद्दल.

अमरपट्टाधारी
अथर्ववेदातून
जबाबदारीतून

कलरवकितीतो
काकूबाईचीआई
पूरियागायकाने

मनेकानंतरच्या
माहुताकडील

नबाबआणिरुबाब
नियोजनमंडळ

..............

‌अमरपट्टाधारी - र
‌अथर्ववेदातून - र्व
‌जबाबदारीतून -ज

‌कलरवकितीतो- व
‌काकूबाईचीआई - आ
‌पूरियागायकाने - पू

‌मनेकानंतरच्या -का
‌माहुताकडील- मा

‌नबाबआणिरुबाब- न
‌नियोजनमंडळ -यो

कामावरपूर्वआयोजन

'पूर्व' आणि योज.. हे बरोबर आहे .

सुधारित सूत्र : एखाद्या कामाची आखणी करावी आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित व्हावी अशा प्रसंगी हा शब्द वापरतात.

या खेळासाठी एक परिच्छेद दिलेला आहे.
त्यातील काही शब्द पुसून तिथे कंसात अंक घातले आहेत. अंक = पुसलेल्या अक्षरांची संख्या.
अंकांच्या जागी सुयोग्य शब्द लिहावेत.
उत्तरे ४ तासांनी लिहा.
.........

सोय आणि (५) यांचे विशेष (२) असते. काय (५) ना ? पण नीट (३) करून पहा; नक्की पटेल. जरा आपल्या (३) पिढ्या आठवून पहा. तेव्हा समाजात (४) यंत्रांची (५) होती. मूळ (२) संस्कृतीचे (२) लोकांमध्ये टिकून होते. त्यामुळे (४) श्रम न (५) केले जात.

(७) चटणी करायची झाली तर (४) किंवा (२-४) हीच साधने होती. अगदी पीठ सुद्धा (३) किंवा बाहेर (३) कुठे मिळत होते ? घरच्या (५ ) ते दळावे लागे. कपडे (४ ) आणि (४ ) ते देखील आपल्या हातांनीच. त्यामुळे शरीराच्या विविध (५ ) आपोआप (३ ) घडे. घराबाहेर फिरायची दोनच (३ ) - एकतर पायी चालणे किंवा (४ ). त्यामुळे (४ ) लोकांची अंगकाठी कशी (५ ) असे. अशा (६ ) काय बिशाद होती पोटे (४ ) ! आजही जंगलात राहणाऱ्या (६ ) लोक दिवसाकाठी तब्बल बारा (५ ) चालतात. त्यांच्या कित्येक (४ ) मधुमेह किंवा (६) हे शब्दसुद्धा माहित नाहीत.

(८) शहरीकरण वाढले. तिथली (४) वाढली तशी शहरे (४ ). अंतरे वाढत गेल्यामुळे (४ ) गरज निर्माण झाली. आता मर्यादित (५ ) अधिकाधिक लोकांना (३) लागते. त्यातून उभ्या राहिल्या (५ ) इमारती. मग काय, त्या प्रत्येकात वर जाण्यासाठी (५) बसवणे (३) आलेच. यातून वर चढण्याचा (९) व्यायामही थांबला.

(५) काय, तर आपले (४) कष्ट कमी करण्यासाठी यंत्रे आपल्या (४) अवतरली. पुढे त्यांचा (४ ) झाल्याने आपण यंत्रांचे (३) होऊन बसलो. विविध यंत्रांचा (४) वापर आणि मूलभूत शारीरिक (५ ) विसरू न देणे हे आपल्या (३) राहील.
.........................................

सोय आणि (५ आळशीपणा ) यांचे विशेष (२ नाते) असते. काय (५ पटत नाही ) ना ? पण नीट (३ विचार) करून पहा; नक्की पटेल. जरा आपल्या (३ आधीच्या ) पिढ्या आठवून पहा. तेव्हा समाजात (४ घरकाम ) यंत्रांची (५ कमतरता) होती. मूळ (२ श्रम) संस्कृतीचे (२ तत्व ) लोकांमध्ये टिकून होते. त्यामुळे (४ सारासार ) श्रम न (५ टाळता काम ) केले जात.

(७ लसूणखोबऱ्याची) चटणी करायची झाली तर (४ खलबत्ता) किंवा (२-४ पाटा वरवंटा) हीच साधने होती. अगदी पीठ सुद्धा (३ दळून/ चक्कीत) किंवा बाहेर (३ तयार) कुठे मिळत होते ? घरच्या (५ जात्यावरच ) ते दळावे लागे. कपडे (४ धुवायचे) आणि (४ ) ते देखील आपल्या हातांनीच. त्यामुळे शरीराच्या विविध (५ अवयवांना ) आपोआप (३ व्यायाम ) घडे. घराबाहेर फिरायची दोनच (३ साधने) - एकतर पायी चालणे किंवा (४ सायकल ). त्यामुळे (४ बहुतांशी ) लोकांची अंगकाठी कशी (५ सडसडीत/सडपातळ) असे. अशा (६ दिनचर्येमुळे ) काय बिशाद होती पोटे (४ सुटायची ) ! आजही जंगलात राहणाऱ्या (६ जमातीमधली ) लोक दिवसाकाठी तब्बल बारा (५ किलोमीटर ) चालतात. त्यांच्या कित्येक (४ पिढ्यांमधे ) मधुमेह किंवा (६ हृदयविकार) हे शब्दसुद्धा माहित नाहीत.

(८ खेडेगावात देखील) शहरीकरण वाढले. तिथली (४ लोकसंख्या) वाढली तशी शहरे (४ विस्तारली). अंतरे वाढत गेल्यामुळे (४ वाहनांची ) गरज निर्माण झाली. आता मर्यादित (५ जागेवरती) अधिकाधिक लोकांना (३ रहावे) लागते. त्यातून उभ्या राहिल्या (५ टोलेजंग ) इमारती. मग काय, त्या प्रत्येकात वर जाण्यासाठी (५ उद्वाहकाचे ) बसवणे (३ ओघाने) आलेच. यातून वर चढण्याचा (९ पायांना होणारा रोजचा/ मार्ग सुलभ झाल्यामुळे ) व्यायामही थांबला.

(५ सांगायचा मुद्दा) काय, तर आपले (४ शारीरिक) कष्ट कमी करण्यासाठी यंत्रे आपल्या (४ दुनियेत) अवतरली. पुढे त्यांचा (४ अतिरेक ) झाल्याने आपण यंत्रांचे (३ गुलाम) होऊन बसलो. विविध यंत्रांचा (४ समतोल ) वापर आणि मूलभूत शारीरिक (५ हालचालीना/ क्षमतेलाही) विसरू न देणे हे आपल्या (३ हातात) राहील.

सोय आणि (५ आळशीपणा ) यांचे विशेष (२ नाते) असते. काय (५ गंमतीशीर ) ना ? पण नीट (३ विचार) करून पहा; नक्की पटेल. जरा आपल्या (३ आधीच्या ) पिढ्या आठवून पहा. तेव्हा समाजात (४ घरकाम ) यंत्रांची (५ कमतरता) होती. मूळ (२ श्रम) संस्कृतीचे (२ तत्व ) लोकांमध्ये टिकून होते. त्यामुळे (४ सारासार ) श्रम न (५ टाळता काम ) केले जात.

(७ लसूणखोबऱ्याची/ तोंडीलावण्यासाठी) चटणी करायची झाली तर (४ खलबत्ता) किंवा (२-४ पाटा-वरवंटा) हीच साधने होती. अगदी पीठ सुद्धा (३ दळून/ चक्कीत) किंवा बाहेर (३ तयार) कुठे मिळत होते ? घरच्या (५ जात्यावरच ) ते दळावे लागे. कपडे (४ धुवायचे) आणि (४ ) ते देखील आपल्या हातांनीच. त्यामुळे शरीराच्या विविध (५ अवयवांना ) आपोआप (३ व्यायाम ) घडे. घराबाहेर फिरायची दोनच (३ साधने) - एकतर पायी चालणे किंवा (४ सायकल ). त्यामुळे (४ बहुतांशी ) लोकांची अंगकाठी कशी (५ सडसडीत/सडपातळ) असे. अशा (६ दिनचर्येमुळे ) काय बिशाद होती पोटे (४ सुटायची ) ! आजही जंगलात राहणाऱ्या (६ जमातीमधली ) लोक दिवसाकाठी तब्बल बारा (५ किलोमीटर ) चालतात. त्यांच्या कित्येक (४ पिढ्यांमधे ) मधुमेह किंवा (६ हृदयविकार) हे शब्दसुद्धा माहित नाहीत.

(८ खेडेगावांमधेसुद्धा/ गावखेड्यांतदेखील) शहरीकरण वाढले. तिथली (४ लोकसंख्या) वाढली तशी शहरे (४ विस्तारली). अंतरे वाढत गेल्यामुळे (४ वाहनांची ) गरज निर्माण झाली. आता मर्यादित (५ जागेवरती) अधिकाधिक लोकांना (३ रहावे) लागते. त्यातून उभ्या राहिल्या (५ टोलेजंग ) इमारती. मग काय, त्या प्रत्येकात वर जाण्यासाठी (५ उद्वाहकाचे ) बसवणे (३ ओघाने) आलेच. यातून वर चढण्याचा (९ ) व्यायामही थांबला.

(५ सांगावयाचे) काय, तर आपले (४ शारीरिक) कष्ट कमी करण्यासाठी यंत्रे आपल्या (४ दुनियेत) अवतरली. पुढे त्यांचा (४ अतिरेक ) झाल्याने आपण यंत्रांचे (३ गुलाम) होऊन बसलो. विविध यंत्रांचा (४ समतोल ) वापर आणि मूलभूत शारीरिक (५ हालचालीना/ क्षमतेलाही) विसरू न देणे हे आपल्या (३ हातात) राहील.

मूळ :

सोय आणि (आळशीपणा) यांचे विशेष (सख्य) असते. काय (दचकलात) ना ? पण नीट (विचार) करून पहा; नक्की पटेल. जरा आपल्या (पूर्वीच्या) पिढ्या आठवून पहा. तेव्हा समाजात (एकूणच) यंत्रांची (कमतरता) होती. मूळ (कृषी) संस्कृतीचे (अंश) लोकांमध्ये टिकून होते. त्यामुळे (शारीरिक) श्रम न (कुरकुरता) केले जात.

(स्वयंपाकघरात) चटणी करायची झाली तर (खलबत्ता) किंवा (पाटा-वरवंटा) हीच साधने होती. अगदी पीठ सुद्धा (तयार) किंवा बाहेर (दळून) कुठे मिळत होते ? घरच्या (जात्यावरच) ते दळावे लागे. कपडे (धुवायचे) आणि (पिळायचे) ते देखील आपल्या हातांनीच. त्यामुळे शरीराच्या विविध (अवयवांना) आपोआप (व्यायाम) घडे. घराबाहेर फिरायची दोनच (साधने) - एकतर पायी चालणे किंवा (सायकल). त्यामुळे (तत्कालीन) लोकांची अंगकाठी कशी (शिडशिडीत) असे. अशा (जीवनशैलीत) काय बिशाद होती पोटे (सुटायची) ! आजही जंगलात राहणाऱ्या (आदिवासींमध्ये) लोक दिवसाकाठी तब्बल बारा (किलोमीटर्स) चालतात. त्यांच्या कित्येक (पिढ्यांमध्ये) मधुमेह किंवा (हृदयविकार) हे शब्द सुद्धा माहित नाहीत.

(औद्योगिकरणामुळे) शहरीकरण वाढले. (लोकसंख्या) वाढली तशी शहरे (विस्तारली). अंतरे वाढत गेल्यामुळे (वाहनांची) गरज निर्माण झाली. आता मर्यादित (क्षेत्रफळात) अधिकाधिक लोकांना (रहावे) लागते. त्यातून उभ्या राहिल्या (गगनचुंबी) इमारती. मग काय, त्या प्रत्येकात वर जाण्यासाठी (उदवाहक) बसवणे (ओघाने) आलेच. यातून वर चढण्याचा ( गुरुत्वाकर्षणविरोधी) व्यायामही थांबला. (एकंदरीत) काय, तर आपले (शारीरिक) कष्ट कमी करण्यासाठी यंत्रे आपल्या (जीवनात) अवतरली. पुढे त्यांचा (अतिरेक) झाल्याने आपण यंत्रांचे (गुलाम) होऊन बसलो. विविध यंत्रांचा (मर्यादित) वापर आणि मूलभूत शारीरिक (हालचालींना) विसरू न देणे हे आपल्या (हिताचे) राहील.

बासरी साठी समानार्थी शब्द
पावा, वेणू, मुरली, अलगुज

इत्यादी परिचित आहेत.

अजून एक तीन अक्षरी शोधा. मला कालच मिळाला.
छान आहे

Pages