शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८. सहानुभूती
बरोबर !
अस्मिता,
संपवून टाका !

हे राहिलेत :

२. श्रम कमी करणारे (२)
३. सहन होत नाही (३)

५. ध्वनी संदर्भात (३)
६. उपकरण (३)

५. ध्वनी संदर्भात (३) आवाज, आरोळी , किंकाळी
६. उपकरण (३)

म्हणजे एक उपकरण का उपकरणाचा समानार्थी शब्द ?

सर्व उत्तरे:
१. कल्पना (२) ……. युक्ती
२. श्रम कमी करणारे (२)…..यंत्र

३. सहन होत नाही (३)... तिडीक
४. मतभेदातून होते (३).... भांडण

५. ध्वनी संदर्भात (३).... मंजुळ
६. उपकरण (३)....... साधन

७. प्रेम (२)..... माया
८. जाणीव (५) ... सहानुभूती

मूळ शब्द : कळ

व्हॉट्सऍप वरून साभार:

स्वयंपाक घरातील भांडी आणि पदार्थ खूप अस्ताव्यस्त झाले आहेत. ते व्यवस्थित , नीटनेटके मांडायचे आहे.
उदाहरण :- मीचबूटलिंठणी -- मीठ लिंबू चटणी ।

1:- ईकवाढत
2:- लेदु पाचेतेधा
3:- चेहाडेभांच
4:- लीवर चुकर भाची
5:- धणी पाटचटे
6:- पोगळीवांळड
7:- करनीपापल
8:- टपोला पाणटल
9:- भाळी कमिस चीर
10:- तखर भासा
11:- चीबणी लोच्याणर
12:- वडणीफोरणचे
13:- वांभर गेले
14:- रीत कुडीभेंकुर
15:- लींकाथापी कडीदालीठचे
16:- कलीसातु चीबु चीपाजु
17:- चाचामी व्याचीरवतरचा
18:- वरची घमाडचा वंठ
19:- उराप झाळी नथल
20:- लाग पेडवा

13:- वांभर गेले>>>> भरले वांगे

14:- रीत कुडीभेंकुर>>> कुरकुरीत भेंडी
15:- लींकाथापी कडीदालीठचे>>>> काकडीदालींचे थालीपीठ

10. साखरभात
11.लोणच्याची बरणी

Pages