शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही
जरा अर्थ काय असेल हा विचार करा

खाली एकूण ९ शब्द दिले आहेत. त्या प्रत्येकातील फक्त एकेक अक्षर घ्यायचे आणि नंतर योग्य तो क्रम लावून ९ अक्षरी मराठी शब्द तयार करायचा.
सूत्र : कपडे अथवा पोषाखासंबंधी

..............
अजस्त्रमहाकाय
मरणकल्पनेशी
वडिलांचीकीर्ती

परवडेनासेझाले
प्राध्यापकमहोदय
महामंडळापासून

अरवलीपर्वताच्या
परतफेडीतूनच
निवडल्यानंतरचा

एकाच शब्दाचे ८ विविध अर्थ ओळखायचे आहेत. या प्रत्येकासाठी वेगळे शोधसूत्र दिले आहे. प्रत्येकाच्या कंसात अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या आणि इतर सूचना.

ते सर्व ओळखल्यावर शेवटी मूळ शब्द (जो यात नाही तो) ओळखा.

1. लांबीला खूप पण अरुंद (३)
2. अनाथांना देतात ( 3, एका जोडाक्षरासहित)
3. दर्जा (२, एका जोडाक्षरासहित)

4. तळ (3)
5. पाणी साठणारी जागा (3)
6. कोरडा असो वा ओला, त्रासदायकच (३)

7. संधान (३)
8. हिम्मत (३)

२ दत्तक
५ तलाव/ डबके/ सखल
६ दुष्काळ

कविन, सियोना
चांगला प्रयत्न पण सर्व नाही.
(पर्यायी उत्तरे ही 'मूळ' शब्दाचे अर्थ नाहीत ).

१ >>>> कापडाचा प्रकार आहे>>> म्हणजे धोतर/सोवळे/ पातळ (असे काही जे लांबीने जास्त आणि त्यामानाने रुंदीला कमी असते असे)?

Pages